Thursday, 20 June 2019

पुन्हा अनुदानासाठी आझाद मैदानावर यावं लागू नये


अनुदानाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या टप्प्यावर आंदोलन करणारे घोषित - अघोषित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्वच शिक्षकांना दिलासा देणारी बातमी आहे. नवे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत जे अश्वासन दिलंय ते खूपच आशादायक आहे. त्यावर विश्वास यासाठी ठेवायचा कारण त्यांनी उत्तर अतिशय प्रामाणिकपणे दिलं, खंबीरपणे दिलं आणि त्यावेळेला खुद्द मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात हजर होते.  

पंधरा दिवसात याबद्दल निर्णय होणार आहे. अनुदान देण्याबाबत जी समिती गठीत झाली होती त्यातील एक सदस्य बदलून आता नव्याने आशिष शेलार आले आहेत. खुद्द शेलारांनीच हे जेव्हा सांगितलं तेव्हा मी दिलखुलास हसलो. माझ्या हसण्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना कळला आणि त्यांनी कोटीही केली, 'उपसमितीतला एक सदस्य बदलला तरी कपिल पाटील किती खुश झालेत बघा!' मुख्यमंत्र्यांची ही कोटी सुद्धा आश्वासक आहे. म्हणून त्यानंतर मला भेटलेल्या वेगवेगळ्या टप्पा अनुदानातील शिक्षकांना मी सांगितलं, 'आता मार्ग खुला झाला आहे.'

शिक्षणमंत्र्यांकडून एक आकडा चुकला होता. पण दत्ता सावंत यांनी तो लगेच दुरुस्त करण्याची मागणी केली आणि सरसकट सगळ्याच शिक्षकांना अनुदान देण्याबाबत शेलार यांनी आश्वासन दिलं. शेलार यांनी असंही सांगितलं की, बजेटमध्ये शिक्षणासाठी पुरेशी तरतूद आहे आणि त्यातून हा खर्च भागवता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आहे. सर्वच शिक्षक आमदारांनी विक्रम काळे, गाणार, देशपांडे, बाळाराम पाटील, सतीश चव्हाण यांनी आज हा प्रश्न लावून धरला होता. 

मी शिक्षणमंत्र्यांना एक स्पेसिपीक प्रश्न विचारला, अनुदानाच्या टप्प्यासंदर्भातलं स्पष्टीकरण मला हवं होतं. ते स्पष्टीकरण यासाठी आवश्यक होतं, की 20 टक्क्याचं घोडं पुढे जाणार की नाही? प्रश्न पुढच्या टप्प्याचा नाही घायकुतीला आलेल्या माझ्या सगळ्या शिक्षक बांधवांच्या मागणीच्या पूर्ततेचा आहे. माझा प्रश्न असा होता की, घोषित असोत वा अघोषित जे शिक्षक ज्या टप्प्यावर आहेत त्या पूर्ण टप्प्याचं अनुदान मूळ प्रचलित धोरण न बदलता देणार काय? शिक्षणमंत्र्यांनी त्यावर अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं. हा प्रश्न मी यासाठी विचारला की बहुतेक सर्व शिक्षक 100 टक्क्याचा टप्पा ओलांडून गेले आहेत. फारच थोडे 60, 80च्या टप्प्यावर आहेत. त्या सर्वांना तो पूर्ण टप्पा मिळायला हवा. आता आणखी 7 वर्ष प्रतीक्षा करायला लावणं हे काही योग्य नाही. म्हणून मी तो प्रश्न विचारला होता. सर्व शिक्षक आमदारांसोबत बैठक घेण्याचे आदेश मा. सभापतींनी दिले आहेत. आणि स्वतः मा. मुख्यमंत्री शिक्षणमंत्र्यांच्या उत्तराकडे काळजीपूर्वक पाहत होते. 

संघर्ष खूप झाला. आपण आज सभागृहात जे घडलं त्यावर विश्वास ठेवूया. आणखी पंधरा दिवसांचा प्रश्न आहे. अधिवेशन संपताच ही बैठक होईल. किंवा आधीही होईल. प्रयत्न बैठक लवकर करण्याचाच राहील. आम्ही सारेजण त्यांच्या मागे लागू. पण पुन्हा अनुदानासाठी आझाद मैदानावर यावं लागू नये, हीच सरकारकडून अपेक्षा आहे. शिक्षकाचा आणखी अंत आता पाहीला जाणार नाही या भरवश्यावर पुढचे पंधरा दिवस वाट पाहायला हरकत नाही. निवडणूका जवळ आहेत. शिक्षकांना नाराज करणं परवडणारं नाही. 


