मुंबई, दि. १७ ऑक्टोबर २०१७ :
शिक्षण आणि शिक्षकांना अंधारात लोटणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी शिक्षक आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' बंगल्यावर काळा आकाश कंदील लावायला जात असताना अटक करण्यात आली.
त्याआधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या 'सेवासदन' बंगल्यावर कपिल पाटील यांनी काळा आकाश कंदील लावला.
शिक्षक ऑनलाईनवर आणि शिक्षण सलाईनवर
रात्रशाळा शिक्षकांना काढून रात्रीचं शिक्षण अंधारात लोटलं आहे. मुंबईतल्या शिक्षकांचे पगार दादागिरीने बुडणाऱ्या मुंबईत बँकेत ढकलले आहेत. पेन्शन नाही, भरती बंद आहे, विनाअनुदानित शिक्षकांचे हाल सुरु आहेत, चौकशांचा आणि बदल्यांचा ससेमिरा लावण्यात आला आहे, वेतनेतर अनुदान नाही, ऐन दिवाळीत राज्यातले हजारो शिक्षक पगाराविना आहेत. हे कमी की काय म्हणून स्टुडन्ट अपडेटच्या नावाखाली ऑनलाईन माहिती भरण्यासाठी शिक्षकांना जुंपण्यात आलं आहे. राज्यातलं शिक्षण जवळपास बंद पडलं आहे. शिक्षक ऑनलाईनवर आणि शिक्षण सलाईनवर अशी राज्याची स्थिती आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी कपिल पाटील यांनी व्यक्त केली.
----------------------
रात्रशाळा आणि मुंबईतील शिक्षकांच्या पगाराच्या प्रश्नाबाबत आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना लिहलेले पत्र.
दिनांक : १७ ऑक्टोबर
२०१७
प्रति,
मा. ना. श्री.
देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मा. ना. श्री.
विनोद तावडे
शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र
म्हणून काळा आकाश
कंदील घेऊन आलो
आहे तुमच्या दारी
महोदय,
या दिवाळीच्या आधी रात्रशाळेतील
शिक्षकांना परत घ्याल
या अपेक्षेत मी
होतो. मुंबईतल्या शिक्षकांचे
पगार भ्रष्ट मुंबई
बँकेत न ढकलता
पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेतून नियमित कराल
ही साधी अपेक्षा
होती.
पण दिवाळीचा पहिला दिवस
उजाडला तरी या
शिक्षकांच्या घरात तुम्ही
दिवा लावायला तयार
नाही. शिक्षकांची घरं
अंधारात लोटून तुम्हाला दिवाळी
साजरी करता येणार
नाही. तुम्ही शब्द
पाळला नाही म्हणून
निषेध करण्यासाठी काळा
आकाश कंदील घेऊन
आलो आहे तुमच्या
दारी.
बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून
त्याला पाताळात ढकलणाऱ्या वामनावतराच्या
बाजूने आपण आहात
की बळीराज्याचा उत्सव
साजरा करणाऱ्या सामान्य
जनांच्या बाजूने आहात?
रात्रशाळांसाठी गेली दीड
वर्षे आपणाशी लढतो
आहोत. पण आपणाकडून
फसवणूकच झाली. केवळ रात्रशाळेत
काम करणाऱ्या शिक्षकांना
पुढे करुन, दुबार
नोकरी करणाऱ्यांना तुम्ही
घरी पाठवलं. आता
आपल्याला फूल पगार
होणार या आनंदात
ते होते. भाजप
प्रणित शिक्षक परिषदेच्या माध्यामातून
त्यांनी शिक्षणमंत्र्यांचं हार घालून
अभिनंदन केलं. आता त्यांना
कळतंय, की आपली
घोर फसवणूक झाली
आहे. सहा महिने
झाले त्यांना अर्धा
पगारही नाही. दुबार नोकरी
करणारे शिक्षक गेले सहा
महिने पगारविना आहेत.
अनेकांची मुलं मेडिकलला
किंवा इंजिनिअरींगला आहेत.
त्यांची फी थकली
आहे. काहींनी यंदा
मुलींची लग्न काढली
होती. ते कमालीच्या
तणावात आहेत. मुंबईत घर
घेतलं होतं, त्याचे
हफ्ते गेले सहा
महिने चुकताहेत. जेव्हा
नाईटला नाममात्र मानधन होतं.
तेव्हा रात्रशाळा आणि रात्र
ज्युनिअर कॉलेजात हे शिक्षक
निष्ठेने शिकवत होते. मानधन
बरं झालं तर
तेही तुम्ही काढून
घेतलं. स्वप्नं आणि आयुष्यं
उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला
कुणी दिला?
