Sunday, 30 July 2017

उद्यापासून माझे बेमुदत उपोषण



३० जुलै २०१७
प्रति,
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

सप्रेम नमस्कार,

महोदय,
मुंबईतील शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतूनच झाले पाहिजेत हा आग्रह मी आपणाकडे गेली दोन महिने धरतो आहे. १७ मे २०१७ चा रात्रशाळांचा जीआर  तर ३ जून २०१७ चा पगाराचा जीआर आपणाकडून वारंवार आश्वासन मिळूनही मागे घेण्यात आलेले नाहीत किंवा त्यात सुधारणा झालेली नाही. 

जुलै पेड इन ऑगस्टचा पगार युनियन बँकेतूनच करायचा आणि पुढच्या पगारांसाठी शिक्षकांना चॉईस द्यायचा. युनियन बँक की मुंबई बँक यापैकी एक पर्याय शिक्षकांना निवडू द्या, इथपर्यंतची तयारी शिक्षक भारतीने दाखवली आपण लगेच तत्वतः मान्यताही दिली. शिक्षणमंत्र्यांशी बोलून कळवतो असं सांगितलं. मात्र अद्यापी उत्तर आलेलं नाही. 

शिक्षकांना त्यांच्या हक्काचा पगार वित्त विभागाच्या नियमानुसार राष्ट्रीयकृत बँकेतूनच मिळाला पाहिजे. मात्र उद्याच्या १ तारखेला गेल्या सहा वर्षात प्रथमच पगार होणार नाहीत. उलट जोर, जबरदस्ती, जुलूम आणि धाकधापटशा सुरु आहेत. शिक्षण विभागाचे अधिकारी आणि बँकेचे अधिकारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना धमकावत आहेत. त्यांना अपमानीत करत आहेत. बँकेच्या काही प्रतिनिधींची मजल शिक्षक, मुख्याध्यापकांना आईवरुन शिव्या घालण्यापर्यंत गेली आहे. हे सहन करण्याच्या पलिकडे आहे. तरीही शिक्षकांची एकजुट भंगलेली नाही. हा अभूतपूर्व सत्याग्रह आहे. 

मी अनेकदा आपल्याला भेटलो. आपण प्रत्येकवेळी मा. शिक्षणमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करता. मा.शिक्षणमंत्री इतके प्रबळ आहेत काय? की मा.मुख्यमंत्री इतके दुर्बळ आहेत? 

उद्ध्वस्त रात्रशाळा -
मुंबईतल्या रात्रशाळा तर शिक्षणमंत्री आणि शिक्षण सचिवांनी बंद पाडल्या आहेत. न्यायालयाने तुमचा जीआर बरोबर ठरवला असं तुम्ही म्हणाल. तर मग, ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांना परत का बोलवावं लागलं? कारण ज्युनिअर कॉलेजमधला एकही शिक्षक सरप्लस नसताना आपण सगळ्या शिक्षकांना काढून टाकलं होतं. नाईट ज्युनिअर कॉलेजच बंद पडली होती. आता नाईटच्या माध्यमिक शिक्षकांनाही परत बोलवा आणि मुलांचं शिक्षण चालू ठेवा, एवढीच माफक मागणी आहे. दीड महिना झाला नाईटच्या मुलांचं शिक्षण बंद आहे. पण सरकारला पर्वा नाही. या देशातल्या चातुर्वण्य व्यवस्थेने २ हजार वर्षे बहुजन शुद्रांचं शिक्षण बंद ठेवलं. नाईटचं शिक्षण बंद करुन त्याची पुन्हा तुमच्या राज्यात सुरवात झाली आहे. 

शिक्षकांच्या नोकऱ्या का घालवता? -
रात्रशाळेचे १,०१० शिक्षक, ३४८ शिक्षकेतर कर्मचारी आणि राज्यातील दिवस शाळांमधील ७ हजार शिक्षक यांच्या सेवा आपल्या सरकारने समाप्त केल्या आहेत. २००५ नंतरच्या शिक्षकांच्या सेवाही समाप्त करण्यासाठी चौकशीच्या नोटीसा जारी झाल्या आहेत. शासनाच्या निर्णयानुसार आणि मा.मुंबई हायकोर्टाच्या सुमोटो आदेशानुसार नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या घालवण्याचं कारण काय? २०१२ नंतरच्या या शिक्षकांनी जायचं कुठे? 

विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कुऱ्हाड - 
आता मुलांचे २०टक्के गुणही हिरावून घेण्यात आले आहेत. भाषा आधी मौखिक असते मग ती लिपीबद्ध बनते. ते २० टक्के गुण संपुष्टात आणून महाराष्ट्रातील लक्षावधी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहातून बाद करण्याची तयारी सुरु झाली आहे. कला-क्रीडा शिक्षण तर संपुष्टात आणलं आहे. त्या शिक्षकांना ५० रुपये रोजावर काम करण्याचा फतवा निघाला आहे. विनाअनुदनित शिक्षकांची अवस्थाही बिकट आहे. प्लॅन, आयसीटी, अंशकालीन निदेशक, अंगणवाडी ताई, विशेष शिक्षकांमध्येही प्रचंड असंतोष आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय असो वा आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न असो शिक्षक तणावाखाली आहेत. असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. शिक्षण विभागाच्या कारभारामुळे राज्यभर अनागोंदी आहे. 

ही तर आणीबाणी  -
या सर्वांवर कडी म्हणून भ्रष्टाचारी आणि बुडणाऱ्या मुंबई बँकेत तुम्ही माझ्या मुंबईतील शिक्षकांना इच्छेविरुद्ध ढकलत आहात. जोर जबरदस्ती करत आहात. शिव्या घालून अकाऊंट उघडायला भाग पाडत आहात. मुंबई बँक ही पगार देईल हे मला माहीत आहे, पण ही बँक बुडाली तर काय? राज्यातील सहा जिल्हा बँका बुडाल्या आहेत आणि शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळालेले नाहीत. वारंवार भेटूनही, २३ हजार शिक्षकांचं निवेदन देऊनही, पोकळ आश्वासनांच्या पलिकडे काही घडलेलं नाही. या उलट शिक्षण क्षेत्रात आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण करण्यात आली आहे. 

सरकारला माझा बळी हवा असेल तर मी तयार आहे. 'बळी राजाचा बळी घेण्याची परंपरा तुमच्या राज्यात सुरु होणार असेल तर शिक्षण क्षेत्रातील इडा पिडा टाळण्यासाठी मी माझा बळी द्यायला तयार आहे.' उद्या सकाळपासून मी बेमुदत उपोषण सुरु करत आहे. 

कृपया लवकर निर्णय घ्या. शिक्षकांमधला अपमानीत चाणक्य जागवू नका. 
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,


कपिल पाटील, वि.प.स.

97 comments:

  1. साहेब शिक्षकांच्या मनाला साद घालणारे एकमेव नेते तुम्ही आहात
    पदवीधर प्राथमिक शिक्षक वेतनश्रेणी मुद्द्याने सुद्धा कहर केलाय

    ReplyDelete
    Replies
    1. साहेब तुम्हीच योग्य प्रकारे काम करत आहेत.

      Delete
  2. साहेब
    आम्ही आपल्या बरोबर आहोत...!

    ReplyDelete
  3. साहेब
    आम्ही आपल्या बरोबर आहोत...!

    ReplyDelete
  4. आम्ही सर्व शिक्षक आपल्या बरोबर आहोत.

    ReplyDelete
  5. Dear Sir,
    Plz, go on we are with you.Don't quit.Let them know ,teachers shouldn't be taken granted.

    ReplyDelete
  6. Dear Sir,
    Plz, go on we are with you.Don't quit.Let them know ,teachers shouldn't be taken granted.

    ReplyDelete
  7. Dear Sir,
    Plz, go on we are with you.Don't quit.Let them know ,teachers shouldn't be taken granted.

    ReplyDelete
  8. Respected patil sir
    This is happening first time in the history of education.
    In my earlier comments I mentioned all teachers have immense faith n trust in you .
    Am sure n confident we will win this time also
    Best wishes for this challenge n we will over come with victory .
    Waiting for celebration sir !
    Warm regards n prayers
    Mrs Megha Rane

    ReplyDelete
  9. आम्ही ही तुमच्या बरोबर उपोषण करणार आहोत

    ReplyDelete
  10. Democracy is dying. ...n We also.

