आज गुढीपाडवा. महाराष्ट्रातल्या
घराघरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गुढय़ा उभारल्या जातात. मीही दरवर्षी उत्साहाने
गुढी उभारतो. घरातले आम्ही सगळेच नास्तिक. नास्तिक म्हणजे निरिश्वरवादी नव्हे. अधार्मिक. पण तरीही सर्व सण उत्साहाने साजरा
करतो. घरी कसलीच पूजा होत नाही. कर्मकांडही नाही; पण दिवाळी, नाताळ, ईद, बुद्ध पौर्णिमा,
महावीर जयंती हे सण आनंदाने साजरे होतात. तसा गुढीपाडवाही. दिवाळी हा तर शेतकर्यांचा
सण. त्याचा धर्माशी काही संबंध नाही. बळीराजाच्या स्वागताचा तो उत्सव असतो. या देशात
वामनावताराची कुठेही पूजा होत नाही. ईडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो, असं औक्षण मात्र
तमाम आया करतात. तीन हजार वर्षे झाली. बळीराजाची आठवण जराही धूसर झालेली नाही.
गुढीपाडव्याची परंपराही १९३८ वर्षे अभिमानाने साजरी केली
जाते. आपल्याकडे लोकदैवतं, लोकपरंपरा आणि लोकउत्सवाचं वैदिकीकरण करण्याची परंपराही
जुनी आहे. वैदिकीकरणातून लोक नायकांचे कर्तृत्व पुसण्याचा प्रयत्न बराच झाला आहे. यज्ञयागांच्या
विरोधात लढणार्या महालक्ष्मीला पुरोहितवर्गाने कसं ताब्यात घेतलं आणि घरातल्या लक्ष्मीलाच लक्ष्मीचा गाभारा बंद केला, हे तर आजही पाहतो आहोत.
महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून आणि मराठी माणसाला
'महाराष्ट्री' म्हणून पहिली ओळख दिली ती सातवाहनांनी. मूळ जुन्नरचा छीमुक सातवाहन याने
हे घराणं स्थापन केलं. सम्राट अशोकाच्या साम्राज्याचे ते भाग होते. पुढे सातवाहनांचं
राज्य हुणांच्या आक्रमणात क्षीण झालं. फक्त सातारा- कराड पुरतं उरलं. पण सातारची माती
खरंच क्रांतिवीरांची आहे. त्या मातीतून गौतमी पुत्र सातकर्णी याने पुन्हा महाराष्ट्रीयांचं
स्वराज्य निर्माण केलं. हुण आक्रमक नहपानाचा पराभव केला. हुणांच्या गुलामीतून राज्य
पुन्हा स्वतंत्र केलं. तो दिवस होता चैत्रपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा. महाराष्ट्रभर
गुढय़ा उभारल्या गेल्या. घराघरात गोडधोड केलं गेलं. सातवाहनांनी चारशे वर्षे राज्यं
केलं. पहिल्या मराठी - महाराष्ट्रीय साहित्याची निर्मिती सातवाहनांच्या काळातच झाली.
गाथा सप्तशती, कथा सरित्सागर, लिलावई या सारखी महाकाव्ये रचिली गेली. वररुचीचा 'प्राकृत
प्रकाश' हा महाराष्ट्रीय भाषेचा व्याकरण ग्रंथ सातवाहनांच्या काळातलाच. उद्या मराठीला
अभिजात दर्जा मिळालाच तर त्याचं कारण सातवाहनांच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या साहित्य
निर्मितीलाच असणार आहे. सातवाहनांनी देश विदेशी व्यापार वाढवला. महाराष्ट्राला समृद्ध
केलं. सातवाहनांनी महाराष्ट्रात अनेक बौद्ध लेण्या कोरल्या. बौद्ध, जैन, ब्राह्मण सर्वच धर्मांना त्यांचा आश्रय होता. सर्व पंथ धर्मियांना समान वागणूक दिली. साहित्य, कला, संस्कृतीला वाव दिला.
अनेक किल्ले बांधून काढले. महाराष्ट्रात आजही उभे असलेले अनेक किल्ले हे त्यांच्याच
काळातले. अगदी शिवरायांचा रायगडही.
