Sunday, 31 May 2020

शाळा नाही पण शिक्षण सुरु


प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

महोदय,
कोरोनाच्या काळातही शिक्षण सुरू रहावं यासाठी आपण आज झूम ऍप द्वारे मीटिंग बोलावली त्याबद्दल आपले आभार. 

कोरोनाच्या काळातही शिक्षण सुरू रहावं म्हणून खुद्द मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी आणि मागच्या दहा वर्षात मुख्यमंत्री स्तरावर अशी बैठक प्रथमच व्हावी , याचं सर्वांना अप्रूप होतं आणि आहे. आणि म्हणून आपले मनःपूर्वक आभार मानतो.

दुसरे आभार यासाठी की आपण, सर्वांनाच विश्वास देत आहात की शाळा, कॉलेज सुरू होऊ शकल्या नाहीत तरी शिक्षण खंडित पडता कामा नये. शिक्षण सुरू राहिलं पाहिजे. शिक्षकांना शिक्षण सोडून अन्य कोणतंही काम देता कामा नये. यासाठी कठोरात कठोर कायदा सरकार करील, असं आश्वासन आपण जे दिलंत ते खूपच दिलासादायक आहे. 

1 जूनपासून विनाअनुदानित शिक्षक आंदोलन करणार आहेत. त्याकडे मी लक्ष वेधलं होतं. त्याबद्दल बोलताना आपण अनुदानापासून सगळ्यांच प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. येत्या काही दिवसात हे प्रश्न निकाली लागावेत, एवढीच अपेक्षा.

आपण स्वतःच म्हटल्याप्रमाणे, गुरू देवो भव हे केवळ सुभाषित राहता कामा नये. त्यामुळे शासन आणि शिक्षण खातं यापुढे मुख्यमंत्री यांच्या या भूमिकेचा विसर पडू देणार नाही, ही अपेक्षा आहे.

माझी आपणाला विनंती आहे की, 20 टक्क्यांचं जे अनुदान विधिमंडळाने मंजूर केलेलं आहे. त्यात कोणतीही दिरंगाई न करता व नवे निर्बंध न लावता तातडीने वितरित करण्याचे आदेश आपण द्यावेत, ही विनंती.

शिक्षण तातडीने सुरू कसे करता येईल यासंबंधी आपण काही लिखित सूचना मागितल्या आहेत.  त्या पुढीलप्रमाणे -

1) जिथे कोरोनाचा बिलकुल प्रादुर्भाव नाही, त्या अतिदुर्गम भागातील digitally deprived शाळा, कॉलेज योग्य ती काळजी घेऊन फिजिकली सुरू करणं उचित ठरेल.

2) कोरोना प्रादुर्भावीत असलेल्या आणि शक्यता असलेल्या भागांमध्ये शाळा, कॉलेज सुरू करण्याची घाई न करता तिथे आपण सुचवल्याप्रमाणे सर्व पर्याय एकाचवेळी अमलात आणण्याचा प्रयत्न करावा. 

3) ऑनलाईन, डिजिटल आणि दूरचित्रवाणीच्या माध्यमातून SCRT ने शिक्षण तातडीने सुरू करावं. 

4) दूरचित्रवाणी व्यतिरिक्त राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या वर्तमानपत्रातून रोज किमान 2 पानं शासनाने मागावीत. सवलतीच्या जाहिरात दरात ती उपलब्ध होऊ शकतील. या दोन पानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होमवर्क, वर्कशीट आणि ऍक्टिव्हिटी देता येतील. जेणेकरून जिथे डिजिटली शक्य नाही, तिथे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यक्तीशः अभ्यास करता येईल.

5) 15 ते 30 जून दरम्यान कोरोना काळातील किंवा कोरोनानंतरच्या शिक्षणाबाबत अत्यंत नियोजनबध्द ऑनलाईन प्रशिक्षण शिक्षकांना दिले जावे. शाळा, कॉलेज सुरू होतील तेव्हा काळजी घेण्यापासून आणि शाळा, कॉलेज बंद आहेत तोवर शिक्षण कसे सुरू ठेवायचे यासंबंधी हे प्रशिक्षण असले पाहिजे.

