Saturday, 6 July 2013

इशरतला न्याय मिळेल?



ख्वाजा युनुसला न्याय नाही मिळाला. पण इशरतला मिळण्याची शक्यता आहे. फेक एन्काउंटरने निष्पाप इशरतचा जीव घेणाऱ्या बेगुमान राज्यकर्त्यांना सजा होण्याची शक्यता नाही. पण ती अतिरेकी कधीच नव्हती. यावर शिक्कामोर्तब झालं. तेही काही कमी नाही. किमान तिच्या आईला आपली मुलगी निष्पाप होती हे सिद्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

ख्वाजा युनुसच्या मृतदेहाची राखही शिल्लक न ठेवण्याची दक्षता पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली होती. ते अधिकारी मराठी आहेत म्हणून देशभक्त असल्याचा दिंडोरा पेटवण्यात काहीना यश आलं. नथुरामलाही देशभक्त ठरवणाऱ्यांची पिलावळ महाराष्ट्रात अजून शिल्लक आहे. त्यांचं देशभक्तीच गणित एकदम सोपं आहे. जे हिंदू म्हणून जन्माला येतात, ते देशभक्तच असतात. दुसऱ्या धर्मात जन्म झाला की, तो जन्मताच देशद्रोही ठरतो. स्वातंत्र्यवीर सावरकर 'स्वातंत्र्यवीर देशभक्त' खरे पण त्यांनीही देशभक्तीची व्याख्या धर्मसंस्कृतीपुरतीच मर्यादित ठेवली आहे. या देशाला संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरालाही त्यांनी देशांतर ठरवलं होतं. इशरत प्रकरणात सीबीआयने एन्काउंटर फेक असल्याचे दाखवून देताच अतिरेकी मुसलमानच असतात अशी प्रतिक्रिया देणारेही होते.


अतिरेक्यांना ते मानत असलेला धर्म असतोच असतो. परद्वेषाचा आधार जेव्हा धर्म असतो, तेव्हा धर्मासाठी अतिरेकी पाऊल उचललं जातं हे वास्तव नाकारण्याची गरज नाही. मुस्लिम अतिरेक्यांच्या बातम्या आपण जास्त वाचतो म्हणजे अतिरेकी मुस्लिम असतात हा निष्कर्ष काढणं म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेण्यासारखं आहे. आपण ठरवून निवडक बातम्या वाचत असतो. कारण आपल्या डोक्यात ते गणित पक्क असतं. दुसऱ्या अतिरेक्यांच्या बातम्याही डोळ्यासमोरून जात असतात. पण आपली नेणिव ती वाचायला तयार नसते.


या देशातल्या दहशतवादाची, अतिरेकी चळवळीची सुरवात केली ती नथुरामाने. त्याला वैचारिक प्रेरणा आणि समर्थन दिलं ते मुस्लिम द्वेषी, वर्ण वर्चस्ववादी जहाल हिंदुत्ववादाने. भारतात दोन राष्ट्र आहेत. हिंदू आणि मुसलमान, ही संकल्पनाही पहिल्यांदा मांडली ती या कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांनीच. ही दोन राष्ट्र एकत्र नांदू शकत नाहीत, या त्यांच्या प्रचाराला सर्वप्रथम विरोध केला तो उदार हिंदू नेत्यांनी आणि दोन राष्ट्रांच्या भूमिकेला समर्थन दिलं ते जीनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने.


द्वी राष्ट्रवादाचे जनक कट्टर हिंदुत्ववादीच होते आणि समर्थक कट्टर मुस्लिम लीगवाले होते. मुस्लिम रेनॉसान्सचे जनक सर सय्यद अहमद यांच्यावर हिंदू, मुस्लिम दोन राष्ट्र असल्याचा पुरस्कार केल्याचा आरोप केला जातो. पण तो निखालस खोटा आहे. सर सय्यद अहमद यांनी नेशन किवा राष्ट्र असा शब्ध्प्रयोग कधीही केलेला नाही. हिंदू, मुस्लिम या दोन कौम आहेत असा तो शब्दप्रयोग आहे. या दोन कौम हिंदुस्तानचे दोन डोळे आहेत, असं ते म्हणत. दोघांच्या अश्रूंचा आणि लहुचा रंग एक आहे. वेगळा नाही. ही त्यांची भूमिका होती.


