दिनांक : ०८/१०/२०१८
प्रति,मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
विषय - सरकारी नोकर भरती महापरीक्षा पोर्टल मार्फत झाल्यास व्यापम घोटाळ्याची भीती.
विनंती - १) नोकरभरती लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात यावी.
२) सरकारी नोकरीतील रिक्त जागा व भरतीबाबत श्वेत पत्रिका प्रसिद्ध करावी.
महोदय,
महाराष्ट्र सरकारमधील विविध विभागांमधील नोकर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम महापरीक्षा पोर्टल मार्फत चालू आहे.
१. सदर परीक्षा ऑनलाइन असल्या कारणाने व विद्यार्थी संख्या खूपच जास्त असल्याने या परीक्षा एकाच वेळी घेणे अशक्य आहे. या परीक्षा अपुऱ्या संगणकामुळे खासगी संस्थांकडे जसे की सायबर कॅफे, कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यासारख्या ठिकाणी सर्रास होत आहेत. सदर ठिकाणी अपुरी शासकीय व्यवस्था व खासगी हितसंबंध यामुळे प्रचंड प्रमाणात सामुहिक कॉपी सारखे गैरप्रकार घडत आहेत. नुकत्याच झालेल्या नगर परिषदमधील भरती प्रक्रियेत सामुहिक कॉपी झाल्याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत.
२. एकूण परीक्षार्थींच्या तुलनेत संगणक खूपच कमी असल्याने एकच परीक्षा ७ ते ८ टप्प्यांमध्ये घेतली जातेय. यामुळे प्रश्न पत्रिकेचा दर्जा समान नसतो. अनेक प्रश्न परत परत विचारण्यात येतात. त्यामुळे दर्जा खालावतो तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होतो.
३. संगणक हे खूपच जवळ जवळ ठेवण्यात येत असल्याने विद्यार्थी चर्चा करुन पेपर सोडवतात. तसेच महापरीक्षा पोर्टलमध्ये परीक्षा प्रक्रियेबाबत खूपच मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे जसे की, वेळेवर परीक्षा न होणे, निकाल वेळेवर न लागणे, प्रश्नपत्रिकेचा दर्जा खूपच असमान असणे इ.
४. ऑनलाईन परीक्षा असल्याने लवकर प्रक्रिया अपेक्षित असताना खूपच जास्त हलगर्जीपणा दाखवला जातो. परीक्षा खाजगी संस्थांमध्ये होत असल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाइल व इतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर कॉपी करण्यासाठी होत आहे.
५. या पोर्टलकडे इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेण्यासाठी मनुष्यबळ व संसाधने उपलब्ध नाहीत. एकूणच येऊ घातलेली महाभरती जर या महापरीक्षा पोर्टलमार्फत झाली तर महाराष्ट्रात देखील मध्यप्रदेश प्रमाणे व्यापम घोटाळा सहज शक्य आहे. प्रमाणिकपणे प्रयत्न करुन परीक्षा उत्तीर्ण होणे या पोर्टल मार्फत अवघड आहे. प्रमाणिक आणि मेहनती परीक्षार्थी उमेदवारांवर हा मोठा अन्याय आहे.
६. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील ३० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याची बाब आढळून येते. यामुळे कार्यक्षमतेवर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला बेरोजगार या पदांच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबतची वस्तुस्थितीही शासनाने स्पष्ट करणे आवश्यक आहे.
तरी या सर्व परीक्षा महापरीक्षा पोर्टलमार्फत न घेता त्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात. एकूण रिक्त जागांची उपलब्धता व भरती याबाबत सरकारने श्वेत पत्रिका प्रसिद्ध करावी, ही विनंती.
धन्यवाद!
आपला स्नेहांकित,
कपिल पाटील, वि.प.स.
अध्यक्ष, एलजेडी महाराष्ट्र
धन्यवाद सर... आमची बाजू मांडायला कोणी तयारच नव्हत, पण मा.आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आता तुम्ही आमचा विषय मुख्यमंत्र्या पर्यंत पोहचवला त्याबद्दल तुमचे आभार... धन्यवाद सर...
ReplyDeleteजय हिंद...
धन्यवाद सर... आमची बाजू मांडायला कोणी तयारच नव्हत, पण मा.आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आणि आता तुम्ही आमचा विषय मुख्यमंत्र्या पर्यंत पोहचवला त्याबद्दल तुमचे आभार... धन्यवाद सर...
ReplyDeleteजय हिंद...
Sir...tumhi ha mudda uchlyabadal dhanyawad...aani ya vrr tumhi cm shi bolla...
ReplyDeleteबरोबर आहे सर परीक्षा सुरु असताना लाईट जाते पुन्हा पेपर द्यावा लागत आहे ...अणि या मधील प्रश्न खूप विसंगती आहे....
ReplyDeleteThanx sir
ReplyDeleteशासन आणि आमदार यांच्यात ज्या मुलांनी पेपर दिला आहे याचे विचार ऐका आणि नंतर ठरवा जी मुलं चांगले मार्क घेऊ शकले नाहीत तेच दोष देत आहेत असाच मुळे rto च्या मुलांचं नुकसान झाल शेवटी लोकशाही आहे पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे .
ReplyDeletePatil saheb aapan Maharashtratil 8000 ICT shikshak kana regular karnysathi sabhagrahat vishay upsthit karava ashi vinanti.
ReplyDeleteNagarparishad exam cha ajun ek mudda jo charchet nhi ala to mhnje mira road mumbai yethil centre var pahilya divashi pahilya shift madhil mulanche answer save zale navte.tyamule amhi kiti question attempt kele tech mahit nhi.yavar hi kahi upay kadhava
ReplyDeleteNagarparishad exam cha ajun ek mudda jo charchet nhi ala to mhnje mira road mumbai yethil centre var pahilya divashi pahilya shift madhil mulanche answer save zale navte.tyamule amhi kiti question attempt kele tech mahit nhi.yavar hi kahi upay kadhava
ReplyDeleteधन्यवाद साहेब🌹🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteधन्यवाद साहेब! खूपच ग्रेट काम केले तुम्ही या महाभ्रष्टाचारा विरोधात
ReplyDeleteअसाच एखादा आमदार महाराष्ट्र चा विकास करु शकतो....धन्यवाद आमदार कपिल पाटिल साहेब
ReplyDeleteधन्यवाद साहेब, सामान्य विद्यार्थ्यांच्या आर्त आवाजाला प्रतिसाद दिल्याबद्दल, आशा करूयात की मा. मुख्यमंत्री ही आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देतील...धन्यवाद.
ReplyDeleteThank you very much
ReplyDeleteKapil patil Sir always raise an issue of needy and right people of not only Maharashtra.. But also for other state people .
ReplyDeleteसाहेब खरंच एक प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहात ...अभ्यासू आहात...
ReplyDeleteतुमचा लहान बंधू
दिपक...धुळे
ऑनलाईन न घेता अगोदर घेत होते त्याप्रमाणे घ्या
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteमा. मुख्यमंत्री
ReplyDeleteमहाराष्ट्र राज्य
मुंबई.
महोदय,
राज्यातील नोकरभरती पोर्टलद्वारे केल्यास कशी गंभीर परिस्थिती उद्भउ शकते, याचे स्पष्ट विवेचन आम. श्री कपिल पाटील यांनी केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पोर्टलद्वारे भारती केल्यास मध्य प्रदेश सारखा घोटाळा महाराष्ट्रातही निर्माण होऊ शकतो. तरी त्यांच्या विवेचनाचा सर्व बाजूनी योग्य तो विचार करून या वर्षी नेहमीप्रमाणेच नोकरभरती करण्याचा निर्णय घेणे योग्य होईल, असे सुचावावेसे वाटते.
धन्यवाद.
स्नेहांकित,
डॉ. भालचंद्र मुणगेकर
All exam made mass copy zhali ahe thymule mahaportal ne getlely sarve pariksha radda karun mahaportal var ban alach pahije sir dhanyvad sir
ReplyDeleteAll exam made mass copy zhali ahe thymule mahaportal ne getlely sarve pariksha radda karun mahaportal var ban alach pahije sir dhanyvad sir
ReplyDeleteधन्यवाद..मागणी पूर्ण होई पर्यंत मुद्दा लावून धरा ही विनंती
ReplyDeletethanks kapil patil saheb & bacchu kadu saheb...
ReplyDeleteघोटाळा होण्याअगोदर _ यंत्रणा गरोदर .....
ReplyDeleteअसं नको व्हायला ची खबरदारी .......
आता म्हणू शकतो आपण पुरोगामी बरोबर सतर्कवादी आणि लोकहितवादी झालो ....
छान आहे ...आनंद आहे .....
धन्यवाद आमदारसाहेब,
ReplyDeleteआमची बाजू आपण मांड़त आहात त्याबाबत आपले आभार. महापरिक्षा Portal वर main page वर मा.मुख्यमंत्री यांचे छायाचित्र वापरून भ्रष्टाचार केला जात आहे. चुकीच्या मार्गाने भरती करून पुढे निवड झालेले उमेदवार पुढील 30 ते 35 वर्षे भ्रष्टाचार करणारच.याला जबाबदार कोण ??????
धन्यवाद सर,
ReplyDeleteआपल्या सारखे प्रामाणिक काम करणारे राजकीय नेते असल्याने राजकीय वैक्तीवर विश्वास अजूनही टिकून आहे.आपण स्पर्धा परीक्षेचे विषय नेहमीच लावून धरता.त्यामुळे माझ्या सारख्या अनेक विध्यार्थ्यांना नक्कीच न्याय मिळेल..धन्यवाद..!
MPSC सारखी सक्षम विभाग असताना तिला बाजूला सारुन या सरकारला हे महापोर्टल,पवित्र असे अपवित्र काम कोणता हेतु साध्य करण्यासाठी करत आहेत?
ReplyDeleteमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत परीक्षा घेण्यात याव्यात ही विनंती
ReplyDeleteधन्यवाद सरजी🤗🤗
ReplyDeleteThank you Sir. Kindly request to hon. CM to take all the competitive exams under MPSC only, because MPSC is the only institution with capabilities to do this with complete transperency.
ReplyDeleteHo sir agdi barober.sagy exam mpsc marft gheyala pahije.thnx patil sir
ReplyDeleteSuperb..nice initiate
ReplyDeleteमहाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत परीक्षा घेण्यात याव्यात
ReplyDelete