करते रहे गुनाह हम, केवल बेटे के शौक में।
कितने मेडल मार दिए, जीते जी ही कोख में।
सिंधू अन् साक्षीच्या ऑलिम्पिक विजयाचं स्वागत बॉक्सर विजेंदरने या शब्दात केलं. विजेंदरने शेर रचला. वीरेंद्र सेहवागने जवळपास त्याच शब्दात साक्षीच्या कौतुकाचं ट्विट केलं. साक्षी हरयाणाची विजेंदर आणि वीरेंद्र दोघंही हरयाणाचे. म्हणून त्यांची प्रतिक्रिया स्वाभाविक मानावी का? पण कुणाला सुचले नाहीत अशा शब्दात दोघांनी मोठा मेसेज दिला. खुद्द अमिताभ बच्चन यांनीही त्याला दाद दिली. सचिन तेंडुलकरपासून मोदींपर्यंत सर्वांनीच या मुलींचं कौतुक केलं. पण विजेंदर आणि वीरेंद्र यांनी आनंद साजरा करणार्या सगळ्या भारतीयांच्या डोळ्यात अंजन घातलं.
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारत पत्त्यासारखा कोसळत असताना साक्षी अन् सिंधूने लाज राखली. दीपा कर्माकर आणि महाराष्ट्राच्या ललिता बाबरने पराभवातही कमाल केली. फायनलमध्ये हरतानाही विजेसारख्या त्या चमकल्या. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या भारतीय क्रीडा क्षेत्रात कमाल केली ती या मुलींनी. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी त्यांची कामगिरी. सेल्फी सरकारच्या क्रीडामंत्र्यांनी सेल्फीच्या खेळात घालवलेली लाज सावरण्याचा प्रयत्न भारत सरकारने अखेर सिंधू, साक्षी अन् दीपाला 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्कार देऊन केला.
पुरुषांचं वर्चस्व फक्त क्रीडा क्षेत्रातच आहे काय? क्रिकेटमध्ये गावसकरपासून विराट कोहलीपर्यंत चमकलेल्या तार्यांचीच कशाला, छोट्या-मोठय़ा ग्रहांची नावंही आपल्याला पाठ असतात. क्रिकेटमधल्या चार मुलींची नावं सांगता येतील? पुरुष जिंकणारा असेल किंवा खेळणारा त्याचा प्रत्येक डाव आपल्याला माहीत असतो. पी.टी. उषाची कथा आपण विसरून जातो. ४२ किमी मॅरेथॉनमध्ये साधं पाणीही न मिळालेली जैशा शर्यत पार करताना डिहायड्रेड होऊन कोसळून पडते. आम्ही दखलही घेत नाही. मुलगी जन्मालाच येऊ न देणार्या समाजात तिचं कौतुक कसं होणार? हरयाणात हजारातल्या १३१ मुली जन्माला येण्यापूर्वीच मारल्या जातात. साक्षीचं कौतुक करताना आईच्या पोटातच मारल्या गेलेल्या त्या मुलींची आठवण वीरेंद्र आणि विजेंदर यांना आली. साक्षीच्या बापासारखं हृदय त्या दोन जवानांमध्ये आहे.
साक्षीच्या बापाने साक्षीला थेट मुलांबरोबर भिडवलं होतं, कुस्ती खेळायला. ज्या हरयाणात लग्नासाठी मुली शोधाव्या लागतात. त्या हरयाणात जिथे जन्मण्याचासुद्धा अधिकार नसतो. विजयाचा आनंद साजरा करण्यामध्ये पौरुष्य काय लागतं? ऑलिम्पिकमध्ये गेलेली लाज राखली म्हणून नाइलाजाने साजरा झालेला तो आनंद आहे. वीरेंद्र आणि विजेंदरच्या प्रतिक्रियांना म्हणून महत्त्व आहे. पुरुष वर्चस्वाच्या मानसिकतेला साक्षी, सिंधूने चितपट केलं, याचा निखळ आनंद फक्त या दोघांनी व्यक्त केला.