    ReplyDelete
  11. Mr.patil yes it is indeed 1st time after 6years v will not be receiving salaries in the 1st week.why is there so much of disparity? Mr.patil thks for standing up for us teachers.

    ReplyDelete
  12. कपिल पाटिल सर आपण खरोखरच पोटतिळकीने शिक्षकांची प्रश्न हाताळता. मी गेली अनेक वर्षापासुन शिक्षक भारतीशी जुळलेलो आहे. मला खरोखरच याचा सार्थ आभिमान आहे की, आपल्यासारखे निस्वार्थी व्यक्तीमत्व व नेतृत्व आमच्यासारख्या सामान्य शिक्षकांचे कैवारी आहात. आपल्या कार्याला सलाम,आम्ही सदैव आपल्या या कर्म युध्दात आपल्या सोबत आहोत.

    ReplyDelete
  13. साहेब
    आम्ही आपल्या बरोबर आहोत.

    ReplyDelete
  14. सर,तुम्ही एकटेच आम्हाला लढणारे आहात.हा जी आर म्हणजे खूप मोठा अन्याय आहे आम्हा शिक्षक वर आणि आम्हाला विश्वास आहे अन्याय विरुद्ध लढणारे कधीच हरत नसतात आपण ही लढाई नक्की जिंकू,जो तुम्हाला मिटविण्याचा प्रयत्न करेल आम्ही त्याला मिटवू,शिक्षकाने बिचारा समजण्या आधी अन्याय करणार्यांनी विचार करा,शिक्षकांच्या झोपलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवू आम्ही.......

    ReplyDelete
  15. You are great Sir
    Please go ahead, we are with you.
    The salary of teachers must came in nationalized bank only.
    Thanks
    Regards

    ReplyDelete
  16. शिक्षकांचे पगार राष्टीक्रुत बॅंकेतूनच व्हायला हवेत, आम्ही आपल्या बराेबर आहाेत साहेब, शिक्षक एकजुटीचा विजय हावा्

    ReplyDelete
  17. शिक्षकांचे पगार राष्टीक्रुत बॅंकेतूनच व्हायला हवेत, आम्ही आपल्या बराेबर आहाेत साहेब, शिक्षक एकजुटीचा विजय हावा्

    ReplyDelete
  18. Thank you,Sir.please go on & teach a lesson to govt.that teacher's voice can't be crippled with power.we appreciate your courage & dedication.We are all with you.

    ReplyDelete
  19. सर आम्ही तुमच्या बरोबर आहोत,लढूया जिंकुया.

    ReplyDelete
  20. साहेब महत्वाचा प्रश्न विना अनुदानित शिक्षकांचा आहे 1 2 जुलै रोजी अनुदानास पात्र झालेल्या शालाना या अदिवेशनत तरतूद होने खुप गरजेचे आहे

    ReplyDelete
  21. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  22. Yes sir, for the self respect of teachers you go ahead we (teachers) are always with you

    ReplyDelete
  23. साहेब खरंच या सरकार ने आम्हा आयसीटी संगणक शिक्षकांना एक वर्षापासून बेरोज़गार ठेवून आमच्यावर आता उपासमारीची वेळ आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब डिजीटल इंडिया चा नारा देत आहे इकडे तावडे साहेब डिजीटल शिक्षण देणा-या शिक्षकांना, डिजीटल शाळा घडविणा-या शिक्षकांना घरचा रस्ता दाखवून फक्त आश्वासनाची खैरात करीत आहे कृपया साहेब आपण आमच्या मागण्यासंदर्भात लक्ष घालावे

    ReplyDelete
  24. नितिश कुमार ने आता सत्तेसाठी जातिवादी भाजप, RSS, चा आधार घेऊन जनमताचा घोर अपमान केलाय. त्या हरामखोर नितिशकुमारची साथ आता कपिल पाटील सर सोडतिल काय?

