Courtesy TOI |
शाहजहाँला तुरुंगात
टाकल्यावरच औरंगजेबाला सत्ता मिळाली होती. नरेंद्र मोदी यांचा आदर्श औरंगजेबच असावा.
पण लालकृष्ण अडवाणी म्हणजे शाहजहाँ नव्हेत. त्यांनी राजीनामा असा फेकला की
'नमोनिया' बुमरँग झालं.
अडवाणी एकटे पडतील.
सगळा पक्ष, सगळा देश मोदींच्या पाठी उभा राहिल. ही अटकळ नितीन गडकरी, अरून जेटली,
राजनाथ सिंह आणि अशोक सिंघल या चौकडीचीच नव्हती फक्त. मोहन भागवतांचाही तोच कयास होता.
महाभारतातल्या
भस्मासुरातली उपमा कोणी नरेंद्र मोदींना दिली. पण नरेंद्र मोदींचा आर्श औरंगजेबच आहे.
तीच महत्वाकांक्षा. तोच रस्ता. औरंगजेबाने आपल्या भावांना मारलं. बापाला नाही. नरेंद्र
मोदीही औरंगजेबा इतकेच दयाळू आहेत. आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला जेरबंद केलं की दिल्लीचा दरवाजा आपोआप उघडेल, हा त्यांचा होरा मात्र चुकला. शाहजहाँसारखे अडवाणी दिल्लीचे पातशाह अजून झालेले नाहीत. शाहजहाँची इतर मुलं म्हणजे आपली भावंड औरंगजेबाने मारुन
टाकली होती. बादशाह एकटा पडला होता. अडवाणी ना भाजपात एकटे होते ना एनडीएत एकटे आहेत.
मोदी आणि औरंगजेब
यांची साम्य स्थळं सांगण्याची फार गरज नाही. दोघांमध्ये एक फरक जरुर आहे. औरंगजेब बादशाह
झाला होता आणि मोदी झालेले नाहीत. हा तो फरक नाही. दिल्लीची नाही तर भाजपाची सत्ता मोदींना जरुर मिळू शकेल. रा.स्व. संघाने मोदींना त्यासाठी रस्ता तयार करुन ठेवण्याचं काम सुरु केलं आहे. मात्र भाजपाच्या सत्ताधिशाला देशाची सत्ता मिळतेच असं नाही. जहाल अडवाणींच्या
ऐवजी उदार कवीमनाच्या वाजपेयींना देशानं स्विकारलं होतं.
मोदी आणि औरंगजेब
यांच्यात फरक आहे, तो राज्यकर्ता म्हणून असलेल्या वृत्तीतला.
हिंदुस्थानचा बादशाह
असलेला औरंगजेब आपला स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी सरकारी तिजोरीत कधी हात घालत नव्हता.
त्याची कबरही त्याच्या मृत्यूनंतरही तितकीच साधी आणि मातीची राहिली आहे. त्या कबरीवर
संगमरवराचा गड कधी चढलेला नाही. त्याचं व्यक्तिगत जीवन त्याने अतिशय साधेपणानं व्यतित
वेत्र्लं. असं इतिहास सांगतो. टोप्या विणून तो स्वतःचा खर्च भागवत असे. नरेंद्र मोदी रोज नवं जाकेट घालतात. जाकेट शिवणारा त्यांचा खास टेलर आहे. पॅत्र्शन डिझायनर.
आपल्या कपड्यांवर कोणी किती खर्च करायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण
मायावतींच्या पर्सची आणि जयललितांच्या सॅण्डलस्ची चर्चा करायला मिडियाला आवडत असेल
तर मोदींच्या जाकेटची का नको. माझा आक्षेप त्यांच्या जाकेटवर किंवा त्यांच्या जीवन शैलीवर नाही. राजकीय व्रत्रैर्याची साम्यस्थळे सांगताना फरकही सांगितला पाहिजे.
म्हातारपणात सत्तेचा
हव्यास सुटलेला नाही, अशी अडवाणींवर टिका करणारे अनेक आहेत. परंतु भाजपला 2 वरुन
182 जागांवर नेऊन ठेवणार्या त्या पक्षाच्या बापालाच असं एकटं पाडणं भाजपातल्या सर्व
सामान्य कार्यकर्त्याला आणि भाजपाशी सुतराम संबंध नसलेल्या करोडो भारतीयांना आवडलेलं
नाही. तसं नसतं तर भाजपाचे तमाम नेते आणि सरसंघचालक मोहन भागवत अडवाणींच्या पाया जाऊन
पडले नसते. मोहन भागवत सरसंघचालक जरुर असतील. पण संघ परिवाराच्या सर्वोच्च चारपाच नेत्यांमध्ये
लालवृत्र्ष्ण अडवाणी यांचं स्थान सर्वोच्च आहे, याची कल्पना परिवाराच्या बाहेरच्या
फारच थोड्या मंडळींना असेल. अडवाणी वेत्र्वळ संघ परिवाराच्याच सर्वोच्च स्थानी आहेत
असं नाही. संघ परिवार देशातला एक प्रवाह जरुर आहे. तो मुख्य प्रवाह नाही. संघाच्या पलिकडचा देश खूप मोठा आहे. विहिरीतल्या बेडकाला बाहेरचं जग माहित नसतं. या बाहेरच्या जगात अडवाणींनी
स्वतःचं एक स्थान निर्माण वेत्र्लं आहे. म्हणूनच अडवाणी एकटे पडले नाहीत.
