Saturday 28 March 2015

सिनेमातलं चैतन्य आणि भगतगीरी







'कोर्ट'मुळे मराठी सिनेमाला खरंच सोनं लागलं. आचार्य अत्रेंच्या 'शामच्या आई'ने पहिलं 'सुवर्ण कमळ' जिंकलं होतं. नंतर मराठी सिनेमा जणू मेल्यागत झाला होता. 'श्वास' आला आणि मराठी सिनेमा जिवंत झाला. त्यात चैतन्य ताम्हाणेने खरंच चैतन्य भरलं.

अलिकडे मराठी सिनेमा ताकदीने उभा राहतो आहे. तेच असभ्य विनोद, त्याच माकडचेष्टा, तेच नकली नाच यातून मराठी सिनेमाची सुटका होते आहे. सर्जनशील लेखक, दिग्दर्शक, संगीतकार यांचा शोध नव्याने लागतो आहे. याचा आनंद आहे. लोकशाहीर संभाजी भगतांनी नाटकात जादू केली आणि संगीतातली भगतगीरी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली. त्या ख्वॉडावाल्या भाऊसाहेब कर्‍हाडेंनी तर कमाल केली. या सगळ्यांचं अभिनंदन करूया! मराठीला मोठं केलं म्हणून. तोडफोड करणार्‍यांनी मराठीला कधीच मोठं केलं नाही. मराठी मोठी झाली ती अशा सर्जनशील, संवेनशील प्रतिभांमुळेच.

आमदार कपिल पाटील,
अध्यक्ष, लोक भारती


1 comment: