आमदार कपिल पाटील यांच्या दि. ५ जुलै २०१७ च्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -
मुंबई बँकेला विरोध का?
राज्याच्या तत्कालीन विरोधी पक्ष नेते व राज्याचे सध्याचे शिक्षणमंत्री विनोदजी तावडे यांनी स्वतः पत्र लिहून मुंबई बँकेची चौकशी करुन संचालकांना तुरुंगात टाकण्याची मागणी केली होती. ४१२ कोटींचा घोटाळा सिद्ध झाल्याने कारवाई करण्याचा आग्रह धरला होता. त्याच मुंबई बँकेच्या ताब्यात शिक्षकांचे पगार देण्याचे कारण काय? ज्या बँकेवर शिक्षणमंत्र्यांचा विश्वास नव्हता आता कोणत्या चौकशी आयोगाने मुंबई बँकेला क्लीन चीट दिली की शिक्षकांचे १२०० कोटी रुपये मुंबई बँकेच्या ताब्यात दिले.
१.
मुंबईतील शिक्षकांनी मुंबई बँकेत खाते उघडण्यास नकार दिल्यामुळे शिक्षण निरीक्षक कार्यालयातून शिक्षकांच्या याद्या घेऊन परस्पर खाते उघडण्यात येत आहेत. हे अतिशय गंभीर आहे. कोणताही फॉर्म भरलेला नसताना. शिक्षकांचे फोटो आणि सही नसताना. केवायसी डॉक्युमेंट नसताना परस्पर खाते उघडणे हे आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन असून हे कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे आहे. येथूनच विश्वासार्हतेला तडा जातो.
२.
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका आर्थिक अडचणीत आहेत.
३.
राज्यातील पाच जिल्हा बँका बुडाल्यामुळे त्या बँकेतील शिक्षकांचे पगार व ठेवी आजतागायत मिळालेल्या नाहीत.
४.
मुंबई बँकेवर आर्थिक घोटाळ्यांचे आरोप आहेत. कलम ८८ अंतर्गत चौकशी झालेली आहे. संचालकांवर एफआयआर दाखल आहे.
५.
मुंबई जिल्हा बँकेची मुंबई बाहेर शाखा अथवा एटीएम केंद्रे नाहीत. मुंबई बाहेर राहणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतरांची संख्या हजारोंच्या घरात आहे.
६.
मुंबई जिल्हा बँकेच्या मुंबईतील एटीएमची संख्या केवळ २५ आहे. २७००० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे व्यवहार होणे अवघड आहे.
७.
शाळेतील विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप, एस.एस.सी. बोर्डाची फी अथवा कोणतेही शासकीय शुल्क राष्ट्रीयकृत बँकेतूनच भरावे लागते. त्यासाठी मुंबई बँक चालणार नाही.
८.
शिक्षकांचा इन्कम टॅक्स राष्ट्रीयकृत बँकेतच भरावा लागेल. मुंबई जिल्हा बँकेच्या चेक अथवा डीडी चालणार नाहीत.
९.
उत्तर भारतीय अथवा दक्षिण भारतीय कर्मचाऱ्यांना आपल्या गावी बँकिंग व्यवहार करता येणार नाहीत.
१०.
महाराष्ट्रातील ग्रमीण भागात राहणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही तीनपेक्षा जास्त वेळा इतर बँकांची एटीएम वापरल्यास दंड भरावा लागणार.
११.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दैनंदिन बँकींग व्यवहार खूप कमी प्रमाणात होतात. त्याठिकाणी कर्ज देणे अथवा घेण्याचे व्यवहार होतात. पतसंस्थांना कर्जपुरवठा करणारी ही मोठी पतसंस्था आहे.
१२.
