Monday, 5 June 2017

तावडेसाहेब, तुम्ही शिक्षकांना का छळू मागत आहात?

आमदार कपिल पाटील यांचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना खरमरीत पत्र. 



दिनांक : ०५/०६/२०१७

प्रति,
मा. ना. श्री. विनोद तावडे
शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय,
मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतरांचे पगार युनियन बँक ऑफ इंडियाकडून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग करण्याचा आपला शासन निर्णय धक्कादायक आहे. 

राज्यातील अनेक जिल्हा बँका अडचणीत आहेत. काही जिल्हा बँका तर बुडाल्या. शिक्षकांचे पगार सहा-सहा महिने अडकले. त्यातली डिपॉझिटस् अजूनही परत मिळालेली नाहीत. मुंबईच्या पाठोपाठ त्या जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतरांचे पगारही राष्ट्रीयकृत बँकेकडे वर्ग करण्यात आले तेव्हा कुठे दिलासा मिळाला. नाशिकची जिल्हा बँकही अशीच अडचणीत आहे आणि शिक्षक-शिक्षकेतरांचे पगार झालेले नाहीत. 

सहकारी बँकांमधील घोटाळे आणि भ्रष्टाचार यांची चर्चा गेली अनेक वर्षे आपण ऐकतो आहोत. स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सक्त पावलं उचलेली आहेत. मोदी, जेटलींच्या राष्ट्रीयकृत बँकेवर तावडे साहेब तुमचा विश्वास दिसत नाही? मुुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पगार सोपवण्यामागचा तुमचा हेतू काय आहे? ५० वर्षात कधी पगार वेळेवर झाले नव्हते. ते गेली सहा वर्षे सुरळीत सुरु असताना हा घाशीरामी निर्णय घेण्याचं कारण काय? 

माझे आई-वडील शिक्षक होते. दिवाळीत सुद्धा पगार वेळेवर मिळत नसे. तेव्हा पगारही जास्त नव्हता. त्यामुळे आमदार झाल्यानंतर विधानपरिषदेच्या सभागृहात मी पहिला प्रश्न शिक्षकांच्या पगाराचाच विचारला होता. ४ वर्षांच्या संघर्षांनंतर युनियन बँक ऑफ इंडियाकडे पगार आले आणि मुंबईचे शिक्षक सुखावले. 

घाशीराम कोतवालाने जसा पुणेकरांचा छळ मांडला होता अगदी तसाच तुमचा हा  निर्णय आहे. तुम्ही शिक्षकांना का छळू मागत आहात? कोणता राग शिक्षकांवर काढू मागत आहात? हेच कळत नाही. 

काळी संचमान्यता आणून राज्यातल्या सगळ्या शाळांची व्यवस्था आधीच आपण बिघडवून टाकली आहे. त्यामुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन अजून झालेले नाही. कला, क्रीडा या विषयांचं शिक्षण संपवून टाकलं आहे. पीटी आणि आर्ट टीचर यांना ५० रुपये रोजावर ठेवून तुम्ही शोषण करु मागता आहात. २ मे २०१२ नंतर मा. हायकोर्टाच्या आदेशाने नियुक्त झालेले शिक्षक आणि वाढीव तुकड्यांवरचे शिक्षक यांचा तर तुम्ही छळ मांडला आहे. आठवड्याच्या ४५ तासिका करुन तुम्ही आता शिक्षकांना रक्त ओकायला लावणार आहात. कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य योजनेचा पाठपुरावा मी तीन वर्षे करतो आहे. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, सुभाष मोरे, जालिंदर सरोदे यांनी तयार केलेली योजना तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी मान्य केली होती. तुम्ही ती अजून अडकवून ठेवली आहे. तुमच्या १७ मे २०१७ च्या घाशीरामी कोतवाली जीआरने रात्रशाळांमधल्या १,०१० अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांच्या सेवा समाप्त केल्या आहेत. रात्रशाळा आम्हाला बंद करायच्या असल्याचं तुमचे शिक्षण सचिव नंदकुमार उघडपणे बोलत आहेत. 

