Tuesday, 25 December 2018

काँग्रेस - राष्ट्रवादीला खुले पत्र




दिनांक : २५/१२/२०१८
प्रति,
मा. श्री. अशोक चव्हाण
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

मा. श्री. अजितदादा पवार
गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस

महोदय,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी आपण पुढाकार घेतला आहे, त्याबद्दल आपला आभारी आहे. देशाचं संविधान आणि लोकशाही संस्था संकटात असताना फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात सर्व पुरोगामी शक्तींनी एकत्र आलं पाहिजे, याबद्दल कुणाचंही दुमत नाही. पण कोणत्याही मुद्दयांची वा अजेंडयाची चर्चा करता मित्र पक्षांना तीन जागा सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी झाल्याचं जाहीर केलं आहे, याचं आश्चर्य वाटतं. छोटया डाव्या पुरोगामी पक्षांनी प्रचाराच्या वाजंत्री वादनाचं कामं करावं, अशी आपली अपेक्षा दिसते. वाजंत्री कोणत्या मुद्दयांची वाजवायची हे मात्र आपण स्पष्ट केलेलं नाही

मा. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रात महाआघाडीला पूर्ण स्वरुप येऊ शकणार नाहीमा. प्रकाश आंबेडकर आणि मा.राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडली आणि अन्य पक्षांना विधान सभेत जागा सोडण्याचं आश्वासन दिलं की आघाडी झाली, असं आपण मानत असाल तर वास्तवापासून आपण खूप दूर आहोत. देशातील आणि महाराष्ट्रातील स्थितीमधे काही एक अंतर आहे. महाराष्ट्रात योगी किंवा खट्टर सरकार नाही. मराठा आरक्षण जाहीर झालं आहे. सरकारनं दुष्काळ जाहीर करुन टाकला आहे. हिवाळी अधिवेशनात ना सरकारला थंडी वाजली ना विरोधी पक्षांची धग जाणवली. राज्यात १९७२ पेक्षा तीव्र दुष्काळ आहे. आताच पाणी टंचाई आहे. पुढचे सात महिने काढायचे आहेत. शेतकरी परेशान आहे. पण दुष्काळाच्या प्रश्नावर सभागृहात ना साधक बाधक चर्चा झाली. ना सरकारला घेरता आलं

अनेक वर्ष सत्तेवर राहिल्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सभागृहात कसं काम करायचं याचा अनुभव कमी पडला असण्याची शक्यता आहे. मला आपल्याला नम्रपणे मा. श्री. शरद पवार आणि मा. श्री. छगन भुजबळ यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून केलेल्या कामाची आठवण करुन दयाविशी वाटते. विधीमंडळाच्या सभागृहात, रस्त्यावर आणि बांधावर शरद पवार यांनी विरोधी पक्षनेता म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केलं होतं. पुरोगामी आघाडीतील छोटया घटक पक्षांना सन्मानाने आणि बरोबरीच्या नात्याने ते सोबत घेत असत. छगन भुजबळ यांनी सभागृहात आणि बाहेरही सरकारला सळो की पळो करुन सोडलं होतं. विलासराव देशमुख यांनी तर स्वपक्षाच्या सरकारच्या विरोधात पाटबंधाऱ्यातून भ्रष्टाचाराचे पाट वाहत आहेत, असं सांगण्याचं धाडस दाखवलं होतंविधीमंडळातील आपला एक सहकारी या नात्याने मला नम्रपणे नमूद करावसं वाटतं की, ती संसदीय रणनिती, कामाची पध्दत आणि आक्रमकता याबाबतीत आपण सारेच कमी पडलो

समाजातील छोटया घटकांमध्ये होणारी घालमेल संसदीय राजकारणात प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून व्हायला हवा. सत्तेवर आणि विरोधात असतानाही पवार, भुजबळ आणि विलासराव यासारख्या नेत्यांनी त्यांच्या काळात हा प्रयत्न केला होता. राईनपाडयावर भटक्यांचे गेलेले बळी, बेरोजगारी आणि बंद असलेली नोकर भरती, भीमा कोरेगाव, संभाजी भिडे प्रकरण, मुस्लिम धनगर आरक्षण, ओबीसींमधील अस्वस्थता अशा अनेक प्रश्नांवरच्या चर्चा तर अनुत्तरीत राहिल्या. संभाजी भिडे प्रकरणात विरोधी पक्ष भिडे यांच्या बाजूने की विरोधात या संभ्रमाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.अस्वस्थ समाजघटकांना विरोधी पक्षाकडून अश्वासक दिलासा मिळालेला नाही. डाव्या लोकशाहीवादी पक्षांना आपण सोबत कसं घेणार हे स्पष्टपणे सांगायला हवं.

