सोलापूर
जिल्ह्याच्या माढा तालुक्यात
परितेवाडी आहे. तिथल्या कदम वस्तीवरची वस्तीशाळा. त्या शाळेवर 2009
मध्ये रणजितसिंह डिसले शिक्षक म्हणून आले. इंजिनिअरिंगचा तो Droupout
Student होता. वडिलांनी सांगितलं D.Ed कर, शिक्षक हो. रणजित D.Ed झाला
आणि शिक्षकही. खेड्यातल्या त्या शिक्षकाने शिक्षण क्षेत्रातलं
नोबेल प्राईज मानलं जाणारं 'Global Teacher Prize 2020' जिंकलं आहे. थक्क
करणारी विलक्षण ही घटना आहे. असं काय केलं त्यांनी की जगातल्या 140 देशातील 12
हजार शिक्षकांतून त्यांची निवड झाली?
देशभरातले अनेक शिक्षक खेड्यापाड्यात,
वडीवस्तीवर असलेल्या शाळांमधून
विद्यार्थी
घडवताहेत. मेहनतीने, निष्ठेने लोकांनी कितीही नावं ठेवू देत शिक्षक
प्रामाणिकपणे काम करताहेत. म्हणूनच देश उभा राहतोय. पण डिसले गुरुजींनी
वेगळं काय केलं?
अलीकडेच
तंत्रस्नेही शिक्षक हा शब्दप्रयोग प्रचलित झाला आहे. तो तेवढासा बरोबर
नाही. शिक्षक हा तंत्रयुक्त पण विद्यार्थी स्नेही असायला हवा. डिसले गुरुजी यांनी तेच केलं.
आपल्या खेड्यातल्या मुलांसाठी त्यांनी देशांच्या सीमा खुल्या केल्या.
जगभरच्या मुलांशी
परितेवाडीची ती मुलं बोलत होती. पण तंत्रज्ञानाचा हा उपयोग त्यांना तिथेच
स्वस्थ बसू देईना. हातात असलेल्या मोबाईलचा, लॅपटॉपचा उपयोग मुलांसाठी का
करता येणार नाही? शिकवणं म्हणजे पाठ्यपुस्तकातले धडे शिकवणं नाही. तो सगळा
धडा जिवंत करता आला तर? ऑडिओ, व्हिडीओमधून नाट्य उभं करता आलं तर? त्या
धड्यातले संदर्भ शिक्षकांना सहज उपलब्ध का होऊ नयेत? पुस्तकात धड्याच्या
खाली संदर्भ दिलेले जरूर असतात पण खेड्यातले शिक्षक ते शोधून कुठून काढणार?
मुलांपर्यंत ते कसे पोचवणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं डिसले
गुरुजींनी एका Click वर शोधली. बाजारातला QR Code किंवा परीक्षेत वापरला
जाणारा BarCode आपल्याला आता काही नवा राहिलेला नाही. गुरुजींनी नवीन एवढंच
केलं की अख्खं पाठ्यपुस्तक त्यांनी QR Coded केलं. आपल्या शाळेत पहिल्यांदा
प्रयोग केला. मग जिल्हा परिषदेत दाखवला. तेथून गुरुजी थेट बालभारतीत जाऊन पोचले. श्रीमती धन्वंतरी हर्डीकर या
बालभारतीतल्या संवेदनशील अधिकारी बाईंनी त्याचं महत्त्व ओळखलं. आणि
प्रोत्साहन दिलं. डिसले गुरुजींच्या पाठपुराव्यामुळे बालभारतीने म्हणजे
महाराष्ट्र सरकारने 2017 मध्ये सगळी पुस्तकं QR Coded करायचं ठरवलं. पुढे
देशभरातल्या अनेक राज्यांनी तोच कित्ता गिरवला.
