उद्या 5 सप्टेंबरला सरकारी शिक्षक दिनी, सरकारने #ThankATeacher नावाचा उपक्रम आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांचा वापर करत आपल्या शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी अशी सरकारची अपेक्षा आहे. धुळ्यात काल दोन शिक्षकांनी आत्महत्या केल्या. विनाअनुदानामुळे पगारच नाही, या स्थितीत हजारो शिक्षकांना वैफल्याने ग्रासलं आहे. विद्यार्थ्यांना कृतज्ञता व्यक्त करायला सांगण्याऐवजी शासनाने ठरल्याप्रमाणे अनुदान सुरू केलं असतं, तर ती खरी कृतज्ञता ठरली असती. स्वतः काही करायचं नाही आणि विद्यार्थ्यांनी मात्र थँक्स अ टीचर म्हणायचं, विद्यार्थी तर ते म्हणतच असतात.
खरा शिक्षक दिन हा 3 जानेवारीला असतो. ज्या दिवशी महामानवी सावित्रीबाई फुले यांची जयंती असते. महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली 1 जानेवारी 1948 ला. सावित्रीबाईंसह फातिमा शेख शिक्षिका होत्या. देशातील पहिल्या महिला शिक्षकांचा जन्मदिवस खरं शिक्षक दिन म्हणून साजरा केला पाहिजे. आम्ही तोच करतो. पण सरकारला शिक्षक दिनी शिक्षकांची आठवण आली असेल तर किमान शिक्षकांना सन्मानाने पगार मिळेल, त्यांच्यावर अशैक्षणिक कामाचं ओझं राहणार नाही आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी प्रत्येक विषयाला शिक्षक मिळेल याची व्यवस्था करणं ही जबाबदारी पहिल्यांदा सरकारने पार पाडावी. ते जमत नसेल तर विद्यार्थ्यांना थँक्स अ टीचर सांगण्याची आवश्यकता नाही.
उद्या सरकारी शिक्षक दिन दिल्लीपासून मुंबईपर्यंत देशात सर्वत्र साजरा होईल. पण त्याचवेळी केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण धोरणाने गोरगरिबांच्या शिक्षणावर मोठं संकट आणलं आहे. कमी पटाच्या लाखभर शाळा बंद करणं, हजारो महाविद्यालयं बंद करणं, खाजगीकरण वाढवणं, व्यावसायिक शिक्षणाच्या नावाखाली मूलभूत शिक्षणाच्या प्रवाहातून वंचितांना पूश आऊट करणं आणि दुसऱ्या बाजूला वर्णवादी सनातनी मूल्यांचा उदोउदो करणं असं हे नवं शिक्षण धोरण आहे. केंद्र सरकारच्या त्या धोरणाचा निषेध आणि राज्य सरकारच्या अनास्थेमुळे शिक्षकांच्या होणाऱ्या आत्महत्या व अवहेलना याबद्दलचा शोक महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांनी उद्याच्याच दिवशी करावा.
शिक्षक भारतीच्या पुढाकाराने देशभरातील विविध राज्यांमधील शिक्षक संघटनांनी संयुक्तपणे नव्या शिक्षण धोरणाच्या विरोधात ऑनलाईन निषेध संमेलन आयोजित केलं आहे. या संमेलनात सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावं, असं आवाहनही मी करत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातील शिक्षक संघटना, राष्ट्र सेवा दल, छात्र भारती आणि विविध राज्यातील विद्यार्थी संघटना या संमेलनात सहभागी होत आहेत. आपणही सहभागी व्हावं, ही विनंती.
संमेलनात सहभागी होण्यासाठी Rashtra Seva Dal India या युट्युब चॅनलला Subscribe करा. Notification साठी Bell Icon दाबा.
आणि
शिक्षक भारती फेसबुक पेजला Like करा
धन्यवाद!
- आमदार कपिल पाटील, अध्यक्ष, लोक भारती
------------------------------------
5 आणि 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन निषेध संमेलनाची रूपरेषा
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या विरोधात शिक्षक भारतीचे निषेध संमेलन
केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 जाहीर केले आहे. शिक्षणाच्या मुळावरच उठणारे हे धोरण आहे. या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात दिनांक 5 व 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी ऑनलाईन निषेध संमेलनात विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सामील होणार आहेत.