महाराष्ट्रात बँकेमार्फत वेतन व भत्ते प्रदान योजनेसाठी शासनाने राज्याच्या निधीची सुरक्षितता लक्षात घेऊन ज्या बँकांना अभिकर्ता म्हणून भारतीय रिर्झव्ह बँकेने घोषित केलेले आहे, अशा राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांनी शासनाने निर्धारित केलेल्या अटी व शर्ती मान्य करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका व खाजगी बँकाशी शासनाने करार केला आहे. या यादीत मुंबई बँक नाहीय. ज्या बँकेची खात्री आरबीआय देत नाही त्या बँकेवर शिक्षकांनी का विश्वास ठेवावा.
१३.
शासनाशी करार करणाऱ्या बँकापैकी कर्मचाऱ्यांच्या पसंतीनुसार जी एक बँक जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी निवडली असेल अशा बँकेतून वेतन देण्यात यावे, असे वित्त विभागाच्या जीआरचे म्हणणे आहे.
अशा बँकेमध्ये शिक्षकांचे पगार कसे काय सुरक्षित राहू शकतील?
विनोद तावडे यांचे पत्र -
व्हिडिओ - मुंबई बँक भ्रष्टाचारी - विनोद तावडे (१७ ऑक्टो २०१३)
Best letter against worst government
ReplyDeleteसर क्या अगले महिने आप पगार देंगे
ReplyDeleteक्यू???
Deleteआप कपिल पाटील जी केलिए काम करते हो??? जिसके लिए और जिनके साथ हमें संघर्ष करना चाहिए, उनके साथवे संघ्रष कर रहे है...ये कुछ कम है????
सुधर जाओ...क्या आप वाकई शिक्षक हो..???
या.....
We agree not to open bank account with Mumbai bank?
ReplyDeleteBut why the govt is very keen to it?
We agree not to open bank account with Mumbai bank?
ReplyDeleteBut why the govt is very keen to it?
Ye sarkar Shikshak virodhi hai . inhe satane ke liye Shikshak hi milate hain. Kyonki shikshak inhe majboor lagta hai. Next election me Shikshak aise sarkar ko vote na de .
ReplyDeleteपारदर्शकतेच्या नावाखाली हा असा अंधार..शिक्षकांच्याच बाबतीत..सर्व म्यानेजचाच प्रकार आहे..मा.मुख्यमंत्री यांनी त्वरित हा अन्याय दूर करावा..अन्यथा शिक्षक यांना यांची जागा दाखवितील..
ReplyDeleteपारदर्शकतेच्या नावाखाली हा असा अंधार..शिक्षकांच्याच बाबतीत..सर्व म्यानेजचाच प्रकार आहे..मा.मुख्यमंत्री यांनी त्वरित हा अन्याय दूर करावा..अन्यथा शिक्षक यांना यांची जागा दाखवितील..
ReplyDeleteमुंबई बँकेत शिक्षकांचेच पगार क ?
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteHow do we oppose this?
ReplyDeleteसपोर्ट शिक्षक भारती...दोन महिने पगार नाहि झाला तरी चालेल पण मुंबई बँकेत खाते खोलू नये.....
DeletePlz...काळ सोकावतोय...वाट लावून टकतील हे तथाकथित अच्छे दिन वाले.....
Say no to mumbai bank
ReplyDeleteजेथे सहकार, तेथे भ्रष्टाचार ...!
ReplyDeleteराष्ट्रीयीकृत बँकेतच पगार मिळावा....
मग तो मुंबईत असो की ठाणे जिल्ह्यात असो...
महाराष्ट्रातील काही जिल्ह्य़ातील शिक्षकांचे पगार जिल्हा सहकारी बँकांतूनच होत आहेत ते बंद करून राष्ट्रीयकृत बँकेमार्फत करण्यात यावेत..
ReplyDeleteWhy only teachers? ??? Say no to mumbai bank.
ReplyDeleteCorrect.....
Deleteमुबई बँके सारखी बँक आमच्या पगारासाठी सुरक्षित नाही.
ReplyDeleteSay no ti Mumbai bank
We are with you sir
ReplyDeleteSave teacher, Save salary.
ReplyDelete