15 जून पासून सर्व शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम सुरू करावं. विद्यार्थी आणि पालकांना संपर्क साधणे, त्यांचे प्रश्न जाणून घेणे आणि त्यांचे फोन, व्हाट्सअॅपद्वारे  निराकरण करण्याचा प्रयत्न करणे. विद्यार्थ्यांना अध्ययनात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी क्लास टीचर आणि विषय शिक्षकांनी आपल्या फोनवर उपलब्ध राहणे. 

6) केंद्र सरकारच्या दिशा अॅप वर अवलंबून न राहता SCRT ने स्वतःचे मॉड्युल्स तयार करावेत. या क्षेत्रात ज्यांनी आधीच काम सुरू केलंय अशा सर्व संस्थांचा उपयोग करून घ्यावा. 

7) सर्व विषयांची वर्क बुक, ऍक्टिव्हिटी बुक तयार करण्यात यावीत. सर्व विद्यार्थ्यांना ती पुढच्या महिन्याभरात मोफत पोचवण्यात यावीत. म्हणजे वेगळ्या वह्यांची गरज लागणार नाही. पाठ्यपुस्तकंही मोफत पुरवण्यात यावीत. क्लास टीचर आणि विषय शिक्षक शाळा सुरू नसली तरी विद्यार्थ्यांच्या वर्क बुकचं मूल्यमापन करू शकतील. त्या आधारावर निकाल लावू शकतील. 

अभ्यासक्रम कमी करावा. किमान कौशल्य व अध्ययन क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात यावा. 

9वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांना आपण सुचवल्याप्रमाणे लोडेड टॅब देता आले तर प्रयत्न करावा. किंवा ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध ठेवावा. 

8) कोरोनाचं संकट कमी झाल्यावर शाळा, कॉलेज पुन्हा फिजिकली सुरू करता येतील. त्या सुरू करण्यापूर्वी इमारतींचे निर्जंतुकिकरण करणं आणि शिक्षकांनी त्याआधी किमान 15 दिवस होम कॉरंटाईन राहणं आवश्यक करण्यात यावं. 

9) मुख्यमंत्री महोदय आपण सुचवल्याप्रमाणे शिक्षकांना आता कोणतंही अशैक्षणिक काम देण्यात येऊ नये. याबाबत महसूल विभागाने खास आदेश काढण्याची आवश्यकता आहे. शाळा, कॉलेज व्यतिरिक्त कोरोना ड्युटी करणारे सर्व शिक्षक किंवा अन्य शासकीय, निमशासकीय कामकाजावर असलेले अतिरिक्त शिक्षक त्या सर्वांना तातडीने परत बोलवण्यात यावं. सरप्लस शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळा, कॉलेज मध्ये तातडीने पाठवण्यात यावं.

10) शाळांना यंदाच्या वर्षी विशेष बाब म्हणून तातडीने 10 टक्के नॉन सॅलरी ग्रँट दोन टप्प्यात in advance वितरित करण्यात यावी. त्यासाठी कोणतेही अन्य निकष लावण्यात येऊ नयेत. रक्कम आधी पोचणं आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण करता येणार नाहीत. 

11) शिक्षकांच्या उपलब्धतेसाठी मीटिंगमध्ये सुचवल्याप्रमाणे 28 ऑगस्ट 2015 संचमान्यते बाबतचा जीआर, 7 ऑक्टोबर 2015 कला क्रीडा विषयावर अन्याय करणारा जीआर आणि 17 मे 2017 चा रात्रशाळा बंद करणारा जीआर हे तिन्ही शासन निर्णय तातडीने रद्द करावेत. बंद पडलेल्या रात्रशाळा पुन्हा पूर्ववत सुरू करणं आवश्यक आहे.2012 मध्ये नियुक्त शिक्षकांवर
2018 मध्ये करण्यात आलेली  बेकायदेशीर कारवाई तातडीने रद्द करण्यात यावी. 

यामुळे शिक्षक उपलब्ध होतील. शिक्षकांना एक नवा विश्वास मिळेल. आणि ते जोमाने कामाला लागतील. 

12) सफाई आणि आरोग्य विषयक सुविधांसाठी नॉन टिचिंग स्टाफच्या भरतीसाठी परवानगी देण्यात यावी.

