मुंबईतील माझे मा. मुख्याध्यापक आणि शिक्षक, शिक्षकेतर बंधू, भगिनी,
मे महिन्याची सुट्टी तुमच्या सगळ्या कुटुंबियांना आनंदाची जावी, यासाठी आधी शुभेच्छा!
मा. हायकोर्ट आणि मा. सुप्रिम कोर्ट यांनी अखेर न्याय दिला. त्याबद्दल तुमचे अभिनंदन! गेले ९ महिने तुम्ही साऱ्यांनी त्रास भोगला. तुमच्या हिंमतीला सलाम!
युनियन बँकेतून पगार सुरळीत झाले आहेत. एप्रिल महिन्या अखेरीस तीन सुट्टया आणि १ मे चा बँक हॉलिडे असूनही युनियन बँकेने २७/२८ एप्रिललाच पगार केले. ९५ टक्क्यांहून अधिक शाळा पुन्हा युनियन बँकेत परतल्या आहेत. त्यांना हा आनंद मिळाला आहे. उरलेल्या ८० शाळांही पुढील महिन्यापासून युनियन बँकेची बिलं सादर करतील, अशी अपेक्षा आहे. मात्र ७ शाळांना काही तांत्रिक कारणांमुळे वेतन मिळू शकलेले नाही. त्यांची नावे अशी आहेत -
दक्षिण मुंबई
१. व्ही. एन. सुळे हायस्कूल, दादर
२. राजा शिवाजी विद्यालय, दादर
पश्चिम मुंबई (दहिसर)
१. विभूती नारायण
२. मातृछाया
३. सुभेदार रामजी
४. शक्ती सेवा
५. अवध विद्यालय
या शाळांची बिले बँकेकडे पोचलेली नाहीत किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे ते अडकलेले आहेत, असे बँकेचे म्हणणे आहे. मी याबाबत संबंधित शाळांबाबत शिक्षण निरीक्षकांना कळवले आहे. कृपया संबधित शाळांनी तातडीने शिक्षण निरीक्षकांशी संपर्क साधून आवश्यक त्रुटी दूर करून युनियन बँकेच्या बझार गेट या पुल अकाऊंट शाखेत आपली वेतनाची बिले पोचवणे आवश्यक आहे. या शाळांमधील शिक्षकांना कारण नसताना त्रास भोगावा लागला आहे. संबंधित लिपिक आणि वेतनअधिकारी यांनी वेळीच काळजी घेतली तर हा त्रास कधीच होणार नाही. कृपया त्यांनी तातडीने लक्ष घालावे, ही विनंती.
शाळांच्या लिपिकांनी वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार पगाराची बिले उशिरात उशिरा १० तारखेपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. महिन्याच्या २० तारखेला ट्रेझरीकडे बिले जाणे आवश्यक आहे. कृपया याबाबत काळजी घ्यावी, ही विनंती.
कोर्टाच्या लढाईतील ९ महिने सोडले तर त्या आधीची सहा वर्षे राष्ट्रीयकृत बँकेतून आपले पगार नियमित होत होते. १ तारखेला पगार व्हावेत यासाठी त्याआधी ४ वर्षे सतत संघर्ष करावा लागला. आपण कुणी कल्पनाही केली नव्हती की सुरळीत असलेले आपले पगार बुडणाऱ्या बँकेत नेले जातील. नाबार्डने जी बँक धोकादायक ठरवली आहे, ती बँक आपल्या डोक्यावर मारली जाईल. नाशिक, उस्मानाबाद, बुलढाणा आणि नागपूर जिल्हा बँका बुडाल्या आहेत. तिथे शिक्षकांचे पगार तर बुडालेच पण सगळी सेव्हींग्ज्, डिपॉझिटस् सुद्धा बुडाली. आजतागायत एक रुपया परत मिळाला नाही. ४ वर्षांपूर्वी नागपूर जिल्हा बँक बुडाली तिथे आता युनियन बँकेतून नियमित पगार होतो. बुडणाऱ्या मुंबई बँकेला टेकू देण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरण्यात आलं. सक्ती करण्यात आली. अखेर मा. मुंबई हायकोर्ट आणि मा. सुप्रिम कोर्ट यांनी अखेर आपल्याला न्याय दिला. कोर्टाच्या आदेशानंतरही बिलं उशिरा पोचवण्यात येत होती. शेवटी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. तेव्हा पुन्हा युनियन बँकेची बिले द्यायला सुरवात झाली. मा. कोर्ट आणि मा. मुख्यमंत्री यांचेही त्याबद्दल आभार.