देशीयांना महारट्ट, आजच्या भाषेत मराठे अशी नवी ओळख
मिळाली, सातवाहनांच्या काळात. त्यांच्या कारभारात मुलकी सेवेत जे होते ते महारट्ट.
तर त्यांच्या पोलीस सेवेत होते ते महारख्ख. एकाच घरातला एक भाऊ महारट्ट होत असे तर
दुसरा महारख्ख. वैदिकीकरणाच्या प्रक्रियेत पुढे त्यांच्या जाती झाल्या.
महाराष्ट्राचे कॅलेंडर शालीवाहन शकानुसारच चालतं. खरं
तर शालीवाहन हा शब्दही चुकीचा आहे. ते संस्कृत रूप आहे. मूळ शब्द सालाहान आहे. ज्या
साली शकांचे हनन केले तो सालाहान शक. त्या शकाभोवती खोट्या कथा गुंफत इतिहास पुसला
गेला. पण कल्याण जुन्नरच्या प्राचीन राजमार्गावर नाणेघाटात कोरलेला पहिला मराठी लेख
वैदिकांना पुसता आला नाही. शक, हूण आणि कुशाण अशा आक्रमकांना गौतमी पुत्राने आपल्या
पराक्रमाच्या जोरावर नर्मदेच्या अलीकडे येऊ दिलं नाही. नाणेघाटातल्या शेवटच्या लढाईत
नहपानाला यमसदनी पाठविल्यानंतर शीलालेखावर गौतमी पुत्राने अभिमानाने कोरून ठेवलं आहे,
'खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस' शकांची ४६ वर्षांची राजवट उलथवून मिळालेल्या स्वराज्याचा
आनंद साजरा करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्र आणि महाराष्ट्री ही ओळख देणार्या
गौतमी पुत्र सातकर्णीची याद गेले १९३८ वर्षे महाराष्ट्राने जपून ठेवली आहे. डॉ. अजय
मित्रशास्त्री आणि संजय सोनवणी यांनी हा सगळा इतिहास अलीकडे उलगडला.
बहुजनांच्या लोकनायकांना एकतर विस्मृतीच्या पाताळात
गाडायचं. न जमल्यास त्या लोकनायकांचं वैदिकीकरण करून पुरोहितांच्या कब्जात देव म्हणून
बंदिस्त करायचं. परंपरांचं कर्मकांड करून सगळा इतिहास पुसून काढायचा. रामकृष्णाचा वैदिकांनी
अवतार केला. फक्त तथागत गौतम बुद्धांना नववा अवतार करण्यात त्यांना यश आलं नाही. विवेकानंदांना
पळविण्यात ते यशस्वी झाले. भगतसिंग मात्र त्यांना झेपला नाही. 'इन्क्लाब झिंदाबाद'
आणि 'भारत माता की जय' या घोषणांशी त्यांचा कधीच संबंध नव्हता, पण आता 'भारत माता की
जय' पळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. राष्ट्रगीतालाच आव्हान देत आहेत.
लोक दैवतांना शेंदूर फासून त्यांच्या पराक्रमांचा इतिहास
पुसून टाकण्याची पद्धत जुनी आहे आणि आजही ती सांप्रदायिकरणातून जारी आहे, पण म्हणून आपल्या
नायकांचा इतिहास विसरण्याचं कारण काय? सांप्रदायिक शेंदूर खरवडला की सत्य बाहेर येईल.
जे आपलं आहे. पाडवा म्हणून साजरा करायचा.
(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.)
पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी ६ एप्रिल २०१६
जिंदाबाद सर
ReplyDeleteया पूर्वी गुडीपाडव्यावर लिहिताना कपिल पाटील याना काही आठ्वत नाही. बहुजन वादाचे आड हिंदू संस्कृती विषयी गैरसमज पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न.
ReplyDeleteया गुढ़ीपाड़वा समर्थक लोकांनी काही प्रश्नांची उत्तरे द्यावी ।।
Delete⛳1)महाराष्ट्राच्या बाहेर हिंदू नाहीत का ?
2) फक्त महाराष्ट्रातच हिंदू आहेत का ?
