हे मत आहे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं. भाजप युपीच्या मार्गाने केंद्रात सत्तेत गेला. त्यांना युपीतूनच पायउतार करायला लावू, अखिलेश यादव ठाम विश्वासाने सांगत होते.
लखनऊचं खास आमंत्रण होतं. सपाचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी गेले दोन महिने मागे होते. आझमी साहेब तसे जिद्दी. कर्मठ समाजवादी. त्यांच्या बेबाक वक्तव्याने कधी वाद होतो. पण अंतर्बाह्य निर्मळ माणूस. तितकाच प्रेमळ. ओठात आणि पोटात वेगळी भाषा नाही. विधिमंडळात गेल्या 20 वर्षात माझा हा अनुभव राहिला आहे. त्यांच्यासोबत म्हणून बुधवारी, 10 सप्टेंबर 2025 रोजी लखनऊला उतरलो.
लखनऊमधील डॉ. राममनोहर लोहिया ट्रस्टच्या दालनात अखिलेश यादव, अबू आझमी, ज्येष्ठ समाजवादी नेते राजेंद्र चौधरी या नेत्यांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली. देशभर वेगवेगळ्या आघाड्यांवर विखुरलेल्या समाजवाद्यांशी अखिलेश यादव स्वतः बोलत आहेत. पक्ष, आघाड्यांची नावं वेगळी असली, विघटन आणि विखुरलेपण खूप असला तरीही समाजवादी विचारांची ताकद देशभर मोठी आहे. 100 ते 150 खासदारांचा ब्लॉक बनवण्याची ताकद आहे. प्रश्नांशी भिडतात समाजवादीच. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल, सचोटीबद्दल विरोधकही शंका घेत नाहीत. अखिलेश यादव समाजवादी आंदोलनातलं सर्वात तरुण नेतृत्व आहे. नेताजी मुलायमसिंह यादव यांचा वारसा त्यांना आहे. ते पक्के लोहियावादी आहेत. त्यापेक्षा मधू लिमये आणि जनेश्वर मिश्रा यांचा प्रभाव अधिक आहे.
अखिलेश यादव यांनी सर्वात आधी चौकशी केली ती जॉर्ज फर्नांडिस यांच्या कामगार संघटनांबद्दल. नुकत्याच मुंबईत झालेल्या बेस्ट पतपेढी निवडणुकीत बेस्ट वर्कर्स युनियनने भाजप आणि उबाठा सेना या दोघांनाही हरवल्याची कल्पना त्यांना होती. मुंबईतल्या कामगारांमधील समाजवादी प्रेरणेचं त्यांना कौतुक वाटत होतं. ''महाराष्ट्रातील कामगार चळवळीने, नेत्यांनी देशातील समाजवादी आंदोलनाला खूप काही दिलं आहे'', अखिलेश यादव सांगत होते.
महाराष्ट्रातील समाजवादी नेत्यांची आठवण निघाली. अखिलेशजी म्हणाले, ''सामाजिक न्यायाच्या बहुतांश चळवळी महाराष्ट्रात झाल्या. या चळवळींनी नेहमीच देशाला नवीन दिशा आणि प्रेरणा दिली आहे.''
पण त्यांना एक प्रश्न पडला होता. महाराष्ट्रात चळवळींचा इतका मोठा इतिहास असूनही इथे समाजवादी किंवा सामाजिक न्यायाचं राजकारण का उभं राहू शकलं नाही ?
फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख आपसूक होता. अचानक अखिलेशजीनी बेल मारली आणि आपल्या सहकार्याला म्हणाले, ''कपिल जी को हम ने बनाई हुई सावित्रीबाई फुले की मूर्ती भेट देते है ।'' ब्राँझची मूर्ती होती ती. खूप जड पण खूपच सुंदर.