निषेध संमेलनाची रूपरेषा
दिवस पहिला : -------------------------
5 सप्टेंबर 2020
सायंकाळी 4 वाजता
सत्र पहिले
सूत्र संचालन :
सागर भालेराव, छात्र भारती
स्वागत व प्रास्ताविक :
अशोक बेलसरे, अध्यक्ष, शिक्षक भारती
उदघाटक व मुख्य भाषण :
मा. सुखदेव थोरात,
माजी अध्यक्ष, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन
प्रमुख अतिथी :
मा. केदारनाथ पांडे, शिक्षक आमदार, बिहार विधान परिषद
सत्र दुसरे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर देशातील विविध शिक्षक संघटना प्रतिनिधींचे संमेलन
सूत्रसंचालन :
सुभाष मोरे, कार्याध्यक्ष, शिक्षक भारती
प्रमुख वक्ते :
1) जालिंदर सरोदे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती
2) कौशल कुमार सिंग,
प्रदेश मंत्री, उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षा मित्र संघ
3) राजेंद्र शर्मा,
संयोजक, हरियाणा अतिथी अध्यापक संघ
4) सुनील चौहान,
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय अस्थायी अध्यापक महासंघ, हिमाचल प्रदेश
5) दिनेश कर्नाटक,
उत्तराखंड, संपादक शैक्षिक दखल पत्रिका
6) अजमेर सिंग,
पंजाब शिक्षा प्रोव्हायडर
7) पुनीत चौधरी, महामंत्री, उत्तर प्रदेश प्राथमिक शिक्षा मित्रसंघ
8) नवनाथ गेंड,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती
9) रविंद्र मेढे, अध्यक्ष, छात्र भारती
आभार प्रदर्शन :
दिलीप निंभोरकर, विभागीय अध्यक्ष, शिक्षक भारती अमरावती विभाग
दिवस दुसरा : -------------------------
दिनांक 6 सप्टेंबर 2020
सायंकाळी 4 वाजता
शैक्षणिक धोरणावर आधारीत विविध राज्यांचे प्रतिनिधी ठराव मांडतील
समारोप :
गिरीष सामंत, शिक्षण हक्क कृती समिती
कपिल पाटील,
शिक्षक आमदार, मुंबई शिक्षक मतदारसंघ
श्रीमती ताप्ती मुखोपाध्याय, अध्यक्षा, एमफुक्टो
केदारनाथ पांडे, शिक्षक आमदार, बिहार विधान परिषद
डाॅ. गणेश देवी,
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल
आभार प्रदर्शन :
प्रकाश शेळके, कार्यवाह, शिक्षक भारती
------------------------------------------
हे संमेलन
Rashtra Seva Dal India युट्युब चॅनलला
आणि
Shikshak Bharati फेसबुक पेजला
Live बघता येईल.
संमेलनात सहभागी होण्यासाठी Rashtra Seva Dal India युट्युब चॅनलला Subscribe करा, Bell Icon दाबा. आणि Shikshak Bharati फेसबुक पेजला Like करा.
संयोजक :
राष्ट्र सेवा दल
शिक्षक भारती
छात्र भारती
एकदम बरोबर आहे साहेब,भारत देशाला महाशक्ती आणि आत्मनिर्भर बनवण्याची स्वप्नें पाहणाऱ्यानी आधी शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षकांचा कोणत्याही कामासाठी केला जाणारा गैरवापर थांबवून आत्मसन्मानाने जगता येईल एव्हडे वेतन देऊन शिक्षकांची अवहेलना शासनकर्त्या नी थांबवावी. शिक्षक दिन कधी साजरा करावा याचा योग्य सल्ला साहेब आपण दिला आहे. जोहार जिन्दाबाद🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteसही सोच सही दिशा
ReplyDeleteAbsolutely right if one thinks to respect the teachers by showing any activity isn't completely fine but on the other hands in America, Japan, France, Germany, Turkey, Britain and many other countries has the law to respect pure for teachers.
ReplyDeleteat there Only teachers can sit on the chair Besides of the judge in the court.
If police want to lodge a complaint against the teacher then Judge's permission is essential and after that judge will contact to the teacher and when he is free only at that time jury will ask debate then if police claim is true then Judge will give suitable penalty if polcpo claim is false then Judge will lodge a case against the police.
In abroad Teachers are happy so whole nation is happy.
Teacher is the constrictor of the nation.
Good
ReplyDeleteएप्रिल महिन्या पासून ठाणे मनपा शाळेचे शिक्षक कोव्हिड सर्वेक्षणाचे काम करत आहेत दुधर आजारी शिक्षकांना प्रवासी साधन नसताना दररोज शाळेत हजेरी दयावी लागत आहे .