राजकीय हिंदुत्वाचे जनक म्हणून ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे पाहिलं जातं तेही अंदमानात जाईपर्यंत सेक्युलर स्वातंत्र्य सेनानी होते. अंदमानातून ते बाहेर पडले आणि हिंदुत्ववादी नेते झाले. ब्रिटीशांनी त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेवरून माफी देत, बाहेर काढताना जी रणनीती आखली होती त्याचा तो भाग होता. विनायक दामोदर सावरकर यांनी माफीनामा देउन अंदमानच्या महाभयंकर शिक्षेतून सुटका करून घेतली. म्हणून देशभक्ती कमी होत नाही. किवा त्यांच्या स्वातंत्र्यवीर किताबाला उणेपणा देण्याचं कारण नाही. त्यांच्या घनघोर त्यागाला आणि संघर्षाला सलामच केला पाहिजे. पण अंदमानच्या आधी अत्यंत विज्ञाननिष्ट, इहवादी आणि सेक्युलर असलेले स्वातंत्र्यवीर अंदमानच्या सुटकेनंतर हिंदुत्ववादी नेते बनतात हा ब्रिटीशांच्या फोडा आणि राज्य करा या रणनीतीचा भाग होता.


खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनातही ती खंत कायम असावी. अन्यथा रत्नागिरीच्या मुक्कामात महात्मा गांधींना त्यांनी आपल्या घरी बोलावून चहा दिला नसता. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला तेव्हा सावरकरांनी आपल्या दादरच्या घरावर भगवा नाही तिरंगा फडकवला होता. खूप खूप आधी त्यांनी तयार केलेल्या राष्ट्रध्वजावर चांद ताराही त्यांना प्यारा होता, असं शेषराव मोरेनीच दाखवून दिलं आहे.


भारतातल्या दहशतवादी थैमानाने हिंदूंचे जितके प्राण घेतले त्याच्या कैक पटीने एकट्या काश्मिरमधल्या मुस्लिमांचे प्राण घेतले. दहशवादी कुणा एका धर्माचा असतो, म्हणून त्या त्या धर्माचे सगळे दहशतवादी हा विपर्यास झाला. श्रीलंकेतील तामिळ अतिरेकी कट्टर हिंदू आहेत. ईशान्येकडील राज्यांमधील सशस्त्र मार्गाने लढणारे शेकडो हजारो देशबांधव आणि मध्य भारतात आदिवासींच्या शोषणाविरोधात उभे ठाकलेले नक्षलवादी मुसलमान नाहीत. त्या दोघांचाही मार्ग दहशतवादी आहे. देशाला आणि लोकशाहीला तितकाच घातक आहे. आसाममधील उल्फा बंडखोर उच्चभ्रू वरिष्ठ जातीतील हिंदू आहेत. Bodo Land साठी लढणारे हिंदूच आहेत. त्यांच्या बातम्या रोज असतात. त्यांच्या हिंसाचारात रोज शेकडो माणसं मरतात, पण आपण त्यांना दहशतवादी म्हणत नाही. कारण ते मुसलमान नसतात म्हणूनच ना?


