असभ्य, अर्वाच्य आणि असंस्कृत शिवराळ भाषेची परंपरा महाराष्ट्राला नवी नाही.
तो मक्ता दुसऱ्यांचा होता शिवसेना - मनसे नेत्यांची ही शैली अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे...
मात्र सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचीयशवंतराव चव्हाण ते शरद पवार अशी परंपरा
असलेल्या अजित पवारांकडून ती अपेक्षा नव्हती.
लब्ज एक ऐसी चीज है ,
जो इन्सान को
या तो दिल में उतारती है
या दिल से उतारती है।
इंदापूरच्या निंबोडी गावात, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या त्या वक्तव्याने
असेच काहीसे घडले. त्यांचे ते शब्द असभ्य आणि असंस्कृत होते, यात दुमत नाही. पण ज्या
परिस्थितीत आणि जे उदाहरण देत त्यांनीते उद्गार काढले, त्यातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना
डागण्या तर दिल्याच, पण साऱ्या महाराष्ट्राला शरम वाटावी असंही काही घडलं.
असभ्य, अर्वाच्य आणि असंस्कृत शिवराळ भाषेची परंपरा महाराष्ट्राला नवी नाही. तो मक्ता
दुसऱ्यांचा होता. शिवसेना - मनसे नेत्यांची ही शैली अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. त्याला
प्रतिष्ठा आहे असं नाही. मात्र सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाची यशवंतराव चव्हाण ते
शरद पवार अशी परंपरा असलेल्या अजित पवारांकडून ती अपेक्षा नव्हती. निंबोडीच्या त्यांच्या
त्या भाषणातच त्यांनी दोन गोष्टी कबूल केल्या आहेत. एक- धरणात पाणीउरलेलं नाही.
दोन लोकांना देण्यासाठी वीज उपलब्ध नाही. राज्यातला दुष्काळ एवढा तीव्र आहे असं स्वतःच
कबूल करत अंधारात काय XXXX होतं आणि प्यायला काय XX देणार अशी भाषा ते करतात;
तेव्हा प्रश्न निर्माण होणारच. राज्यकर्तेच अशी भाषा वापरतात, तेव्हा असंतोषाचा स्फोट
स्वाभाविक होतो.
ज्या ' राजा विरोधा'तल्या असंतोषातून फ्रेंच राज्यक्रांती जन्माला आली त्या सोळाव्या लुईसच्या
पत्नीचे उद्गार तुलनेने खूपच सभ्य म्हणायचे! दुष्काळाने होरपळेल्या शेतकऱ्यांना पोटाची खळगी
भरण्यासाठी पावही मिळत नव्हता. तो मिळवण्यासाठी दंगली सुरू झाल्या, तर राणी मारी-
आन्त्वाने (Marie-Antoinette) म्हणाली, 'पावमिळत नसतील, तर त्यांना केक खायला
सांगा'. फ्रान्सची राणी असं वाक्य खरोखरंच वदली की नाही, याबद्दल वाद आहे. पण
जगभरच्या इतिहासात मात्र त्याची नोंद झाली. इतिहासात आपली अशी नोंद होणं अजित
पवारांना खचितच आवडणार नाही. त्यांना उपरती झाली. त्यांनी तीनदा जाहीर माफी
मागितली. कराडच्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीला साक्ष ठेवून
प्रायश्चित्तही घेतलं.
अजित पवारांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियाही तशाच
आहेत. तितक्याच असमर्थनीय. असभ्य. अर्वाच्य. असंस्कृत. आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेची भीडभाड
न बाळगणाऱ्या. अजितपवारांच्या प्रतिमेवर शिवसैनिकांनी शिवांबू ओतलं; तर दादरला मनसे
सैनिकांनी लहान मुलाला पवारांच्या फोटोवर सू सू करायला लावली. पोरगं तयार नव्हतं, तर
त्याला टपल्या मारून करायला भाग पाडलं. नंतर नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण नेत्यांची
भाषा सैनिकांनी रस्त्यावर अमलात आणली, तर दोष त्या सामान्य अजाण सैनिकांना कसा देता
येईल? कालवरीच्या टेकडीवर त्या बाईने पाप केलं म्हणून साऱ्यांनीच हातात दगड उचलले,
तेव्हा येशू ख्रिस्त म्हणाले, 'ज्यांच्या मनातही कधी पाप आलं नाही, त्यांनी जरूर दगड मारावा.'
इथे कुणी कुणावर दगड मारावा? बेशर्मी नावाचं एक रोपटं असतं. ते कुठेही उगवतं.
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दोन्ही बांधांवरही ते तरारुन उगवलंय.
इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्या टीआरपीसाठी हल्ली अशी भाषणं रोज लाइव्ह दाखवत असतो.