प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांना एक-एक जागा सोडणं म्हणजे महाआघाडीची बेरीज झाली असं आपण मानलं तर ती मोठी फसवणूक ठरेल. प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील उपेक्षित आणि वंचित वर्गाचं प्रतिनिधीत्व करतात. संख्येच्या भाषेतच बोलायचं तर चाळीस ते पन्नास टक्के वर्गाच्या प्रश्नाला महाआघाडीच्या अजेंडयावरच स्थान नसेल तर प्रकाश आंबेडकरांशी सन्मानाने चर्चा कशी होणार? मुस्लिमांच्याबाबत महाआघाडी सॉफ्ट हिंदुत्वाच्या पायी राजकीय अस्पृश्यता पाळते काय, याची शंका वाटतेराजू शेट्टी म्हणजे केवळ हातकणंगलेची जागा नव्हे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट भाव आणि संपूर्ण कर्जमुक्ति याबाबतचं धोरण स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाला महाग आणि नोकरीला पारखी झालेली शेतकऱ्यांची मुलं सैरभैर आणि वैफल्यग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी आघाडीचं धोरणं स्पष्ट होणं आवश्यक आहे

शिक्षणाच्या क्षेत्रातलं भगवीकरण आणि खाजगीकरण या दोन्ही मुद्दयांवर आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. गरीबांना प्रवेश नसलेली खाजगी विद्यापीठांची बीले आणि शिक्षणाच्या कंपनीकरणाचं बील यावर आघाडीचं मत काय आहे? सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण आणि आऊटसोर्सींग म्हणजे कर्मचारी आणि कामगारांच्या शोषणाला अमर्याद सूट आहे. शिक्षण सेवक आणि सफाई कामगारांपासून सुरु झालेलं हे कंत्राटीकरण आता थेट मंत्रालयातील सचिव पातळीपर्यंत पोचलं आहे. आघाडीने याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. विनाअनुदानाच्या नावावर शिक्षणाचं वाटोळं करण्याची प्रक्रीया आपल्याच राज्यात सुरु झाली. युतीच्या राज्यात कडेलोट होण्याची वेळ आली आहे. आघाडीचं सरकार आल्यावर १००टक्के अनुदान देणारं काआंगणवाडीताई, कंत्राटी कर्मचारी, आयसीटी शिक्षक, अंशकालिन निदेशक, मानसेवी शिक्षक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, अर्धवेळ कर्मचारी यांचं शासनमान्य शोषण सुरु आहे. ते थांबवणार का? जुन्या पेन्शनच्याबाबत २००५ नंतरचे कर्मचारी टाहो फोडत आहेत. केंद्रात आपलं सरकार आल्यावर समान काम, समान वेतन आणि समान पेन्शन या मागणीचा विचार होईल काय

विक्रमादित्याच्या पाठीवरच्या वेताळाचे हे प्रश्न नाहीत. तुमची राजकीय अडचण करण्यासाठी हे प्रश्न विचारत नाही. न्याय आणि समतेच्या मागणीचे आहेत. समता आणि न्याय यांची हमी संविधानाने दिली आहे. संविधान विरोधी सरकार घालवताना आपलं सरकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानानुसार अंमलबजावणी करील. सर्वांना न्याय आणि समता देईल, याचं आश्वासन महाराष्ट्रातील जनतेला हवं आहे

उत्तराच्या अपेक्षेत

आपला स्नेहांकित


कपिल पाटील, वि...
प्रदेशाध्यक्ष, लोकतांत्रिक जनता दल, महाराष्ट्र


25 comments:

  1. Very nice blog patil saheb.
    I'm ICT teacher,I'm requesting to you sir plz do something for 8000 ICT teachers we are unemployed.

    ReplyDelete
  2. Hello sir..तुमचे पत्र वाचले आणी एक प्रकारचे समाधान लाभले.. आपले विचार किती परग्लभ आहेत याची प्रचिती अली... आणी एक गोष्ट एथे नमुद करवी वतते आपण जे प्रकाश आंबेडकर बाद्द्ल जे मत केले आहे ते अगदी 100% बरोबर आहे...