उल्फा दहशतवादी वरिष्ठ जातीचे हिंदू आहेत. म्हणून या देशातल्या सगळ्या वरिष्ठ हिंदू जाती दहशतवादी आहेत, असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. नथूरामने महात्माजींची हत्या केल्यानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राम्हणांची घरं जाळण्यात आली. त्यांना पळवून लावण्यात आलं, हा मूर्खपणा होता. नथुरामवादाच्या  विरोधात भूमिका घेत असंख्य ब्राम्हण स्वातंत्र्याच्या आणि समतेच्या चळवळीत उतरले होते. त्यांना नथुराम ठरवणे हा घोर अन्यायच ठरतो. प्रज्ञा भारती आणि कर्नल पुरोहित नथुराम परिवाराचे पाईक आहेत. त्यांच्यावर फुलं उधळणाऱ्याना देशभक्त म्हणता येणार नाही. पण त्यांचे कोणी नातेवाईक आणि जातवाले आहेत त्यांना देशद्रोही ठरवणं तितकंच मूर्खपणाच आणि अन्यायकारक आहे.


या देशातल्या स्वातंत्र्य लढ्यात लक्षावधी मुस्लिमांनी त्याग आणि बलिदान दिलं आहे. अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. फासावर गेलेला अश्फाक उल्ला खान एकटा नव्हता. ब्रिटीशांनी फासावर चढवलेले आणि तोफेच्या तोंडी दिलेले मुसलमान किती याची बेरीज केली तर मुसलमानांना दहशतवादी ठरवताना स्वतःची लाज वाटते. मुंबईच्या आझाद मैदानात दोन तोफांच्या तोंडी मुसलमान सय्यद हुसैन आणि हिंदू मंगल गडिया या दोघांना एकाचवेळी बांधण्यात आलं होतं. हजारो मुंबईकरांनी त्यांच्या चिंधड्या उडताना पहिल्या. प्रेताचा कोणता तुकडा हिंदूचा आणि कोणता मुसलमानाचा असा प्रश्न अंत्यसंस्कार करणाऱ्यांना पडला होता.


दोघांच्या देशभक्तीचं रक्त मांस तर एकच होतं.



- कपिल पाटील

  अध्यक्ष, लोक भारती.
  kapilhpatil@gmail.com

23 comments:

  1. Ya deshat hindutvavadi nahi aahe asala tari to islamic aatankvadala uttar denyasathich aahe....
    jar islamic aatankvad sampala to rahnaarch nahi

    ReplyDelete
  2. कपिल सर इस्लामिक दहशतवाद हा फक्त भारता पुरता मर्यादित नाही तर तो जागतिक स्तरावरील प्रश्न आहे आणि या देशातल्या दहशतवादाची, अतिरेकी चळवळीची सुरवात नथुरामाने केली असे म्हणणे म्हणजे तर Secularism चा कहरच आहे अहो इ.स ७१२ पासूनचा इतिहास जर चाळलात तर दहशतवादाचा खरा अर्थ लक्षात येईन, आणि भगवा आतंकवाद म्हणून कंठशोष करणाऱ्या पिलावळीची हि काही कमतरता नाही भारतात!

    ReplyDelete
  3. Ishrat Jahan .. an Innocent girl with 3 terrorists at 2 am ?
    The case is a flop, it is over before it began.

    1) FBI informed IB that Ishrat Jahan is an Islamist LeT suicide bomber. A 'Fidayeen' who wanted to assassinate Narendra Modi.

    2) LeT's website claimed Ishrat Jahan as one of their own.

    3) Ishrat's mother says Ishrat was kidnapped 4 days before she was encountered in Gujarat. But no missing person's report is filed ? very coonvenient indeed.

    4) Satish Verma (IPS officer investigaating the case) was a nominee of Ishrat Jahan's mother in the SIT.

    5) Abdul Gani was killed in Ishrat Jahan encounter and he could be heard on tape speaking to Lashkar Commander.

    6) a report prepared by investigating officer in the Ishrat case, ACP Parixita Rathod submitted in the POTA court clarifies that Ishrat was with terrorists.

    7) One of the rare public cases where we find Indian intelligence coordinating with foreign intelligence, acting on it well in time to prevent a terror attack.
    Reward for this ? government uses the CBI to attack IB. Gujarat IPS officers are falsely framed and harassed. Modi is vilified again.

