Monday 31 July 2017

आपणच जिंकणार आहोत


मा. प्राचार्य / मुख्याध्यापक आणि शिक्षक-शिक्षकेतर बंधू भगिनींनो,

सप्रेम नमस्कार,
भ्रष्टाचारी आणि बुडणाऱ्या मुंबई बँकेत कोणालाच जायचं नाहीये. आपली लढाई अंतिम टप्प्यात आहे. माझा बेमुदत उपवास सुरु आहे. एरव्ही उपोषण एका जागी बसून केलं जातं. मात्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असल्याने मी कामकाजात भाग घेत आहे. म्हणून एका जागी बसून उपोषण करणं शक्य नाही. पण माझा उपवास थांबलेला नाही. हा अन्नत्याग सत्याग्रह आहे. पाण्याशिवाय अन्य कोणताही अन्नपदार्थ मी सेवन करणार नाही. 

मुख्यमंत्र्यांना गेल्या आठवड्याभरात मी अनेकदा भेटलो आहे. त्यांच्या काही अडचणी आहेत. पण त्या अडचणींसाठी माझ्या शिक्षकांना त्रास का होऊ द्यायचा. म्हणून अखेर उपवासाचा निर्णय घेतला आहे. २ ऑगस्टला कोर्टाकडून नक्की काही तरी उत्तर मिळेलच. शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे आणि प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांची ही केस आहे. आज ती कोर्टात मेन्शन झाली. २ तारखेला युक्तिवाद होईल. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय दिला नाही तर तो पर्यंत थांबावं लागेल. 

इतका धीर आपण धरला आणखी दोन दिवस. आपणच लढून जिंकणार आहोत. 

काही शाळांमधल्या शिक्षकांनी मुंबई बँकेत खाती उघडली आहेत. पण त्यांना दोष देऊ नका. तेही आपल्या सोबत आहेत. नाईलाजाने, दडपणापोटी खाती उघडली गेली आहेत. ते सर्व परत येतील, यावर विश्वास ठेवा. आपल्यात भांडण होऊ देऊ नका. आपली एकजुट अभेद्य ठेवा. ते आपली परीक्षा पाहत आहेत. पण आपण लढाई सोडून देता कामा नये. काल प्रकाश शेळकेंची एक पोस्ट तुम्ही पाहिली असेल 'आता खडूंच्या तलवारी होतील' असं प्रकाश शेळकेंनी लिहिलं आहे. केवढा मोठा निर्धार आहे. एका मोठ्या साहित्यिकाचा उद्गार यावा तसं हे वाक्य आहे. शेळकेंच्या या उद्गाराचा प्रकाश राज्यकर्त्यांच्या अंधारलेल्या डोळ्यापुढे पडो. लवकरच तो पडेल. शिक्षकांच्या खडू, फळ्याची ताकद त्यांनी अजून अजमावली नसावी. 

लढूया, जिंकूया!

आपला स्नेहांकित,


कपिल पाटील, वि.प.स.

20 comments:

  1. सत्य परेशान होता है,पराजित नही।

    ReplyDelete
  2. बाकी कोणी असेल किंवा नसेल परंतु मी अपणासीबत आहे सर.....

    ReplyDelete
  3. Patil Saheb will win definitely

    ReplyDelete
  4. सर आम्हि तुमच्या बरोबरच आहोत

    ReplyDelete
  5. मा.आमदार कपिल पाटील साहेब जिंदाबाद. .हम सब आपके साथ है...लढू या..जिंकु या.

    ReplyDelete
  6. मा.आमदार कपिल पाटील साहेब जिंदाबाद. .हम सब आपके साथ है...लढू या..जिंकु या.

    ReplyDelete
  7. मा.आमदार कपिल पाटील साहेब जिंदाबाद. .हम सब आपके साथ है...लढू या..जिंकु या.

    ReplyDelete
  8. आदरणीय कपिल पाटील सर.. आम्ही शिक्षक आपले सोबत आहोत, सोबतच असू, लढू आणि जिंकू पण.

    ReplyDelete
  9. टेकनोसेवी टिचर्सना टेकनाॅलाॅजी वाली बॅंक असावी सर धन्यवाद लढाई चालू असल्या बद्दल

    ReplyDelete
  10. टेकनोसेवी टिचर्सना टेकनाॅलाॅजी वाली बॅंक असावी सर धन्यवाद लढाई चालू असल्या बद्दल

    ReplyDelete
  11. टेकनोसेवी टिचर्सना टेकनाॅलाॅजी वाली बॅंक असावी सर धन्यवाद लढाई चालू असल्या बद्दल

    ReplyDelete
  12. Mr.Kapil H.Patil MLC
    आदरणीय पाटील साहेब!
    लढेंगे! जितेंगे!!
    आम्ही सतत आपल्या सोबत आहोत!!!

    ReplyDelete
  13. विद्यार्थांना राष्ट्रीय कृत बँकेत खाते उघडायला सांगून शिक्षकांचा पगार त्यातून काढण्याचे कारण ?


    आम्ही तुमच्या सोबत आहोत सर

    ReplyDelete
    Replies
    1. आदरणीय पाटील साहेब!
      लढेंगे! जितेंगे!!
      आम्ही सतत आपल्या सोबत आहोत!!!

      Delete
  14. शिक्षक मित्रांनो कपिल पाटलांचे उपोषण हे बाब आपल्यासाठी अतिशय जबाबदारीची आहे हा माणूस आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी भांडतो आहे। आपणही आहे तिथे या आन्दोलनाचा भाग होण्यासाठी मुख्यमंत्र्याना पोस्ट कार्ड लिहुया आणि आपल्या मागण्या मान्य करण्याची विनंती करुया कपिल पाटलांचे उपोषण लवकर संपले पाहिजे ही आपली जबाबदारी आहे।

    ReplyDelete
  15. Ho sir aamhee aaplya sobat aahot !!!

    ReplyDelete
  16. कपिल सर, आम्ही तुमच्या सोबत आहोत. फक्त तुम्ही आम्हाला एक हाक द्या

    ReplyDelete
  17. Definitely we will win sir
    I am always with you and your team.

    ReplyDelete
  18. Definitely we will win sir
    I am always with you and your team.

    ReplyDelete