Tuesday, 15 September 2015

मंडलची 25 वर्षे - पिछड्यांच्या मुक्तीचा पेच


ज्ञान, कौशल्य आणि सर्जनशीलतेचा मिलाप होतो, तेथेच नवनिर्मिती घडते. शोधांचं अवकाश निर्माण होतं. या मिलापाची आणि अवकाशाच्या निर्मितीची सुरूवात आता कुठेशी होते आहे. मंडल आयोगाच्या शिफारशींमध्येच या अवकाशाची शक्यता दडलेली आहे. 25 वर्षे झाली. मंडल अजून पुरता अमलात आलाय कुठे?

पिछडा पाँवे सौ में साठ!
डॉ. राममनोहर लोहिया यांच्या या जादूई घोषणेने उत्तरेच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली. तोवर विंध्या पलिकडचं राजकारणही उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती. लोहियांनी दलित, ओबीसी नेतृत्वात प्राण पुंकले. पारंपरिक सत्तेच्या परिघात कधीही नसलेल्या समाज समूहातून नवं नेतृत्व उभं राहिलं. ब्राह्मण, रजपूत, ठाकूर यांच्या पलीकडे असलेल्या उपेक्षित जनजातींना सत्तेची कवाडं खुली झाली.

कर्पूरी ठाकूर, बी. पी. मंडल यांच्यापासून ते मुलायमसिंग यादव, शरद यादव, रामविलास पासवान, नितीश कुमार, लालूप्रसाद यादव, उपेंद्रसिंग कुशवाह यांच्यापर्यंत. खूप मोठी रांग आहे ही. मंडलोत्तर राजकारणात या नावांबद्दल बोटं मोडली जातात. पण जयप्रकाशजींच्या आंदोलनात तुरंगात गेलेल्या या त्या वेळच्या तरुण नेत्यांनी काँग्रेसचा पायाच डळमळीत केला होता. लालूप्रसादांचा कथित चारा घोटाळा आणि मुलायमसिंग यादव यांची अलिकडची असंबद्ध वक्तव्ये सोडली तर लोहियांच्या या चेल्यांकडे बोट दाखवता येईल असं एकही वाईट उदाहरण नाही. उलट ज्या ग्रामीण दारिद्र्याच्या आणि सामाजिक विषमतेच्या पार्श्वभूमीतून हे नेतृत्व उभं राहिलं त्याचं कौतुक दोन दशकं होत होतं. 7 ऑगस्ट 1990 या तारखेनंतर चित्र पालटलं.

कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री असताना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केसकर्तनातून होत होता. लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी चुलीवरती स्वयंपाक करत होत्या. मुलायमसिंग शाळेत शिक्षक होते. गांधींचा मार्ग आणि आंबेडकरांचा विचार ज्यांच्या समाजवादातून अविष्कृत झाला होता तो लोहियावादाचा झेंडा या मंडळींच्या खांद्यावर होता. राजकारणातील सत्ताधारी वर्गाशी त्यांचा संघर्ष होता. पण या झेंड्यामुळे भारतीय राजकारणात त्यांची विश्वासार्हता तितकीच मोठी होती. त्यांच्या बदनामीला सुरूवात झाली ऑगस्ट 1990 नंतर. मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची घोषणा पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी केल्यानंतर.

व्ही. पी. सिंग यांनी 7 ऑगस्ट 1990 रोजी घोषणा केली. 13 ऑगस्टला नोटिफिकेशन जारी झालं आणि देशात आग लागली. निर्णय एकट्या व्ही. पी. सिंगांचा नव्हता. शरद यादवांचा तो सल्ला होता. व्ही. पी. सिंगांचे पुतळे जाळले जाऊ लागले. देशातला तथाकथित बुद्धिजीवी वर्ग आणि वर्तमानपत्रेही मंडल विरोधात आग ओकत होती. बंद बाटलीतलं भूत व्ही. पी. सिंगांनी बाहेर काढलं अशी टीका आजही होते. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करत आज दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल यांच्यासारखी आयआयटीतली मंडळी मंडलच्या विरोधात रस्त्यावर होती. मंडलच्या विरोधात उघड भूमिका घेणारे, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणवणारे योगेंद्र यादव यांच्यासारखे बुद्धिवंत आजही बंद बाटलीतलं मंडलचं भूत असंच म्हणतात. त्या निर्णयाला 25 वर्षे होत असताना त्यावर चर्चा होत नसल्याबद्दल संतोष व्यक्त करतात.

मंडलचा परिणाम कुणालाच पुसता आलेला नाही. त्यांच्यासाठी भूत असलेला मंडल कमंडलूत बंद करण्याचा किती प्रयत्न झाला. देशाला कमंडलूच्या त्या राजकारणात मोठी किंमत चुकवावी लागली. लालकृष्ण अडवाणींनी रथ यात्रा काढली. मंडल रोखण्यासाठी धर्मद्वेषाची आग देशभर पेटवण्यात आली. बाबरी मशीद शहीद करण्यात आली. पुढे भाजपला सत्ता मिळाली. पण मंडलचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसलं. मंडलच्या भुतांना भगवी वस्त्र चढवण्यात त्यांना यश जरूर आलं. पण मंडलला गाडण्यात नाही.