3) हा जर हिंदू सन आहे तर नेपाळ तर हिंदू राष्ट्र आहे मग तेथे पाड़वा साजरा का होत नाही ?
4) महाराष्ट्राऐवजी दुसऱ्या राष्ट्रात हिंदू नाहीत का ?
5) हिंदू धर्मात शुभ असलेला सरळ तांब्या गुढ़ीवर उलटा कसा ?
6) हिंदू धर्मात प्रेताच्या तिरडीसाठी वापरले जाणारे बांबू शुभ मानल्या जाणाऱ्या गुढ़ीला उपयोगी कसे ?
~दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात या सणाला मराठी नवीन वर्षसुद्धा म्हणतात. पण खर्या इतिहासाच्या मुळाशी जायचं म्हटलं तर या दिवसापर्यंत तब्बल चाळीस दिवस कैद केलेल्या शंभू राजांना आबाजी भट्ट आणि रंगनाथ स्वामी या ब्राम्हणांच्या सांगण्यावरुन
मनुस्मृतिनुसार छळलं गेलं, अनन्वित अत्याचार केले. डोळे काढले, जीभ छाटली, नखे काढ़ली, कानात तेल ओतलं, चमड़ी सोलली अन् अखेर 11 मार्च 1689या दिवशी वडू बुद्रूक
तुळापूर येथे शंभू राज्यांचं मस्तक कलम केल्या गेलं. इंद्रायणी-भीमेला रक्ताचा अभिषेक झाला. अन् अखेर फाल्गुन वद्य अमावस्या 12 मार्च 1689 हा दिवस उगवला या दिवशी छाटलेलं शंभू राज्यांचं मस्तक भाल्याच्या टोकावर अडकवलं गेलं व गावागावातून मिरवलं गेलं. अंततः भाल्याच्या टोकाला अडकवलेलं ते मस्तक रक्ताने न्हाऊन निघालेल्या इंद्रायणी-भीमा तिरावर आणलं गेलं अन् तोच भाल्याचा फाळ तिरावर रोवला गेला ..भाल्यावर अडकवलेलं शंभूराज्यांचं मस्तक, बांबूपासून बनलेला तो भाला अगदी हेच स्वरूप भटांनी गुढ़ीला दिले. अन् पाहता पाहता अशुभ असलेला उलटा तांब्या शुभ झाला. स्त्रियांची अब्रू असलेली साड़ीचोळी गुढीवर टांगण्यात आली. मात्र हे सर्व कुणाच्या दृष्टीस आलंच नाही आणि ज्यांनी हे दृष्टीस आणून दिले त्यांना इथल्या मनुवादी व्यवस्थेने हिंदुद्रोही-समाजद्रोही ठरवलं.. सर्व काही खोट्या धार्मिक अस्मितेच्या नावावर बहुजनांनी गिळंकृत केलं. वास्तविक इतिहास बाजूला गेला.. अन् हाच दिवस मनुवादी ब्राम्हणांनी 'मराठी नवीन वर्ष' या नावाने मराठी जनांच्याच मस्तकी मारला. पुढे हा दिवस हिंदू नवीन वर्ष दिन सुद्धा झाला. ।।।।अन आम्ही मूर्ख बहुजन विचार न करता मोठ्या उल्हासात गुढीपाडवा साजरा करतो. म्हणजे शंभू राजांचा स्मृतिदिन मोठ्या आनंदाने साजरा करतो. म्हणजे आमच्या राज्यांचं बलिदान व्यर्थ झालं की काय हा आमच्यासाठी मोठा प्रश्न आहे।।।।तरी कृपया कुणीही गुढीपाडवा हा दिवस सण म्हणून साजरा करू नये....
दोन ओळी माझ्या राजासाठी~~~
जनभक्तिचे तुशावरीनच उधाणले भान रियासतीवर नसे नोंदले तुझे कुणीच नाव जरी न गाति भाट डफावर तुझे यशोगान सफल जाहले सफल तुझे रे तुझेच रे बलिदान ।।
।।अशा माझ्या संभाजी राजाला स्मृतिदिनी विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा !!!