त्या
एका QR Code ने अख्खा धडा जिवंत होऊ लागला. तंत्रज्ञानाचा वापर करण्याची
ही प्रेरणा विद्यार्थी स्नेहाशिवाय, शिक्षणाबद्दलच्या तळमळीशिवाय आणि
अध्यापनाच्या सर्जनशिलतेशिवाय मिळूच शकत नाही. या तिन्ही गोष्टी डिसले
गुरुजींकडे होत्या. म्हणून त्यांच्या आग्रहाने QR Code चा वापर देशभरातल्या
सगळ्या पाठ्यपुस्तकात सार्वत्रिक झाला. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर
अध्यापनासाठी आणि अध्ययनासाठी सुद्धा होऊ शकतो हे त्यांना सुचलं.
सुचल्यानंतर प्रयत्नपूर्वक त्यांनी ते अमलात आणलं. आणि आपल्या शाळेपुरतं
मर्यादित न ठेवता देशभरच्या पाठ्यपुस्तकांना त्यांनी एका अर्थाने ग्लोबल
केलं.
Internet
आणि QR Code या दोन तंत्राच्या आधारावर वाडी, वस्तीवरच्या शाळा आणि तिथली
मुलं ग्लोबल होऊ शकली याचं अप्रूप
Varkey Foundation आणि UNESCO ला वाटलं. कोविडच्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे QR Code चं महत्त्व अधिक अधोरेखित झालं. गेल्या वर्षी लोकमतच्या विजयबाबू
आणि राजेंद्र दर्डा यांनी डिसले गुरुजींची दखल घेऊन त्यांचा सन्मान केला
होता. Microsoft ने सुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं. आता तर थेट जागतिक
स्तरावर त्यांची मुद्रा उमटली.
डिसले
गुरुजींचं मोठेपण इथेच थांबत नाही. हा शिक्षक जितका सर्जनशील आहे तितकाच
संवेदनशील आहे. आणि विनम्रही. म्हणून पुरस्कार स्वीकारताना ही काही
आपल्या एकट्याचीच निर्मिती आहे, असं न मानता त्यांनी आपल्या पुरस्काराची
अर्धी रक्कम त्यांचे सहस्पर्धक असलेल्या 9 जणांमध्ये शेअर केली. वाटून
टाकली. आणि उरलेली अर्धी रक्कम शिक्षणाच्या Innovative Lab साठी वापराचं ठरवलंय. 7 कोटींचं बक्षिस आहे साहेब. पण घरात नाही नेलं. पुन्हा जे कंकण हाती बांधलेलं आहे, त्याच्याशी जोडलं.
या पुरस्काराने गुरुजी मोठे झाले खरे, पण आपली बक्षिसाची रक्कम
सहस्पर्धकांमध्ये वाटायची आणि उरलेली रक्कम पुन्हा नव्या शैक्षणिक
संशोधनासाठी वापरण्याचा निर्धार करायचा, यातून ते आणखीन मोठे झाले.
डिसले
गुरुजींनी केवळ तंत्रज्ञानाला असलेल्या बाजारू मर्यादा नाही तोडल्या, तर
आपल्या मुलांना बॉर्डर क्रॉस करून जगभरातल्या मुलांशी जोडलं. त्यांना
आधुनिकतेची, नवतेची दारं खुली केली. आणि केवळ
परितेवाडीच्या मुलांसाठी नाही देशभरातल्या, प्रत्येक शाळेतल्या, प्रत्येक
मुलाच्या ज्याच्या पाठ्यपुस्तकात QR Code आता आहे त्या प्रत्येकाचा दरवाजा
त्यांनी खोलला आहे. शिक्षणाला कोणतीच बंधनं नकोत, कोणत्याच सरहद्दी नकोत हे
त्यांनी सांगितलं. आपल्या देशात माहोल तर असा आहे की प्रत्येकजण स्वतःलाच
एक कुंपण घालून घेत आहे. केशवसूत शिक्षक होते. ते म्हणत, 'मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे.' धर्म, जाती, प्रांत भेदाच्या भिंती केवळ आपल्याच देशात घातल्या जात
आहेत असं नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे हरलेत त्यांना मोठी भिंत
बांधायची होती, अमेरिकेतल्या लोकांनी त्यांना हरवलं. डिसले गुरुजी
शिक्षणाला घातलेल्या भिंतीही तोडू मागत आहेत, याचं आधी कौतुक केलं पाहिजे.