    8 ) Congress and Media will try its level best to indict both Modi and shah so that the whole country talks about it and forgets about 2G, coalgate, Railgate, CWG, Jet-Etihad deal etc

    Ishrat Jahan case is a clear testimony to the fact that Congress will sell this nation for minority votes. It will protect terrorists like Ishrat Jahan and punish patriotic officers who eliminate them. It will manipulate the system and compromise national security to stay in power.

    ReplyDelete
    Replies
    1. I fully agree with what Chirag says. Kapil Patil is wasting his time in trying to protect a terrorist. May be, he is paid to do it by Lashkar! Our politicians are nothing short of traitors. Kapil is an example to prove my doubt.

      Delete
  4. इशरत ला न्याय मिळेल...
    खूप छान मांडणी झालीय....
    जबाबदारी आपण सर्वानी घेण्याची गरज आहे....
    आपण मांडलेली मत "जाणिवा" झाल्या पाहिजेत...
    संतोष शिंदे ९८६९०३०३८२



    ReplyDelete
  5. मा. कपीलजी, इशरत न्याय मिळेल असं म्हणताना इतक्या मोठ्या माणसांच्या रांगेत तिला बसवण्याचा हा आपला प्रयत्न अनाकलनीय आहे. आपण खूप वर्षे पत्रकारिता केली आहात. पण अशा त-हेचा गोलमाल लेख मी तरी प्रथम वाचीत आहे.
    -विनायक सुतार(मुलुंड)

    ReplyDelete
  6. तुम्ही संदर्भ दिलात म्हणून सांगतो-कॉंग्रेस आणि गांधीनी अखंड भारत का नाकारला हे त्याचं अलीकडील पुस्तक वाचावे. त्यात त्यांनी फाळणीची मुस्लिम मानसिकता सांगितली आहे. सर सय्यद ह्यांचे ते दोन डोळे वैगेरे अर्ध वाक्य आहे,अशी भाषण त्यांनी अलीगड विद्यापीठ उभारताना हिंदुनी मदत करावी म्हणून केली आहेत. उलट हिंदुनी तलवारीशी लढा असा त्यांनी उपदेश केला आहे. जो लढून विजयी होईल त्याच्याकडे ब्रिटिशानि स्वतंत्र भारताची सत्ता द्यावी. संदर्भ- Writing & Speeches of Sir Syed Ahmad Khan-by Shan Mohammad. Nachiketa Pub. Mumbai

    Pan इस्लाम हा प्रकार ऐकला का कधी? त्यात वाचावे. सर सय्यद,सर अमीर अली,मोलाना अफगाणी,मोलानं शिबली, मोलाना महमूद हसन,मोलाना सिंधी अगदी मोलाना आझाद हे पण pan इस्लामीच होते हे त्या ग्रंथात सप्रमाण सिद्ध केल आहे.

    बाकी तुमच राजकारण आणि इशरत पुराण चालू द्या.

    ReplyDelete
  7. Khup Sundar Mandani Keli Ahe , Ishrat la Nay Nakkic Milel Ti Aapli Sarvanci Jababdari Ahe


    ReplyDelete
  8. मुंब्र्यासारख्या छोट्याश्या ठिकाणी राहणा-या, स्वतःचे शिक्षण सांभाळून, पैसे कमवून घर चालवणा-या ह्या "निष्पाप" मुलीचे आणि गुजरातच्या राज्यकर्त्यांचे असे काय वैर होते कि त्यांनी तिला अतिरेक्यांबरोबर खोट्या चकमकीत मारावे? खुनाच्या मागे काहीतरी मोटिव्ह असतो; इथे काय मोटिव्ह असू शकेल? निष्कारण कोणालातरी मारत सुटायला ते काय रामन राघवनचे अवतार आहेत काय? काहीतरी उगाचच लिहायचे ह्याला काही अर्थ आहे काय? इस्लामिक दहशतवाद हा फक्त भारता पुरता मर्यादित नाही तर तो जागतिक स्तरावरील प्रश्न आहे; पण तो ह्या देशाच्या राज्यकर्त्यांना कधीच समजला नाही (किंवा त्यांनी हेतुपुरस्सर समजून घेतला नाही ???) अन्यथा आज देशाचे चित्र नक्कीच वेगळे असते.