मुंबईतील शिक्षक-शिक्षकेतरांचे गेली सहा वर्षे नियमित सुरु असलेले पगार तुम्हाला पहावत नाहीत. एका फटक्यात तुम्ही सगळे हे पगार शासकीय धोरणाच्या विरोधात जाऊन मुुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत ढकलण्याचं कारण काय होतं? मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आहे, असं तुम्हीच जीआरमध्ये कबुल केलं आहे. आणि ती वाचवण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियाचा निर्णय रद्द करत असल्याचं तुम्हीच जीआरमध्ये म्हटलं आहे. इतकं निर्लज्ज समर्थन खुद्द जीआरमध्येच केलं जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. 

का छळता आहात तुम्ही शिक्षकांना? का महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था मोडून काढता आहात? सहकारी बँक वाचवण्यासाठी फक्त आम्हा शिक्षकांचा बळी का देत आहात? मुंबईतल्या सगळ्याच सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत सुरक्षित ठेवणार आणि आमच्या गरीब शिक्षकांना मात्र डेंजर झोनमध्ये ढकलणार, हा कोणता न्याय? 

नाना फडणवीसांच्या मुत्सद्देगिरीचं मराठी माणसाला आजही कौतुक आहे. पण घाशीराम कोतवाल हा काही अभिमानाचा विषय नाही. छत्रपती शिवराय आणि छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श घेण्याऐवजी आपण कोतवाली का करता आहात? 

अजूनही वेळ गेलेली नाही. हे सगळे चुकीचे निर्णय ताबडतोब मागे घ्या. एवढीच विनंती. 

अन्यथा ...

आपला स्नेहांकित,


98 comments:

  1. अगदी बरोबर साहेब. .आपण च शिक्षकांचे खरे वाली आहात..धन्यवाद साहेब.

    ReplyDelete
  2. सर तुम्हीच शिक्षकांना न्याय देऊ शकता

    ReplyDelete
  3. Very good sir,,yana patrachi bhasha nahi aandolanachi bhasha samjte

    ReplyDelete
  4. Kapil sir very good. This was necessary. Plz do something to cancell this GR. V r with you.

    ReplyDelete
  5. Very Good sir your support

    ReplyDelete
  6. सर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत.आता पेटून उठण्याची वेळ आली आहे. नेहमी तुम्हाला शिव्या घालणारे आता कुठे लपून बसले आहेत

    ReplyDelete
  7. Nice work sir.Keep it up.All teachers r with u.

    ReplyDelete
  8. पाटील सर, अतिउत्तम!
    आम्ही आपल्या सोबत आहोत

    ReplyDelete
  9. बरोबर आहे
    हा निर्णय चुकीचा आहे
    जिल्हा बँक वाचवायची असेल तर सर्व आमदारांचे मानधन मुंबई बँकेत जमा करा

    रोजंदारीवर शिक्षक नेमताय
    आम्ही तर मंत्री आणि आमदार रोजंदारीवर नेमायचे स्वप्न पाहतोय

    ReplyDelete
  10. Good that at least someone is speaking on behalf of us teachers ,sir keep up the good work

    ReplyDelete
  11. ,आमदार महोदय अगदी बरोबर, यापुढे शिक्षक भर्ती व सेवा समाप्ति चे अधिकार ही शासन स्तरावर करून द्यावे म्हणजे आम्ही धन्य होवू. अभिनंदन

    ReplyDelete
  12. सर आता यांना धडा शिकवायलाच हवा.तुम्हाला नेहमीच शिव्या घालणारे आता कुठे लपुन बसले आहेत स्वतःला शिक्षकांचे कैवारी समजणारे आता का गप्प बसले आहेत गेली कित्येक वर्षे तुमच्यामुळे आम्हाला वेळेवर पगार मिळतोय हे यांना पाहवले नाही सर आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत

    ReplyDelete
  13. Excellent, this gov.is only for bizman n rich. They never thinks about poor. Teachers should unite like farmers to oppose this decision.

    ReplyDelete
  14. Patil Sir,you are correct.

    ReplyDelete
  15. Patil Sir,you are correct.

    ReplyDelete
  16. लोकशाही ऐवजी हूकूमशाही प्रस्थापित करण्याची ही पद्धतशिर सु्रूवात आहे.
    5 म्हणजे 50 नाही हे कोतवाल सरकारने ध्यानात घ्यावे.

    ReplyDelete
  17. शिक्षकांचे पगार वेळेवर हाेत आहेत,हे पहवत नाही का?बॅक बदलाची याेग्य कारणे न दाखवता हा कीेतवली निर्णय काेणासाठी?

