Friday, 7 May 2021
Friday Flame Against biological & ideological Covid
देशातील जैविक आणि वैचारिक कोविडच्या विरोधात आज #FridayFlameAgainstCovid प्रज्वलित केली जाणार आहे.
कोविडमध्ये बळी गेलेल्यांसाठी संवेदना, कोविड योद्धयांना समर्थन (Solidarity) आणि कोविडच्या आडूनही द्वेषाचं राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी घराघरात दिवा लावा, असं आवाहन राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केलं आहे.
आज संध्याकाळी 6 वाजता (Live on fb.com/RSDIndian) होणाऱ्या फ्रायडे फ्लेम कार्यक्रमात देशातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. मल्लिका साराभाई, कविता लंकेश, कन्हैया कुमार, डॉ. बाबा आढाव, निखिल वागळे, नंदिता दास, आनंद ग्रोव्हर, अश्रफ अली, नंदिनी सुंदर, इंदिरा जयसिंग, शांता सिन्हा, एअर मार्शल मतेश्वरन, डॉ. झहीर काझी, नितीन वैद्य, सुरेखा दळवी, प्रतिभा शिंदे, अंजली आंबेडकर असे अनेक मान्यवर सामील होणार आहेत.
फ्रायडे फ्लेम ही केवळ आदरांजली सभा नाही. करोनाची दुसरी लाट ही मानव निर्मित म्हणजे सरकारच्या अपयशाची आपत्ती आहे. आरोग्य सुधारणांकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष, लसीकरणाबाबत दाखवलेली कमालीची बेफिकिरी हे त्याचं कारण तर आहेच. दुसऱ्या बाजूला प्रादेशिक शक्ती संपवण्यासाठी निवडणुकांमधला उन्मादी गर्दीचा घाट, कुंभमेळ्याला दिलेली परवानगी, मंदिर उभारणीतून करोनाग्रस्त जनतेला राम भूल देण्याचा झालेला प्रयत्न या सगळ्याचा परिपाक म्हणजे ही आपत्ती आहे.
डॉ. गणेश देवी यांनी म्हणूनच Biological आणि Ideological करोनाच्या विरोधात Friday Flame असा शब्दप्रयोग केला आहे.
डॉ. गणेश देवी हे काही राजकीय नेते नाहीत. भाषांचं काम करणारा, आदिवासी आणि भटक्या विमुक्तांमध्ये रमणारा माणूस. पण संसदेत CAA, NRC ची विधेयकं मांडली जाण्याच्या कैक महिने अगोदर धारवाडवरून त्यांनी या प्रस्तावित विधेयकांच्या विरोधात जागृतीची मोहीम छेडली होती. देशभरातल्या जाणकारांना त्यांनी 14 भाषांमधून या कायद्यांबद्दल आधीच जागरूक केलं होतं. धारवाडला देशभरातील अनेकांना त्यांनी त्यासाठी मुद्दाम बोलावलं होतं. जवळपास सगळ्याच राजकीय नेत्यांना त्यांनी पत्र लिहली होती. आणि भिन्न समाज घटकातील नेत्यांनाही.
शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीत पेटायचं होतं, त्याआधीच देवींनी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील APMC ना भेट देऊन याबद्दल जागं करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणतात, 'आंदोलनाचं नेतृत्व करणं हे माझं काम नाही. लिहण्याचं, बोलण्याचं, सांगण्याचं काम आहे.' ती जागृती, ते आंदोलन सामान्य कार्यकर्त्यांमधून उभं रहावं यासाठी पडद्यामागे राहून कौशल्याने आंदोलनाचा पट विणण्याचं काम देवी करत आहेत.
फ्रायडे फ्लेम ही अशीच उद्याच्या आंदोलनाला प्रेरित करणारी घटना ठरेल, यात शंका नाही. विश्वास हरवलेल्या सर्वसामान्यांना त्यातून किमान दिलासा मिळेल. कार्यकर्त्यांना एकत्र येण्याला गती मिळेल. आणि यातूनच पुढची काही आखणी होऊ शकेल.
करोना लसीकरणातून उद्या जाईलही. पण विद्वेष आणि भेदभावाचं राजकारण दूर सारण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. फ्रायडे फ्लेम ही त्याची सुरवात ठरावी.
--------------------------
फ्रायडे फ्लेमचा कार्यक्रम -
पुढील पाच शुक्रवारी अशा ऑनलाईन सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.
पुढचा शुक्रवार पत्रकारांसाठी आहे. देशातील मान्यवर पत्रकार सहभागी होणार आहेत.
दि. 14 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता
देशभरातील कोरोनात बळी गेलेल्या जवळपास 500 (महाराष्ट्रात 124) पत्रकारांना अभिवादन आणि एकजूट दाखवण्यासाठी.
तिसरा शुक्रवार दि. 21 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता
कोरोनात बळी गेलेल्या देशातील फ्रंट लाईन वर्कर्स, डॉक्टर्स, नर्सेस, आशाताई, शिक्षक, कामगार यांच्या बलिदानाला अभिवादन आणि त्यांच्या लढाईला पाठिंबा.
चौथा शुक्रवार दि. 28 मे, रोजी संध्याकाळी 6 वाजता
जैविक आणि वैचारिक कोविड विरोधात लढणाऱ्या देशभरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा निर्धार.
पाचवा शुक्रवार, दि. 4 जून,
धैर्य, एकजूट, आशा आणि स्वातंत्र्य, समता या मूल्यांशी आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचा उपवास.
- आमदार कपिल पाटील
कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल
जबरदस्त ००० चांगली माणसं चांगले काम
ReplyDeleteYes I am ready
ReplyDeleteSir.we can not recovered lost person,buttogetherly we can help their families.We are listening about the side effect of 5G.testing,if this is true then it must be stop for entire humankind and planet...
ReplyDeleteYes sir
ReplyDeleteYes sir
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteYes sir
ReplyDeleteYes Sir.
ReplyDeleteYes sir
ReplyDeleteहो सर.
ReplyDelete