Saturday, 23 June 2018

पैशाची पाकिटं येऊ लागली, पण मुंबईकर शिक्षक विकला जाणार नाही, तो स्वाभिमानी आहे!


प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो,
सोमवार दि. २५ जून रोजी मुंबई शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे. आजपर्यंत प्रस्थापित राजकीय पक्षांनी शिक्षकांना फारसं महत्व दिलं नव्हतं. पण आता अचानक त्यांचं शिक्षकांबद्दल प्रेम जागं झालं आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळा संचालकांवर दबाब टाकायला सुरवात झाली आहे. कडी त्याहून आणखी आहे. घराघरात जाऊन भगवी पाकिटं दिली जात आहेत. ५ हजार तर कुठे १० हजार मताचा भाव केला जात आहे. 

पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, शिक्षकांना विकत घेता येतं, असा समज या नेत्यांनी करून घेतलेला  दिसतो. मुंबईचा शिक्षक स्वाभिमानी आहे. त्याला एकच भूक आहे, ती आत्मसन्मानाची. म्हणून तो कपिल पाटील सोबत राहून बलाढ्य सरकारशी लढतो आहे. 

किती छळलं गेलं. परेशान केलं गेलं. बेसलेस बेसलाईन आणि सदैव ऑफ राहणारी ऑनलाईन यांच्या कामाचं ओझं लादलं गेलं. हक्काची पेन्शन हिरावून घेण्यात आली. भर्ती बंद केली गेली. शिक्षकांना सरप्लस केलं गेलं. कला-क्रीडा शिक्षकांना संपवलं गेलं. अनुदान नाकारलं गेलं. २० टक्क्यांवर बोळवण करण्यात आली. हे झालं सरकारकडून. 

तावडे साहेबांनी तर छळ मांडलाच आहे. पण ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आहे त्यांनी तरी काय केलं? बीएमसीच्या शाळा ओस पाडल्या. खाजगी संस्थांच्या शाळा चांगल्या चालल्या आहेत. पण अशा ७० प्राथमिक शाळांना महापालिकेचे सत्ताधारी अनुदान द्यायला तयार नाहीत. मतांसाठी पाकिटं वाटायला त्यांच्याकडे पैसे आहेत. पण पगार द्यायला पैसे नाहीत. शाळांची मैदानंही यांनीच पळवून नेली. बड्या क्लबना बीएमसी मैदान देतं पण शाळांना देत नाही. 

आता त्यांना पैशानी मतं खरेदी करायची आहेत. संस्थाचालकांबद्दल त्यांना आता अचानक प्रेम आलं आहे. सरकारमध्ये तर तुम्हीही सामिल आहात ना. विद्यापीठाचं खाजगीकरण आणि व्यापारीकरण होत असताना तुम्ही मूग गिळून का होतात? शाळांच्या कंपनीकरणाचं बिल सेना आणि भाजपच्या कॅबिनेटने मंजूर केलं. विधानसभेतही ते मंजूर केलं. मात्र विधानपरिषदेत गेले दोन अधिवेशनं शाळांच्या कंपनीचं बिल मंजूर झालेलं नाही. केवळ कपिल पाटील ठामपणे उभा राहिला आहे म्हणून. दोन्ही सत्ताधाऱ्यांना फक्त कपिल पाटीलची भीती म्हणून वाटते. 

शिक्षणाचा सत्यानाश रोखण्याचं काम हा एकटा करतो, म्हणून दोघांनाही कपिल पाटील नको आहे. पण मुंबईकर सर्वसामान्य शिक्षक कपिल पाटलाच्या मागे ठामपणे उभा आहे. आता फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. घरोघरी पैशाची पाकीट देण्यासाठी दोघांमध्ये चुरस लागली आहे. 

शिक्षकांचा असा अवमान यापूर्वी कधी झाला नव्हता. पण मुंबईतला शिक्षक कधीही विकला जाणार नाही. मुंबईकर शिक्षक हा स्वाभिमानी आहे. आपली अस्मिता, आपला आत्मसन्मान तो कधीच विकणार नाही. ज्यांनी कधी ढुंकूनही आपल्या प्रश्नांकडे बघितलं नाही त्यांना तो तारणहार कधीच मानत नाही. मुंबईकर शिक्षकांची एकजूट अभेद्य आहे. आपली लढाई तो कधीही कमजोर होऊ देणार नाही. 