प्रश्न केवळ अडवाणींचा नव्हता. मोदी साहसामुळे आज एनडीएमध्ये पुत्र्ट पडली आहे. अडवाणींना वजा करुन
होणार्या राजकारणाने एनडीए एक राहू शकत नाही हे आता स्पष्ट झालं आहे. ज्या कारणासाठी
अडवाणी टोकाचं पाउत्र्ल उचलतात, त्याच कारणावरुन
अन्य सेक्युलर घटकांनी मोदींच्या भाजपाला साथ का द्यावी? मोदी भाजपाचा उद्या जरुर
ताबा घेऊ शकतील. पण देशाचं स्टेअरींग मोदींच्या हाती कधी लागणार नाही. संघ म्हणजे देश
नाही. भाजपा म्हणजे देश नाही. मोदी म्हणजे देश तर बिलकुल नाही. हा देश एका जातीचा,
एका धर्माचा, एका भाषेचा, एका विचारांचा, एका संस्कृतीचा कधीच नव्हता. हिंदुत्वाच्या, वर्ण वर्चस्वाच्या एका पोषाखात हा देश, त्यांनी किती आटापिटा केला तरी संघ संचलन
कधीच करणार नाही. तिथे मोदीचं फासीस्ट नेतृत्व स्विकारण्याचा प्रश्नच येत नाही.
मोदींच्या विकास
नितीचं या देशातल्या लब्ध प्रतिष्ठीतांमधल्या एका वर्गाला जरुर आकर्षण आहे. मोदी कसे
नॉन करप्ट आहेत आणि विकासाचा एक्सप्रेस हायवे फक्त गुजरात मधूनच धावतो अशा कथा रंगवणं
कॉर्पोरेट जगताला आणि त्याची बटिक असलेल्या मिडीयाला सोयीचं आहे. पण मोदींचा विकासाचा
रस्ता नैसर्गिक संसाधनांच्या विखारी ओरबाडण्यातून, भूमिपुत्रांच्या र्निय विस्थापनातून,
शोषितांच्या शोषणातून आणि रक्तरंजित द्वेषातून बांधला गेला आहे.
परवा ते पुण्यात
येऊन गेले आणि शिक्षण क्षेत्राचा स्वतःचा तथाकथित अजेंडा त्यांनी जाहीर वेत्र्ला. तेव्हापासून देशातील शैक्षणिक व्रत्रंती जणू गुजरातमध्ये झाली असं चित्र संघ परिवारातला मिडीया रंगवत
आहे. पण वस्तुस्थिती अलग आहे. गुजरातचा नंबर महाराष्ट्राच्या खाली आहे. महाराष्ट्र
9व्या नंबरवर आहे. गुजरात 13 व्या नंबरवर आहे. बर्याचा कम्युनिस्ट, कधी काँग्रेसच्या
ताब्यात राहणार्या वेत्र्रळने पहिला नंबर सोडलेला नाही. जीडीपीमध्ये महाराष्ट्र 1
नंबरवर आहे. गुजरात खूप मागे आहे. शेती क्षेत्रातलं किमान वेतन महाराष्ट्रात 120 रुपये आहे. बिहारमध्ये 109 ते 114 रुपये आहे. तर गुजरात मध्ये 100 रुपये आहे.
State or
union territory
|
Crore Rupees 2011-12 nominal GDP
|
Billions
USD FY11-12 Nov 2012 INR rates
|
Per capita GDP INR
|
India
|
8,353,495
|
$1,564.96
|
61,564
|
Maharashtra
|
1,248,452
|
$233.89
|
101,314
|
Andhra Pradesh
|
676,234
|
$126.61
|
71,540
|
Uttar Pradesh
|
6,76,083
|
$125.86
|
30,051
|
Tamil Nadu
|
639,024
|
$119.72
|
84,496
|
Gujarat
|
613,172
|
$116.14
|
89,668
|
गुजरातने सिंचनात
आणि उद्योगात महाराष्ट्राच्या पाठोपाठ नक्कीच प्रगती केली आहे. मात्र ही प्रगती केवळ मोदींच्या काळातली नाही. त्यांच्या आधीच्या किमान पाच मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी
या विकासाची पायाभरणी केली आहे. त्याचा उल्लेखही मोदी करत नाहीत. जणू त्यांच्या
आधी गुजरातमध्ये अंधाराचं राज्य होतं.