साक्षीच्या बापाचं हे काळीज आणखी एका माणसाकडे आहे. पुलेला गोपीचंद त्याचं नाव. आधी त्याने सायनासाठी कष्ट घेतले. तिला मेडल मिळालं. गोपीचंद तिथेच थांबला नाही. सिंधूसाठी त्याने तितकेच कष्ट घेतले. सिंधूच्या जिभेवर चॉकलेट जाणार नाही आणि हातात मोबाईल दिसणार नाही याची काळजी त्याने जितकी घेतली तितकेच निर्बंध त्याने स्वत:च्या खाण्यावरही टाकले. इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर झालेल्या दुखापतीने त्याला निवृत्त व्हावं लागलं. पण नवे खेळाडू घडवण्यासाठी त्याने सर्वस्व पणाला लावलं. सरकारकडून जमीन मिळाली पण अकॅडमी उभी करायला पैसे नव्हते. पठ्ठय़ाने आपलं घरच गहाण ठेवलं. कोकची जाहिरात करून मिळालेले पैसेसुद्धा कुणा महान भारतीय खेळाडूने अकॅडमीसाठी लावले आहेत काय? गोपीचंदने कोक खेळासाठी आणि मुलांसाठी चांगलं नाही म्हणून आलेली जाहिरात झिडकारली. आपण त्याला वेडं म्हणू. त्याच्या या वेडेपणाने भारताची लाज राखणारी दोन पदकं मिळवून दिली आहेत. नरसिंग यादव डोपिंगमध्ये चितपट झाला. सिंधूला देवाचा तीर्थप्रसादही खाऊ न देण्याची हिंमत गोपीचंद दाखवू शकला म्हणून सिंधू सिल्व्हर जिंकू शकली. गांधींचा साध्य-साधनाचा विवेक खेळातही कामाला येतो, याचं दर्शन गोपीचंदने घडवलं. हा देश सचिन, विराटचा जितका आहे तितकाच साक्षी, सिंधूचा आहे. स्त्री सन्मानाची ही गाथा घडवण्यात गोपीचंदचाही एक हात आहे. साक्षीच्या बापाइतकीच गोपीचंदही कमाल आहे.
कॅरोलिना मरीनकडे जो अनुभव होता, जी साधनं होती, ज्या सुविधा होत्या त्या ना गोपीचंदकडे, ना सिंधूकडे, ना साक्षीकडे खेळानंतर काय याच्या चिंतेत आमचे अर्धे खेळाडू जळून जातात. त्याचं सोयर सूतक ना समाजाला असतं ना सरकारला. कला-क्रीडा शिक्षक ५० रुपये रोजावर नेमा म्हणून जीआर काढणार्या राज्यांमध्ये खेळाडू स्त्री असो वा पुरुष त्यांच्यासाठी सुविधांचं मैदान असणार कुठे? तिथे साक्षी अन् सिंधू जन्माला येण्याची अपेक्षा कशी करणार? कवी प्रसून जोशींनी या पुरुषी अहंकाराला शर्म करो म्हणून सुनावलं आहे..
'शर्म आनी चाहिए, शायद हम सबको...
क्योंकि जब मुठ्ठी में सूरज लिए नन्ही सी बिटिया सामने खडी थी, तब हम उसकी उंगलियों से छलकती रोशनी नहीं, उसका लडकी होना देख रहे थे...

पर सूरज को तो धूप खिलाना था, बेटी को तो सवेरा लाना था...'
तुमचा आमचा सूर्य तर तिच्याच पोटातून जन्माला येतो, जिला पोटातसुद्धा
वाढू देण्याची आमची तयारी नसते. साक्षीच्या बापाला म्हणून सलाम..!
कपिल पाटील
कपिल पाटील
(लेखक
महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष
आहेत.)
पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्यनगरी २४ ऑगस्ट २०१६
.
ReplyDeleteअप्रतिम लेख आहे कपिल सर...
.
शर्म आनी चाहिए, शायद हम सबको...
क्योंकि जब मुठ्ठी में सूरज लिए नन्ही सी बिटिया सामने खडी थी, तब हम उसकी उंगलियों से छलकती रोशनी नहीं, उसका लडकी होना देख रहे थे...
पर सूरज को तो धूप खिलाना था, बेटी को तो सवेरा लाना था...'
छान
ReplyDeleteसाक्षी आणि सिंधू या दोन्ही विजेतेपद घेतलेल्या मुलींना नुतन माध्यमिक विद्यालय चुंचाळे ता.चोपडा जिल्हा जळगाव येथील विद्यार्थ्यांकडून सलाम✌✌✌🌺🌺🌺

ReplyDeleteखूपच छान , लेखन आवडले
ReplyDelete