ब्रिटिशांनी संस्कृत पाठशाळा सुरू केल्या, तेव्हा राजाराममोहन रॉय यांनी
आधुनिक शिक्षणाची मागणी केली होती. डिसले गुरुजी आधुनिक तंत्रज्ञानाचा
उपयोग आपल्या वस्तीवरच्या मुलांसाठी करून देत आहेत. महात्मा फुलेंनी
शिक्षणाची दारं सगळ्यांना मोकळी केली त्यालाही 170 वर्ष होऊन गेली. आता
कमी पटाच्या शाळा बंद करण्याची तरतूद नवीन शिक्षण धोरणात (NEP 2020) आली
आहे. त्या पार्श्वभूमीवर कुठल्या हायफाय शाळेतल्या शिक्षकाचा नाही गौरव झाला. शिक्षणापासून आजही वंचित असलेल्या वर्गातली, गावातली मुलं जिथे शिकतात
तिथल्या शिक्षकाचा जागतिक सन्मान झाला ही घटना आपल्या सगळ्यांनाच मोठी बळ
देणारी आहे.
रणजितसिंह डिसले गुरुजी, खरंच ग्रेट. तुम्हाला सलाम! आणि
तुमच्या सारखेच प्रयत्न करणारे देशातले आणि जगभरचे जे जे शिक्षक आहेत,
त्यांनाही सलाम!
- कपिल पाटील
(कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल, आमदार - मुंबई शिक्षक मतदार संघ, अध्यक्ष - लोक भारती.)
(कार्यकारी विश्वस्त - राष्ट्र सेवा दल, आमदार - मुंबई शिक्षक मतदार संघ, अध्यक्ष - लोक भारती.)
तंत्रयुक्त विद्यार्थीस्नेही शिक्षक..
ReplyDeleteग्लोबल चे रणांगण जिंकणारे रणजित sir .. Great Salute..,
Deleteएकदम बरोबर आहे साहेब. डिसले सरांचे खूप खूप अभिनंदन🌹🌹🌹🌹🌷🌷🌷
ReplyDeleteखरंच साहेब अतिशय अभिमानास्पद आणि आजही मराठी शाळा आणि त्यातील शिक्षक काय करू शकतात हे डिसले गुरुजींनी दाखवून दिले आहे सलाम
ReplyDeleteखूपच चांगले कार्य
ReplyDeleteमुंबईतील काही संस्थाचालक शिक्षकांचे मनोबल वाढवण्याऐवजी, मानसिक खच्चीकरण करून शिक्षक व विद्यार्थी यांचे नुकसान करीत आहेत.
ReplyDeleteछानच
ReplyDeletenice
ReplyDeleteNice
ReplyDeleteHats off to this real global teacher. Very nice article sir. 🌹👌💐
ReplyDeleteसलाम गुरुजींना...
ReplyDeleteआणि...
खुपच छान लेख म्हणून आदरणीय आमदार कपिल पाटील साहेबांनाही सलाम...
एकदम खरं आहे साहेब खरोखर अभिमानास्पद आहे डिसले गुरूजींना सलाम 🙏
ReplyDeleteआदरणीय साहेब अप्रतिम शब्दांत आदरणीय रणजितसरांचा आणि होतकरू शिक्षकांच्या कार्याचा गौरव तथा कौतुक आपण केले
ReplyDeleteखूप छान डिसले गुरुजी आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो तुम्ही तुमच्या जीवनात पुढे अशीच कार्यकरत राहा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteविध्यार्थीना दैवत मानून केलेले कार्य हे खूप महत्त्वाचे आहे, तंत्रशिक्षण आणि संवेदनशील यांचा सुंदर मिलाप डिसले गुरुजीनी घातला. त्यांच्या या कार्यस सलाम,
ReplyDeleteजय हिंद 🙏🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
अप्रतिम जिल्हा परिषद व
ReplyDeleteReally great work sir
ReplyDeleteWe will also try for that type of innovation.
सलाम या गुरूजींना...छान लेखन साहेब.