    ReplyDelete
  18. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  19. Rightly said .....& Be forceful....

    ReplyDelete
  20. लोकशाही ऐवजी हूकूमशाही प्रस्थापित करण्याची ही पद्धतशिर सु्रूवात आहे.
    5 म्हणजे 50 नाही हे कोतवाल सरकारने ध्यानात घ्यावे.

    ReplyDelete
  21. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  22. आंदोलन केले शिवाय पर्याय नाही...

    ReplyDelete
  23. तावडेनी शिक्षण व्यवस्थेचे खरंच हाल लावले आहेत. कला ,क्रीडा आणि कार्यानुभव विषयाचा तर विषयच संपवला आहे.
    अधुरा हकीम अन जान खतरे में... असं झालंय आता हे....

    ReplyDelete
  24. Sir we all very much aware that only due to your efforts we are getting salary very regularly since 6 yrs. Sir we are with you. Give us a call

    ReplyDelete
  25. Very very effective sir we must ask him for such stupid decision.
    Carry-on we all are with you

    ReplyDelete
  26. Good Sir. We are with you and must do something about the same to protest it

    ReplyDelete
  27. कपील पाटील साहेब यांना असेच खडे बोल सुनवले पाहीजे

    ReplyDelete
  28. Good reply from you,what is the procedure to change the edu minister.

    ReplyDelete
  29. Good reply from you,what is the procedure to change the edu minister.

    ReplyDelete
  30. Kapil. Sir. Amhy. Apanas. Sath. Det. Ahot ata. Vel. Ali. Ahe. Krantichi

    ReplyDelete
  31. Ramdas. Kerkar. Kapil. Sir. Amhy. Apanas. Sath. Det. Ahot. Ata. Vel. Ali. Ahe. Krantichi

    ReplyDelete
  32. Very good sir for being with us. We should protest for this decision.

    ReplyDelete
  33. सर चांंगले केलेले कार्य या सरकारला देखवत नाही. आता यांंना असे निर्णय घेऊन शिक्षकांंना त्रास द्यायचा आहे.त्यासाठी आपल्याला आंंदोलन करावे लागेल.

    ReplyDelete
  34. भाजप सरकारला काय झाल आहे? कळेना आता काही तरी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
    पाटील साहेब आम्ही बरोबर आहोत.

    ReplyDelete
  35. My comment is removed.
    Kindly know the reason.
    I full support ur struggle to save night schools & junior colleges.
    I as a retired Junior College Teacher,I am available at any time to back ur struggle.

    ReplyDelete
  36. या सरकारला महाराष्ट्र नव्याने जनतेचे हित जोपासनारा नेता नको आहे.सर तुमच्या माध्यमातून या महराष्ट्रातला शिक्षक सुखावला,तुम्ही घेतलेले सर्व निर्णय मोडीत काढण्याचा या भटव्या सरकरचा डाव आहे.

    ReplyDelete
  37. सर्व शिक्षक बंधुना कळकळीची विनंती आहे.आंदोलन करावे लागेल बोलण्या पेक्षा सुरवात करा आमदार साहेब नेहमीच आपल्या सोबत आहे.

    ReplyDelete
  38. Replies
    1. Excellent sir AATA LADHAYCHE FAKTA, Kranti Sathi aamhi barobar ahot hak dhya aata Kranti hoil patil sir aage badho hum tumhare sath hein

      Delete
  39. Good Sir. We are with you.

    ReplyDelete
  40. Good Sir. We are with you.

    ReplyDelete
  41. Good sir. We are with you.

    ReplyDelete
  42. All mumbai AIPA headmasters and teachers with you

    ReplyDelete
  43. All mumbai AIPA headmasters and teachers with you

    ReplyDelete
  44. Mahadik sir
    All mumbai AIPA headmasters and teachers with you

    ReplyDelete
  45. Very good sir for being with us. We should protest for this decision.

    ReplyDelete
  46. अगदी बरोबर आहे सर्

    ReplyDelete
  47. Sir we r with u .Will fight injustice

    ReplyDelete
  48. Yes sir you r correct. And thanx for this.