हे हिंदू नववर्ष नाही तर मराठी नववर्ष आहे. शक ही कालगणना महाराष्ट्रात आहे. छ.संभाजी महाराजांची हत्या सुद्धा जाणीवपूर्वक मराठी वर्ष सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला केली असावी.
Deleteसक (शक) सवंत बौद्ध सम्राट कनिष्क यांचा.पण विक्रम सवंत ब्राह्मणांचा सांगून गुढीपाडवा साजरा होत आहे. राम, ब्रम्हा यांना जोडून समाज भ्रमात गेला. छत्रपती संभाजी महाराज यांचा ही छळ ११ मार्च १९६९ करून शहीद करणे... त्या मुळे मन नाही करत गुढी पाडवा करायला.
Deleteसाहेब, खूप महत्त्वाची महिती मिळाली आणि तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Deleteपहिले शिक्षकांना न्याय द्या.
ReplyDeleteपहिले शिक्षकांना न्याय द्या.
ReplyDeletefarch chaan
ReplyDeleteछान!
ReplyDeleteछान!
ReplyDeleteGood View... Congrats
ReplyDeleteखूपच सुंदर काका
ReplyDeleteपाडवा कराचा मानून लोक सन साजरा करतात पण त्या सणाचे महत्व हा लेख वाचल्यावर समजेल
आपला आविकृस सुनील 👍
खूपच सुंदर काका
ReplyDeleteपाडवा कराचा मानून लोक सन साजरा करतात पण त्या सणाचे महत्व हा लेख वाचल्यावर समजेल
आपला आविकृस सुनील 👍
Yes this articale puts limelight on hinduisation of Nationality. I appreciate Kapil Patil's article.
ReplyDeleteSir very nice and informative article .
ReplyDeleteSir very nice and informative article .
ReplyDeleteपाटील साहेब.
ReplyDeleteशिक्षकांचे एकमेव लढवय्ये आमदार आहेत कपिल सर. न्याय तर भाजप सरकार देत नाही शिक्षकांना.
अभ्यासपूर्ण लेख..सण साजरे करणारा इतिहास सांगितलला सर.छान धन्यवाद साहेब.
ReplyDeleteखुप छान सर... भारताचा खोटा इतिहास लिहिला आहे या ब्राह्मणानी आणि मग फायदेशिर हिंदू संस्कृती व परंपरा या मध्ये लोकांना वेड बनवले..
ReplyDeleteYou are right sir
Deleteसाहेब....
Deleteखुपच छान विचार...
आपण आमचे प्रेरणास्थान ...
आमचे लढवय्ये नेतृत्व....
...दिपक पाटील,धुळे
शिक्षक भारती परिवार,धुळे
Nice information sir !
ReplyDeleteVery well written sir!!
ReplyDeleteअभिनंदन सर, लेख खुप सुंदर व अभ्यासपुर्ण झाला.
ReplyDeleteमराठी नव वर्ष दिन म्हणावे। पण हिंदू नववर्ष दिन म्हणतात ते चुकीचे आहे। हिंदू कॅलेंडर नावाचा प्रकारचं उपलब्ध नव्हता। मराठी कॅलेंडर अर्थात सालाहन कॅलेंडर हीच ओळख योग्य आहे। पण त्यावेळी आजच्या सारखी गुढी उभारली असे दिसत नाही। गुढी हे काहीतरी गौड बंगाल वाटते।
ReplyDeleteExcellent sir...
ReplyDeleteExcellent sir...
ReplyDeleteExcellent info...
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteधन्यवाद साहेब
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती
ReplyDeletePerfect इतिहास व पाडवा यांची माहिती मिळाली जय महाराष्ट्र
ReplyDeleteसुंदर माहीती मिळाली
ReplyDeleteछत्रपती संभाजी महाराजांचा वध आणी ब्राह्मणी षडयंत्र यांचाही काहीतरी संबंध पाडव्याशी जोडला जातो त्यावरही भाष्य करायला हवे.
ReplyDeleteमी पाडव्याला गुढी उभारीत नाही.
बरोबर आहे सर, मीही गुढी उभारीत नाही.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery nice I know little about satkarni but u gave good detail. Somewhere about sambhaji vadh details should be given ...
ReplyDelete👍👍👍👍
Deleteआपला अभ्यासपूर्ण लेख वाचून खरा गुढीपाडव्याच्या इतिहास कळला नाही तर मनुवादी संस्कार झालेली आमची मतीची खोळ झडली सर तुमचे आभार आणि मराठी नव वर्षाच्या शुभेच्छा.
ReplyDeleteVery informative blog...
ReplyDelete100%खरं आहे साहेब, अगदी माझ्या मनातील विचार आपण मांडलेत सलाम आपल्याला आता देशावर आणि जगावर महामारीचे संकट आले असताना कोणत्याही देवाचा अवतार होत नाही हे दुर्दैव आहे.
ReplyDeleteकपिल पाटील साहेब यांचा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण मांडला आहे. त्याच बरोबर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान आणि पाडवा हा संदर्भ वेगळा आहे. शालिवाहन शक अगोदरचे आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा काळ त्यानंतर चां आहे. तेंव्हा गुडीचा संदर्भ जो राज्यांच्या बाबतीत जोडला तो ही वैदिक संस्कृती आणि बहुजन यांच्यात संभ्रम निर्माण करणारच आहे. ज्या शिवरायांनी राजाराम महाराज जन्मले तेंव्हा म्हंटले होते हा पातशाही पालथी करणार आहे. त्या शिवपुत्र संभाजी राजांना संपवून गुढी उभारली जात असेल तर आपण बलिदान दीन म्हणून भगवा ध्वज उभारून संभाजी राजांना मानवंदना देवू. म्हणजे शालिवाहन शक पाडवा आणि संभाजी महाराज बलिदान दीन या वैदिक विकृतीतून आमचा स्वाभिमान म्हणुन टिकून राहतील.
ReplyDeleteसंतोष तांबे पाटील,पक्ष अध्यक्ष, अखिल भारतीय क्रांती सेना पक्ष महाराष्ट्र 9850017175
हे अगदी बरोबर आहे.
Deleteअर्धसत्य...सातवाहन हे घराने जुन्नरचे नाही
ReplyDeleteपेतान म्हणजे पैठणचे आहे...शकाचा पराभव केला की हुनाचां? हुनांच्या आक्रमनात शालीवाहनांच राज्य फक्त सातार कराड पुरतच राहील होत हेही खर नाही...शालाहन,सातवाहन,शालीवाहन ,सतकर्णी असे विविध ऊल्लेख ईतिहासात आढळतात
महत्वाच म्हणजे पैठणचा ऊल्लेख हि नाही
एका ग्रीक ईतिहासकारांनी तिसर्या शतकात पैताण असा ऊल्लेख केला आहे त्यात भोगवर्धन,तेर आणी पैठण हे तीन शहर म्हणजे देशातील महत्वाची व्यापारी केंद्र होती असे म्हटले आहे
जुन्नरला फक्त नाने घाटामुळे महत्व आले नाने घाटातुन पुढे ठाणे व नंतर समुद्रमार्गे सातसमुद्रपार व्यापार चालत होता
बोद्ध लेणी क्रमांक 7,8,9,10,13 व 15 शालीवाहन काळातील आहेत बाकी वाकाटक राष्ट्रकुट,चालुक्य यांच्या काळातील आहेत
प्रा.संतोष गव्हाणे,इतिहास अभ्यासक, पैठण 9850697007
Welldone sir 👍
ReplyDeleteअभ्यासू व्यक्तिमत्व,छान माहिती दिली आहे साहेब
ReplyDelete*या वर्षांपासून गुढी उभारायची की नाही ते वाचुन ठरवा.*
ReplyDelete"गुढीपाडवा "या सणाच्या इतिहासात थोडे डोकावून पाहूया.
१.गुढीपाडवा हा सण संभाजी राजांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु झाला त्या पुर्वी कधीच गुढ्या ऊभारल्याचा इतिहास नाही.
२.शिवरायांच्या गुढ मृत्यूची संभाजी राजांनी शहानिशा केल्यावर त्याला जबाबदार असलेले तीन ब्राम्हण मोरोपंत पिंगळे,अण्णाजी दत्तो ,राहू सोमनाथ यांना हत्ती च्या पायाखाली दिले.