पाकिटं वाटणाऱ्यांच्या नेत्यांना मी विचारू इच्छितो, हे पाकिटबाज राजकारण तुम्हाला मान्य आहे काय? छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि असा अभद्र व्यवहार करणाऱ्यांना संरक्षण द्यायचं हे काही बरोबर नाही. लढाई लोकशाही मार्गाने करा. पण शिक्षकांचा कृपा करून अवमान करू नका. तुमच्या हातात महापालिकेची सत्ता आहे. पण शाळा शिक्षकांना अनुदान नाही. पगार नाही. पदवीधर मतदार संघ आणि शिक्षक मतदार संघ यांना बटीक करू नका. 

शिक्षक मित्रहो, मी तुम्हाला एकच अश्वासन देतो, एकच विश्वास देतो. २५ जून रोजी तुम्ही तर भरघोस मतदान करणार आहात. पदवीधर मतदार संघातून आपला जालिंदर सरोदेही निवडून येईल. आणि २८ जून रोजी जेव्हा निकाल येईल त्यावेळेला आपल्याला सरप्लस करणारे तावडे साहेब हेही सरप्लस झालेले असतील, याची खात्री बाळगा. 

Mumbai teachers : How to cast your vote
Tap to Watch - https://youtu.be/WAZPt4Ux0bI


आपला, 
कपिल हरीश्चंद्र पाटील   1

30 comments:

  1. काहीही झाले तरी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत ,तुमच्या सोबतच राहू. विजय आपलाच आहे👍👍

    ReplyDelete
  2. sir aamche navch vhoter least madhe aale nahi iwant to vote you but how

    ReplyDelete
    Replies
    1. आपल नाव जर बढे प्रदीप वसंत असेल तर हे नाव आहे whatsap me on 8446507471




      Delete
    2. Sir, I satyadeo yadav support you.

      Delete
    3. Sir, I satyadeo yadav support you.

      Delete
  3. अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटना आपल्या सोबत सोबत आहे

    ReplyDelete
  4. We are always with you Sir.Definitely Sir you can make changes in education system.

    ReplyDelete
  5. A M Dubey
    Sir , Kindly focused in unaided school. Samajwada or your party visionary our people salute it . we will always stand with you. You will definitely will .

    ReplyDelete
  6. काही काळजी नसावी सर मागच्या पेक्षा अधिक मताधिक्याने आपण निवडून येणार आहात. कारण शिक्षण क्षेत्रात 90% शिक्षक प्रामाणिक आहेत.आणि हे शिक्षक आपल्या सोबत आहेत. पैसे वाटणारे साम,दाम दंड भेद या नितीचा वापर करणाऱ्याचेच जवळचे भाऊ आहेत.ते हेच करणार. Union Bank मध्ये निव्वळ आपल्यामुळे पगार टिकून राहिले हे सर्वच शिक्षकांना माहिती आहे. नाहीतर काहीजन शिक्षकांना दरे(खड्डा)कर(रु)न घालण्यासाठी बसले होते त्यांचा समाचार आम्ही वेळोवेळी घेतला होता. 28 तारिख कशाला आजच सांगतो निवडून शिक्षकभा येणार...

    ReplyDelete
  7. Don't worry sir, u will win again

    ReplyDelete
  8. असे पाकिटे वाटणारे यांचा प्रथम निषेध.पण शिक्षक प्रामाणिक आहेत..जाणकार आहेत..ते यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत..ते यांना 25 लाच दाखवुन देणार की शिक्षक पैशाने विकला जात नाही..विजय आपलाच आहे साहेब..चिंता नसावी.जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  9. Victory is ours do'nt worry sir .

    ReplyDelete
  10. सत्याचाच नेहमी विजय होतो सर ... जय शिक्षक भारती.

    ReplyDelete
  11. Replies
    1. जेथे आपल्या सारखे प्रामाणिक नेतृत्व आहे तेथे काहीच कमी नाही
      विजय निश्चित आहे

      Delete
  12. Sir I want to cast vote but dont know where to go .

    ReplyDelete
  13. Sir I want to cast vote but dont know where to go .

    ReplyDelete
  14. कपिल पाटिल साहेब आपल्या पाठीशी मुंबईतीलच शिक्षक नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा शिक्षकवर्ग उभा आहे.आपला विजयरथ कोणीही रोखू शकणारनाही.

    ReplyDelete
  15. Aapko jitane se koi nahi rok sakata sir aapki jeet sunischit hai.

    ReplyDelete
  16. Sir all support to u.
    U are really a great person.

    ReplyDelete
  17. विजय आपलाच आहे सर

    ReplyDelete
  18. What ID do we need to cast the vote

    ReplyDelete
  19. Sir plz 20% anudanachya shala 100% anudanavar ana.Shikshak karjbajari ahet tyanche haptesuddha jat nahit plz plz

    ReplyDelete