ReplyDeleteकार्यमुक्तीची फसवी घोषणा करण्यात आली आहे
दररोज १०० घरांचे सर्वे करावे लागत आहे
सर्वे करुन काय साध्य करायचे आहे कळत नाही पुन्हा त्याच घरांचे सर्वे
Sahi soch sahi vichar
ReplyDeleteJay shikshak bharati
ReplyDeleteShikshak ki samsyao ka nivaran hi shikshak divas sahi mayane me hoga,unake karya ki जवाबदेही देखते हुए उनकी समस्याओं का समाधान करने की कोशिश की जाए,यही सच्चे अर्थों में शिक्षक दिवस होगा,अन्यथा ये खानापूर्ति होती थी और होती रहेगी।thanks again
ReplyDeleteGautam Pal Worli Mumbai
DeleteJay ho shikshk bharti
ReplyDeleteखरंच धोरणात्मक निर्णय घेणारे शासनचा धोरणा विषय ज्यांनी असे निर्णय घ्यावा असे वाटते लोकशाही ने नाही यांना ठोकशाहीने दखल घेण्यास भाग पाडले पाहीजे
ReplyDeleteशासन धोरणाचा निषेध۔ Thank a teacher धोरण राबवायचे आणि शिक्षकांन वेतन वंचित ठेवायचे۔ काय धोरण आहे
ReplyDeleteजाहीर निषेध निषेध 20 वर्षपासून शिक्षकांना विना वेतन ठेवल्या साठी प्रथम शासनाचे निषेध युक्त अभिनंदन ज्यांना आहे ते तुपाशी आणि आम्ही उपाशी ,जे काम आम्ही करतो तेच इतर शिक्षक करत आहेत मग आम्ही का उपाशी ,आज कोरोना च्या काळात आम्ही रोजमजुरी करत एक वेळ जेवण करून कुटुंब निर्वाह करत आहोत ,आणि अजून शाशन निधी वितरुणांचा gr काढत नाही तर आमच्या जखमेवर मीठ म्हणून उपसमिती ची पटी लावत आहे शाशनाचा या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो ,जर आज या शिक्षक दिन निधी वितरण gr निघाला असता तर आम्ही शिक्षक दिन साजरा केला असता 😢😢😢😢😢
ReplyDeleteAll teachers should get payment from the date of appointment on the 1st day of the next monththen and then only their families will be happy and they can concentrate on their teaching
ReplyDeleteजय शिक्षकभारती
ReplyDeleteSchool teacher ends life in Maha''s Palghar : not got salary for the last few months.
ReplyDelete===============
Palghar, Jul 17 (PTI) A 31-year-old school teacher allegedly committed suicide in Dahanu tehsil of Maharashtra''s Palghar district apparently due to depression, police said on Friday.
The man, Gangaram Chowdhari, who taught in a local private school, hanged himself at his home in Nimbapur- Mahalpada hamlet during the intervening night of Tuesday and Wednesday, Palghar police spokesperson Sachin Navadkar said.
"As per the statement of the brother of the deceased, the latter was depressed ever since his wife had left him few months ago and gone to her parents'' house," he added.
According to police, the teacher had reportedly not got salary for the last few months.
Before ending his life, the man drew his own picture on a paper and wrote July 15 on it, the official said.
Kasa police have registered a case of accidental death, he said. PTI COR NP NP
https://www.outlookindia.com/newsscroll/school-teacher-ends-life-in-mahas-palghar/1897577
Maharashtra: Weeks after scribbling date of death on self-portrait, teacher, painter commits suicide
ReplyDelete================
MUMBAI: Around a month after he drew a self-portrait and mentioned his date of death on it, a Warli painter from Dahanu committed suicide in his home. While the 32-year-old painter of the tribal art form was worried about his job as a teacher (he taught drawing in the unaided section of a government school in Dahanu) due to the lockdown.
The Kasa police have registered a case of accidental death. The victim was found hanging in his home in Nimbapur on July 15.
A portrait of himself that he had sketched on June 20, had his death date mentioned as July 15. The portrait was hidden from his family. Minutes before killing himself, he shared the garlanded portrait on Whatsapp with a relative. But it was too late. When his body was discovered by the family hours later, they were shocked to see him hanging and the garland portrait around.
(TOI)
right.today the treatment we get from government is totally disgraceful regarding DCPS and NPS.New education plan is also not satisfactory.It is said that in USA the teacher is considered as a highest post.Teachers are given due respect.Theit salary is also highest than others.Regarding NPS and DCPS these both plans are very disgraceful to all new well qualified and efficient teachers.Why should new teachers give up their old pansion plan?we need it.It is our constitutional right to acquire it.
ReplyDeleteWe all the teachers condemn Government's insensitivity towards teachers grant. Teachers are doing suicides and many of them are suffering from heart diseases.
ReplyDeleteToday, Teachers' Day is "Black Day" for teachers of Maharashtra State.
100% खरे आहे सर
ReplyDeleteलय भारी, अगदी बरोबर सर
ReplyDeleteGovernment and beaurocates looking for their own benefit , rather than addressing real issue of teacher and nation welfare,few honest people in government we hope they will help teacher ,
ReplyDeleteI support you Sir.
ReplyDeleteIt is right way to express.
DeleteIt is right way to express. Ramdas Shinde (mpv)
Deleteख़री बाब असून,हे सर्व आजवर महान मानवांच्या जयन्त्या उत्सव साजरे करतात, करायचे म्हणून !👌
ReplyDeleteपण;'लक्ष्यात कोंण घेत'विचारधन !👍
त्यांना 💐नकों,सुंगंध हवा ,
रुक्षता नकों,कांति हवी,
साधपण नकों, संगीत हव!👌
जे हवे ते फक्त Atm,सिंहासन!👌💐