    ReplyDelete
  9. इशरत असो कि ख्वाजा युनुस असो अथवा संजय दत्त ! कायदा जर सर्वांना समान आहे हे तत्त्व मान्य असेल तर सर्वांना न्यायसंस्थेच्या प्रक्रियेतून जावे लागेल. हे अपरिहार्य आहे. इशरत अतिरेकी संघटनांशी संबंधित होती तर तिला न्यायालयात हजर करून तसे सिद्ध करायचे होते. त्यासाठी चकमक घडवून आणण्याची गरज काय होती ? आणि जर कायद्यावर तुमचा विश्वास नाही तर आजवर जे काही बॉम्ब स्फोट आणि तत्सम देशद्रोही कृत्यात सापडलेले आरोपी आहेत --- त्यात मुस्लिम अबू सालेम प्रमाणे हिंदू प्रज्ञासिंग आणि संजू बाबा देखील अपेक्षित आहेत -- त्या सर्वांच्या हाती रिकाम्या बंदुका देऊन त्यांचेही एनकाउंटर घडवून आणा. प्रश्नचं मिटला ! हे भगवा आणि हिरवा दहशतवाद सगळे थोतांड आहे. पोटाला चार घास कमी पडले किंवा जास्त मिळाले कि माणूस या मार्गाने जातोच. सरकारने प्रथम जनतेच्या पोटा - पाण्याचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवायला हवेत.

    ReplyDelete
  10. https://en.wikipedia.org/wiki/Syed_Ahmad_Khan - There was a sudden change in Sir Syed's views after the Hindi–Urdu controversy. His education and reformist policies became Muslim-specific and he fought for the status of Urdu. Maulana Hali writes, in his book, Hayat-e-Javed, "One day as Sir Syed was discussing educational affairs of Muslims with Mr. Shakespeare, the then Commissioner of Banaras, Mr. Shakespeare looked surprised and asked him, 'This is the first time when I have heard you talking specifically about Muslims. Before this you used to talk about the welfare of the common Indians.'" Sir Syed then told him, "Now I am convinced that the two communities[Muslims and Hindus] will not put their hearts in any venture together. This is nothing [it is just the beginning], in the coming times an ever increasing hatred and animosity appears on the horizon simply because of those who are regarded as educated. Those who will be around will witness it." Sir Syed is hailed as the father of the Two Nation Theory and one of the founding fathers of Pakistan, along with Allama Iqbal and Muhammad Ali Jinnah.[5]

    ReplyDelete
  11. जमात उद दावा, तालिबान किंवा सिमी स्वतःला इस्लामी म्हणवतात - आपण त्यांना इस्लामी म्हणत नाही. जिहादच्या नावाखाली मुसलमान नसलेल्यांना किंवा वेळप्रसंगी मुसलमानांनाही मारणे ते त्यांचे कर्तव्य समजतात. ते तसे वागतात व मिरवतात - आपण त्यांना तसे करायला सांगत नाही. त्यावरुन त्यांना इस्लामी दहशतवादी म्हटले जाते. जे स्वतःला इस्लामी म्हणवून घेतात व निरपराधांना मारण्यात भूषण मानतात त्यांना इस्लामी दहशतवादी नाही तर काय हिंदु प्रतिपालक म्हणायचे ?