    ReplyDelete
  3. साहेब शिक्षक भरती झालीच पाहिजे

    ReplyDelete
  4. Kapil jee ye sate sawal ko agar congress radhe adi solve karne ke iccha shakti dikhaye to bahut bada parivartan ko sakta hai...App ne sahi mudda uthai hai....

    ReplyDelete
  5. Nice sir.You have raised nice concern of common public's minds.

    ReplyDelete
  6. सर शिक्षक भरती झाली पाहिजे tet exam देउन मूल परेशान झाली आहेत कारन फॉर्म भरायला पण मुलांकडे पैसे नाहीत त्यासाठी 3000रु महीना अनुदान देण्यात यावे तेलंगाना राज्य अनुदान देवु शकते तर महाराष्ट्र का नाही.

    ReplyDelete
  7. यासाठी कोणीही काहीही करीत नाही.समानता व बंधुता तत्वावर कोणीही काम करण्यास तयार नाही.
    पेन्शनच्या असंख्य योजना आहेत परंतु कोणीही सरसकट स जेष्ठ नागरिक म्हणून किमान रूपये 2000बेसिक पेन्शन व महागाई भत्ता अशा प्रकारची योजना समोर ठेवून चर्चा करीत नाही सध्या पाच कोटी लोकांना पेन्शन मिळते तेव्हा उपरोक्त योजनेमुळे आणखी सात लाख लोकांना पेन्शन द्यावी लागेल
    परंतु कोणीही यासाठी कोठेही मुद्दा तीव्रतेने उपस्थित केला नाही हे सत्य आहे.

    तसेच कमी वेतनाच्या नोकर्‍या असणे आवश्यक आहे परंतु याबाबत कोणीही पुढाकार घेत नाही.कनिष्ठ लिपिक ड्रायव्हर असे सहाय्यक कुशल कर्मचारी व सेवक आणि मजूर असे अकुशल कर्मचारी पदे कमी वेतनावर परंतु सामाजिक संरक्षण योजना लागू असणारी निर्माण केली तरच असंख्य व्यक्तीना रोजगार/ नोकरी मिळू शकते पण याचा विचार केला जात नाही.लोक अर्ध वेळ काम करायला तयार आहेत पण त्याना सामाजिक संरक्षण योजना दिल्या पाहिजेत याकडे लक्ष दिले जात नाही.
    रोज आंदोलन केले जाते परंतु यावर चर्चा होऊन निर्णय होत नाही हे आश्चर्य आहे. लोकसभा राज्य सभा विधानसभा व विधानपरिषद या संस्थांच्या कामकाजातून नागरिकांच्या जन्म ते मृत्यू पर्यंतच्या जीवनासाठी आवश्यक किमान अर्थाजनाचे वैध मार्ग उपलब्ध असले पाहिजेत यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

    ReplyDelete
  8. सर शिक्षक भरती झाली पाहिजे tet exam देउन मूल परेशान झाली आहेत कारन फॉर्म भरायला पण मुलांकडे पैसे नाहीत त्यासाठी 3000रु महीना अनुदान देण्यात यावे तेलंगाना राज्य अनुदान देवु शकते तर महाराष्ट्र का नाही.