ReplyDeleteछान असे शिक्षक असावेत. नाहीतर काही तरी समाजात फुट पाडून आपली पोळी भाजून घेण्यासाठी प्रयत्न करत बसतात
ReplyDeleteरणजित डिसले सरांबद्दल खूप छान व प्रेरणादायी लेख!
ReplyDeleteखूप छान लेख . डिसले सरांचे कौतुक
Deleteरणजित डिसले सरांबद्दल खूप छान व प्रेरणादायी लेख
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteरणजित डिसले सरांबद्दल खूप छान व प्रेरणादायी लेख
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसर आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे आपण खरच ग्रेट आहात ,आपल्या कडून शिक्षकांनी प्रेरणा घेवुन आपला पेशा सेवा आहे या भावनेने काम केले पाहिजे
ReplyDeleteविद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी जीव ओतून ,निस्वार्थ पणे कार्य करून इतका मोठा पुरस्कर मिळवणाऱ्या दिसले सरांविषयीची खूप छान माहिती.ही माहिती समस्त शिक्षकगनाना प्रेरणादायी ठरेल.
ReplyDeleteआपणा सर्व शिक्षकांना प्रेरणा देणारी ही बाब आहे. डिसले सरांनी जसे कार्य केले तसेच आपण सर्वांनी करुन सर्व जि. प.शाळांचा दर्जा उच्च पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करू व शासनास जि.प.च्या शाळा बंद करण्याच्या विचारापासून दुर नेऊ.
ReplyDeleteVery good sir
DeleteVery good sir
DeleteGreatful contribution for nation and world.
ReplyDeleteसाहेब ह्या मिळालेल्या पारितोषिक आहे यात आपला पण खूप मोठा सिंहांचा वाटा आहे कारण मुख्य म्हणजे जर तुम्ही परमेश्वरा सारखे वस्ती शाळा शिक्षक बांधवांना न्याय मिळवून दिला म्हणून डिसले सरांनी जगात इतिहास घडविला साहेब यातुन मला एवढेच म्हणायचे आहे आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत
ReplyDeleteडिसले सरांचे काम खूप प्रेरणादायी आहे सर्व शिक्षकांना मार्गदर्शक ठरेल असे आहे तसेच पाटील साहेबांनी जी कौतुकाची थाप दिली ति तर अवर्णनीयच
ReplyDeleteडिसले गुरुजी अभिनंदन, लेख बद्दल पाटील सरांचे पण अभिनंदन.💐💐👍
ReplyDeleteजिल्हा फरिषदेचा शिक्षक जागतिक स्तरावर पोहचणे खुप प्रेरणा दायी घटना आहे..
ReplyDeleteआदरणीय डिसले सरांचे मनःपूर्वक अभिनंदन. डिसले सरांसारखे अभ्यासू, संवेदनशील, संशोधक शिक्षक यांचे थोर कार्य आपण या पोस्ट च्या निमित्ताने वाचकांसमोर आणलेत यासाठी आपणास मनःपूर्वक धन्यवाद पाटील साहेब.
ReplyDeleteWe are proud of you Ranjitsinh Disable sir
ReplyDeleteअतिशय प्रेरणादायी काम डिसले सरांनी केले आहे.शहरातील शाळांमध्ये काम करणे सोपे असते.कारण शहरातील पालक हे सूज्ञ, सुशिक्षित व शिक्षणाचं महत्त्व माहिती पण वाड्या वस्त्यांवर उपक्रमशिल शिक्षण देणे तसे फार कठीण असते ते काम डिसले सरांनी अगदी सहजपणे करुण शिक्षणाची ज्ञानगंगा साऱ्या जगभर पोहोचवली
ReplyDeleteखरंच तुमचा आम्हाला अभिमान आहे.
🙏🙏✌️✌️👌 ं ं
Very nice.Congratulation to Disale Sir and his team.
ReplyDeleteखरचं ग्रेट ....!खेड्यापड्यातील असणाऱ्या मुलांसाठी आणि संपूर्ण भारत देशासाठी अभिमानास्पदगोष्ट असेल...सलाम गुरुजी सलाम....!