    तामीळ इलमचे आतंकवादी हिंदुंसाठी भांडतोय असे कधी म्हणत नाहीत म्हणून त्यांना तामीळ आतंकवादी म्हटले जाते. बोडो आतंकवादीही तसे कधी म्हणत नाहीत. त्यामुळे त्यांना हिंदू आतंकवादी म्हणणे किंवा तसे सूचित करणे हे कलुषित राजकारणाचे द्योतक आहे. भाजप किंवा रास्वसंघ ह्यासारख्या स्वतःला राष्ट्रीय म्हणवणाऱ्या संस्थांना आतंकी छावण्या चालवता असे म्हटले जाते तेव्हा त्याविरुद्ध असे लेख लिहावेसे वाटत नाहीत का ?

    ReplyDelete
  12. इसरतला न्याय मिळेल का? हे शीर्षकच मुळी चुकीचे आहे. तिला आता कसला न्याय मिळायचा? ती तर मरून गेली आहे. शीर्षक असे हवे : " नरेन्द्र मोदीस तुरुंगात कसे घालता येईल? " तसे म्हटले नसले तरी लेखाचा रोख तिकडेच आहे ना? थोडे थांबा की पाटिल साहेब. केस न्यायप्रविष्ट आहे. कुणास काय न्याय द्यायचा ते न्यायपालिका ठरवेलच की. एवढा त्रास का करून घेता?

    ReplyDelete
  13. Kaustubh ji, have you read about Pan Hinduism proposed and professed by Savarkar? He was adamant on Hindu princely states be independent of India...He had asked Travancore & Kashmir not to accede India.

    ReplyDelete
  14. The question is not whether Ishrat gets justice, the question is whether India will get justice in India. Having people like Kapil India will always suffer. I request Kapil Patil to declare how much money he has taken to write this blather.

    ReplyDelete
  15. patilji,better you should focusso on teacher's problems.pls keep aside national politics

    ReplyDelete
  16. माझ्या प्रिय वाचक मित्रांनो,
    तुमच्या सर्वांचं स्वागत. विरोधी मतांचेही स्वागत.
    इशरतला न्याय मिळेल का? या ब्लॉगवरच्या तिखट प्रतिक्रियांचेही स्वागत. त्यांना एवढंच सांगणं आहे. की त्या सर्वांनी कालच झालेलं मलालाचं भाषण वाचावं. तालिबानच्या गोळ्या डोक्यावर झेलणाऱ्या त्या सोळा वर्षाच्या मुलीने संयुक्त राष्ट्रांच्या सभेत जे सांगितलं, ते जमलं तर एकदा ऐकावं किंवा वाचावं. तालीबनीही बदलतील, मग ते हिंदू असोत की मुस्लिम. मलालाचा आशावादही दुर्दम्य आहे आणि अखेर तोच जिंकेल याची मला खात्री आहे. तालिबानी हातातल्या बंदुकांमध्ये नसतो. तो मनातल्या द्वेषात असतो. नरेंद्र मोदी यांची कालची मुलाखत ज्यांनी वाचली असेल त्यांना याची खात्री पटेल.
    http://www.independent.co.uk/news/world/asia/the-full-text-malala-yousafzais-speech-to-the-un-general-assembly-8706606.html

    ReplyDelete
  17. Good Afternoon Sir,
    I got your post included Leaflets, when i read it I understood right person and its thoughts...
    Keep It Up Kapil Sir, We are With U...

    ReplyDelete
  18. I think the discussion is loosing basic subject. It is no doubt that Ishrat was a terrorist. Kapil Patil has to support her because his boss SHARAD PAWAR also supported her. Fact is she was with terrorist (don't know upto what extent she was involved in the activities?).
    India should prove that we will not tolerate terrorism (religious or cultural)..............

    ReplyDelete
  19. Isharat jaha baddal aajahi apale tech mhanane ahe ki ti nirdosh hoti .................. apan kay post karatoy..... kunabaddal kartoy .... kashasathi kartoy .... yachha abhyas karunach samajprabodhan karave

    ReplyDelete