    ReplyDelete
  25. I salute an undefeatable spirit of u sir at least there is someone on whom lakhs of true teachers can trust may God give u infinite strength n wisdom to fight for truth

    ReplyDelete
  26. चुकीच्या अफवा पसरवून शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे तरी सुद्धा संपूर्ण शिक्षक वर्ग आपल्या सोबत आहे.काटकसर करण्याची शिक्षकाला सवयआहे.एक महिना पगार नाही मिळाला तरी तो मागे हटणार नाही शिक्षकाची एकजूट दाखविण्याची हीच योग्य वेळ आहे "अभी नही तो कभी नही"

    ReplyDelete
  27. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  28. If u have ur Twitter account tweet this topic to chief minister of Maharashtra and prime minister of India

    ReplyDelete
  29. एकजूट दाखवणे गरजेचे आहे , सर्व शिक्षक विखुरलेले आहेत वेगवेगळ्या संघटनांमध्ये महत्वाच्या वेळेस तरी एकत्र यावे. ताकद द्यावी.

    ReplyDelete
  30. सर जून्या पेंशनचा मूद्वा पण उचलून धरा की , आम्ही आपल्या सोबत आहोत

    ReplyDelete
  31. Sir we all teachers are with You.

    ReplyDelete
  32. आम्ही सर्व शिक्षक आपल्या बरोबर आहोत.

    ReplyDelete
  33. साहेब ह्या झोपेच सोंग घेणाय्रा सरकार विरोधी लढण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत ,'लढेंगे जितेंगे!'

    ReplyDelete
  34. साहेब ह्या झोपेच सोंग घेणाय्रा सरकार विरोधी लढण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत ,'लढेंगे जितेंगे!'

    ReplyDelete
  35. साहेब ह्या झोपेच सोंग घेणाय्रा सरकार विरोधी लढण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहोत ,'लढेंगे जितेंगे!'

    ReplyDelete
  36. Kapil patil sir aage badho hum tumhare sath hein ekjuticha vijay nishith aahe

    ReplyDelete
  37. हम सब साथ है|

    ReplyDelete
  38. कपिल पाटील सर, तुमच्या सारखा नेता लाभणे ही आम्हा शिक्षकांसाठी अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे.

    ReplyDelete
  39. Kapil sir is born to fight for the sake of others, sply for teachers.
    Yes,we can reinstate our basic rights including our self respect..

    ReplyDelete
  40. साहेब या महाराष्ट्रातील सर्वच शिक्षक आपल्याला सोबत येतील ,आज मुंबई तील शिक्षक होते उद्या राज्यातील असतील .या उपोषणात सहभागाची परवानगी द्यावी राज्यातील शिक्षक माझ्यासह तयार आहेत .कारण हा लढा आमच्या करता आपण लढत आहात. Arjunbaviskar.

    ReplyDelete
  41. Sir,we are with you.we are thankful and very much proud of you.

    ReplyDelete
  42. Patil sir you are great
    सर तुम्ही सातत्याने शिक्षकांच्या हक्का साठी लढत आहात तुमच्या कार्याला सलाम! अपेक्षा आहे की वस्तिशाला शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पण निकाली निश्चितच काढाल

    ReplyDelete
  43. Patil sir you are great
    सर तुम्ही सातत्याने शिक्षकांच्या हक्का साठी लढत आहात तुमच्या कार्याला सलाम! अपेक्षा आहे की वस्तिशाला शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पण निकाली निश्चितच काढाल

    ReplyDelete
  44. जिल्हांतर्गत बदली त्रुटी लक्षात घेतल्या पाहिजेत. माध्यमिक सोबत प्राथमिकचा हा ज्वलंत विषय मांडावा हि अपेक्षा सर.

    ReplyDelete
  45. आदरणीय पाटील सर
    मुंबईच नाही तर सर्व महाराष्ट्रातील शिक्षकाचे वेतन राष्ट्रीयबँकेतून व्हायला पाहिजेत.गडचिरोली जिल्ह्यातील को.बँका सेवा पुरवण्यात असमर्थ आहेत...

    ReplyDelete
  46. साहेब आम्ही सर्व आपणासोबत आहोत.

