Sunday 3 December 2017

आणि शिक्षणमंत्री म्हणतात, कपिल पाटील उगाच बोंब मारतात


१३०० नव्हे १३ हजार शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. 

३० टक्के नोकर कपात करुन ५ लाख सरकारी नोकऱ्या कमी केल्या जाणार आहेत. त्यापैकी शिक्षकांची पदं २ लाख आहेत. महाराष्ट्रातील गरीबांचं शिक्षण सरकार उद्ध्वस्त करत आहे. 

१३ हजार शाळा बंद करण्याची योजना यापूर्वीच शिक्षणमंत्र्यांनी आखली आहे. त्यातल्या १३०० शाळा कायमच्या बंद करण्याचा निर्णय आता फक्त अमलात येतो आहे. १२ हजार शाळा प्रतिक्षा यादीवर आहेत. 

सातव्या वेतन आयोगाचा भार नको यासाठी ५ लाख नोकऱ्यांची कपात करण्याचा सरकारचा डाव आहे. प्राथमिक, माध्यामिक शाळांमधील १ लाख जागा रिक्त आहेत. त्यांच्या भर्तीवर बंदी आहे. आणखी १ लाख पदे कमी करण्यासाठी शिक्षकांना सरप्लस करणारा स्टाफ पॅटर्न यापूर्वीच अमलात आलेला आहे. 

तीन ते चार भाषा विषयांना मिळून फक्त १ शिक्षक. गणित आणि विज्ञानालाही फक्त १ शिक्षक. तर कला-क्रीडा विषयांना आणि समाजशास्त्राला वेगळा शिक्षकच द्यायचा नाही. असा सरकारचा नवा स्टाफ पॅटर्न आहे. 

हे सगळ भयंकर आहे!

मा. शिक्षणमंत्री म्हणतात, एकाही शिक्षकाची नोकरी जाणार नाही. २६,२८० मुलांचं शिक्षण पहिल्याच फटक्यात बंद होणार आहे त्याचं काय? उरलेल्या १२ हजार शाळा बंद होतील तेव्हा सव्वा दोन लाख मुलं शाळा बाह्य होतील. शाळेत न गेलेली आणि ड्रापआऊट झालेली अशा मुला-मुलींची संख्या ४ लाखाहून अधिक आहे. 

एका मुलीची शाळा तुटू नये म्हणून त्या एका लहानग्या प्रवाश्यासाठी जपानची ट्रेन त्या सुनसान स्टेशनवर थांबत होती. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री म्हणातात, २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळा कशाला चालवायच्या? 

भामरागडच्या जंगलातल्या त्या पाड्यावरच्या मुलांनी सुरंग पेरलेल्या रस्त्यावरुन शाळेसाठी किती पायपीट करायची? कोकणातल्या डोंगर दऱ्यात राहणाऱ्या आपल्या लेकींना तावडेंच्या शाळेत एकटं कसं पाठवायचं? आदिवासी पाडा आणि बंजारांचा तांडा शाळेविना होणार. कारण २० पटा खालच्या शाळेचा खर्च श्रीमंत फडणवीस सरकारला परवडत नाही. चारी बाजूनी खवळलेल्या समुद्रातल्या त्या बेटावर शिक्षक पाठवायचा खर्च सरकारला परवडत नाही आणि तिथल्या खाजगी शिक्षण संस्थेला अनुदान द्यायची सरकारची तयारी सुद्धा नाही. कोपर्डीचा निकाल लागला. निर्भयाला न्याय मिळाला. पण गावकऱ्यांनी शाळा मागून वर्ष लोटलं, शाळा द्यायला अजून सरकार तयार नाही.  

१३०० हजार प्राथमिक शाळा बंद केल्यानंतर माध्यमिक शाळांवर सुद्धा कुऱ्हाड येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सरकारी आणि खाजगी अनुदानित शाळा बंद करण्याची सरकारला घाई झाली आहे. कारण व्हाऊचरवर चालणाऱ्या पातंजलीच्या शाळा लवकरच येऊ घातल्या आहेत. टुथपेस्ट आणि फेसवॉश पेक्षा शाळांचा धंदा जास्त किफायतशीर आहे.

आणि शिक्षणमंत्री म्हणतात, कपिल पाटील उगाच बोंब मारतात. तुम्ही शिक्षणच बंद करणार, मग आम्ही बोंबही मारायची नाही का? 

- आमदार कपिल पाटील

आज दिनांक ३ डिसेंबर २०१७, मुंबई  




32 comments:

  1. Yes बोंब तर मारायचीच, आप आगे बढो हम सब शिक्षकगण आपके हमेशासे साथ हैं

    ReplyDelete
  2. कपिल पाटील यांची काविळ झालेल्या शिक्षण मंत्र्याला आपल्या याकर्माची फळे भोगावी लागतील.

    ReplyDelete
  3. खरं तर अती आदरणीय शिक्षणमंत्री साहेब कपील पाटील यांच्या नावानं बोंबा मारत आहेत.. धास्ती घेतल्यागत..