मात्र सगळयांनाच हे भाग्य मिळत नाही. पण माध्यमांकडून अशा वक्तव्यांची दखल मात्र
पक्षपातीपणे घेतली जात असल्याचा आक्षेप सत्ताधाऱ्यांकडून घेतला गेला आहे. त्यात भाग्य -
दुर्भाग्याचा भाग नाही. अजित पवारांविरोधात उफाळेल्या रोषाला भांडारकर संस्था आणि
दादोजी कोंडदेव यांच्यावरच्या हल्ल्याचाही संदर्भ आहे. त्याची दखल पवारांनी किती घेतली
माहीत नाही; पण महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय भूगर्भात पेटलेला जाती संघर्षाचा लाव्हा
यानिमित्ताने वर आला नसता, तरच नवल.
जात, धर्म आणि भाषा यांच्या द्वेषाची चूड लावत महाराष्ट्रात अनेकदा राजकारण झालं आहे.
राज्यातल्या खऱ्या प्रश्नांवरच्या लढाया चिरडून टाकायच्या आणि द्वेषाची आग भडकवायची,
हे दोन्ही बाजूने झालं आहे. दोघांनाही तेसोयीचं असतं. गिरणी कामगारांचा असंतोष दडपून
टाकण्यासाठी बाबरी मशिदीचं निमित्त करत, हिंदू - मुस्लिम दंगल घडवण्यात आली. सेना -
भाजप युतीला १९९५मध्ये याच खेळातून सत्ता मिळाली. अर्थात ती फार काळ टिकली नाही.
पण तो खेळ काय फक्त त्यांनीच केला होता? त्या सत्तांतरापूर्वीच्या पाच वर्षांत काँग्रेस अंतर्गत
राजकारणात तोच खेळ सुरू होता. तो चेंडू अलगद पकडत युती सत्तेवर आली, इतकंच. सामान्य
जनता त्यात होरपळून निघाली. राजकारणाच्या कैफात जनतेचं होरपळणं कुणाच्या लेखी आहे?
गेल्या पाच - सात वर्षांच्या राजकारणात राष्ट्रवादीने तोच खेळ पुन्हा सुरू केला आहे . मागच्या
खेळात आपली सत्ता गेली होती, याचं भान त्यांना आलेलं नाही. याच कैफात युतीलाही साडेचार
वर्षांत गाशा गुंडाळावा लागला होता. महाराष्ट्रातील सलग१३ - १४ वर्षांच्या सत्तेचा मद इतका
आहे, बेफिकिरी इतकी आहे की आपल्याच गंजीला आपणच आग लावतो आहोत, याचं भानही
विद्यमान राज्यकर्त्यांना नाही.
सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी, गर्दी आणि लोकप्रियता यांचा एक माज असतो. तो निरंकुश बनतो.
मग ज्या सामान्य माणसांच्या मतांवर लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला ही सत्ता
मिळाली आहे, त्या लोकशाहीची आणि लोकांची पर्वा राहत नाही. पुरोगामी म्हणवला जाणारा
महाराष्ट्र अजून सरंजामशाहीतून बाहेर आलेला नाही. सत्ताधारीच नाही, तर विरोधी
पक्षातल्या नेत्यांचं वागणंही सरंजामदारांपेक्षा कमी नाही. कुठे धरणांशिवाय भ्रष्टाचाराचे पाट
वाहतात. कुठे खंडण्या, सेटलमेंट आणि भ्रष्टाचाराचे टोलनाके सुरू होतात. परस्परांवर
अधुनमधून चिखलफेक करणं हा परस्परांच्या सोयीच्या राजकारणाचा भाग बनलाय .
पण कधीतरी नेम चुकतो आणि थेट सामान्य माणसाच्या अंगावर चिखल उडतो. मोहोळ
तालुक्यात पाणी यावं म्हणून प्रभाकर देशमुख आझाद मैदानात, दोन महिने धरणं धरून बसले
होते. उजनी धरणातलं पाणी दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न देता
बारामतीतील डायनॉमिक्स दूध डेअरीला बेकायदेशीररीत्या दिलं जात आहे, असा त्यांचा आक्षेप
होता. पाटकुळच्या एका सामान्य शेतकऱ्याचं ६० दिवसांचं धरणं अजित पवारांना खुपलं.
खरं तर धरणं नाही, तर त्या शेतकऱ्याने उपस्थित केलेला प्रश्न त्यांना खुपला होता. प्रभाकर
देशमुखांचा उद्धार करत अजित पवार बरसले. एका छोट्या गावात, विशेष महत्त्वाच्या
नसलेल्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची दखल कोण घेणार, असं त्यांना वाटलं असेल.
पण सामान्य माणसाला डिवचलं की काय होतं, त्याची तिथून पुढे घडलेली हकिगत
आता सर्वांच्या समोर आहे. साध्याच माणसांचा एल्गार सत्ताधाऱ्यांच्या सिंहासनाखाली
सुरुंग पेरत असतो !
- कपिल पाटील, अध्यक्ष, लोक भारती.
पूर्व प्रसिद्धी महाराष्ट्र टाइम्स (Apr 16, 2013)

संतुलित लेखन आहे. राजकीय घराणेशाही व सामान्य जनतेची होणारी परवड यांचा अगदी मोजक्या शब्दांत आढावा घेतला आहे.
ReplyDelete