शिक्षक दिन आला की सगळ्यांना गुरु ब्रम्हा आठवतो. शिक्षकांना शुभेच्छा दिल्या जातात. UNESCO ने ५ ऑक्टोबरचा जागतिक शिक्षक दिवस केवळ शुभेच्छांसाठी ठरवलेला नाही. १९९४ पासून जगभरच्या १०० देशात हा दिवस साजरा होतो, तो केवळ शिक्षकांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी नाही.
UNESCO, ILO, UNICEF आणि Education International यांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे, ''On World Teachers’ Day, we are not only celebrating every teacher. We are calling on countries to invest in them and prioritize them in global education recovery efforts so that every learner has access to a qualified and supported teacher. Let’s stand with our teachers!''
यावर्षीची थीम आहे, 'Teachers at the heart of education recovery.' कोविडच्या अत्यंत कठीण काळात शिक्षकांनी शिक्षण पोचवण्यासाठी जो महाप्रयास केला त्याचं कौतुक करणं आणि त्याला मान्यता देणं, हा त्यामागील उद्देश आहे. शिक्षकांचं वेतन, त्यांचा दर्जा, त्यांची प्रतिष्ठा याकडे यानिमित्ताने लक्ष वेधलं जावं. उच्च अर्हता, क्षमता आणि प्रेरित शिक्षक समाजाला मिळावेत अशी UNESCO ची अपेक्षा आहे.
आपल्याकडे आपत्ती असो, कोविड असो किंवा जनगणना असो. निवडणुका, सर्व प्रकारची सर्वेक्षणं अगदी प्राण्यांची गणना असली तरी शिक्षकांना कामाला जुंपलं जातं. कोविडची ड्युटी करताना किती शिक्षकांनी प्राण आहुती दिली. अजूनही त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळालेली नाही. त्याची किंमत न करता शिक्षक जणू फुकट पगार खातात अशी भाषा केली जाते, तेव्हा दुःख होतं.
शिक्षकांना २०टक्के पगार द्यायचा की ४० टक्के पगार द्यायचा, घोषित करायचं की अघोषित करायचं याचा काथ्याकुट वित्त विभाग करतं तेव्हा दुःख होतं. शिक्षण सेवक, नवीन शिक्षक भरती, जुनी पेन्शन, रात्रशाळा, वेळेवर पगार, अतिरिक्त शिक्षक समायोजन, शिक्षक बदली, अर्धवेळ शिक्षक, आयटी शिक्षक, अंगणवाडी ताई यातल्या शोषणावर सरकार बोलायला तयार नाही. आता भरीस भर केंद्र सरकारचं नवीन शिक्षण धोरण येतंय.
आपल्या बजेटमध्ये पूर्वी आरोग्यावर जीडीपीच्या अर्धा टक्के खर्च होत असे आणि शिक्षणावर अडीच टक्के. कोविडमुळे आरोग्य सुधारणा होऊ लागल्या आहेत. पण आरोग्य सेवकांचं शोषण मात्र थांबलेलं नाही. तीच स्थिती शिक्षणाची आणि शिक्षकांची. त्यात सुधारणा व्हावी हीच या जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्त अपेक्षा. आणि शिक्षकांना शुभेच्छा!
- कपिल पाटील
सेव्हन हिल्स हॉस्पिटल, मुंबई
दि. ०५ ऑक्टोबर २०२१
आपल्या कार्याला सलाम
ReplyDeleteशिक्षकांची खरी तळमळ असणारे महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व....म्हणजेच मा.शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब!!
ReplyDeleteमा.पाटील सर आपण नेहमीच शिक्षकांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहात.मनःपूर्वक धन्यवाद.आपणास आपले कार्य निर्भीडपणे करण्यासाठी आपणास अखंड सकारात्मक ऊर्जा मिळावी.ही शुभकामना
ReplyDeleteशिक्षकांचे दैवत म्हटलं तर वावगं ठरणार नाही.समाज कार्याला वाहून घेणारं एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे कपील पाटील सर
ReplyDeleteशिक्षकांचे खरे नेतृत्व म्हणजेच माननीय शिक्षक आमदार कपिल पाटील साहेब
ReplyDeleteसलाम आपल्या कार्याला
. साहेब, शिक्षक हा नेहमीच कोणत्याही कामाला सर्वांच्या पुढे असतात परंतु आज शिक्षक दिनी आपणाला सांगावेसे वाटते की,महाराष्ट्र राज्य सरकारने सन 2019 -20 ,2020- 21 2021 - 22चे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केलेले नाहीत तरी सरकारने राज्य पुरस्काराची कार्यवाही सुरू करावी ही आपल्या प्रशासनाला कळकळीची विनंती
शिक्षकांचे खरे दैवत साहेब खरंच आपन आहात आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
ReplyDeleteVery true words ,expressed about teachers work.
ReplyDeleteशिक्षकांचे खरे दैवत साहेब खरंच आपन आहात आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे
आपण लवकर बरं व्हावे हिच देवाकडे प्रार्थना
सर अतिशय समर्पक शब्दात आपण शिक्षकांबद्दलची व्यथा मांडली. आपण हॉस्पिटलमध्ये आहेत तरीही शिक्षकांचं विचार करीत आहात .आधी आपली काळजी घ्या सर .👍
ReplyDeleteपाटील साहेब म्हणजे यश हे समिकरण झालय
ReplyDeleteविधानसभेत आपण ऊभे राहिलात की सरकारला धडकी भरते, आपम मांडलेला प्रश्न सोडवावाच लागतो. इतका अचूक अभ्यास व मांडणी क्वचीत पहायला मिळते. शिक्षकांबदंदल असलेला सन्नमान ही बाब समाजाला दिशा देणारी आहे.
पाटील साहेब एकमेव असे नेते आहे सलाम त्यांच्या कार्याला.
ReplyDeleteसलाम आपल्या कार्याला साहेब जिवेत शरदं शत
ReplyDeleteशिक्षण हे अनुत्पादक काम आहे असं म्हणून पाहणारी व्यवस्था शिक्षण व शिक्षकांना बदनाम करत आहे त्यातून देशाचं भविष्य धोक्यात जाईल याची कल्पना त्यांना का येत नसावी.शिक्षणसेवक टप्पा अनुदान विनाअनुदान हे शिक्षकांचे शोषण करणारी व्यवस्था आहे यातून शिक्षणाचं वाटोळ होतं
ReplyDeleteआपण हॉस्पिटलमध्ये आहेत तरीही शिक्षकांचं विचार करीत आहात .आधी आपली काळजी घ्या, आपण लवकर बरं व्हावे हिच देवाकडे प्रार्थना.
ReplyDeleteसाहेब आपण हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा शिक्षकांची काळजी घेता सलाम आपल्या कार्याला .
ReplyDeleteशिक्षकांच्या दैवताला मनापासून प़णाम
ReplyDeleteशिक्षकांच्या दैवताला रहदयापासून प़णाम
ReplyDeleteसर आपण पुरोगामी विचाराचे आहात हेच आमच्या साठी भाग्याची गोष्ट आहे. आपण लवकर बरे व्हा. हो प्रार्थना
ReplyDeleteInternational Teachers' Day Mubarak Ho
ReplyDeleteJin ko grant hai. Aur Jin ko grant nahi hai. Sab ko Mubarak ho.
आपली प्रकृती शीघ्र दुरुस्त होवो हीच सदिच्छा!
ReplyDeleteGod bless you,get well soon.
ReplyDelete