Friday, 24 November 2017

मुंबईतील कोणत्याही शिक्षकांना मतदार याद्या पुनरिक्षण किंवा बीएलओचे कोणतेही काम देणार नाही

जिल्हाधिकारी यांचे आमदार कपिल पाटील यांना आश्वासन


मुंबई, दि. २४ नोव्हेंबर २०१७ (प्रतिनिधी) :
मतदार याद्या आणि फोटो तपासण्याच्या कामातून आणि बीएलओच्या ड्युटीतून मुंबईतल्या शिक्षकांची सुटका झाली आहे. या कामासाठी मुंबईतल्या एकाही शिक्षकाला घेतलं जाणार नाही, ज्यांना काम दिलं असेल त्यांना तातडीने कार्यमुक्त केलं जाईल, असं स्पष्ट आश्वासन मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी आज आमदार कपिल पाटील यांना दिले.

मतदार याद्या आणि फोटो तपासण्याचं काम आणि बीएलओची ड्युटी शिक्षकांना लावल्यामुळे शिक्षक परेशान झाले होते. तर शाळेचे कामकाज बंद पडण्याची भिती निर्माण झाली होती. आमदार कपिल पाटील यांनी तातडीने याबाबत दिल्ली गाठून भारत निर्वाचन आयोगाच्या प्रधान सचिव एन. एन. भुटोलिया आणि के. एफ. विल्फ्रेड यांची भेट घेतली होती. शिक्षकांना असं काम लावल्याबद्दल त्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं होतं.

सार्वजनिक निवडणूका आणि जनगणना या व्यतिरिक्त अन्य कोणतंही अशैक्षणिक काम शिक्षकांना देता येणार नाही, अशी जोरदार हरकत घेत, शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे या ड्युट्या रद्द करण्याची आग्रही मागणी केली होती.

आज आमदार कपिल पाटील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि मुंबई शहर उप जिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांना भेटले. जिल्हाधिकारी कुशवाह यांनी तातडीने निवडणूक अधिकारी राजा ठाकूर यांना बोलावून घेऊन एकाही शिक्षकाला ड्युटी लावू नये, असे स्पष्ट आदेश दिले. तर मुंबई शहर उप जिल्हाधिकारी (निवडणूक) अर्पणा सोमाणी यांनी ज्यांना ड्युट्या लागल्या होत्या त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले, अशी माहिती शिक्षक भारतीचे राज्य कार्यवाह प्रकाश शेळके यांनी दिली

सरल नोंदणी, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत सातत्यपूर्ण सर्वंकक्ष मूल्यमापण नोंदी, शाळासिद्धी, स्टुडन्टस् पोर्टल, पायाभूत चाचणींच्या गुण नोंदी अशा विविध कामांमुळे यापूर्वीच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेजार झाले आहेत. ऑनलाईन कामांवर बहुतांश वेळ वाया जाऊ लागल्याने मुलांच्या शिकवण्यावर त्याचा परिणाम होत आहे आणि त्यातच निवडणूकीच्या या अतिरिक्त कामाच्या सक्तीमुळे शिक्षक पुरते हैराण झाले आहेत. शिक्षण हक्क कायदा आणि संविधानातील तरतुदी यानुसार सार्वत्रिक निवडणूक आणि राष्ट्रीय जनगणना या व्यतिरिक्त अन्य कोणतेही अशैक्षणिक काम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना बंधनकारक नाही. त्यामुळे मतदार याद्या पुनरिक्षण, सर्वेक्षण, याद्या तयार करणे, बीएलओ अशी कोणतीही निरंतर कामे शिक्षकांन देऊ नयेत, अशी शिक्षक भारतीची भूमिका आहे.


राज्यभर अनेक जिल्ह्यातील शिक्षकांनी बीएलओ ड्युटी नाकारली म्हणून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. ते तातडीने मागे घ्यावे आणि मुंबई प्रमाणेच राज्यभरातील शिक्षकांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्रथमिक शिक्षक भारतीचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी केली आहे.

29 comments:

  1. Sir what about thane district teachers,

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Please tell me which election duty 2017 ka kya pls confirm

    ReplyDelete
  4. Which election duty 2019 ka kya please confirm

    ReplyDelete
  5. Which election duty 2019 ka kya please confirm

    ReplyDelete
  6. This is really great news for teachers as now we can concentrate on our students.

    ReplyDelete
  7. Congratulations n great. It's success of teachers unity n strength. Thanks to respected. Kapil Patil for his sincere efforts... Kishor Chavan, Sathaye college

    ReplyDelete
  8. As usual good work sir
    Keep it up
    Your concern for teachers is really appreciated
    Thnx a lot

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. U r really great sir... Thanku for such a great work... @ kapil patil sir

    ReplyDelete
  11. सर, संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचे काम काढले जायला पाहिजे. आम्ही जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांनी आताच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. पण आमची अजूनही सुटका करण्यात आली नाही.
    योगेश पाटील.अमळनेर, जळगाव,मो. 8669036636

    ReplyDelete
  12. सर,आपणास या माध्यमातून विनंती आहे.

    ReplyDelete
  13. सर, संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचे काम काढले जायला पाहिजे. आम्ही जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांनी आताच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. पण आमची अजूनही सुटका करण्यात आली नाही.
    योगेश पाटील.अमळनेर, जळगाव,मो. 8669036636

    ReplyDelete
  14. मा आमदार श्री कपिल पाटील साहेबजी,
    संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांनकडून BLO चे काम काढून टाकले पाहिजे आमच्या जळगाव जिल्ह्यतील एरंडोल तालुक्यतील शिक्षकांवर BLO चे कामावर बहिष्कार टाकल्यामुळे तहसीलदार यांनी गुन्हे दाखल करू असा धाक दाखविला जात आहे कृपया ह्या कामातून सर्व शिक्षकांची सोडवणूक व्हावी किशोर ना पवार जि प प्राथमिक शाळा वैजनाथ ता एरंडोल जि जळगाव 9028621037

    ReplyDelete
  15. Great job sir,you are such a teachers leader

    ReplyDelete