13) स्थलांतरित कामगारांच्या मुलांची नोंद त्यांच्या गावच्या शाळांमध्ये तातडीने करण्यात यावी. ते जेव्हा शहरांमध्ये परत जातील तेव्हा त्यांचं रिपोर्ट कार्ड सोबत पाठवावं. स्थलांतरामुळे शहरी शाळांचा पट कमी होणार आहे. त्यामुळे संचमान्यता पुढील दोन वर्षांसाठी स्थगित ठेवण्यात याव्यात.

14) मुलीचं शिक्षण याकाळात बंद होण्याची शक्यता रजनीकांत गरुड आणि अन्य तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. ती साधार आहे त्यामुळे मुलींचे शिक्षण बंद पडणार नाही यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेश द्यावेत.

15) अनुदानाचा प्रश्न हा सुटू शकतो. अनुदान नव्हे तर हा पगाराचा प्रश्न आहे. शिक्षण विभागाच्या सध्याच्या मंजूर निधीमधून सर्व विनाअनुदानित शिक्षकांचा पगार भागवता येऊ शकतो. फक्त शासनाची त्यासाठी तयारी हवी. सर्व घोषित, अघोषित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विनाअनुदानित पात्र शिक्षकांना तातडीने वेतन देण्याबाबतची कार्यवाही सुरू करावी. त्यासाठी कोणत्याही नव्या निकषांची, तपासणीची अट ठेवण्यात येऊ नये. 

16) ऑनलाईन शिक्षणाच्या दृष्टीने मदत होईल अशा ICT, संगणक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावेत. वाड्या - वस्त्यांवर, आश्रम शाळांमध्ये आणि विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शिक्षण देणाऱ्या शाळा यांच्याबाबत स्वतंत्र आढावा घेण्यात यावा.

17) यावर्षी अभ्यासक्रमात कपात पण कला, क्रीडा अशा मुलांच्या उर्जाना वाट करून देणाऱ्या विषयांना अधिक महत्त्व द्यावं. दहावीच्या परीक्षेमध्ये बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये कला व क्रीडा विषयाचा समावेश करावा.

18) कृपया शिक्षण विभागाला यासंबंधी संपूर्ण आराखडा व नियोजन तयार करायला सांगावं. हा आराखडा आधी जाहीर करुन, त्यावर पुन्हा मतं मागवावीत. अंतिम निर्णय घ्यायला थोडा उशीर झाला तरी चालेल. परंतु कोणत्याही नियोजनाशिवाय कोणताही निर्णय घाईचा व अपुरा ठरू शकतो. 

धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, विपस

दिनांक : 31 मे 2020

-------------------------------------
कोरोना काळातलं शिक्षण ...
Tap to read - https://bit.ly/2X2pUI7
-------------------------------------

49 comments:

  1. Very well said Sir, nice discussion

    ReplyDelete
  2. आपण खूप चांगले मुद्दे मांडले.सुदैवाने मुख्यमंत्रीही सामान्य माणसांचा विचार करणारे आहेत.
    Weldone

    ReplyDelete
  3. To the point discussion.Thank you very much sir

    ReplyDelete
  4. उचित मुद्दे आपण निवेदनात उपस्थित केले आहेत

    ReplyDelete
  5. आपण खूप सर्व मुद्दे मांडले आहेत.आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!! धन्यवाद

    ReplyDelete
  6. आपण खूप सर्व मुद्दे मांडले आहेत.आपल्या कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!! धन्यवाद

    ReplyDelete
  7. Thank you very much sir for your concern for teaching faculty and students. All suggestions are appropriate.
    Thank you once again.

    ReplyDelete
  8. आपल्या कार्यास मनपूर्वक शुभेच्छा 💐

    ReplyDelete
  9. अगदी सविस्तरपणे मांडणी केली आहे सर.31 मे 2020 ला आमच्या सोलापूर जिल्ह्यातील 2बांधव सेवानिवृत्त झाले .2014 नेमणूक असल्याने पेन्शन नाही.

    ReplyDelete
  10. साहेब, काल आपण मंत्रालयात मीटिंग नंतर फेसबुक live आले , तेव्हा थकवा चेहऱ्यावर जाणवत होता.काळजी घ्या.आपण नेहमीच चांगले मुद्दे मांडता,मी तर म्हणेन आपल्या निवेदन नुसार म्हणजेच लगेच शासन निर्णय होणे असे असावे.

