Thursday, 13 February 2020

शाळा, कॉलेजला पाच दिवसांचा आठवडा करा

आमदार कपिल पाटील यांचे शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र  

दिनांक : 13/02/2020
प्रति,
मा. ना. श्रीमती. वर्षाताई गायकवाड
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदया,
मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शाळा, ज्युनियर कॉलेज सीनियर कॉलेज यांनाही पाच दिवसांचा आठवडा करावा, ही विनंती.

आरटीई नुसार पहिली ते पाचवीसाठी वर्षाला अध्यापनाचे 200 दिवस / 800 तासिका तसेच सहावी ते आठवीसाठी 220 दिवस /1000 तास निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांकडून पूर्णवेळ सहा दिवस शाळा सुरू ठेवण्याची सक्ती करण्यात येत असल्याचे वृत्त येत होते.

मुंबई सारख्या मोठया शहारांमध्ये अनेक शाळा पूर्वीपासून पाच दिवसाच्या आठवडयाने चालतात. उर्वरित शाळा शनिवारी अर्धवेळ चालतात. शिक्षणतज्ज्ञ आणि बाल मानस शास्त्रज्ञ यांच्या मते आठवडयात किमान दोन दिवस मुलांना सुट्टी देणं आवश्यक आहे. शहारांमधल्या शाळांमध्ये दुरून येणाऱ्या शिक्षकांवर सुध्दा प्रवास आणि बदलत्या शिक्षणक्रमाचा ताण हे लक्षात घेता आरटीईनेच अपेक्षा केल्याप्रमाणे शिक्षकांना तयारीसाठी (प्रिप्रेशन / होमवर्क ) पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांनाही शनिवार, रविवार ही उसंत देणं आवश्यक आहे.

लोअर प्रायमरीसाठी (1ली ते 5वी) यासाठी आरटीईने 200 दिवस / किमान 800 तास शिक्षकांसाठी निश्चित केले आहेत. तर अप्पर प्रायमरीसाठी (6वी ते 8वी) यासाठी 220 दिवस/ किमान 1000 तास निश्चित केले आहेत. अध्यापनासाठी आठवडयाला कमाल मर्यादा 30 तासांची आहे. याचा अर्थ त्याहून अधिक काळ विद्यार्थ्यांन ताण देणं हे कायदयाशी विसंगत आहे. मात्र त्यावेळी कायद्याचा गैर अर्थ काढून 45 तासांची ड्युटी लावण्याचा प्रयत्न झाला होता. मुंबई सारख्या शहरांमध्ये जिथे दोन शिफ्टटमध्ये शाळा चालतात तिथे आठ अधिक आठ म्हणजे सोळा तास शाळा चालवाव्या लागणार होत्या. आठ तासांची शाळा विद्यार्थ्यांसाठी तुरुंगवास ठरेल. त्या विरोधात मी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवेदन करताना तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी अध्यापनाचे केवळ 30 तास आणि शिक्षकांना त्यांच्या होमवर्कसाठी किंवा प्रिपरेशनसाठी 15 तास असे स्पष्टीकरण देत 45 तासांची सक्ती चुकीची ठरवली. त्याच शासन निर्णयात पाच दिवसांचा आठवडा असलेल्या शाळांना या निर्णयाची कोणतीही आडकाठी असणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. (शासन निर्णय क्र.  पीआरइ 2010/प्रक्र.114/ प्रशि-1 दि. 29 एप्रिल 2011) याच निर्णयाचा आधार घेत तत्कालीन सचिव मा. श्री. नंदकुमार यांनी माझ्या विनंती पत्रावर पाच दिवसाचा आठवडा करण्याची परवानगी देण्यात यावी, असे आदेश त्यावेळी उपसंचालकांना दिले होते.  

हे करायचं कसं?
आरटीईच्या हेतूशी सुसंगत अंमलबजावणी करावयाची असेल तर अप्पर प्रायमरीसह माध्यमिक शाळा म्हणेज 6वी ते 10वीचे वर्ग सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी 7 ते 12.30 या वेळेत चालवावेत. तर लोअर प्रायमरीच्या प्राथमिक शाळा 1ली ते 5वीचे वर्ग दुपारी 1 ते 5.30 या वेळेत चालवाव्यात. लोअर प्रायमरीच्या शाळा 4.30 तासाहून अधिक चालवू नयेत, हे आरटीईच्या दृष्टीने सुसंगत आहे.

