राष्ट्र सेवा दलाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. गणेश देवी निव्वळ भाषाशास्त्रज्ञ नाहीत. इतिहासाचे अभ्यासकही आहेत. आदिवासी आणि भटक्यांच्या संस्कृतीचे केवळ संशोधक नाहीत. राजकीय भाष्यकारही आहेत. साने गुरुजी आणि गुरुदेव टागोरांच्या आंतर भारतीचे वर्तमानातील सर्वात मोठे वाहक आहेत. बायोलॉजिकल करोना येण्याच्या आधीच धर्मद्वेषाच्या विषाक्त कोविड संकटात होरपळत असलेल्या देशाला साने गुरुजींच्या आंतरभारतीचा विचार सांगणारं, एस. एम. जोशींच्या समन्वयाच्या वाटेने चालणारं राष्ट्र सेवा दल सांस्कृतिक राष्ट्रवादाला पर्यायी नॅरेटिव्ह उभं करू शकेल या मोठ्या अपेक्षेने त्यांनी सेवा दलाचं नेतृत्व स्वीकारलं.
४ जूनला ८० वर्ष होतील, राष्ट्र सेवा दल गठीत झालं त्याला. राष्ट्र सेवा दलाच्या स्थापनेला पहिले दल प्रमुख एस. एम. जोशी यांनी पुनर्घटना असा शब्द वापरला. त्या पुनर्घटने मागील पूर्वघटनांचा आणि वैचारिक प्रेरणांचा शोध घेणारं पुस्तक लिहण्याचा आग्रह डॉ. देवींनी धरला. मी ना अभ्यासक आहे, ना संशोधक. देव मानत नसलो तरी देवींना मानतो. त्यामुळे नकार देऊ शकलो नाही.
पहिले दल प्रमुख साथी एस. एम. जोशी यांचा व्यक्तिगत सहवास लाभलेले ८ ट्रस्टी राष्ट्र सेवा दलाच्या विद्यमान विश्वस्त मंडळात आहेत. त्यातले मी आणि नितीन वैद्य यांच्या घरात सेवा दल असलं तरी मोठा वारसा नव्हता कधी. इतरांना कौटुंबिक आणि वैचारिक वारसाही मिळाला. ज्यांना मी माझा वैचारिक पिता मानत आलो ते माझे काका अॅड. लक्ष्मण पाटील यांच्यामुळे मी सेवा दलात आलो. लीलाधर हेगडे यांनी वरोरला सेवा दलाची शाखा सुरु केली होती, माझे काका लक्ष्मण पाटील, विवेक पंडितचे वडील रघुनाथ पंडित आणि माझे वडील हरिश्चंद्र पाटील हे त्या शाखेतले. लक्ष्मण पाटील यांचा एस. एम. अण्णांशी जवळचा संबंध होता. माझा संबंध नंतर आला. नितीन वैद्यचे वडील रॉयिस्ट होते. तर आई पक्की समाजवादी. थेट कौटुंबिक वारसा नव्हता तरीही एस. एम. जोशी यांच्या प्रेमाचे वाटेकरी होण्याची संधी मला आणि नितीनला मिळाली. तसा वारसा नसल्यामुळे जेव्हा बाकीचे, मला जवळचे किंवा स्पृश्य मानत नव्हते (नाहीत) तेव्हा एस. एम. यांनी प्रेम, विश्वास, विचार आणि प्रेरणा दिली.
निखिल वागळे आणि सुरेखा दळवी यांनी राष्ट्र सेवा दलाचा विद्यार्थी विभाग सुरु केला नसता तर कदाचित मी आणि नितीन कम्युनिस्टांच्या विद्यार्थी संघटनेकडे ओढले गेलो असतो. पुढे याच विद्यार्थी विभागाचं छात्र भारतीत रूपांतर झालं. आणि त्यालाही कारण ठरलं एस. एम. जोशी यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद. एस. एम. आणि अरुण लिमये यांच्या आग्रहामुळे सेवा दल मंडळात छात्र भारतीचा ठराव करण्यात आला. आणि स्वायत्त विद्यार्थी संघटना जन्माला घालण्यात आली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून ते मंडल आयोगाच्या ओबीसी आंदोलनापर्यंत एस. एम. यांची ही वैचारिक साथ आणि दिशा मिळाली.
मी आणि नितीन वैद्य आम्ही दोघंही मराठवाडा विद्यापीठ नामांतरवादी कृती समितीचे सचिव होतो. दलित पँथरच्या सोबतीने प्रत्यक्ष लढाईत उतरलो होतो. पुढे तसेच मंडलच्या आंदोलनातही. आम आदमीचे राजकारण करण्याचा दावा करणारे तेव्हा युथ फॉर ईक्वालिटीच्या नावावर आरक्षण विरोधी आंदोलन अक्षरश: पेटवत होते. लोकांना जाळून घ्यायला भाग पाडत होते. त्यावेळी ओबीसी आंदोलनाची ज्योत पेटवणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये माझी आणि नितीन वैद्य यांची भागीदारी होती. जनार्दन पाटील आणि दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पोद्दार कॉलेजमध्ये पहिली राज्यव्यापी ओबीसींची मंडल आयोग परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याचं उद्घाटन एस. एम. जोशी यांनीच केलं होतं आणि डॉ. बाबा आढाव आवर्जून उपस्थित होते. एस. एम. जोशी यांना त्याबद्दल आम्हा दोघांचं खूप कौतुकही होतं. आमच्या तिघांचा एक फोटो प्रख्यात छायाचित्रकार मोहन बने यांनी काढला होता. कदाचित तो नितीनकडे असू शकेल.