ReplyDeleteजि.प.शिक्षकांचा सन्मान असा जागतिक व्हावा..खरचं ग्रेट आहात...आणि आपल्या मनाच्या मोठेपणाचाही...
Sir खूप छान लेख आहे गुरुजींची महिती सर्वांना कळेल पाटिल सर धन्यवाद
ReplyDeleteGreat Teacher
ReplyDeleteडिसले गुरूजींचे मनःपूर्वक अभिनंदन!
ReplyDeleteया लेखातून डिसले गुरुजींचे कार्य व माहिती समजली
त्या बद्दल माननीय पाटील सरांना धन्यवाद!🙏
Nice Sir, superb performance💐
ReplyDeleteआपल्या कार्याला सलाम सर आम्हाला पण तुमच्या कर्यातुन् प्रेरणा नक्कीच मिळेल सलाम सर आपल्या कर्याला
ReplyDeleteसाेलापूर जिल्हा परतेवाडी येथील वस्ती शाळेतील मा.रनजितसिंग डीसले गुरूजी जे कायॆ तूमच्या हातून घडलेले आहे याला ताेड नाही असेच कायॆ करत राहा देशातील जनता तूम्हाला सलाम करत आहे
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteGreat person Disle sir
ReplyDeleteशिक्षक काय करतात या प्रश्नाचे उत्तर डिसले गुरूजीच्या मार्फत समाजाला मिळाले. व शिक्षकांच्या कामावर अप्रामाणिक पणा दाखवणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर लख्ख प्रकाश पडला असेल या पुरस्काराने. खरंच खूपच अभिमानास्पद वाटचाल आहे डिसले सरांची.
ReplyDeleteडिसले गुरुजींचे मनापासून अभिनंदन!आणि कपिल पाटील सरांना धन्यवाद
ReplyDeleteअतिशय अभिमान वाटतो डीसले सरांचा,great work
ReplyDeleteHats of to you
माननीय कपिल पाटील सर तुम्ही छान शब्दांत दिसल सरांबद्दल लेखन केले Hats off Disle sir and lots of thahnks to Rrspected Kapil Patil sir...
ReplyDeleteVery nice Disle sir.
ReplyDeleteडिसले सरांचे मनपूर्वक अभिनंदन
ReplyDeleteखूपच छान लेख सर,डिसले सरांना त्रिवार सलाम
ReplyDeleteखूप अभिमानास्पद आणि प्रेरणादायी कार्य आहे सरांचे.zp गुरुजींचा जागतिक पातळीवर गौरव झाला.मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ReplyDeleteआदरणीय श्री. रणजीत सिंह डिसले सरांचे हार्दिक अभिनंदन ..
ReplyDeleteमा. आमदार साहेबांचे प्रेरणादायी व अत्यंत सुंदर वैचारिक शब्दांकन ..
Nice👌👌💐💐
ReplyDeleteसलाम गुरुजींच्या कार्याला!
ReplyDeleteअभिमानास्पद !
डिसले सरांना तर सलाम त्यांच्या कार्याला सुध्दा सलाम व आपल्या सारख्या प्रेरणा देणारे आमच्या साहेबाना सुध्दा माझा सलाम 🙏🙏🙏
ReplyDeleteGreat work Disale sir, congratulations
ReplyDeleteडीसले सर आपले काम आम्हा शिक्षकांना प्रेरणादायी आहे
ReplyDeleteपाटील साहेब आपला आम्हा शिक्षकां प्रती जो विश्वास आहे तो सार्थ ठरवन्या चा प्रयत्न करू जय शिक्षक भारती
डीसले सरांच्या कार्याला सलाम, सर्व भारतीयसाठी अभिमानास्पद बाब, साहेबांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन खूपच सुंदर लेख लिहिला आहे, साहेब आपल्याला सुध्दा सलाम !!