विद्यार्थी शिक्षकांसह शाळांना शनिवार रविवार अशी दोन विक एन्डची सुट्टी असेल. हे दोन दिवस संस्थांना अन्य शैक्षणिक शाळाबाहय उपक्रमासाठी किंवा व्यवसायिक कारणांसाठी इमारतीचा उपयोग करता येईल. विजेची बचत होईल. आणि विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापनावरचा ताण दूर होईल.

यासंदर्भातील मा. अवर सचिव यांचे 29 एप्रिल 2015 चे पत्र आणि 29 एप्रिल 2011 चा शासन निर्णय सोबत जोडला आहे.

कृपया वरील सर्व बाबींचे अवलोकन करुन 5 दिवसांचा आठवडा सुरु करण्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, ही विनंती. धन्यवाद!

आपला स्नेहांकित
  





72 comments:

  1. Sir I appreciate your efforts. 5 days week is good for teachers. Few schools and colleges are already following this system.

    ReplyDelete
    Replies
    1. Only 5 days school is very necessary for students and teachers. Rest for brain is also important. Limited school time is must for classes 1st to10th.

      Delete
  2. सर नमस्कार आपण शिक्षकांच्या समस्या पोटतिडकिने सोडवतात पण काहि लोकं न काहि करता चुकिच्या पोस्ट टाकून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात , सर आपल्या ला सेल्यूट !!! जय शिक्षक भारती !!

    ReplyDelete
  3. Excellent job sir. I am fully agree with you.

    ReplyDelete
  4. सर पाच दिवसाचा आठवडा होणे गरजेचे आहे आमच्या सारख्या शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक हे अर्धा दिवस काम करतातच शनिवारी. बाकी शाळा मन्हते दोन शिफ्ट मध्ये भरणाऱ्या शाळांनी काय करावे अश्या वेळेस परंतु सर शाळेचा ही पाच दिवसाचा आठवडा व्हायलाच पाहिजे

    ReplyDelete
  5. आपण सदैव शिक्षक व विद्यार्थी यांचाच विचार करता, सर, सलाम आपल्या कामास

    ReplyDelete
  6. Its possible in cities to run the schools 6 hours and primary 5 hours.


    Thanks sir

    ReplyDelete
  7. Agree with you sir. Students will also get time for their home assignments and tests preparations. As it is done in international schools. Also they can play certain sports on weekend. Must need 5 days for teachers too so that they can do preparations for the week easily and in a relaxed way.
    Thanks for your efforts

    ReplyDelete
  8. आगदी बरोबर साहेब..शहरांकरिता योग्य आहे..पण ग्रामीण भागात ईतर दिवशी कामकाज वाढविणे शक्य होणार नाही.. बस सुविधा नसतात..साधने नसतात..या ठीकाणी सक्ती करू नये.

    ReplyDelete
  9. सर सच मे आप जैसा शिक्षक नेता होना मुश्किल है। कान्वेंट के स्कूल 5 दिन चल सकते है तो हमारे क्यों नही। जिस तरह से आपने 45 घंटे के कार्य को 30 घंटे में किया है उसी तरह 6 दिन के कार्य को 5 दिन का करवा दीजिये

    ReplyDelete
  10. शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या कामकाजाचे संनियंत्रण करणारी कार्यालय शनिवारी रविवारी बंद राहणार असतील तर शनिवारच्या कामाच काय? आपातकालीन निर्णय कोणी घ्यायचे?
    शाळांना पाच दिवसाचा आठवडा नसेल तर शाळांशी संबंधित सर्व कार्यालय शाळांप्रमाणे सुरु राहावेत, दूसरा व चौथा शनिवार कार्यालय बंद असतात तेव्हा शाळांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
    म्हणूनच सन्माननीय आमदार कपिल पाटील साहेबांच्या पत्रास आम्ही समर्थन करतो ,
    धन्यवाद साहेब
    याच कारणास्तव समस्त शिक्षक वर्ग आपला सदैव आदर राखतो

    ReplyDelete
    Replies
    1. Really teachers r students dono ko hi mentally relaxatiin ki zrurat h.aj kal bchho ko machin smjha ja rha h unse activity practicals assignment karwaye jarhe h but usme kitni mehnat lgti h ye bche hi jante h so unko bhi time mil jayega r teachers ko bhi insan nahi balke machin smjha ja rha h aisa smjh rhe h k wo jitna zyada time school ko denge utna wo teacher achha h but dekhna to ye cahhiye k wo itne time me kitna kitna bcho ko de rhe h q k kam time me bhi teacher boht kuch de skta h agr wo dena chahe to

      Delete
  11. Thanks Sir for your initiative and hope always there in future.We secondary teachers are totally busy and this would really help the students for their preparation.

