Wednesday 19 July 2017

पहिल्या दहशतवाद्याला रोखणारा हात हरपला



३० जानेवारी १९४८ ला नथुरामने दिल्लीत महात्म्यावर गोळ्या चालवल्या. त्यादिवशी तिथे भिलारे गुरुजी नव्हते. अन्यथा गांधीजींचे प्राण वाचले असते. त्याआधी जुलै १९४४ मध्ये महात्माजींवरती भर गर्दीत हातात जांबिया घेऊन एका माथेफिरुने हल्ला केला होता. तो माथेफिरु दुसरा, तिसरा कुणी नव्हता, नथुराम गोडसेच होता. पण एका जेमतेम पंचवीशीतल्या तरुणाने नथुरामचा हात पकडला आणि त्याला चांगलं बदडून काढलं. गांधीजींनीच त्याला माफ कर म्हणून सांगितलं. म्हणून नथुराम त्या दिवशी सुटला. भारतातल्या त्या पहिल्या दहशतवाद्याला रोखणारा तो हात आज हरपला आहे. 

भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजी यांच्या जाण्याने फॅसिझम आणि आतंकवाद यांच्या विरोधात लढणारा महाराष्ट्रातला पहिला स्वातंत्र्यसेनानी काळाच्या पडद्याआड गेला आहे. ९८ वर्षांचं समृद्ध जीवन आणि जिवंतपणी दंतकथा बनलेले भिलारे गुरुजी त्यांच्या वृद्धापकाळाने गेले आहेत. पण नथुरामी शक्ती पुन्हा वाढत असताना गुरुजींचं जाणं चटका लावणारं आहे. नथुरामाला रोखणारे त्यांचे हात फॅसिझम आणि आतंकवादाच्या विरोधात लढणाऱ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील. 

भि. दा. भिलारे ऊर्फ भिलारे गुरुजींना विनम्र श्रद्धांजली!

- आमदार कपिल पाटील
प्रदेश अध्यक्ष, जनता दल युनायटेड, महाराष्ट्र प्रदेश

5 comments:

  1. नथुरामाचे वारसदार आजही आहेत.सत्तेवर राहून नथूरामाच उरलेल काम करत.जनतेला त्यांनी गृहीत धरु नये.

    ReplyDelete
  2. भावपुर्ण आदरांजली !!!

    ReplyDelete
  3. भावपुर्ण आदरांजली !!!

    ReplyDelete
  4. भावपुर्ण आदरांजली !!!

    ReplyDelete
  5. भावपुर्ण आदरांजली !!!

    ReplyDelete