या लढाईत तुमची सर्वांची साथ होती. म्हणून हे शक्य झालं. आता पुढची लढाई जुनी पेन्शन, सर्वांना अनुदान, सर्वांना पदवीधर वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी, सातवा वेतन आयोग, कंत्राटी शिक्षकांना (पूर्वीचं नाव शिक्षण सेवक) किमान २१ हजार रुपये वेतन, कॅशलेस आरोग्य योजना (मेडीक्लेम नव्हे) यासाठी करावयाची आहे. ज्यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना धमक्या दिल्या, दुषणं दिली, परेशान केलं, सरप्लस केलं त्यांनाच सरप्लस करण्याची वेळ जवळ आली आहे. नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा त्रास, जाच, परेशानी यांना आपण सरप्लस करू. तुमच्या निर्धाराचं बळ माझ्या सोबत नेहमीच राहीलं आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून सभागृहात जालिंदर देवराम सरोदेही सोबत असेलच. तोपर्यंत पुन्हा एकदा सुट्टीच्या शुभेच्छा!
धन्यवाद!
आपला,
कपिल हरिश्चंद्र पाटील
Hello sir, tumhi fakta aided teachers sathi ladhata kay?Amchyasarkhya unaided junior college chya staff cha kay?Khup issues aahet.
ReplyDeleteतुमचे प्रश्न सभागृहात सतत मांडतो.
Deleteमोठ्या लढाईची आवश्यकता आहे.
Thank you so much kapil patil sir
ReplyDeleteNirmal Vidyalaya Ganesh nagar wadala payment jama zale nahi
ReplyDeleteफोन नं. पाठवा
Delete02224154748 Thanks saheb we are always support you
Delete02224154748 Thanks saheb we are always support you
DeleteMy Teacher also facing same problem from unaided school pls do something that every teacher can get same pay scale by same rule.
ReplyDeletePls take action of our problem also na salarth
ReplyDelete*महाराष्ट्रातील अनेक शिक्षक विनावेतन*
ReplyDelete'शालार्थ'मध्ये नाव समाविष्ट करूनदेखील महाराष्ट्रातील सुमारे हजाराहून जास्त शिक्षक विनावेतन काम करीत आहेत. त्यांची नावे 'शालार्थ'मध्ये समाविष्ट करूनदेखील या शिक्षकांची उपासमार थांबविण्याची मागणी होत आहे. याबाबत *मा.आ. कपिलजी पाटील* यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे व शिक्षण आयुक्तांकडे सदर विषयाची मांडणी करावी...
'शालार्थ'मध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत राज्यातील अनेक शिक्षकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. कर्मचाऱ्यास वैयक्तिक मान्यता प्रदान केल्यानंतर व शालार्थ क्रमांक दिल्यानंतरच या प्रणालीत त्या कर्मचाऱ्यांची माहिती भरून त्यांचे वेतन देता येते. पूर्वी शालार्थ क्रमांक देण्याचे अधिकार त्या-त्या शिक्षणाधिकाऱ्यांना होते, परंतु शिक्षण आयुक्तांनी १८ नोव्हेंबर २०१६ रोजी हे अधिकार शिक्षण संचालकांना दिले. त्यामुळे शिक्षण संचालक कार्यालयात शालार्थ क्रमांकासाठी अनेक प्रस्ताव येऊ लागले.