    ReplyDelete
  12. We totally agree with u Sir.It is good not only for student,teachers but it saves our mother nature too because vehicles, Acs do are major causes of pollution by saving this 1 day we will save resources for our future generation.

    ReplyDelete
  13. शाळा विद्यार्थी, शिक्षक, व्यवस्थापन,शासन यांना सोईचे.१)वेतनेतर अनुदानाचा प्रश्न-संस्था शनिवारी नि रविवारी ईमारतीत ईतर उपक्रम राबवून सोडवतील शासनावर विसंबून रहावे लागणार नाही.२)विद्यार्थी आनंदाने शिकतील.३)शिक्षक नव्या ऊर्जेने वर्गात वावरतील.

    ReplyDelete
  14. अगदी बरोबर आहे सर,really appreciate your efforts

    ReplyDelete
  15. It will be good relief for students, parents, teachers and management. It will save a lot of things and the holiday will be used to develop extra co-curticular activities. Go ahead we are always with you.

    Akhil Bhossle

    ReplyDelete
  16. Sir if it is to be implemented it should be same for all aided as well as private schools and colleges... Students and teachers across the state will appreciate this move..🙏

    ReplyDelete
  17. Sir if it is to be implemented it should be same for all aided as well as private schools and colleges... Students and teachers across the state will appreciate this move..🙏

    ReplyDelete
  18. आदरणीय कपिल पाटील सर,
    तुम्ही आणि तुमची टीम शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असता. शिक्षक आणि त्यांच्या समस्या यामध्ये प्रामुख्याने तुम्ही दुवा आहात. तर ५ दिवसांचा आठवडा व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला यश देवो.

    ReplyDelete
  19. आयसीटी शिक्षकाची मागणी कधी पुर्ण होणार? आपन सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडा लवकर ।

    ReplyDelete
  20. रास्त मागणी

    ReplyDelete
  21. सर अतिशय चांगली मागणी आहे,हे झालेच पाहिजे काळाची गरज आहे.
    आपल्या कार्यास सलाम आणि आपल्या विचारांना पाठिंबा.

    ReplyDelete
  22. आदरणीय कपिल पाटील सर,
    तुम्ही आणि तुमची टीम शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असता. शिक्षक आणि त्यांच्या समस्या यामध्ये प्रामुख्याने तुम्ही दुवा आहात. तर ५ दिवसांचा आठवडा व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला यश देवो.

    ReplyDelete
  23. Sir! It's useful for teachers & students. I appreciate your efforts.

    ReplyDelete
  24. आदरणीय कपिल पाटील सर,
    तुम्ही आणि तुमची टीम शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असता. शिक्षक आणि त्यांच्या समस्या यामध्ये प्रामुख्याने तुम्ही दुवा आहात. तर ५ दिवसांचा आठवडा व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला यश देवो

    ReplyDelete
  25. ५ दिवसांचा आठवडा ही आताची गरज आहे.तुमच्या प्रयत्नांना यश मिळो ही सदिच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. अप्रतिम सर जी
      शनिवार व रविवार दोन दिवस मुलांना ईतर क्लासेस करता येतील उदा.डान्स,अँक्टिंग,चिञकला
      शिवाय आज पालक आपल्या मुलांना वेऴ देवु शकत नाही सतत आहोराञ कुटूंबासाठी मरमर करत असतो.
      मुलांना दिवाऴीची व उन्हाऴ्याची सुट्टीची वाट पहावी लागते.
      म्हणुन शाऴांना देखील ५ दिवसांचा आठवडा होणे फार गरजेचे आहे.
      धन्यवाद
      डाँ जाहेद बागवान

      Delete
  26. पाच दिवसांचा आठवडा नसावा शनिवारी तासीका नसाव्या त्याऐवजी खेळ व्यायाम गीत गायन इत्यादी तासीका असाव्यात.

    ReplyDelete
  27. ५ दिवसाचा आठवडा ही आता विद्यार्थी यांना अभ्यास करण्यासाठी आवश्यकता आहे

    ReplyDelete
  28. रास्त मागणी सर

    ReplyDelete
  29. आपण सदैव शिक्षक व विद्यार्थी यांचाच विचार करता, सर, सलाम आपल्या कामास तसेच वीणा अनुदान शिपाई पदे य्न्चे प्रश्न मार्गी लावा सर

    ReplyDelete
  30. योग्य मागणी आहे सर आपल्या प्रयत्नाना यश मिळाे.

    ReplyDelete
  31. हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब.

    ReplyDelete
  32. nice decision sir. mental work is more difficult than physical work. so pls do five days week. so all students and teachers will be fresh and do their work with great energy.