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. साहेब काम करणारे राहिले की लोक असे करणारच

    ReplyDelete
  6. 1ही मुलं शाळाबाह्य होणार नाही याची हमी कोण देईल काय?

    ReplyDelete
  7. अगदी बरोबर साहेब. हे सरकार वरील तत्वानेच चालत आहे..यांना ह्या शाळा बंद करून..नविन शाळा आणायच्या आहेत.कारण ह्या शाळा आपल्या नाहीत ईतरांच्या आहेत हा गैरसमज झालेला आहे. एवढे पद कमी होणार. समोर विद्यार्थी पण लांबच्या नियमितपणे शाळेत जाणार नाही.

    ReplyDelete
  8. अगदी बरोबर साहेब. हे सरकार वरील तत्वानेच चालत आहे..यांना ह्या शाळा बंद करून..नविन शाळा आणायच्या आहेत.कारण ह्या शाळा आपल्या नाहीत ईतरांच्या आहेत हा गैरसमज झालेला आहे. एवढे पद कमी होणार. समोर विद्यार्थी पण लांबच्या नियमितपणे शाळेत जाणार नाही.

    ReplyDelete
  9. लोकमान्य टि ळ कांचे वाक्य आठवते "सरकाचे ड़ोके ठीकानावर आहे का?

    ReplyDelete
  10. आता माझ्या तांड्यातला विध्यार्थी खऱ्या अर्थाने शासनाचा लाभार्थी होइल साहेब???? तो ही शाळेविना....

    ReplyDelete
  11. आणि हे फक्त महाराष्ट्रात होते आहे.

    ReplyDelete
  12. 1 वर्षानंतर लाभ हवा असल्यास धान्य पेरा
    50 वर्षासाठी झाडे लावा
    आणि 100 वर्षासाठी माणसांना शिक्षण द्या... अशी विचारधारा असलेल्या

    जे जे आपणासी ठावे
    ते इतरांना सांगावे
    शहाणे करुनी सोडावे
    सकल जन ....
    हा संदेश देणार्या तुकारामाच्या ...
    शिक्षणाच्या हक्कासाठी झटणार्या फुले- शाहूंच्या महाराष्ट्रात
    सरकारने असा अविचार करणे यासारखे दुर्दैव ते काय?

    शिक्षणाच्या समान संधीचा हक्क आम्हास संविधानाने दिला आहे. तो हक्क शासन हिरावून घेवू पहात असेल तर याचा विरोध केलाच पाहीजे.

    ReplyDelete
  13. शासक का बुरा वक्त आता है
    जब शिक्षक को तकलीफ देता है

    ReplyDelete
  14. आता खरोखर एक प्रश्न विचारावासा वाटतो

    या सरकार चे डोके ठिकाणावर आहे का?

    मा. नंदकुमार ने स्वतः 1 विद्यार्थी गुणवंत करून दाखवावा शिक्षण इतर कामे सांभाळून जे शिक्षक करतात

    आणि शाळा बंद करण्यापेक्षा सर्व अधिकारी आणि आमदार खाजदाराने आपली मुले सरकारी शाळेत दाखल करावी हा निर्णय घ्या

    अशिक्षित शिक्षणमंत्री दिसून येते

    ReplyDelete
  15. Anti Education ahe He shikshan mantri

    ReplyDelete
  16. शिक्षण मंत्र्यांंना शिक्षणातलंं काही कळत नसावंं, मदरसध्ये जस. शिक्षण देतात तसंत्यांंच शिक्षण झाल असाव. यांंना मंंत्री करताना एक परीक्षा घेण आवश्याक आहे. जशी काॅॅलेज शीक्षकांंसाठी आहे.

    ReplyDelete
  17. 2019 नंतर तुम्हीच बोंबा मारणार हे नक्की

    ReplyDelete
  18. शिक्षकांना रस्त्यावर आणन्याचा हा डाव आहे.

    ReplyDelete
  19. त्याचं १३ व घाला व

    ReplyDelete
  20. शिक्षण मंत्री ज्या संस्कारातून वाढले आहेत त्याप्रमाणे त्यांची वागण्याची बोलण्याची संस्कृती कळते बहुजन समाज्याची मुले शिकूच नयेत असा शिक्षण मंत्री पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळाला. यासाठी महाराष्ट्रातील के जी ते पी जी संघटनांनी एकत्रित येऊन अश्या जातीयवादी गुंडगिरी करणाऱ्या सरकारला धडा शिकवावयास हवा
    अध्यक्ष शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)
    डॉ शंकर पवार


    ReplyDelete
  21. मंत्रीपद ही जास्त झालेत ती कमी करण्याचा निर्णय घ्या, आणि सगळी पद श्रीदेवेंद्र ना दया मग, हे कस विनोद करत बोंबलतय बघूया!

    ReplyDelete
  22. मंत्रीपद ही जास्त झालेत ती कमी करण्याचा निर्णय घ्या, आणि सगळी पद श्रीदेवेंद्र ना दया मग, हे कस विनोद करत बोंबलतय बघूया!

