Saturday, 30 September 2017

त्या २२ घरात ...


आजच्या सणाच्या शुभेच्छा देताना कालच्या दुर्घटनेची आठवण गळ्याशी दाटून आली आहे. त्या २२ जणांच्या घरात आज सण नसेल. काय दोष होता त्यांचा? कुणाचा कमावता मुलगा गेला होता. कुणा लहानग्यांची आई.

माझे मित्र आणि विधान परिषदेतील पूर्वीचे ज्येष्ठ सहकारी, आताचे खासदार अरविंद सावंत यांनी त्या परळ-एलफिस्टन पुलाबद्दल खुद्द रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यांना रेल्वे मंत्र्यांनी उत्तर काय दिलं? पैसे नाहीत म्हणून.

सहा फुटी फूट ओव्हर ब्रीजसाठी भारत सरकारकडे पैसे नाहीत पण बुलेट ट्रेन आणायला पैसे आहेत. मेल्यानंतर काय लागतं? सहा फुटांचा खड्डा नाहीतर सहा फुटांचं सरण. सरकारकडे पैसे नाहीत म्हणून या २२ जणांचे जीव गेले. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारला ३० हजार कोटी द्यायचे आहेत. महाराष्ट्र शासन देणार आहे. 

मुुंबई बँक सरकारला २ हजार कोटी रुपये देणार आहे. म्हणून बुडणाऱ्या बँकेत मुंबईतल्या माझ्या शिक्षकांचे पगार ढकलण्यात आले. 

काळया पैशाचा नायनाट करायला नोटबंदी केली. ब्लॅकमनीवाले कमिशन देऊन सुटले. भारताची अर्थव्यवस्था मात्र कोसळायला लागली आहे. भाजपचेच माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांनी घरचा आहेर दिला आहे. मनमोहन सिंग सांगत होते की, दोन टक्क्यांनी जीडीपी खाली जाईल. गेलीच.

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली खरी पण त्यासाठी ३ हजार शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. दोन वर्ष शेतकरी रस्त्यावर होता सरकार ऐकायला तयार नव्हतं. 

परळ-एलफिस्टनच्या चेंगराचेंगरीमध्ये काही मिनिटात २२ माणसं मारली गेली. आता सरकार स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे. गेल्या वर्षात ३,५०० माणसं मुंबईतल्या ट्रेनखाली मारली गेली. या आठ महिन्यातला आकडा २,००० वर गेला आहे. 

हे सरकार आल्यापासून शेतकरी आणि शिक्षक यांना छळण्याचा कार्यक्रमच हाती घेण्यात आला आहे. रोजगाराचा पत्ता नाही. पण शिक्षणाच्या व्यापारीकरणाला दारं उघडी करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात मागच्यावेळी समाजवादी सरकार होतं. तिथल्या १ लाख ७८ हजार शिक्षा मित्रांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मला बोलावून घेतलं होतं. महाराष्ट्रातल्या ८ हजार वस्तीशाळा शिक्षकांना कायम कसं केलं? हे विचारण्यासाठी. आता योगींचं सरकार आलं आहे. त्या १ लाख ७८ हजार शिक्षकांना योगी म्हणतात, ३९ हजार पगारावर नाही  तर १० हजार मानधनावर काम करा. 

महाराष्ट्रात ७ हजार शिक्षक आणि शिक्षण सेवकांना काढून टाकण्यात आलं. कोर्टाने वाचवलं. पण अजून पगार सुरु करायला सरकार तयार नाही. रात्रशाळा शिक्षकांना देशोधडीला लावण्यात आलंय आणि विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे. रात्र ज्युनिअर कॉलेजला तर एकही सरप्लस शिक्षक पाठवता येत नाही म्हणून ज्युनिअर नाईटच्या शिक्षकांना परत बोलावण्यात आलं. पण गेल्या ४ महिन्यात १ रुपयाचा पगार देण्यात आलेला नाही. परवा संस्थाचालक मोठ्या अपेक्षेने शिक्षणमंत्र्यांना भेटायला गेले. शिक्षणमंत्र्यांनी त्यांना नकार घंटा वाजवून परत पाठवलं.  

बनारस हिंदू विद्यापीठातल्या विद्यार्थीनी रोज आंदोलन करताहेत. पण त्यांना सुरक्षा द्यायला सरकार तयार नाही. कुलगुरु मुलींनाच दोष देताहेत आणि संस्काराचे धडे शिकवताहेत. मुंबई विद्यापीठात म्हाळगी प्रबोधिनीतून तयार झालेले कुलगुरु कसा कारभार करत होते हे दोन वर्ष आपण पाहतो आहोत. निकालांचा बट्टयाबोळ झाला. हजारोंचं पुढचं शिक्षण बोंबललं. पण सरकारला पर्वा नाही. 

विजयादशमीचा सण रावण दहनासाठी प्रसिद्ध आहे. दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट करायला शमीच्या झाडावरुन पांडवांनी शस्त्र उतरवली तो हा दिवस. भारताला ज्याच्या राज्यामुळे ओळख मिळाली त्या सम्राट अशोकाच्या विजयाचा हा दिवस. मनुस्मृतीचं अंधार राज्य संपवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र फिरवलं तोही हाच दिवस. परिवर्तनाचे चक्र फिरवण्यासाठी संकल्प करायला यापेक्षा आणखी कोणता दिवस हवा. 

विजयादशमीच्या शुभेच्छा! 

आपला,
कपिल हरिश्चंद्र पाटील
आमदार, विधान परिषद

शनिवार, दि. ३० सप्टेंबर २०१७

(व्यंगचित्र - प्रदीप म्हापसेकर)

10 comments:

  1. Dolyat anjan ghalnara lekh.. Katu pan satya

    ReplyDelete
  2. आता मृतांना मदत देतील

    ReplyDelete
  3. eye opener, shame for NAMO POLITICES

    ReplyDelete
  4. सर्व महाराष्र्टाच्या शिक्षकभारती परिवारातील सर्व सदस्याना विजयादशमिच्या कोटी—कोटी शुभेच्छा।

    ReplyDelete
  5. सर्व महाराष्र्टाच्या शिक्षकभारती परिवारातील सर्व सदस्याना विजयादशमिच्या कोटी—कोटी शुभेच्छा।

    ReplyDelete



  6. All said and done people in general like this govt.
    We who hate this govt are in microscopic minority.








    ReplyDelete
  7. एक कटूसत्य
    सरकार अजून काय काय गोंधळ घालणार आहे 2 वर्षात
    काय माहिती.
    पण आपली एकजुटीने लढा देऊ

    ReplyDelete
    Replies
    1. नाशिक विभागात चiग ला माणुस टाका साहेब शिक्षक आमदार म्हणून ... आमचे पदवीधर व शिक्षक आमदार घ्या सोबतीला , वजनदार आहेत पण ..भेट नाही राव सामान्य शिक्षकाची... आमचा कॅसचा प्रॉब्लेम.. संशोधनाचा प्रॉब्लेम... मिळालं तेवढं गिळा अन् साहेब सांगतील तस्सं बारीक. ठेका धरायचा .ही देखील वृत्ती थोडी बोकाळलीय साहेब ... राजघराण्यांना मतदार संघ नाहीत मणुन ते . विधान परीषदेकडे गर्दी करतात... कड़े

      Delete