Thursday, 14 December 2017

विधान परिषदेत कपिल पाटील आक्रमक


आमदार कपिल पाटील आणि शिक्षक आमदारांनी आज विधान परिषद गाजवली. प्रश्नोत्तराच्या तासात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शिक्षक आमदार अस्वस्थ होते. शून्य प्रहारात आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषद नियम २८९ अन्वये स्थगन सूचना दिली होती. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उत्तराने संतापलेले कपिल पाटील कधी नव्हे ते थेट व्हेलमध्ये उतरले. त्यांच्या पाठोपाठ अन्य शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदारही आल्याने सभागृहात गोंधळ उडाला. अनुदान नाकारणाऱ्या, शाळा बंद करणाऱ्या आणि शिक्षकांना परेशान करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. मनुवादी सरकारचा धिक्कार असो. अशा घोषणांनी सभागृहात दणाणून सोडलं. 

सर्वश्री आमदार कपिल पाटील, विक्रम काळे, दत्तात्रेय सावंत, श्रीकांत देशपांडे, डॉ. सुधीर तांबे, सतीश चव्हाण यांच्या घोषणांनी सभागृहाचं कामकाज चालणं अशक्य झालं. तेव्हा सभापतींना सभागृह दोनदा तहकुब करावं लागलं. विधान परिषदेत विनोद तावडे विरुद्ध कपिल पाटील असा सामना नेहमीच रंगतो. सभागृहात कितीही गोंधळ झाला तरी आपली जागा कधी कपिल पाटील सोडत नाहीत. पण शाळा बंदी आणि अनुदानाच्या प्रश्नावर ते आज खूपच संतापले होते. 

दुर्गम भागातल्या १३०० शाळा सरकारने बंद केल्या आहेत. आणखी १२ हजार शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. १७६ रात्रशाळा बंद पाडण्यात आल्या आहेत. १०१० रात्र शिक्षकांच्या सेवा समाप्त केल्या तर नाईट ज्युनिअर कॉलेज शिक्षकांना गेली ७ महिने पगार दिलेला नाही, असा आरोप कपिल पाटील यांनी केला. 

राज्यातल्या शाळांना गेल्या ७ महिन्यात पोषण आहाराचा १ रुपया सुद्धा मिळालेला नाही, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. विनाअनुदानित ज्युनिअर कॉलेज शिक्षकांची गेली १७ वर्षे उपासमार सुरु आहे. घोषित, अघोषित शाळांना अनुदान नाही. २० टक्के अनुदानावर बोळवण करण्यात आली आहे, पेन्शनचा प्रश्न लोंबकळत ठेवण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं. 

अनुदानाच्या मागणीसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक नागपूरच्या सडकेवर आहेत. त्यांना न्याय द्या, अशी कळकळीची मागणी कपिल पाटील आणि अन्य शिक्षक आमदारांनी केली. 

ऑनलाईन कामांचा ससेमिरा लावणे, वरिष्ठ आणि निवडश्रेणीचा अधिकार नाकारणे, १ मिनिट उशीर झाला तरी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश न देणे, जिल्हा परिषद शिक्षकांच्या मनामनी बदल्या करणे, बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त न करणे, बेसलाईन परीक्षा पेपरमध्ये मोठा घोटाळा होणे, विद्यापीठांमधल्या परीक्षांच्या गोंधळाने लक्षावधी विद्यार्थ्यांचे करीअर बर्बाद होणे याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला.

सभापतींनी या विषयावर पुढील आठवड्यात विधान परिषद नियम ९७ अन्वये चर्चा लावून घेण्याचे मान्य केल्यानंतर वाद संपला. 

-------------------------------

शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य योजना १ एप्रिल पासून सुरु होणार.
एप्रिल फुल नाही - विनोद तावडे

प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार कपिल पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले की, काही त्रुटी दूर करुन येत्या १ एप्रिल पासून ही योजना सुरु करण्यात येईल. हा एप्रिल फुल नसेल, असं आश्वासनही तावडे यांनी कपिल पाटील यांना दिलं. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या नावाने शिक्षकांना कॅशलेस कार्डावरती आरोग्य सुविधा पुरवणारी ही योजना शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी तयार केली होती. या योजनेला तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी मंजूरी दिली होती. मात्र गेले तीन वर्षे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मान्य करुनही योजना अंमलात आली नव्हती. अखेर आज शिक्षणमंत्री यांनी घोषणा केल्यानंतर कपिल पाटील यांनी त्यांचे आभार मानले. 



-------------------------------

मुंबईच्या शिक्षिकेचं नागपूर येथील समायोजन अखेर मागे
विधान परिषदेत कपिल पाटील यांच्या ९३ सूचनेवर शिक्षणमंत्र्यांचे उत्तर



मुंबईच्या सरप्लस शिक्षिका जयश्री ढोरे यांचं समायोजन ८०० किलोमीटर दूर नागपूरच्या शाळेत करण्यात आलं होतं. त्या विरोधात आमदार कपिल पाटील यांनी आज विधान परिषदेत आवाज उठवला. 

नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमदार कपिल पाटील यांनी आज विधान परिषदेत नियम ९३ अन्वये स्थगन सूचना दिली होती. सभापती रामराजे निंबाळकर यांनीही हा मुद्दा उचलून धरत ही बदली अन्यायकारक असल्याचे सांगितले. त्यावेळी उपस्थित असलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपण तात्काळ हा अन्याय दूर करत असल्याचे आश्वासन दिलं. नागपूरचे संस्थाचालक रिक्त जागांसाठी हायकोर्टात गेले होते त्यामुळे आम्हाला हे करावं लागलं, अशी कबुली त्यांनी दिली. 

न्यायालयाचा कोणताही आदेश नसताना त्याचा विपर्यास करुन या महिला शिक्षिकेची बदली करण्यात आली. स्त्री शिक्षिका असूनही कोणतीही सहानुभूती, स्त्रीदाक्षिण्य किंवा स्त्री बद्दलचा आदर न दाखवता ८०० किलोमीटर दूर बदली होणं अन्यायकारक व निषेधार्ह असल्याचं कपिल पाटील यांनी यावेळी आग्रहाने सांगितलं. 

एरव्ही सभागृहात विनोद तावडे विरुद्ध कपिल पाटील असा सामना नेहमी पहायला मिळतो. मात्र यावेळेला शिक्षणमंत्र्यांनी स्वतःहून उभं राहून सदर बदली थांबवण्याचं आश्वासन दिलं. त्यावर कपिल पाटील यांनी आभार मानले.

-------------------------------

मॅक्स महाराष्ट्र फेसबुक लाईव्ह 
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/920057771485445/

-------------------------------

आज दिनांक १४ डिसेंबर २०१७, नागपूर 
शब्दांकन : दिलीप तडस, शिक्षक भारती, नागपूर 


28 comments:

  1. शिक्षकभारती जिंदाबाद

    ReplyDelete
  2. जय शिक्षक भारती

    ReplyDelete
  3. Kapil patil sir , very well done we are always with u

    ReplyDelete
  4. Well done sir.Proud to have leader like you.

    ReplyDelete
  5. धन्यवाद कपिल पाटील साहेब

    ReplyDelete
  6. Aapla manus,Aamdar Kapil Patil Saheb, Shikshakanche Aashasthan

    ReplyDelete
  7. Thanks sir.You always support the truth n strive hard to give the teachers justice n respect.Salute to your great awareness.

    ReplyDelete
  8. Salute to your great work sir.

    ReplyDelete
  9. धन्यवाद मा.पाटील साहेब. .आपण शिक्षकांचे प्रश्न सभागृहात मांडून ते गाजवलेे..लढवय्ये आमदार. .शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती.

    ReplyDelete
  10. धन्यवाद मा.पाटील साहेब. .आपण शिक्षकांचे प्रश्न सभागृहात मांडून ते गाजवलेे..लढवय्ये आमदार. .शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी शिक्षक भारती.

    ReplyDelete
  11. Congratulations Kapil Patil Sir. You are the real saviour of teachess during their difficult time...Dr Dhanaji Kumthekar

    ReplyDelete
  12. Thanku saheb shikshak bharticha jay ho

    ReplyDelete
  13. Congratulations sir u r always standing behind teachers in their all sort of problem.I personally feel like seeing u to solve my problem pl do tbe needful.

    ReplyDelete
  14. Very good sir ..खरे नेते आहे शिक्षकाचे कपिल पाटिल साहेब

    ReplyDelete
  15. आमचे दैवत
    मा.आ.कपिलभाऊ पाटील

    ReplyDelete
  16. साहेब आंतरजिल्हा बदलीचा 2 रा टप्पा त्वरीत निकाली काढणेसाठी प्रयत्न करावेत व 20 जानेवारी 2018 पर्यत तरी 2 रा टप्पा निकाली काढून कार्यमुक्तीसाठी प्रयत्न व्हावेत हि विनंती

    ReplyDelete
  17. शिक्षण क्षेत्रात 1च नेता मा. कपिल पाटिल साहेब

    ReplyDelete
  18. शिक्षण क्षेत्रात 1च नेता मा. कपिल पाटिल साहेब

    ReplyDelete
  19. कपिल पाटील साहेब शिक्षकांच्या समस्या ह्या विषयावर आपण आवाज उठविल्याबददल महाराष्ट्र कास्ट्राईब शिक्षक संघटना आपले आभार व्यक्त करते धन्यवाद रविंद्र पालवे कार्याध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ

    ReplyDelete
  20. धन्यवाद, मा. कपिल साहेब....

    ReplyDelete
  21. Sir plz be aggressive in night school matter also.....God blessed you with victory for us

    ReplyDelete