    ReplyDelete
  11. ज्या शिक्षकांनी कंटेमेंट झोन मध्ये ड्युट्या केल्या आहेत.त्यांची सेवापुस्तकात नोंद घेण्याबाबत सुचवावे व त्यांना प्रमाणपत्र द्यावे

    ReplyDelete
  12. चांगले मुद्दे मांडलेत.!

    ReplyDelete
  13. Very nice and very well sir
    We are with you and hope full

    ReplyDelete
  14. साहेब आपण सविस्तरपणे मांडणी केली आहे.आपलया‌ कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा धन्यवाद साहेब. प्रमोदिनी दवंडे . मुंबई

    ReplyDelete
  15. धन्यवाद सर सर्व विषयाना हात घातला

    ReplyDelete
  16. शिक्षकांचे आधारस्तभ ,आदरणीय पाटिल साहेब, शिक्षक सदैव तुमचे ऋणी च असतील . शिक्षकांच्या प्रश्नावर अधिवेशनाच्या वेळी असो वा इतर वेळी नेहमी आक्रमकपने भूमिका मांडत असतात हे संपूर्ण महाराष्ट्रा जाणतो . आदरणीय साहेब स्थानिक स्वराज्य संस्थानच्या शाळांमधे सन 2012-13 पासून ते 2018-19 पर्यंत काम केलेल्या अंशकालीन / अतिथि कला , क्रीड़ा व कार्यानुभव निदेशकाना शासनाने गत शैक्षणिक वर्षापासून नियुक्ति दिलेली नाही त्यामुळे निदेशकांवर रोजगारविना उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी साहेब या प्रश्नावर आपण शासनदरबारी आवाज उठवून या वर्षी कायमस्वरूपीची नियुक्ति मिळवून द्यावी ही विनंती .

    ReplyDelete
  17. खूप छान मुद्दे मांडलेत सर आपण !

    ReplyDelete
  18. मा कपिल पाटील साहेब यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षात शाळा सुरु करीत असताना शाळा व्यवस्थापन, शिक्षक, विध्यार्थी या सर्व घटकांना येणाऱ्या सर्व अडचणी मुद्देसूद मांडल्या आहेत. त्याबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  19. खूप अभ्यासपूर्वक मत मांडले आहे साहेब धन्यवाद..

    ReplyDelete
  20. कपिल पाटील साहेब... आपले खुप खुप आभार... सर्व प्रश्नांना आपण नेहमी वाचा फोडून न्याय मिळून देत असता... हे खरंच खुप कौतुकास्पद आहे... शिक्षक आमदार असावा तर असा... हे आपल्याकडे पाहून वाटते...आणखी एक बाब नम्रपणे आपल्या निदर्शनास आणून द्यावीशी वाटते ती म्हणजे मनपा शिक्षकांवर सातत्याने होत असलेला अन्याय..7वा वेतन आयोग अजून लागू नाही.बोटावर मोजण्या इतक्या कमी मनपा मध्ये आयोग लागू झाला परंतु फरक अजून मिळाला नाही. यावर आपण गांभीर्यपूर्वक लक्ष द्याल हा विश्वास आहे.
    मनपा शिक्षक यांना 100% शासनाकडून वेतन मिळावे यासाठी प्रयत्न करून न्याय्य मिळून द्यावा.
    गजानन मोरलवार, मनपा सांगली

    ReplyDelete
  21. अशक्य ते शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.

    ReplyDelete
  22. All suggestions are appropriate
    Thank you sir

    ReplyDelete
  23. वस्तीशाळा / अप्रशिक्षित शिक्षकांचे मूळ सेवा ग्राह्य धरले बाबत शासन निर्णय तात्काळ निर्गमित करण्यात व्हावा. कारण काही शिक्षक सेवा निवृत्त होत आहे.

    ReplyDelete
  24. खूप छान आमदार साहेब. अजून अनेक शिक्षक.covid duty करीत आहेत त्यांना ताबडतोब बोलावणे आवश्यक आहे.

    ReplyDelete
  25. सर,१३ सप्टेंबर २०१९ ला घोषित झालेल्या शाळांना अजूनही अनुदान मिळाले नाही.३ महिन्यापासून पगार नाही.आवश्यक गरजा पण भागवणे मुश्किल झाले आहे. लवकरात लवकर पगार जमा व्हावा हीच अपेक्षा.