(पावसाळी अधिवेशन - दि. २० जून २०१९, मुंबई)

34 comments:

  1. Let's see but it is question of ours family who depends on ours payment

    ReplyDelete
  2. मा.कपिल पाटील सर आपले धन्यवाद आपण नेहमीच शिक्षकांच्या पाठीशी खंभिर पणे उभे राहतात व प्रचलित नियमाने अनुदान हे पटवून व समजावून सांगणारे एकमेव शिक्षक आमदार आहात

    ReplyDelete
  3. अभिनंदन पाटील साहेब आपल्या प्रयत्ननां यश मिळाले।
    मागे आपण आय सी टी शिक्षकां विषयी बोलला होतात.
    साहेब आज आय सी टी शिक्षक हा बेरोजगारी ची झळ सोसत आहे. आमची 4-5 वर्षांपासून मागणी आहे.पण फक्त आश्वसन मिळाले आपण आ सि टी शिक्षकांना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा ही विनंती.

    ReplyDelete
  4. धन्यवाद कपिल पाटील साहेब. .हा प्रश्न शिक्षकांच्या खुप जिव्हाळ्याचा आहे.तसेच पेन्शन प्रश्न पण लवकरच मार्गी लागावा..

    ReplyDelete
  5. राज्यातील सर्व शिक्षकांना पाटील साहेबांशिवाय पर्याय नाही यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांनी पाटील साहेबांच्या पाठीशी खंभीर पणे उभे राहणे आवश्यक आहे .

    ReplyDelete
  6. आपले व नवीन शिक्षण मंत्र्यांचे आभार आपण यात जातीने लक्ष दिले ,18ते 19 वर्षांपासून शिक्षणाच पवित्र काम करणाऱ्या सर्वांना या मुळे समाधान मिळेल,सर आपणास विनंती आहे की 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात काही तरी करा, 2005 नंतरचे आमदार जर पेन्शन घेतात तर बाकी कर्मचारी का नाही

    ReplyDelete
  7. अघोषित शाळा तरतुदीसह घोषित व्हव्यात म्हणजे पुन्हा तरतूद करा तरतूद करा असं म्हणायची वेळ येऊ नाही नाहीतर तरतूद होण्यासाठी निवडून आल्यावर पुन्हा दोन वर्षे वाट पहायची वेळ येईल आणि हो जो टप्पा वाढ होणार आहे त्या दिनांकापासून आम्ही म्हणजे जे घोषित होणार आहेत त्यांना सुद्धा त्याच दिनांकापासून अनुदान जाहीर करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत ही नम्र विनंती

    ReplyDelete
  8. मा.पाटील साहेब आपले मनापासुन अभिनंदन व आपल्याला शिक्षकांंचे प्रश्न सोडण्यासाठी प्रमेश्वर खुप मोठी ताकत देवो........

    ReplyDelete
  9. पाटील साहेब आभारी राहू 100% अनुदान मिळाले

    ReplyDelete
  10. साहेब मग 146,193,व 500कनिष्ठ महा .चे झालेत मग 1600अधिक कनिष्ठ maha.चे कय .......आता खरच सांगा जगावं की मरावे .👎

    ReplyDelete
  11. काही करा पण Election पूर्वी पगार चालू करा ।।। नाही तर यावर्षी कोणाची सरकार पडेल , अन कोणाची येईल हे शिक्षक ठरवेल।।।।।।।

    ReplyDelete
  12. Sir khup varsh pension sathi sagle zatat aahet.Tumhi ha prasha margi lavla tr yenarya shikshkanchya pidhya tumche kayam smaran thevtil .Tumchya hatun pension che swapn sakar hovo. Raktache pani karun phidhi ,samaj ghadvtoy ,aata sarkar kadun mhatarpaniche niyojan have ,aamchi seva 2000 pasun asundhekhil aamhi pension madhe nahit ,ka tr shalela 40% anudan hot. Saglya prashananvr sakaratmak vichar vhava.