    ReplyDelete
  33. Sir almost all engineering colleges in Mumbai work 6days a week. Students and teachers both need 5 day week for physical and mental health. This rule should apply even for private colleges

    ReplyDelete
  34. सर आपण नेहमीच शिक्षकांच्या पाठीशी असता आणि तुम्ही आहात म्हणूनच आमच्या समस्या सोडविण्यासाठी खूपच तत्परतेने तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिक्षकांना न्याय देतात. आपले मनःपूर्वक अभिनंदन.
    सर ,असेच आमच्या पाठीशी सदैव रहा हीच सदिच्छा.

    ReplyDelete
  35. सरजी, या समाजातल्या अगदी शेवटच्या वंचित घटकां पर्यंत शिक्षणाचा प्रवाह निर्माण करणार्या शिक्षकांप्रती आपण करत असलेल्या कार्याला मानाचा मुजरा...

    ReplyDelete
  36. तणाव कमी करण्यासाठी 5 दिवसाचा आठवडा आवश्यक आहे जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  37. सरजी, एक विनंती आहे की, कोल्हापूर जिल्हातील बर्‍याचशा मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील शिक्षकांचे टीईटी अनुत्तीर्ण असल्या कारणास्तव फेब्रुवारी 2020 पासून चे वेतन थकविण्यात आले असल्याबाबतचे पत्र संबंधित शिक्षकांना देण्यात आलेले आहेत.

    ReplyDelete
  38. 5दिवसाचा आठवडा व्हावा ही रास्त मागणी आहे.तुमच्या प्रयत्नांना लवकर यश मिळो सर

    ReplyDelete
  39. Sir amacha anudanach Baga ...?
    Agodar ......

    ReplyDelete
  40. Namaskar,Patil Saheb!
    None but a single personality,a single soul dedicated for teaching and the teachers is one and only one Respected, honoured man Mr. Kapil Patil Saheb.
    Shat!shat Naman Patil Saheb.

    ReplyDelete
  41. Sir

    I am not praising you but the fact remains about those schools where 2 shifts are necessary. Morning Jr. College and Noon Schools. There we cannot extend time slot which is already full packed.
    Plz consider this

    ReplyDelete
  42. आदरणीय कपिल पाटील सर,
    तुम्ही आणि तुमची टीम शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असता. शिक्षक आणि त्यांच्या समस्या यामध्ये प्रामुख्याने तुम्ही दुवा आहात. तर ५ दिवसांचा आठवडा व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. परमेश्वर तुम्हाला यश देवो

    ReplyDelete
  43. आदरणीय आमदार पाटील साहेब यांचं मत अगदी योग्य आहे आणि आमचा सर्वांचा त्यास पाठिम्बा गृहीत धरावा, कारण सध्या अनेक कामाच्या ताणामुळं मेंदूला विश्रांती मिळत नाही. कुटुंबाला ही वेळ देता येत नाही. धन्यवाद.

    ReplyDelete
  44. आदरणीय श्री.कपिल पाटील साहेब तुम्ही नेहमीच शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पोटतिडकीने प्रयत्नरत असता.हाही प्रश्न तुम्ही लवकरच सोडवाल व पाच दिवसांचा आठवडा मंजूर करून घेऊन शिक्षण व शिक्षकांना अमूल्य भेट द्याल हीच अपेक्षा.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  45. आमचा सर्वांचा त्यास पाठिम्बा गृहीत धरावा, कारण सध्या अनेक कामाच्या ताणामुळं मेंदूला विश्रांती मिळत नाही. कुटुंबाला ही वेळ देता येत नाही. धन्यवाद.

    Reply

    ReplyDelete
  46. पाच दिवसाचा आठवडा होणे ही काळाची गरज आहे तुमच्या प्रयत्नाला यश येवो धन्यवाद सर

    ReplyDelete
  47. Shalanach Fact 5 divasacha athavada pahije kharach student's pan mokala vel pahije

    ReplyDelete
  48. Correct ,मुलांना अभ्यासला नकीच वेळ मिळेल,5 दिवसाचा आठवडा करावा हा योग्य निर्णय आहे, माणसे whats up वर मिळू लागली आहे किमान या निर्णयाने कुटुंबात एक मेकान सोबत भेटतील अशीआशा आहे.

    ReplyDelete
  49. Good decision and this letter forwarded to state minister Mr.Bachukadu Saheb

    ReplyDelete
  50. सर आपली मागणी एकदम बरोबर आहे,सरकार योग्य निर्यय घेईल याची खात्री आहे

    ReplyDelete