एस. एम. हा खरा डीकास्ट झालेला समाजवादी नेता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणूनच त्यांच्यावर सर्वाधिक विश्वास होता. म्हणून ४ जून १९४१ हे पुस्तक एस. एम. जोशी यांना समर्पित आहे. राष्ट्र सेवा दलाच्या पुनर्घटनेमागील वैचारिक प्रेरणांचा शोध घेण्याचा त्यात प्रामाणिक प्रयत्न आहे.
साने गुरुजी राष्ट्र सेवा दलाची ओळख आहेत. पण सेवा दलाची ही वैचारिक बांधणी करण्यामध्ये एस. एम. यांचा वाटा सर्वात मोठा आहे. त्या दोघांच्या चरित्रात, आंदोलनात आणि साहित्यात राष्ट्र सेवा दलाच्या वैचारिक प्रेरणांचा शोध घेता येतो. तोच प्रयत्न या पुस्तकामागे आहे.
कोविडमुळे प्रिंटीग प्रेस अजूनही बंद आहेत. पुस्तक प्रकाशित व्हायला वेळ लागेल. तोवर थांबायचं कशाला म्हणून ४ जूनपासून ते सर्वांसाठी ते डिजिटली खुलं करत आहोत. दर दोन दिवसा आड एक भाग प्रसिद्ध करण्याचा इरादा आहे. kapilpatilmumbai.blogspot.com इथे नियमित वाचता येईल. वाचणाऱ्यांनी त्यात जरूर भर टाकावी. त्यांचं स्वागत राहील.
ता. क.
अतिशय महत्त्वाच्या आणि बिलकुल चुकवता येणार नाही, अशा एका कार्यक्रमाची मला तुम्हा सर्वांना आठवण करून द्यायची आहे. नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ आणि भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन आणि महात्माजींचे नातू व ज्येष्ठ विचारवंत प्रा. राजमोहन गांधी यांना ऐकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या आमंत्रणावरून हे दोघं प्रथमच सेवा दलाच्या व्यासपीठावर येत आहेत. करोनाच्या काळात देशाशी बोलणार आहेत.
शुक्रवारी ४ जून रोजी रात्री ८ वाजता. राष्ट्र सेवा दलाच्या फेसबुक पेजवर Facebok Live Link - https://www.facebook.com/RSDIndian तुम्ही आवर्जून त्यांना ऐकायला या. बायोलॉजिकल आणि आयडॉलॉजीकल करोनाशी कसं लढायचं याचा नवा विचार ते आपल्याला देतील.
- कपिल पाटील, कार्यकारी विश्वस्त, राष्ट्र सेवा दल
अर्थतज्ञ्ए आणि भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. राजमोहन गांधी यांना ऐकण्याचा हार्दिक एक सुवर्णक्षण असेल,,
ReplyDeleteफारच छान
ReplyDeleteसुरेख...💐💐💐
ReplyDeleteस्वागत आहे
ReplyDeleteवैचारिक चळवळीचा जिवंत झरा !
ReplyDeleteवैचारिक चळवळीचा जिवंत झरा !
ReplyDeleteवैचारिक चळवळीचा जिवंत झरा !
ReplyDeleteमनापासून स्वागत 💐💐
ReplyDeleteहो सर,हा आमच्यासाठी एक सुवर्णयोग असेल.
ReplyDeleteहो सर,हा आमच्यासाठी एक सुवर्णयोग असेल.
ReplyDeleteInformative
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteछान
ReplyDeleteमा कपिल पाटील साहेब काय आहेत हे आज मला
ReplyDeleteकळले कारण राष्टसेवादलात तयार झालेला माणूस शैक्षणिक आणि. सामाजिक समस्या कशा सोडवायच्या ते आज कळले
कारण शासनाला तळागाळातील गोरगरीबांच्या मुलांना शिकवणारे शिक्षक व पालक यांच्या स्थानिक समस्या काय
असतात आणि ते कसे सोडवतात हे येडेगबाडे शासनाला
निदर्शनात आणून देतात ते पाटील साहेब मला अभिमान
ते सेवादलात तयार झाले त्याचा कारण तिथे शिस्त सामाजिक जाण गरीबाविषयी तळमळ आणि कार्यत्पर आणि
निस्वार्थ सेवा शिकवली जाते हे कपिल पाटील यांचं
नसानसात आहे यात शंका नाही लिहीण्याचा सारखे खूप
आहे नमस्कार
This comment has been removed by the author.
ReplyDeleteदोन महान विभूतीचे विचार ऐकण्याची संधी आपण उपलब्ध करत आहात. धन्यवाद
ReplyDeleteअभिनंदन,स्वागत,शुभेच्छा आणि धन्यवाद ...
ReplyDeleteखुप छान.... सेवा दल बढाणा है परिवर्तन लाना है
ReplyDeleteखूप छान,
ReplyDeletePlease go ahead Sir.
ते कोणत्या भाषेत बोलणार आहेत,
ReplyDeleteप्रयत्न चांगला आहे
छान लिहिले आहेस कपिल. पण मला एक वाटले...
ReplyDeleteएस. एम. हा खरा डीकास्ट झालेला समाजवादी नेता,असे तू म्हटले आहेस.हे जितके खरे आहे, तितकेच किंवा जास्तच म्हणेन मी, कि नानासाहेब गोरे डीकास्ट होते.
मला कधी कधी वाईट वाटतं कि आपण सर्व नानासाहेबांना विसरतो. सध्या मी "गोरे गौरव" हे पुस्तक वाचत असल्या मुळे कदाचित मला हे जास्त तीव्रतेने जाणवलं असेल.
खुप छान
ReplyDeleteअतिशय काळ अन् वेळ (परिस्थिती) पुरक उपक्रम.
ReplyDeleteहम होंगे कामयाब एक दिंन
मन में हैं विश्वास, पुरा हैं विश्वास !!
छान
ReplyDelete