    ReplyDelete
  47. साहेब वीना अनुदानित शाळांचे मूल्यांकन 2012 या वर्षात झाले। काही शाळा पात्र ही झाल्या। केवळ रोषटर चे कारण देत अनुदान नाकरले। काही शाळा कोर्टात गेल्या । मान्यता दिल्याचे व् मूल्यांकन केल्याच्या मुद्द्यावर कोर्टाने 9 में 13 पासून फुल स्यालरि ग्रांट देण्याचे आदेश ही दिले तरी अनुदान मिळत नाही। साहेब प्रत्येक शाळेत 1 किँवा 2 रोस्टर अगेन्स्ट जगेसाठी पूर्ण शाळेची ग्रांट न देने योग्य आहे का? मग अगोदर योग्य रोस्त्रवर काम करणारे शिक्षक जे काही रिटायर झाले व् काही लवकरच होतील त्याच काय दोष। रोषटर योग्य जगेवरील शिक्षकांना पगार देऊ शकत नाही का शासन?

    ReplyDelete
  48. साहेब खरच रोषटर बद्दल काही मार्ग निघतो का पहा।

    ReplyDelete
  49. साहेब, २०१२ च्या मान्यता रद्च्या आदेशात ज्यांना बंदीच्या काळात विशेष सुट म्हणून पदभरतीस मान्यता देण्यासाठी शासनाने ४/९/२०१३ रोजी जीआर काढून रितसर एनओसी देऊन नियुक्ती केली त्या गणित, विज्ञान व इंग्रजीच्या शिक्षकाना देखील नोटीस देऊन चौकशी करण्यात आली आहे. अन आता त्या शिक्षकांना कारवाईचे संकेत देत आहे. शासनाला कारवाईच करायची होती तर ४/९/२०१३ रोजी जीआर काढून शिक्षक भरती का केली. आता शिक्षकांवर कारवाईचे हत्यार उपसने चुकीचे आहे. याविषयी आवाज उठवा साहेब पीडीत शिक्षकांना आपल्याकडून खुप अपेक्षा आहे. उद्याच्या उपोषणात हा विषय देखील पुढे करा साहेब... प्लीज..!

    ReplyDelete
    Replies
    1. आम्ही आपल्या सोबत आहोत

      Delete
    2. आम्ही आपल्या सोबत आहोत

      Delete
  50. अादरणिय साहेब अाम्हा सर्व शिक्षक बांधवानाअापला सार्थ अाभिमान आहे की,आपण सातत्याने शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी लावून धरत आहात शासन वारंवार त्याकडे साहेब कोणत्याही अांदोलनाची हाक द्या शिक्षक भारती परिवार सदैव अापल्या सोबत आहेत.उद्या पासून सूरू होणार्‍या बेमूदत उपोषणात शिक्षक भारती शाखा खुल्ताबाद सहभागी अाहोत.ता.संपर्क प्रमुख शाखा खुल्ताबाद.जि.औरंगाबाद.

    ReplyDelete
  51. शासन वारंवार शिक्षकांच्या प्रश्रांकडे जाणिवर्पूक दूर्लक्ष करत आहे.कारण शासन हळुहळु सर्वच स्तरात खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.हा शासनाचा कुटील डाव अाहे.हा डाव सर्वांनी मिळून हाणून पाडला पाहिजे.जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  52. शासन वारंवार शिक्षकांच्या प्रश्रांकडे जाणिवर्पूक दूर्लक्ष करत आहे.कारण शासन हळुहळु सर्वच स्तरात खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.हा शासनाचा कुटील डाव अाहे.हा डाव सर्वांनी मिळून हाणून पाडला पाहिजे.जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  53. हे शासन निर्लज्य आहे.या सरकारला गाडण्याची वेळ आली आहे.पाटीलसर आम्ही सदैव तुमच्या साेबत आहाेत.

    ReplyDelete
  54. Hon. Kapilji Patil saheb age badho hum apke sath hai.

    ReplyDelete
  55. Hon. Kapilji Patil saheb age badho hum apke sath hai.