    ReplyDelete
  49. नाशिक च्या शिक्षकांना न्याय ध्या कर्ज विमा सगळे 4 महिन्यापासून थकलेले आहे

    ReplyDelete
  50. RESPECTED SIR;
    IN YOUR LETTER YOU HAVE ALREADY MENTION EXCEPT TEACHING AND NON-TEACHING SALARY MR. EDUCATION minister need to correct G.R. not only for teacher-nonteaching salary transfer to Mumbai district sahakari bank but also salary of all mantralay dir education consultant of Mr. Education minis govn semi govn all employ salary will get from mum dist say bank so that this bank will either come out from loss or difficulties and will become balance sheet or will get good chance to make so so so....
    So if they are ready to transfer salary of all then ye to bahut cache din ki shuruwat hai
    Ye to mere shikshak ki MAN KI BAT nahitar shikshachya man ki bat Jon dakhavinar and eaikavinar

    ReplyDelete
  51. This letter was really needed

    ReplyDelete
  52. This letter was really needed

    ReplyDelete
  53. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. मा.पाटील सर आम्ही आपल्या सोबत आहेत.

      Delete
    2. मा.पाटील सर आम्ही आपल्या सोबत आहेत.

      Delete
  54. मा.पाटील सरदार आम्ही आपल्या सोबत आहेत.

    ReplyDelete
  55. Excellent Hon. KapilPatilsaheb karach aapan shikshakanche khare kaiwari aahat aapan the veloveli dakun file aahe I salute you.

    ReplyDelete
  56. आपल्याला खूप मोठ्ठंआंदोलन करण्याची आलीय वेळ

    ReplyDelete
  57. Superb observations in this letter, no doubt.
    But unless a PIL is filled in the High court challenging this G.R, the authorities wouldn't care for the security of the salary of our teaching force.
    Hence, let's brace up for a legal battle, friends.

    Mrs.Pragna Sheth.
    Vice Principal,
    Bhavans Hazarimal Junior College.
    Chowpatty.
    Mumbai

    ReplyDelete
  58. Sir,

    Tumhich amhala nyay deu shakaal. Khatri ahe.

    Thank you.

    ReplyDelete
  59. Very nice sir
    Wel done keep it up
    P b mali dhule

    ReplyDelete
  60. Well done,sir.Do something to stop this.We all are with you.Go ahead.

    ReplyDelete
  61. Well done,sir.Do something to stop this.We all are with you.Go ahead.

    ReplyDelete
  62. Better approach court n get stay on this GR

    ReplyDelete
  63. Patilsir,
    You are right.
    We are with you. I would like to say that the Mumbai Bank looted by someone and it is duty of authority to digging the corruption and save that bank. But do not give victim of Teaching and Non-teaching staff.
    Ramkrishna Minde
    Y.B.Chavan High School

    ReplyDelete
  64. सर,असेच लढत रहा. आम्ही तुमच्या सोबत आहोत.

    ReplyDelete
  65. सर,असेच लढत रहा,आम्ही आपल्या सोबत आहेत.

    ReplyDelete
  66. Very good, sir. Keep it up.
    Dr. R I sharma.

    ReplyDelete
  67. या सरकार ला शिक्षण व्यवस्था बकाल करायची आहे. लोकहीताचे व शिक्षक हीताचे निर्णय घेण्याची ईच्छाशक्ती मा.विनोद तावङें मधे नाही.
    पाटील सर, आपण शिक्षक हिताचे मुद्दे लावुन धरत आहात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत...! keep it up..!

    ReplyDelete
  68. Well done Sir. We all are with you.

    ReplyDelete
  69. Well done Sir. We all are with you.

    ReplyDelete
  70. पाटील सर आपण राज्यातील सर्व शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याची मागणी कारावी कारण जिल्हा बँकेतून कधीही पगार वेळेवर होत नाहीत. त्याबद्दल राज्यातील तमाम शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.
    आपण शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल खूप जागरूक, अभ्यासू व संवेदनशील आमदार म्हणून ओळखले जाता...त्यामुळे आपण केवळ मुंबई विभागापुरता हा प्रश्न मर्यादित न ठेवता त्याची व्यापक मागणी व गरज लक्षात घेऊन आपण राज्यातील सर्व शिक्षकांच्या पगारी राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यासाठी आग्रही प्रश्न मांडून पाठपुरावा करावा, राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे राहतील. आपण हा प्रश्न सोडवावा हि आपणास कळकळीची विनंती आहे. देविदास कोरे ता.निलंगा जि. लातूर मो- 9730325000

    ReplyDelete
  71. Very good sir for being with us. We should protest for this decision.

    ReplyDelete