तसेच *अनेक प्रस्तावांवर निर्णय घेवून आदेश संचालकांकडून मोठ्या प्रमाणावर देण्यात आले तसे पत्र सदर शिक्षकांना संचालक कार्यांलयाकडुन देण्यात आले परंतु शालार्थ प्रणाली बंद असल्याकारणाने सदर शिक्षकांचे शालार्थ आय डी तयार होत नाही आणि त्यामुळे शिक्षक वेतनापासून वंचित राहू लागले.*
परंतु ज्या शिक्षकांचे प्रस्ताव तपासुन शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यासाठी *शिक्षण संचालक कार्यांलयाकडुन आदेश दिलेले आहेत अशा शिक्षकांचे पगार जो पर्यंत शालार्थ प्रणाली चालु होत नाही* ताे पर्यंत *अॉफलाईन* करावेत ही विनंती...
*कारण त्या शिक्षकांचे प्रस्ताव तपासुन त्या शिक्षकांना शालार्थ प्रणालीत नाव समाविष्ट करण्याबाबत शिक्षण संचालक पुणे यांनी आदेश दिलेले आहेत* सदर शालार्थ प्रणाली अजुन किती दिवस बंद राहील हे सांगता येतील नाही...
This comment has been removed by the author.
Deleteआमचाही हाच प्रॉब्लेम आहे.
Deleteकृपया शालार्थ सुरू होई पर्यंत ऑफलाईन पगारासाठी प्रयत्न करावे.खूप उपकार होतील. कित्येक वर्षांपासून आम्ही विना वेतन काम केलेलं आहे.आता अनुदानावर आल्यावर शालार्थ बंद पडला. कृपया......
साहेब आम्ही अर्धवेळ प्रयोगशाळा सहाय्यक ठाणे व पालघर जिल्हा आमचे 27 लोकांचे पगार सप्टेंबर 2016 पासून बंद आहेत कारण संख्यानिश्चिती मध्ये आमचे पद दिसत नाही परंतु आम्ही दर वर्षी मा शिक्षणाधिकारी ठाणे यांची परवानगी घेत होतो
ReplyDeleteजरा आपण लक्ष घालावे आम्ही हतबल झालो आहोत आता मंत्रालयाच्या फेऱ्या मारून घर कसे चालावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे शेवटचा उपाय मंत्रालयात आत्महत्या हाच नाहीतरी सरकारला सवय झाली आहे त्याची
Sir,I want to know when will the ban get lifted by the government . I have taken a transfer from aided to aided school. the department sent my file back
ReplyDeleteDnyansampda highschool govandi no salary for month of April 2018
ReplyDeleteSir I'm from Thane district. My shalarth I'd work is not yet done I'm not getting any salary from last 6 years I don't know what to do please help. Thanks.
ReplyDeleteसर ज्या शाळांना अद्याप काही तांत्रिक कारणांमुळे अथवा मॅनेजमेंट च्या आडमुठेपणामुळे अद्याप पगार झालेले नाहीत त्यात एक नाव आही बी पी एम हायस्कूल खार. मार्चपासून या शाळेतील शिक्षकांना अद्यापही पगार मिळालेले नाहीत. यासाठी आपण काहीतरी करावे ही नम्र विनंती
ReplyDeleteI am Asst. Teacher from aided school. My appointment is from 1997 but i got aided salary from 2005 after that my PF deduction was continued but from 2013 my PF deduction was stopped under the guise of no benefits of pension and PF to the teachers who has received aid fron the year 2005. The said matter is under litigation.
ReplyDeleteMy query is to why my and other teacher PF deduction has stopped .. kindly guide in this matter.
My mobile number
9920912566
आपल्या हिमतीला सलाम
ReplyDeleteSir may salary not yet credited and when we will get 7th pay?
ReplyDelete