श्रद्धांजली
केवळ गुणवत्ता यादीतच नाही तर मूल्यशिक्षणात, आधुनिक ज्ञान विज्ञानात आणि जगाच्या स्पर्धेत बालमोहन या नावाने डॉ. बापूसाहेब रेगे शिक्षणाच्या क्षेत्रात एक अमिट मुद्रा सोडून गेले आहेत. The best School throughout India and Europe असा अभिप्राय अमेरिकेतून आलेल्या 25 शिक्षण तज्ज्ञांनी बालमोहनला भेट दिल्यानंतर दिला होता. दादासाहेब रेगे यांनी लावलेलं हे रोपटं डॉ. बापूसाहेबांनी नावारुपाला आणलं. शाळेच्या दारातच महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांचे केवळ त्यांनी पुतळे बसविले असं नाही तर देशभक्तीचा आणि सामाजिक सलोख्याचा संस्कार देणारी ही शाळा आहे.
दादर जसं शिवाजी पार्क , चैत्यभूमी यामुळे ओळखलं जातं तसं ते बालमोहन मुळेही ओळखलं जातं.दादरच्या संस्कृतीचं बालमोहन हे प्रतिक मानलं जाऊ लागलं ते बापूसाहेब रेगे यांच्या असंख्य शैक्षणिक प्रयोगांमुळे सरकारने सुरु करण्याआधीच त्यांनी पहिलीपासून इंग्रजी, कॉम्पुटर शिक्षण, राष्ट्रीय एकता सफरी, एक सुर एक ताल असे प्रयोग आपल्या शाळेत सुरु केले . मार्च 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात दादर हादरलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या शाळेतल्या सर्व मुलांना एकाचवेळी धीरोदात्तपणे माणसुकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरु... हे समुह गान गायला लावलं होतं.
गेल्या 2 फेब्रुवारीला शिक्षण हक्क वृत्र्ती समितीच्या वतीने मुंबईतल्या सर्व शिक्षकांनी आणि शाळा चालकांनी एकत्र येऊन प्रचंड मोर्चा काढला होता. त्या मोर्च्याची सुरवात बाल मोहनच्या पायरीवरून झाली होती. त्या मोर्च्याची सुरवात करुन द्यायला 83 वर्षाचे डॉ. बापूसाहेब रेगे प्रकृती ठिक नसतानाही खाली उतरले होते. त्यांना स्वतःला मोर्च्यात चालायचं होतं. पण ते शक्य नव्हतं. त्यांच्यावतीने त्यांचे चिंरंजीव गिरीष रेगे मोर्च्यात शेवटपर्यंत अमोल ढमढेरे, प.म.राऊत यांच्या सोबत चालत आले.
बापूसाहेब रेगेंच्या आठवणी दादार आणि शिवाजी पार्कच्या परिसरात कायम दरवळत राहतील.
आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
No comments:
Post a Comment