सुरेश तावडे. एक जिंदादिल माणूस. लढवय्या. पक्का समाजवादी. मुंबईच्या सहकारातला अग्रणी.
पण सहकारात शिरलेला एकही दोष अंगी लावून न घेतलेला. अत्यंत प्रेमळ. मनमिळावू. संवादी.
सर्वमित्र. अजातशत्रू.
सर्वमित्र, अजातशत्रू यांच्या भूमिका कधी कधी पातळ होतात. पण तावडेंचं तसं कधीच झालं नाही.
स्पष्ट वैचारिक भूमिका. लोकशाही समाजवादी विचारांवरची निष्ठा अढळ. दलित, अल्पसंख्य
चळवळींशी सांधा. पॅत्र्सिझम विरोधी स्पष्ट आणि ठाम भूमिका. ही त्यांची वैशिष्ट्यं होती. राजकीय
घडमोडींचं त्यांचं वाचन आणि विश्लेषण अचूक असायचं. कामगारांच्या एरियात सहकाराच्या
माध्यमातून विधायक संस्थांत्मक काम त्यांनी उभं वेत्र्लं. अपना बाजार म्हणजे जुन्या काळातला
मॉल. सर्वसामान्यांना परवडणारा. अपना बाजारची साखळी उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा
होता.
अपना परिवाराचे ते प्रमुख होते. म्हणजे सर्वांनीच त्यांना तसं मानलं होतं. अपना बँकेवर दत्ताराम
चाळके आणि त्यांचं पॅनल निवडून आलं, म्हणून सत्कार झाला. तो तावडे साहेबांच्याच
सांगण्यावरुन. तब्येत ढासळत असतानाही ते कार्यव्रत्र्माला हजर राहीले. स्पष्ट आणि खणखणीत
बोलले.
माझ्यावरही त्यांचं प्रचंड प्रेम. लोक भारतीच्या नव्या फेरमांडणीसाठी काही महिने ते आग्रही होते. नवं काही सुरु करणार, इतक्यात ते अवचित गेले. सकाळी (१ ऑगस्ट) त्यांच्या मुलाचाच फोन
आला. भेटल्यावर ऋषिकेश म्हणाला, बाबांचे तुम्ही लाडके होता. अगदी शेवट पर्यंत आठवण काढत होते.
आला. भेटल्यावर ऋषिकेश म्हणाला, बाबांचे तुम्ही लाडके होता. अगदी शेवट पर्यंत आठवण काढत होते.
निरलस, निरपेक्ष प्रेम करणारा माणूस. कॅन्सर झाला हे कळलं, काही महिन्यांपूर्वी. पुन्हा बरे
होतील ही आशा मात्र खोटी ठरली. तावडे साहेब तुम्ही इतक्या लवकर जायला नको होतं.
_________________
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
अध्यक्ष, लोक भारती
No comments:
Post a Comment