नर्मदा सरोवर योजनेचं
श्रेय मोदींचे खचित नाही. त्यांच्या काळात ती पूर्णत्वाला जाते आहे इतकंच. पण त्या
नावावरही निर्लज्ज खोटेपणाची मोदी कमाल करतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला
400 कोटी रुपये किमतीची मोफत वीज मिळू शकत नाही. असा आरोप त्यांनी नुकताच पुण्यातल्या
सभेत वेत्र्ला. त्यांच्या आरोपाला नर्मदा बचाव आंदोलनानेच जे उत्तर दिलं आहे, ते लोकसत्तेत
प्रसिद्ध झालं आहे. खाली ते दिलं आहे. मोदींचा खोटेपणा सिद्ध करण्यास ते पुरेसं ठरावं.
गुजरात तिसर्यादा जिंकल्यानंतर थेट पंतप्रधानकीचं स्वप्न आता मोदी पाहत आहेत. पी.एम. मोदी म्हणून त्यांचं मार्केटींग सुरु आहे. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून 15 हजार माणसं वाचवल्याचा दावा
त्यांनी केला. जे काम सैन्याला जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं. मुंबईतलं त्यांचं
भाषण आणि त्यांचा अॅटिट्युड ज्यांनी पाहिला असेल त्यांनी त्यातून झिरपणारा नथुरामी
अहंकार जरुर पाहिला असेल. उदारतेची, राम राज्याची झुल त्यांनी किती पांघरु देत, त्यांच्यात दडलेलं हिंस्त्र श्वापद दडून राहत नाही.
सरकार प्रायोजित
गुजरात दंगली नंतर मोदींना बदलण्याचा निर्णय त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी
घेतला होता. मोदींना त्यांनी राजधर्माची आठवण करुन दिली होती. अडवाणी यांनी मात्र त्यावेळी मोदींची बाजू घेतली. त्यांना संरक्षण दिलं. त्याच अडवाणींना बाजूला ढकलत मोदी घोड्यावर
स्वार झाले. गोव्यात त्यांनी अडवाणींचं नावं सुद्धा घेतलं नाही.
गोव्यात त्यांनी
काय भाषण केलं? मोदी म्हणाले, ''गोवा मेरे लिए लकी है. इसी गोवा मे मुझे गुजरात
चलाने का लायसन मिला.''
राज्य म्हणजे काय दुकान आहे? की कसला ठेका आहे? पवित्र मातृभूमीचे स्तोत्र गाणार्या संघ पुत्राच्या लेखी
मातृ भू म्हणजे दुकान आणि ठेका असेल तर त्याला काय म्हणायचं?
सार्वभौम जनतेचं
राज्य चालवणं हा ठेका मानणार्या वृत्तीच्या हातात देशच काय ते राज्यही कायम ठेवणं त्या
राज्यासाठी, लोकशाहीसाठी धोकादायक आहे. अडवाणींना सुद्धा टोकाचं पाऊल उचलावं लागत असेल,
नितिशकुमार, शरद यादवांना त्यांच्यासोबत राहू नये असं वाटत असेल तर देशाच्या जनतेने
काय ठरवायचं?
आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोकभारती
kapilhpatil@gmail.com
_______________________________________________
मोदी पंतप्रधान होऊ नयेत : अमर्त्य सेनJul 22, 2013, 03.32PM IST
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जे आर्थिक विकासाचे मॉडेल राबवले ते मला अर्थशास्त्रज्ञ म्हणून अयोग्य वाटते. म्हणूनच मोदी पंतप्रधान होऊ नयेत, अशी माझ्या भारतीय मनाची इच्छा आहे, असे विधान नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केले आहे.
सीएनएन-आईबीएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. सेन यांनी हे विचार व्यक्त केले. या मुलाखतीत त्यांनी मोदींचा हा विकास सर्वसमावेशक नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला. समाजातील मागास आणि अल्पसंख्य घटकाला मोदींच्या विकासामध्ये सुरक्षित वाटत नाही, असे ते म्हणतात.
विकासाला सामाजिक बदलांपासून वेगळे करता येत नाही. फक्त उच्च विकास दर हा गरीबी निर्मुलनाचा उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वसमावेशक विकास महत्त्वाचा आहे. असे सांगत डॉ. सेन यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्तुती केली आहे.
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या मॉडेलमधील कोणते मॉडेल देशासाठी योग्य यावर सध्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे डॉ. सेन यांनी मोदींच्या मॉडेलवर टीका करून नितीश कुमार यांची केलेली स्तुती फक्त अर्थशास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचे मानली जात आहे.http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Amartya-Sen-dont-want-Narendra-Modi-as-PM/articleshow/21243530.cms
_______________________________________________
सध्या काही नमोनिया समर्थक सोशल mediyaanchya माध्यमाने असा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की जो कुणी नमोनियाचा दिवस रात्र जाप करेल तोच खरा हिन्दू असणार आहे .....माझा प्रश्न एवढच की हिन्दू असण्यासाठी असा एखाद्या नमोनिया ब्रांड सर्टिफिकेटची गरज आहे का ?
ReplyDelete........................................................................संजय दुबे (शिक्षक भारती :मुलुंड विभाग )
Nowadays ever body is pampering Mr modi but its a fact that no one can deny that because of modi there were many riots in Gujarat.
ReplyDeleteHis comparisan with Aurangzeb is absolutely true.