नव्या लढाईचा संकल्प
माझ्या मुंबईकर शिक्षक बंधूनों आणि भगिनींनो,
मी माझ्या मुंबईकर शिक्षकांबद्दल अत्यंत कृतज्ञ आहे. तिसऱ्यांदा तुम्ही माझ्यावर जबाबदारी दिली आहे. त्याच निष्ठेने आणि त्याच तळमळीने यापुढेही मी काम करत राहीन. यावेळची लढाई खूप मोठी होती. एका बाजूला सत्ता, पैसा आणि त्यांची ताकद. दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य शिक्षक. पण मुंबईतले शिक्षक हरले नाहीत. घाबरले नाहीत. दचकले नाहीत. तुम्ही तितक्याच निष्ठेने आणि तितक्याच तडफेने कौल दिलात. आधी त्यांनी आपली नोंदणी होऊ दिली नाही. ज्यांची नोंदणी झाली त्यांचे फॉर्म गायब केले. ते पोहचू दिले नाहीत. दिलेली नावं सुद्धा गायब करण्यात आली. ७ हजार शिक्षकांचा मतदानाचा अधिकारच हिरावून घेतला गेला. पण ज्यांची नोंदणी झाली त्यांनी सारं पणाला लावून मतदान केलं. पैशाची पाकिटं घरी आली. पण त्याला बळी कुणी पडलं नाही. इथून, तिथून धमक्या आल्या. धमक्यांना कुणी घाबरलं नाही. सगळी सरकारी यंत्रणा काम करत होती. शाखेशाखेतून फोन जात होते. नगरसेवक, आमदार, मंत्री बुथवर येऊन बसले होते. पण मुंबईकर शिक्षक बहाद्दर आहे. हिंमतवान आहे. त्याने हिंमतीने मतदान केलं आणि शिक्षकांना विकत घेता येत नाही, हे दाखवून दिलं.
चाणक्याचा अवमान झाला. चाणक्याने सत्ता उलथवून दाखवली. मुंबईच्या शिक्षकांनी अवमान, अप्रतिष्ठा, अवहेलना, छळ आणि नंतर पैशाचं अमिष, दबाब आणि धाकधपटशाही या कशालाही जुमानलं नाही. माझ्या मुंबईकर शिक्षक बंधूनों आणि भगिनींनो, माझा तुम्हाला सलाम आहे. मी अत्यंत कृतज्ञ आहे. मी तुमच्यासमोर अत्यंत विनम्र आहे. अफाट धैर्य दाखवलंत तुम्ही.
ज्यांनी आपल्याला छळलं, त्रास दिला त्यांना सरप्लस करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि ते नक्की होणार आहे. महाराष्ट्रभरातले शिक्षक मोठ्या आशेने मुंबईकर शिक्षकांकडे पाहत होते. मीडिया पाहत होता. साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं. कपिल पाटील काय टिकणार? असं भल्याभल्या विश्लेषकांचं म्हणणं होतं. पण मुंबईच्या शिक्षकांनी निर्धार केला आणि ते सगळे संभ्रम दूर करुन टाकले.
आता पुढची लढाई आहे. आपण साऱ्यांनी मिळून ती लढायची आहे. हिंमतीने असंच लढायचं आहे. पेन्शनची लढाई असेल. सरप्लसची असेल. नाईट स्कूलची असेल. Cashless medical smart कार्डाची असेल. सातव्या वेतन आयोगाची असेल. ऑनलाईनच्या ओझ्याची असेल. अभ्यासक्रम बदलाची असेल. बेसलेस बेसलाईन परीक्षेची असेल. या प्रत्येक लढाईत आपण अशीच एकजुट टिकवली तर नक्कीच यशस्वी होऊ. ही लढाई फक्त शिक्षकांची नव्हती आणि नाही ही. ही सर्वसामान्यांची लढाई आहे. गरीबांची आणि मध्यमवर्गाची पण आहे. शिक्षण महाग करुन सोडलेलं आहे, त्या विरुद्धची ही लढाई आहे. शाळांचं कंपनीकरण, विद्यापीठांचं खाजगीकरण या विरोधातली ही लढाई आहे. शैक्षणिक समाजवादाची ही लढाई आहे. ही लढाई राजकीय आहे. या लढाईत आता सर्वांची साथ हवी. या मोठ्या लढाईची तयारी आपण सारे मिळून करुया.
येत्या शनिवारी तोच संकल्प आपल्याला करायचा आहे. येत्या शनिवारी म्हणजे ७ जुलैला संध्याकाळी ४ वाजता शिवाजीमंदिर, दादर, मुंबई. होय चलो शिवाजीमंदिर, दादर. शरद यादव, राजू शेट्टी, हितेंद्र ठाकूर ही सगळी मंडळी येणार आहेत. आपणही एकत्र येऊया आणि नव्या लढाईचा संकल्प सोडूया. मी वाट पाहतोय तुमची. जरुर या. धन्यवाद!
आपला स्नेहांकित,
कपिल हरिश्चंद्र पाटील