    ReplyDelete
  9. आमदार साहेब नमस्कार,
    आपल्यालाच माझं खूल पत्र,
    दोन्ही काँग्रेसच्या पोतडीत समजवाद्यांसाठी काही नाही.हे अखेर आपल्याला उमगलं तर!आपली हीच भूमिका रिडालोस च्या वेळीपन होती.पण झाले काय त्यावेळी पण आपली फसगतच झाली.मागून मिळत नाही,मिळणार नाही व कोण देणारही नाही.राज्यात समजवाद्यांची ताकत कमी नाही तरीपण समजवाद्यांची आजची पंगू अवस्था का आहे?याला जबाबदार कोण?हेच आपल्याला आजवर उमगलेले नाही आहे.एकेकाळी राज्यात सत्तेत असणारी मंडळी आज सत्तेपासून इतकी दूर का आहेत याच उत्तर कुणा समाजवाद्याकड मिळेल काय? समाजवादी नेतृत्व व सम्पवताना ज्या शक्तींनी समाजवाद्यांच्या पाठीत खंजीर खुपसला व ज्यांनी जातीयवादी शक्तींना जाणीवपूर्वक खतपाणी घातलंच नाही तर समाजवाद्यांच्या नाकावर टिच्चून सत्तेत बसवलं त्या पक्षांकडून कसल्या अपेक्षा ठेवताय.त्यांचा पुरोगामीत्वाचा बुरखा समाजवाद्यांकडून वेळीच फाडला गेला नाही म्हणून आज समाजवादी शक्ती मोठी असून पंगू आहे.मुळात आपल्याकडील अति पुरोगामीत्व व पुरोगामीत्वाचा लिबास घातलेले काँग्रेसी समाजवाद्यांना ओळखता न आल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.दोन्ही काँग्रेसची लढाई ही त्यांची पापाची साम्राज्य वाचवण्याची आहे व आपली लढाई ही सामाजिक न्याय प्रामाणिक विकासची आहे.या दोन्ही लढाया एकाचवेळी ते पण बरोबर लढणं कस शक्य होणार आहे?समाजकारण व राजकारण एकाच वेळी आपण करतो व मतांच्या राजकारणात मागे पडतो.आपली मतं काँगेसींना गृहीत असतात. हेच त्यांच्या पथ्यावर पडते.हेच आजवर घडते आहे.सत्ता महत्वाची आहे.मग ती कशीही मिळवा.आज समाजवादी नेतृत्व बियाणाला उरलं नाही.तुम्ही कशी तग धरली आहे ते तुम्हालाच माहिती आहे. मतांचे राजकारण करत असताना समाजवाद्यपुढे काँग्रेसचं पर्याय का असावा?जोपर्यंत आपण सत्तेसाठी भाजपलाही पाठिंबा देऊ शकतो हे दाखवून देत नाही तोपर्यंत समाजवाद्यांच कोणी धडभल करू शकत नाही.मला प्रकाश आंबेडकरांची भूमिका काहिशी आवडली जर वांझोट्या आघाडीतून काही पदरी पडणार नसेल व आपल्या ताकतीचा चा वापर फक्त जळण म्हणून होणार असेल तर पुन्हा कुठेतरी विचारांची फेरमांडणी करावी लागणार आहे,तेच प्रकाश आंबेडकरांनी केलं.आता येऊ घातलेल्या राज्यातील व केंद्रातील निवडणूका राजकीय पक्ष व राजकारणी या च्यासाठी दीर्घकालीन भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहेत.व राज्यातील समाजवादाची जहाजाचे सुकाणू आपल्या हातात आहे.ते आपण योग्य दिशेने न्याल हीच अपेक्षा
    @नितीन झिंजाडे, सामाजिक कार्यकर्ता
    करमाळा,सोलापूर

    ReplyDelete
    Replies
    1. नितीन जी... सलाम तुम्हाला.... ईतकं धाडस कुठून आणलं... सत्य बोलण्याचं??? अलिकडे तर चाटूगिरीचीच भलावन आहे... समाजवादी.... कम्टुनिस्ट वगैरे डावे हे आज बियाण्यालाही उरले नाहीत... किती धाडस...! राजकारणात प्रत्येकाला आपल्या जातीच्या पायरीप्रमाणेच काम मिळते... हे सत्य नाकारता येणार नाही... भूजबळसाहेब ढाण्या वाघ होता आमचा ... आज अजितादादांचे पायाशी स्थान आहे... मराठा आरक्षणावर अजितदादाच्या आदेशाने मतदान केले...

      Delete
  10. मा.व आदरनीय कपिल पाटील साहेब,
    शतश:वंदन.
    साहेब तुमची ही पोस्ट वाचून लोकशाहीत ,समाजवाद आणि समाजातून ,सर्वच क्षेत्रातून हद्दपार होत चाललेली मानवी मूल्ये सत्ता स्वार्थ राजकारण व त्यातील लाचारी अशा परिस्थितीत कोणीतरी सर्वसामान्याचा त्यांच्या भावना जाणणारा ,त्यांच्या वेदनांची सल असणारा आपणासारखा दयाळू,प्रस्थापित अन्यायाला प्रखर विरोध करणारा लढवय्या आहे हे पाहून सामान्यांचा वाली आहे याची जाणीव झाली नाहीतर या दुनयेकडे पाहताना स्वत:वरीलच विश्वास हरवून बसलेल्या समाजाला काळ्याकुट्ट अंधारातील आशेचा एक किरण.म्हणजे आपणासारखे दैवी नेतृत्व.अशा नेतृत्वास मानाचा मुजरा. आपल्या या कार्यास कोटी कोटी शुभेच्छा. खूप काही लिहावे बोलावे असे आहे
    साहेब आपल्या लोकलढ्यास मनस्वी शुभेच्छा.