अखिलेशजी मुख्यमंत्री असताना 1 लाख 78 हजार शिक्षा मित्रांना कायम करण्याचा निर्णय झाला होता. महाराष्ट्रातील वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न मी सभागृहात आणि रस्त्यावर लावून धरला. त्या प्रयत्नांतून ते कायम झाले होते. त्याच धर्तीवर युपीमध्ये तोडगा कसा काढता येईल, त्यासाठी स्वत: अखिलेशजी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री रामगोविंद चौधरी यांनी मला 2015 मध्ये लखनऊमध्ये बोलावून घेतलं होतं. त्यावेळी शिक्षक भारतीच्या वतीने सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचं चित्र अखिलेशजींना आम्ही भेट दिली होती. त्याची आठवण निघाली. अखिलेशजींनी विचारलं, ''त्या फोटोशी सावित्रीबाईंची मूर्ती जुळतेय ना ?''
''त्यातल्याच फोटोवरून फातिमाबींचीही प्रतिमा आम्ही तयार करतो आहोत'', हे सांगायला ते विसरले नाहीत.
''देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील चळवळींची एकजूट व्हायला हवी'', असे ते सांगत होते. पण चर्चा फक्त एवढीच मर्यादित नव्हती. जगभरच्या समाजवादी अजेंड्याच्या पुनर्शोधाची आणि राजकीय पुनर्गठनांच्या घडामोडींची चर्चा निघाली.
George Monbiot आणि Peter Hutchison यांच्या Invisible Doctrine या नव उदारमतवादावरील पुस्तकाचा संदर्भ आला. Thomas Piketty यांच्या Time for Socialism या पुस्तकाबाबतही अखिलेश यादव यांनी विचारलं.
''महाराष्ट्रात यावर काही चिंतन होतंय का ?'' असा प्रश्न त्यांनी विचारला. ''नवीन काही पुस्तकं असतील तर मला पाठवा,'' असंही ते म्हणाले.
प्रा. नीरज हातेकर व अन्य काही यावर लिहिताहेत. ते पाठवतो, असं मी त्यांना त्यांना संगितलं.
''महाराष्ट्र आणि गुजरातची थोडी जरी साथ युपीला मिळाली तरी आपण देशात सत्ताबदल घडवू शकतो'', असं गणित त्यांनी मांडलं.
''भाजप यूपीच्या रस्त्याने केंद्रात सत्तेवर आली आहे. त्यांना यूपीमधूनच घालवू'', असं सांगताना अखिलेशजींच्या चेहऱ्यावर ठाम विश्वास जाणवत होता.
देशासमोर आरएसएसचे संकट मोठे आहे. आणि या संकटाचा सामना फक्त समाजवादीच करू शकतात. त्यासाठी अखिलेश यादव यांनी पुढे येऊन समाजवादी एकजुटीचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, असं मी त्यांना सुरवातीलाच म्हणालो. त्यावर ते म्हणाले, ''फक्त मधु लिमये यांनी आणि मुलायमसिंह यादव यांनी हा संघाचा धोका ओळखला होता.''
ते प्रामाणिकपणे मधु लिमये यांचं योगदान नोंदवत होते. त्यांच्या खुर्चीच्या मागे ज्या महापुरुषांचे फोटो लावले होते, त्यात मधु लिमये होते.
बैठकीत उपस्थित असलेले ज्येष्ठ समाजवादी नेते राजेंद्र चौधरी यांनी यासंदर्भात महत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, ''साने गुरुजी आणि एस. एम. जोशी यांनी आर. एस. एस. ला काऊंटर करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली होती. मात्र राष्ट्र सेवा दल उत्तर भारतात वाढवण्यात आम्ही कमी पडलो. सेवा दल वाढलं पाहीजे.''
मराठवाड्यातील अजित शिंदे हे तरुण कार्यकर्ते सध्या राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि अतिशय ताकदीने देशभर सेवा दल वाढीसाठी काम करत असल्याची माहिती मी त्यांना दिली. ते मुंबईत आणि दिल्लीत एक कार्यक्रम घेत आहेत, त्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल, असं अखिलेशजी आणि चौधरी दोघांनाही सांगितलं.

''जरूर आयेंगे.'' ते म्हणाले.
- कपिल पाटील
अध्यक्ष, हिंद मजदूर किसान पंचायत, महाराष्ट्र राज्य
***