    ReplyDelete
  13. Karyerat shikshakanna pan TET Paasun dur thewa sir

    ReplyDelete
  14. माननीय साहेब शिक्षणसेवक पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार मानधनात वाढ अपेक्षित आहे त्या विषयी प्रश्न मार्गी लागेल का? ही विनंती

    ReplyDelete
  15. 15 days how it is possible those who are time passes last 4/5 years for declair aghoshit 276 n1031 tukdi of primary schoo who belived?

    ReplyDelete
  16. नवीन मा आदरणीय शिक्षण मंत्र्यांनी जरी आमदार कपील साहेबांचे म्हणणे आग्रही मनाने ऐकून घेतले तरी असे ऐकून मनाला खूष करण्याची सवय पडलेली आहे परंतु पदरी पडते नेहमी निराशाच जणू मनाला ऐकण्याची सवय पडली आहे. यावर खरंच काही पाऊल उचलले जाईल काय याची शाश्वती कितपत प्रमाणात

    ReplyDelete
  17. R/s
    कपिल पाटील सर
    Sabhagruhatli आपली शिस्तबद्ध व मुद्देसूद प्रश्नांची मांडणी.यामुळे sarkarvar नक्कीच फरक पडेल .20% ना खर्रच 100% हवे.पण जे झाले ते अमानुष झाले.
    मा. Navin मंत्र्यांनी जर ते बदलविले तर हि एक शिक्षण क्षेत्रातील नवपहाट असेल .

    ReplyDelete
  18. @ प्रदीप खडसे smmv मुक्ताईनगर , जळगाव

    ReplyDelete
  19. Purogami Maharashtra mde Shikshan aani shikashak upekshit ka. Ha Prashan ka 20 Varsha pasun sarkar la vichara VA lagto pagar dya mnun. Kiti lajirvani gosht ,thik ahe Patil sir ,Tumi Yodha Aahat Lakho shikshak tumch NAV ghetat ki Tumi vastigruh shadech Prashan sodvle mnun,aamchya jr. College Che anudanch Prashan sodval Aayush bhr aaplach reun rahnar , aaplya patishich aamhi ubhe rahu

    ReplyDelete
  20. आदरणीय साहेब आपले अभिनंदन
    साहेब वस्ती शाळा शिक्षकांचे प्रश्न पण आपणच मार्गी लावले आहेत.
    परंतु साहेब आपणास विनंती की, वस्ती शाळा शिक्षकाची मागील सेवा ग्राहय धरण्यासाठी अजून नेटाने प्रयत्न केले तर विधानसभेच्या पूर्वी प्रश्न निकाली लागू शकतो.
    मा.साहेब आमचा प्रश्न तुम्हीच सोडवू शकता.

    ReplyDelete
  21. पाटील साहेब आपलं काम खुप ग्रेट आहे.

    ReplyDelete
  22. धन्यवाद सर्वांचे 1628ला 100%भेटले तर अत्यंत आभारी राहील कारण 17 वर्ष विनाअनुदानित सेवा zhali

    ReplyDelete
  23. टप्पा अनुदान शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागणार

    ReplyDelete
  24. शेवटचे दोन वाक्ये महत्त्वाचे आहे... निवडणूक जवळ आहे त्यामुळे आश्वासन देऊन time pass करणे सरकार ला कठीण नाही.... 15 दिवसात बैठक घेतली जाईल...अजून बैठकीचा दौर सुरू आहे..
    निवडणूक पर्यंत अमलबजावणी कशी होईल????????

    ReplyDelete
  25. सर आपले मनापासून धन्यवाद सर , आपण करत असलेले प्रयत्न यश येवो

    ReplyDelete
  26. सर आपले मनापासून धन्यवाद सर परंतु हें सरकार फक्त बोलचा भात बोलाची कडी करू नये अशी अशा आम्ही बाळगतो अनेक वर्षे अशेतच गेली आमची
    धन्यवाद सर

    ReplyDelete
  27. आपले व नूतन शिक्षण मंत्री महोदय मनापासून धन्यवाद साहेब 3 वर्षे झालीत 20टक्के अनुदानावर काम करतो आहे.अपेक्षा आहे आपणच आमचे प्रश्न मार्गी लावलं.पुढील टप्पा मिळेल.

    ReplyDelete
  28. Res. Sir, Kapil Patilji 1 mhinyachya var divas zale..... 15 divasat nirnay honar hota.... Please kahitary laxya dya...

    ReplyDelete