    ReplyDelete
  26. साहेबआपण खूप अभ्यासपूर्ण व संवेदनशीलतेणे
    मते मांडता.सर्व विद्यार्थी व शिक्षक खरेच आ पले ऋणी आहेत. आम्हाला आपला सार्थ अ भिमान आहे.

    ReplyDelete
  27. Very nice sir. Confusion about residential schools.please guide. Thanks and regards sir

    ReplyDelete
  28. अतिशय योग्य मांडणी..

    ReplyDelete
  29. Well said on all aspects. Need guidance of internet uses ,the net facility should be free of cost to teacher faculty.Teacher's complaint's should be attended vastly. Thanks for you pain taking efforts.

    ReplyDelete
  30. Physical distance, safe distance नियमानुसार विद्यार्थ्याना 15/20 चा गट विभागणी करून शिक्षण देण्यासाठी आधिकाधिक शिक्षकांची गरज आहे म्हणून सलप्लस शिक्षकांना त्वरीत मूळ शाळेत वो‌लावण्यात यावं.
    हि विनंती.

    ReplyDelete
  31. khupach changla nirnay ahe ha Mananiya CM che...karan school clgs madhe ekatra khup mula aslyane risk ahe ani e- learning best ahe...mi sudha professor ahe ani mala he khupach uttam vatat ahe teachers ani mulanchya safety sathi...krupaya mumbai university ne he declare karava sagla colleges sathi karan kai colleges mulancha ani teachers la risk var taktat job loose karaicha extortion var....Its a request to mumbai university to declare this for all colleges so that we can start teaching to our students atleast upto slow dowm of corona cases...Thank you

    ReplyDelete
  32. खूप छान सर्व प्रकारच्या मुद्दे घेतले त्याबद्दल आभार
    तुमच्या प्रमाणे इतर शिक्षक आमदार काहीच करत नाही तुम्ही एकाच शिक्षकांच्या अडचणी समजून न्याय मिळविण्यासाठी धडपड करतात तुमचे आभार ,,

    ReplyDelete
  33. आपल्या जिकिरीचे प्रयत्न आहेत श्री कपिल पाटील सर आणि आपल्या प्रयत्नांना जरुर यश येईल आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी आपल्या पाठीशी आहोत.
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!!

    ReplyDelete
  34. खूप खूप आभार साहेब। आपण नेहमीच विद्यार्थी , पालक समाज व शिक्षक या सर्वांना विचारात घेऊनच सर्वांच्या हिताचे आपण भाष्य करत असतात।
    आपणही काळजी घ्यावी।

    ReplyDelete
  35. सर अतेंत मौलिक मांडणी आपण केली
    विना अनुदानित शिक्षकांच्या समस्या आपण लवकरात लवकर सोडवलं ही अपेक्षा

    ReplyDelete
  36. We teachers are proud of you because valuable sensitive leader we got.sir what's about p.f.of non grand before 2005(tappa anudan 20℅>>>>>>100℅) please pay attention and cooperat us

    ReplyDelete
  37. सूर्यकांत देशपांडे
    शिक्षकांना अन्यकामे दिली जाणार नाहीत,हे केवळ पोकळ आश्वासन.सरकार कोणत्याही पक्षाचे असो.
    २.करोनाच्या खर्चाने वाकलेले सरकार वर्कबुक,अॕक्टिव्हिटी बुक यांचा खर्च कसा करू शकेल?
    ३.पाठ्यपुस्तके वेळेत तयार करताना पाठ्यपुस्तक मंडळाला धाप लागते,मग ही अन्य पुस्तके मंडळ केव्हा तयार करणार? त्यांचा खर्च कोण करणार?
    ४.केवळ वर्क बुक भरून मूल्यमापन कसे होणार? परीक्षा रद्द? विद्यार्थ्यांपर्यंत ही पुस्तके कशी जाणार?
    ५.९वी ते १२वीसाठीच्या लोडेड टॕबचा खर्च कोण करणार?कर्जात बुडालेले सरकार नक्कीच करणार नाही.

    ReplyDelete
  38. One more thing I was asking u that when you r in opposition you have tried to implement 1 and half teacher for 1 class and special teachers to be considered separate but after forming govt I don't think u have thought of implementing also.kindly do it sir so that most of surplus teachers in mumbai will get their school back

    ReplyDelete
  39. Nice sir, we r very happy to read ur kindly approch for our teachers,we hope that u should continue it in future thanks again

    ReplyDelete