३.भारतात पहिल्यांदाच ब्राम्हणाला दंडित केले गेल्या चा राग मनात धरुन ब्राम्हणांनी कट-कारस्थान करुन संभाजी राजांना पकडून दिले.
४.संभाजी राजांचा मृत्यू आदेश औरंगजेबाने जरी दिला होता पण त्याच्या अंमलबजावणी चे काम ब्राम्हण मंत्र्यांकडून झाले म्हणून ब्राम्हणांनी मनुस्मृती नुसार डोळे फोडणे, कानात शिसे ओतणे, जिभ कापणे या सारख्या अनेक शिक्षा फर्मावल्या. अशा प्रकारच्या शिक्षा मुस्लिमांच्या कोणत्याही धर्मग्रंथात नाही हे लक्षात घेणे गरजेचं आहे.
५.संभाजींना हालहाल करुन मारल्याने बामणं इतके आनंदित झाले कि त्यांनी हत्ती वरुन साखर वाटली. त्या नंतर संभाजी चे शिर तलवारी च्या टोकावर घेऊन परिसरात फिरलेत.
६. रयतेचं राज्य संपवून यशस्वी पणे पुन्हा ब्राम्हण राज स्थापन झाल्याचा तो इशारा होता.
हा ब्राम्हणांंचा विजय दिवस आहे म्हणून याबाबत बामणं जास्त आग्रही असतात. या विजय दिवसाचे प्रतिक म्हणून "गुढी" उभारली गेली.
१. घट किंवा तांब्या जो नेहमी सरळ ठेवणे शुभ मानले जाते तो मात्र पाडव्याला उलटा ठेवला जातो हे संभाजी राजांच्या शिरा चे प्रतिक आहे.
२.गुढी बांबू पासून बनलेली असते, धर्मशास्त्रात बांबू चा वापर प्रेतासाठी करतात .
३.कोरे कापड आणि लिंबाची पाने हे देखील प्रेतासाठी वापरतात.
मग या गोष्टी शुभ कशा ?
तर गुढी हे बामणांच्या विजयाचे प्रतिक आहे.
गुढीपाडवा फक्त महाराष्ट्रात साजरा केला जातो. महाराष्ट्राबाहेर कोठेही साजरा केला जात नाही. आपल्याला सांगितलं जातं रावणाच्या पाडावानंतर रामाने अयोध्या येथे प्रवेश केला तेव्हा लोकांनी गुढ्या ऊभारुन स्वागत केले पण उत्तर प्रदेशातील लोकांना गुढि बाबतीत काहिही माहीत नाही. याबाबतीत आपल्या यु.पी. मधील मित्राकडे खात्री करु शकता. अट एकच तो ब्राम्हण नसावा.
संभाजी महाराज आपले पुर्वज आहेत आणि पुर्वजांचा मृत्यू दिवस आनंदाने साजरा करावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल गुढ्या ऊभारा आणि बामणांनी आयोजित केलेल्या शोभा यात्रेत जरुर सहभागी व्हा.
🙏
प्रा. नितीन बानगुडे पाटील
सातारा.
*खरा इतिहास लोकांपर्यंत* *पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त पुढे पाठवा.*
*शिवाजी महाराज की जय....*
*संभाजी महाराज की जय....*
गुढी म्हणजेच ध्वज , अयोध्या असो की प्राचीन महाराष्ट्र भगवा ध्वज घरोघरी लावून पताका लावून आनंदोत्सव, नववर्षाचे स्वागत होते
ReplyDeleteम्हणून गुढी पाडवा हा आपला नववर्ष सण बहुजनांच्या दुःखाचा व्हावा असे प्रयत्न झाले , हेतपुरस्कर 40 वैर्याच्या रात्री अन दिवस बहुजनांच्या नायकाला छळले गेले , की यापुढे कुणी ब्र .... सुद्धा काढू नये, परंतु प्रत्येक थेंबातून 1 ज्वालामुखी विचार निर्माण झाला।आहे, घरादाराची समृद्धी कलशातून उलटी टांगू नका,
प्रचलित गुढी उभारणेच काय आधी तसे फोटो पाठवणेही बंद करा