मुंबई बँकेच्या भ्रष्टाचाराचे पाढे
तर खुद्द मा.
शिक्षणमंत्र्यांनी वाचले होते. आता
ती बँक वाचवण्यासाठी
शिक्षकांचे बळी का
देता? मुंबई जिल्हा
बँक वर्षभर पगार
अगदी वेळेवर करील.
त्यांना करावेच लागतील. पण
राज्यातल्या सहा जिल्हा
बँका बुडाल्या तशी
ही मुंबई जिल्हा
बँक बुडाली तर
मुंबईतल्या शिक्षकांच्या ठेवी आणि
पगार वाचवण्याचं हमीपत्र
तुम्ही देणार आहात का?
तुमचे स्वतःची आणि
सरकारी कर्मचाऱ्यांची अकाऊंटस् राष्ट्रीयकृत बँकेत.
नागपूरातील शिक्षकांची अकाऊंटस् युनियन
बँकेत. मग मुंबईच्या
शिक्षकांचा छळ कशासाठी?
या दिवाळीत तरी ईडा
पीडा टळो आणि
शिक्षकांच्या घरातील दिवाळीचे दिवे
उजळो.
धन्यवाद.
आपला स्नेहांकित,
सरकारला आपले म्हणणे ऐकावेच लागेल .कारण ते सत्य आहे.आम्ही सर्व शिक्षक आपल्या बरोबर आहोत.
ReplyDeleteमुजोर शासन जावो,अन जनसामान्यांचे राज्य येवो....
ReplyDeleteशिक्षकांच्या घरात अंधार करुन स्वतः दिवाळी साजरी करणाऱ्या मा. मंत्री महोदयांना दिवळीच्या शुभेछ्या
ReplyDeleteतळतळाट
ReplyDeleteतळतळाट
ReplyDeleteYou are fighting for teachers'rights continuously.I salute you for your great efforts.Thanks, sir.
ReplyDeleteA true soul,an honest man!a guiding light for teachers' rights.commendable work being done by u sir.thank u.
ReplyDeleteA true soul,an honest man!a guiding light for teachers' rights.commendable work being done by u sir.thank u.
ReplyDeleteजिल्हा परिषद शिक्षकांचा बादल्या थांबल्या पाहिजे ....
ReplyDeleteहे फक्त आमदार कपिल पाटील थांबवू शकतात.....
पारदर्शी पणाचा आव आणणाऱ्या आणि भ्रष्टचारी मुंबई बँक व बँकेच्या भ्रष्ट संचालकांना पाठीशी घालणाऱ्या मा.मुख्यमंत्री व शिक्षकमंत्री व शिक्षकांचा तळतळाट घेणाऱ्या सरकारला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteपारदर्शी पणाचा आव आणणाऱ्या आणि भ्रष्टचारी मुंबई बँक व बँकेच्या भ्रष्ट संचालकांना पाठीशी घालणाऱ्या मा.मुख्यमंत्री व शिक्षकमंत्री व शिक्षकांचा तळतळाट घेणाऱ्या सरकारला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteआम्ही आपणा समवेत आहोत.
ReplyDeleteDon. Thikani. Ardha. Vel. Kam. Karanyarya. Shikshakala. Eak. Nokari. Karata. Yenar. Nahi. Mag. Ya.shkshakani. nuksan. Sahan. Karun. Atmahatya. Karayachi. Kay. Ha. Aghori. Nirnay
ReplyDeleteआम्ही सर्व शिक्षण आपल्या सोबत आहोत कपिल पाटील सर
ReplyDeleteAap ne jo aawaz buland ki hai oh sab ke dil ki aawaz hai.
ReplyDeleteकपिल पाटील साहेब जे बोलतात तेच करतात. सर आप आगे बढो सभी आपके साथ है ।।
ReplyDeleteNice Sir we all with you keep it up . This fight is not only for teacher but it's also for our Nation's great future .
ReplyDeleteExcellent sir
ReplyDeleteSir,Iam proud of you
ReplyDeleteधोकादायक आणि फसवे सरकार!
ReplyDeleteधोकादायक आणि फसवे व शिक्षण विरोधी शासन!!!
ReplyDeleteDear Kapil Patil we are wholeheartedly with you in your fight against injustice.
ReplyDeleteBut will you support us to fight against teachers who are engaged in taking illegal tuition classes and discriminating other bright students who do not attend their tuition classes.
Dear Kapil Patil we are wholeheartedly with you in your fight against injustice.
ReplyDeleteBut will you support us to fight against teachers who are engaged in taking illegal tuition classes and discriminating other bright students who do not attend their tuition classes.
Waiting to get our salary back in Union Bank. Thanks for your efforts Mr. Kapil Patil.
ReplyDelete