    ReplyDelete
  23. पाटिल साहेब हे शिक्षण मंत्री साहेब गरीबाचे शिक्षण बंद करीत असताना पाटिल साहेबांनी मांडलेला मुद्दा यांन बोम्ब वाटते2019 नंतर बसतील बोम्बा मारत
    पाटिल साहेब आगे बढ़ो ------

    ReplyDelete
  24. पाटिल साहेब हे शिक्षण मंत्री साहेब गरीबाचे शिक्षण बंद करीत असताना पाटिल साहेबांनी मांडलेला मुद्दा यांन बोम्ब वाटते2019 नंतर बसतील बोम्बा मारत
    पाटिल साहेब आगे बढ़ो ------

    ReplyDelete
  25. माननीय महोदय, शाळा बंद शाळा स्थलांतरचा विचारांती निर्णय घ्या. ज्या महाराष्ट्रात राजषी छत्रपती शाहू महाराज,महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील यानी बहुजन, दलित,वंचित, ग्रामीण, डोंगरी, मागास, शेतकरी, कष्टकरी यांच्या मुला-मुलींसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी अव्याहतपणे कष्ट करून आपले आयुष्य पणाला लावले त्याच महाराष्ट्रात आपण कोणते निर्णय घेत आहात आणि याच्यातून कोणाचे भले करू पहात आहात? खाजगी संस्था कोणी सुरू केल्या आणि त्या कोणाच्या आहेत कोणा गोरगरिबांच्या नाहित हे ध्यानात घ्या. ज्या शाळां आपण बंद करणार आहात त्याला गोंडस नाव दिले आहे. म्हणे त्या स्थलांतरित करत आहोत. मूळ गावातून जिथे स्थलांतर होणार आहे तिथे, आपण एकदा डोंगर दऱ्या खोऱ्यातून एकटे जाऊन पहा. पालक पहिली ते पाचवी तील लहान मुलांना- मुलींना खरोखरच दूरवर शाळेत पाठवतील? आता या निर्णयाने ज्या गावातील शाळा बंद होणार आहे तेथील पिढ्यान पिढ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. अस्तित्वात असणाऱ्या शाळा इमारत ,तेथील फर्निचर ,किचनशेड, क्रीडांगण आणि इतर सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध असताना त्या शाळांना टाळे ठोकणे हा काय प्रकार आहे? एकदा का शाळा बंद झाली की त्याच शाळेच्या जागेवर जुगार, मटका आणि दारूचे अड्डे बनवतील हे आपल्या कोणाच्या ध्यानात येत नाही का? पुन्हा बहुजनांना १६-१७ व्या शतकात नेहण्याची व्यवस्था आहे काय? ह्या पिढीच्या शिक्षकांचे सध्या अस्तित्वात असणाऱ्या त्या शाळेतील शिक्षकांचे स्थलांतर होईल त्यांचे नुकसान होणार नाही परंतु त्या शाळेतील सध्याच्या वपुढच्या पिढीतील विद्यार्थ्यांना नेहमीच दुसरीकडे शाळेत जावे लागेल. शिवाय आशा शाळा बंद करून पुढच्या पिढीच्या कष्टकऱ्यांच्या मुलांचा रोजगारही यानिमित्ताने कायमस्वरूपी बंद करणार होणार आहे. आपण जनतेच्या कल्याणासाठी आहोत याचा विसर पडतो आहे काय? असे विघातक निर्णय घेऊन आपण काय साधणार आहात? आपल्यापर्यंत महाराष्ट्रातील तमाम जनतेचा असंतोष; आक्रोश पोहोचत नाही काय. काहीही मार्ग काढा पण चालू असणाऱ्या अस्तित्वात असणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही शाळा बंद करू नका ही कळकळीची नम्र विनंती. आपला नम्र,प्रकाश चिकुर्डेकर वारणानगर जिल्हा कोल्हापूर.

    ReplyDelete
  26. मा.श्री. कपिल पाटील यांच्या वरिल रागापायी कुणाचेही न ऐकता असे सुडाचे राजकारण करणे बरे नाही.

    ReplyDelete
  27. मंत्रीसाहेब गरीब मुलांचे शिक्षण हिरावून घेऊ नका.आताशी कुठे शिक्षण शिकून मुलं लिहायला वाचायला लागली आहेत.मोठ पातक लागेल.

    ReplyDelete
  28. शिक्षणमंत्र्यानी कपिल पाटील सरांना आपल्या हिसाबात बसेल तेवढेच बोलावे.... Tag line

    ReplyDelete
  29. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

  30. Kunal Thukrul5 December 2017 at 00:37
    कारण तुम्ही शिक्षण मंत्री व्हायच्या अगोदर पासुन कपिल पाटील सर मुलांच्या शिक्षणासाठी काय करत होते हे फक्त आम्हाला माहित आहे

    ReplyDelete