ReplyDeleteअभिमान आहे सरजी
ReplyDeleteध्येयवादी, उच्च विचारांनी प्रेरित शिक्षक समाज घडवत असतो हे Disale सरांनी कृतीतून दाखवून दिले आहे
ReplyDeleteबक्षिसाची निम्मी रक्कम इतर देशांच्या सहभागी शिक्षकांना समान वाटण्याचा त्यांचा निर्णय भारतीय विचारांचे प्रतीक आहे
खरोखर आम्हांस आपला अभिमान वाटतो
सर्व काही कौतुकास्पद ग्रेट शिक्षक भाई (गुरुजी)
ReplyDeleteखरोखर ग्रेट
ReplyDeleteसर्व शिक्षकांची मान या पुरस्काराने उंचावलीच परंतु सरकारी शाळांमध्ये किती गुणवंत शिक्षक आहेत याची प्रचीती सर्वांना
आली असेल,
तरी सुद्धा माझी शंका आहे
डिसले सरांना महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे का
अभिनंदन सर...
ReplyDeleteफारच छान
ReplyDeleteअभिनंदन सर 🌺🌺🌺
अभिनंदन सर 💐💐💐
ReplyDeleteफारच छान अभिनंदन सर,👍👍👍
ReplyDeleteफारच छान अभिनंदन सर,👍👍👍
ReplyDeleteखूप खूप अभिनंदन 💐💐💐
ReplyDeleteअति सुंदर तंत्रस्नेही शिक्षकांना आदर्श निर्माण झाल्याची सुरुवात
ReplyDeleteखूपच प्रेरणादायी आहेत गुरुजी.
ReplyDeleteआपला आदर्श सर्व होतकरू शिक्षकांना प्रेरणादाई ठरेल,✌️✌️✌️
ReplyDeleteSalam Sir .. tumchya karyala ...
ReplyDeleteप्रत्येक शिक्षकासाठी आयकाँन आहात सर
ReplyDeleteडिसले सरांचे खूप अभिनंदन... त्यांच्या मेहनतीला सलाम.त्यांचा शोध उचलून धरणाऱ्यांचे विशेष आभार...
ReplyDeleteपाटील साहेब पण आज आपल्या देशात शिक्षकाची काय अवस्था आहे हे परदेशात कुठे माहित आहे?.. ज्युनिअरचे व्यपगत शिक्षक, व हायस्विकूलचे विनाअनुदानित शिक्षक आज हालाखित दिवस काढत आहेत .हे कुठे परदेशात माहित आहे.. महाराष्ट्रातील शिक्षक जीवाचे रान करतोय पण टिचभर पोटाची खळगी भरु शकत नाही .असा दुदैवी शिक्षक आहे.सध्या या पदाची लखज वाटते.पण या शिक्षकांच्या पगाराचे राजकारण करुन आत्महत्या करण्यासाठी भाग पाडले जात आहे.. शिक्षकांचे एवढे प्रकार व त्यावर होणारे राजकारण याची माहिती जगाला कुठे आहे...मरमर मरतोय आम्ही पण ना सरकार ना संस्थाचालक शिक्षकांच्या अडचणी दूर करत आहेत.कोणत्या देशातला शिक्षक शेळ्या हाकतोय व परिस्थीतीमुळे आत्महत्या करतोय हे चित्र दिसत नाही..इथे मतांसाठी शिक्षकाला अमीष दाखवून स्वप्न दाखवली जातात...भय इथले कधी संपत नाही.
Very nice sir
DeleteSalute Disale Sir.
ReplyDeleteRamdas Shinde Sir
DeletePrernadai
ReplyDeleteखरोखरच डिसले सरांनी केललं कार्य हे कौतुकास्पद आहे.
ReplyDeleteA sacrifices teacher for all children.and A excellent role model of children .and this work would be inseparable for activate teachers.SALUTE of excellent work.
ReplyDeleteमहाराष्ट्राचे भूषण दिसले सर
ReplyDeleteThe Great
Great work and very Innovative work by Mr.Ranjitsingh Disle sir....we r proud of you...👍👍👍👌👌👌
ReplyDeleteआपल्या ज्ञानाचं चिज़ झालं सर. सलाम आपल्या कष्टाला,
ReplyDeleteकर्म करो फल अपने आप मिलेगा.