    ReplyDelete
  11. जो पर्यंत आपल्या मुद्द्यावर आघाडी जाहीरपणे स्पष्ट भूमिका मांडत नाही किंवा हे मुद्दे आपल्या जाहीरनाम्यात घेत नाही तो पर्यंत यांच्यावरही विश्वास ठेवायला जागा नाही

    ReplyDelete
  12. nice blog sir अत्यंत परखड मत

    ReplyDelete
  13. Very nice . It's important for non-granted divisions & schools

    ReplyDelete
  14. जबाबदारीची जाणीव करून देणारा लेख.

    ReplyDelete
  15. Most relevant issues expressed forcefully and clearly. Congress and NCP could leave just three seats for the left front and announce it without any discussion with the parties involved because they think that the left front has very little following. But they are making a mistake. The alliances are formed not only on the basis of relative strength but to create an overall public opinion on common issues and agenda.
    Congratulations on well written letter.

    ReplyDelete
  16. खुपच छान व स्पष्ट भूमिका आपण मांडली.या बद्दल अभिनंदन.

    ReplyDelete
  17. Kapil Dada JAYBHIM
    Three Salutes for your work on all the fronts of the Society.
    Education, unemployment,farming community, economic problems, social issues, atrocities, environmental issues, press and media. your concern is genuine and you have
    ave suggested hundreds of solutions time and again.
    You have always taken a firm stand .leading a crusade of freedom equality
    Brotherhood and justice.
    In the new economic order India is no more a welfare state. Thus therefore you can not expect a fair deal from any government.
    It is private sector that has taken the control of India.
    They are the few Industrial houses
    Or big corporates that decide the POLICY OR THE ORDER TO RUN THE COUNTRY.
    IF YOU LOOK AT WORLD SCENARIO the situation remains the same.
    In the forthcoming election of parliament there are few leaders like HON.AD.PRAKASH AMBEDKAR, and like minded, your role has become pivotal.
    You can do it. You are person who knows the crux of the problems and their ultimate solutions too.
    Protection of constitution is a fundamental issue.
    At present except Prakash Ambedkar there is not a single leader who is TRUSTWORTHY. YOU HAVE MENTAINED THAT SPIRIT IN REAL SENSE.
    DR.BABASAHEB AMBEDKAR, MAHATMA GANDHI WERE ALONE WON THE CONFERENCE AND TRUST OF THE PEOPLE.
    NOW IT IS FIGHT BETWEEN CONSTITUTION AND MANUSMRITI,and FULE SHAHU AMBEDKAR I SAMAJ CAN DO AWAY, ELIMINATE MANUSMRITI.
    HEARTY CONGRATULATIONS TO YOU FOR TAKING THE LEAD BY WRITING A OPEN LETTER TO CONGRESS.
    HOPE YOUR NOBLE EFFORTS BEAR FRUITS.
    You have a proper understanding of the situation. Please bring like minded but selfless leaders together.FORGE their ALIANCE. Let Prakash Ambedkar lead .NOW NATION NEEDS AMBEDKAR.
    People TRUST YOU.
    All the BEST.

    ReplyDelete
  18. कपिल पाटील सर लेख खूप छान , विचार करायला भाग पाडणारा आहे. आपण सर्वच घटकांचा सखोल विचार मांडलेला आहे.

    ReplyDelete
  19. Very nice Kapil Patilsaheb.The facts mentioned in the letter are absolutely true.

    ReplyDelete
  20. हे कुणीतरी सांगायची गरज होती. तुम्ही ते केलंत हे उत्तम झालं

    ReplyDelete
  21. Sir whatever you express in your blog.it is good but sir Congress cancelled pension after 2005, it also brought unaided education.congress destroyed quality of education by bringing various scheme.so I think how can we expect from congress.congrss has been cheating us from 60 years.they did not follow directions of constitution.sir whatever you have written in letter,it real problem

    ReplyDelete