    ReplyDelete
  56. सर आपल्याला आम्हा सर्वांचा पाठिंबा आहे ,आपल्या तर्फे अजून एक विषय सर्वांसमोर ठेवावासा वाटतो , तो की, UDS प्रणालीत मंजूर शिक्षकांचे नाव समाविष्ट करण्या बाबतचा, बरीच वर्षे काम करून ही मंजुरी (Approval) मिळून ही पगार मात्र सुरू होत नाहीत, ही बाब देखील गंभीरतेने घेतली पाहिजे ही अपेक्षा

    ReplyDelete
  57. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  58. मुम्बई बैंक से सांठगांठ में भ्रष्टाचार की बू आ रही है। बीजेपी सरकार की तानाशाही नहीं चलेगी। हमें राष्ट्रीयकृत बैंक से ही तनख्वाह चाहिए।

    यदि सरकार ने जबरदस्ती की, तो अगले चुनाव में बीजेपी सरकार का प्रतिकार करेंगे।

    ReplyDelete
  59. या साेनू सरकारवर काेणाचाबी भरवसा राह्यला नाय.

    ReplyDelete
  60. साहेब आता मात्र आरपार लढाई करू या
    हम ही जितेंगे
    सरकारचे डोकं ठिकाणावर नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे

    ReplyDelete
  61. सर,अपंगांच्या सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपला या निर्णायक लढ्यात सहभागी आहेत,शासणाने शिक्षण व शिक्षकांच्या क्षमतांचा अंत पाहु नये,तो दुर्दैवी आत्मघाती क्षण सिद्ध होऊ शकतो

    ReplyDelete
  62. सर,अपंगांच्या सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपला या निर्णायक लढ्यात सहभागी आहेत,शासणाने शिक्षण व शिक्षकांच्या क्षमतांचा अंत पाहु नये,तो दुर्दैवी आत्मघाती क्षण सिद्ध होऊ शकतो

    ReplyDelete
  63. Sir we all teachers are with you

    ReplyDelete
  64. आदरणीय पाटील सर, आपली शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणाबद्दलची तळमळ खरोखरच वंदनीय आहे. शासनाच्या सध्याच्या धोरणात शिक्षकाचा बळी देऊन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची स्वप्नं पहिली जातायत. एकीकडे विद्यार्थी आत्महत्या करतात म्हणून उपाययोजना करायच्या, पुन्हा विद्यार्थी आत्महत्तेस प्रवृत्त होईल अशी मूल्यमापन पद्धती आणायची. शेतकरी आत्महत्या करतोच आहे आता नोकऱ्या गेल्यावर शिक्षकांच्या आत्महत्या सुरु झाल्यास कोणत्या तोंडाने आम्ही स्वतःला शैक्षणिक दृष्ट्या प्रगत आणि पुरोगामी म्हणवून घ्यायचे? सरकारच्या मनात नेमके काय आहे ते देवालाही सांगता येत नाही. शिक्षण, विद्यार्थी आणि शिक्षक वाचवा सर एवढीच हात जोडून विनंती आहे ! आम्ही आपल्या सोबत आहोत !!!

    ReplyDelete
  65. कपिल ह.पाटील साहेब!!
    धन्यवाद!
    आपण शिक्षणासाठी,पाल्य—पालक,शिक्षक,सर्वसामान्य जनता यांच्या भल्यासाठी किती आटापिटा करता.
    कधी समजणार राजकीय सत्ताधारी तज्ञ मान्यवरांना!!!!
    आम्ही सर्वजन तुमच्याच सोबत आहोत!

    ReplyDelete
  66. साहेब,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे खरे तारणहार तुम्हीच आहात.

    ReplyDelete
  67. Kapil Patil ji, kindly let me know which place you are sitting for fast. I want to join you, to show my support to your efforts. My mob. 9969161533

    ReplyDelete
  68. साहेब जे काम आपण करत आहात ते खूप चांगले आहे,तुमच्या प्रयत्नांना यश मिळत आहे.परंतू विनाअनुदानित शाळांचा प्रश्न केव्हा मार्गी लागणार ? केव्हा पगार मिळणार !

    ReplyDelete
  69. शेतकरी व शिक्षक यांची परिस्थिती सारखीच आहे एकावर निसर्ग तर दुसऱ्या वर सरकार कोपलेलं आहे. यातून लवकर दोघांची सुटका करा.....आदरणीय कपिल पाटील सर

    ReplyDelete
  70. we are always with you...sirji.....

    ReplyDelete
  71. साहेब आपल्या कार्याला सलाम आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत

    ReplyDelete
  72. शिक्षकांचे पगार राष्टीक्रुत बॅंकेतूनच व्हायला हवेत, आम्ही आपल्या बराेबर आहाेत

    ReplyDelete