सर आपले कार्य आम्हा शिक्षकांसाठी खूपच प्रेरणादायी आहे. आपणास खूप खूप अभिनंदन.....आपल्या कार्यास सलाम
ReplyDeleteहाजिल्हा परिषदेतील शिक्षकांचा खूप मोठा सन्मान आहे.पाटील साहेब आपण छान लेख लिहिला.दोघांनाही सलाम.
ReplyDeleteआदरणीय कपिल पाटील साहेब नमस्कार .जिल्हा परिषदेच्या शाळांतून आता पीएचडी धारक शिक्षकांची फळी उपलब्ध होत आहे,त्यांच्या संशोधन क्षमतेचा वापर करून गुणवत्ता वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाला विधिमंडळात प्रश्न विचारून सजग करावे ही विनंती.
ReplyDeleteप्रश्न:-
1)महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून किती शिक्षकांनी पीएचडी पदवी संपादित केली आहे?याची माहिती सरकारकडे आहे का?असल्यास सादर करावी.तसेच ज्यांनी अध्यापनाचे पवित्र कार्य करीत असताना शिक्षण क्षेत्रातील ही सर्वोच्च पदवी संपादित केली आहे,त्यांचा सन्मान शासन करणार आहे का,असल्यास कसा?तसेच त्यांच्या ज्ञानाचा वापर करून गुणवत्ता वाढविण्यासाठी सरकारकडे काय नीती आहे?
हे प्रश्न विचारून आम्हांला न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा करतो.धन्यवाद. आपलाच
डॉ बालाजी समुखराव
पदवीधर शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हासेगाव ता औसा जि लातूर
संपर्क:9284376494
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून किती शिक्षकांनी पीएचडी पदवी संपादित केली आहे? याची माहिती सरकारकडे आहे का? असल्यास सादर करावी. तसेच ज्यांनी अध्यापनाचे पवित्र कार्य करीत असताना शिक्षण क्षेत्रातील ही सर्वोच्च पदवी संपादित केली आहे, त्यांचा सन्मान शासन करणार आहे का, असल्यास कसा? तसेच त्यांच्या ज्ञानाचा वापर करून गुणवत्ता वाढविण्यासाठी सरकारकडे काय नीती आहे?
ReplyDeleteHats up to his big achievement 💐💐🙏🙏
ReplyDeleteWe r proud of U Disle Sir
ReplyDeleteNicely explained..
ReplyDeleteदिसले गुरुजींचे काम एकदम क्रांतिकारी व वाखाणण्याजोगेच आहे परंतु त्यापेक्षाही ज्या निरलसपणे त्यांनी पुरस्काराची सर्व रक्कम योग्य कामासाठी वाटली त्याने त्यांना सामान्यातील असामान्य व्यक्तीमत्व झाले.
ReplyDeleteVery motivational work done by Ranjit Disle sir.
ReplyDeleteCongratulations sir ..!
सलाम तुमच्या कार्याला
ReplyDeleteCongratulations Sir Your great sir
ReplyDeleteडिसले सर प्रथम तुमच्या शै. कार्याला सलाम. सर तुमच्या या शै. कार्याचा विद्यार्थी /शिक्षक /पालक तसेच देशाच्या विकास कार्यासाठी उपयोग व्हावा. सदर लेखासाठी ज्यांनी कस्ट घेतले ते शिक्षक आमदार मा. कपिल पाटील साहेब यांनाही सलाम.
ReplyDeleteश्री. रणजित डिसले सरांचा एक शिक्षक म्हणून सार्थ अभिमान आहे. आम्हां सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याला, विद्यार्थी, पालकांना सलाम.
ReplyDeleteडीसले सर् यांचे अभिनंदन व आपण लिहिले लेख हा प्रेरणदायीं आहे
ReplyDeleteअभिनंदन जे काही केले ते फारच छान केलं🌹🌹🌺👌👌👍👍
ReplyDeleteअभिनंदन 🌹सरजी आपनांपासून प्रेरणा घेऊन सर्वानी आपलं कर्तव्य पार पाड़ावं हिच ईश्वर चरणी प्रार्थना।🙏🙏🌹
ReplyDelete