कमंडलूचं राजकारण फक्त एकटा भाजपच खेळला काय? काँग्रेसही तोच खेळ खेळत होती. राममंदिराचं टाळं त्यांनीच उघडलं. मंडल हे त्यांच्यासाठी बाटलीत बंद करण्यासाठी भूतच होतं. 12 डिसेंबर 1980 रोजी बी. पी. मंडल यांनी आपला अहवाल आणि शिफारशी पंतप्रधान इंदिरा गांधांच्या हाती सोपवल्या. पुढे दहा वर्षे तो अहवाल बाटलीत बंद करून ठेवण्यात काँग्रेसने धन्यता मानली. काँग्रेस नेतृत्वाची पारंपरिक सत्ता अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी हे करणं त्यांच्या धोरणाला साजेसं होतं. मंडल विरोधात देशात आग लावण्यात भाजप, विद्यार्थी परिषद आणि त्यांच्या अन्य संघटना पुढे होत्या. तर त्या आगीत तेल टाकण्याचं काम देशभर काँग्रेसवालेच करत होते.

मंडल आयोगाने नवीन काय केलं? ती तर घटनात्मक तरतूद होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या संविधानिक तरतुदीसाठी आग्रही होते, त्यात ओबीसींच्या सवलतींचा मुद्दा प्रमुख होता. घटनेत कलम 340 ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोठी देणगी आहे. हे कलम म्हणतं, ‘सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या स्थितीचे आणि त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्याचे अन्वेषण करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी त्यांची स्थिती सुधारण्यासाठी संघराज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्यात त्या संबंधी शिफारशी करण्यासाठी आयोग नियुक्त करता येईल.’

घटनेतील याच कलमाचा आधार घेत 1977 मध्ये सत्तेवर आलेल्या  मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता सरकारने बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. त्याआधी 1953 मध्ये काका कालेलकर आयोग नेमला गेला होता. 1955 मध्ये त्यांचा अहवालही आला. परंतु अंतर्विरोधांनी भरलेल्या त्या अहवालात स्वतलाच गुंडाळण्याची शिफारस होती. मंडल आयोग येण्यासाठी नंतर 25 वर्षे लागली. शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांना 25 वर्षे न्याय नाकारला गेला. मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर 25 वर्षांनंतर या वर्गांची काय स्थिती आहे? मंडल आयोगाने 52 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना 27 टक्के आरक्षण सुचवलं. देशाच्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये या घडीला फक्त 2 टक्के प्रोफेसर आहेत. देशाचं सरकार, विविध मंत्रालयं आणि सार्वजनिक उपक्रम यात ओबीसी नोकरदारांचा टक्का आहे फक्त 4.69 टक्के. दुसऱया वर्गात हे प्रमाण 10.63 टक्के आहे. तृतीय वर्ग कर्मचाऱयांमध्ये 18.98 टक्के आहे. तर चतृर्थ श्रेणीमध्ये 12.55 टक्के आहे. ओबीसी म्हणजे महाराष्ट्राच्या भाषेत भटक्या विमुक्तांसह सर्व इतर मागासवर्गीय. तथाकथित चतुर्वर्णात शूद्र या श्रेणीत येणारे
आरक्षणाच्या विरोधात दिल्ली पाठोपाठ सर्वात मोठं आंदोलन झालं ते गुजरातमध्येच. संघ प्रणित विद्यार्थी परिषदांसारख्या संघटना त्यात पुढे होत्या. त्याच भाजपला आज देशाच्या पंतप्रधानपदी ओबीसी मोदींना स्वीकारावं लागलं. आरक्षण विरोधात चूड लावत सवर्ण मतांची बेगमी एका बाजूला भाजपने केली. तर दुसऱया बाजूला  पक्षाचं मंडलीकरण करत ओबीसी नेत्यांच्या खांद्यावरून अनेक राज्यांमध्ये सत्ता खेचून आणली. देशाच्या अगदी विपरीत महाराष्ट्रात मात्र भाजपने मंडलच्या समर्थनाची भूमिका घेतली. भाजपच्या या मंडलीकरणाचं श्रेय प्रमोद महाजनांना जातं. खरं तर त्यांचे गुरू वसंतराव भागवत यांनी त्याचा पहिला प्रयोग केला. गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व पुढे आणण्यात आलं. हा भागवत प्रयोग पुढे अन्य राज्यांतही भाजपला सत्ता देता झाला. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे मंडल समर्थनाच्या परिषदांमध्ये पुढे होतेतर दुसऱया बाजूला मंडलला उघड विरोध पण ओबीसींना सत्ता असा प्रयोग शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंनी केला.






















मंडलच्या परिणामांची दखल भाजपने ज्या पद्धतीने घेतली. तशी दखल कम्युनिस्टांसह देशातल्या अन्य पुरोगामी पक्षांना घेता आली नाही. मंडल आयोगापुढे साक्ष देताना कम्युनिस्ट पश्चिम बंगालने तर विरोधात भूमिका घेतली होती.काँग्रेस आज देशभर कोसळते आहे ती मंडल विरोधी भूमिकेमुळेच. उत्तर भारतात लोहियावादी जनता दल समाजवादी गट आजही आपले अस्तित्व टिकवून आहे, ते मंडलचा झेंडा खांद्यावर असल्यामुळेच. तेच जनता दल मंडल समर्थक असूनही मंडल समूहांना सामावून घेऊ शकल्यामुळे महाराष्ट्रातून बाद झालं. दक्षिणेत तमिळनाडूत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघंही मंडलवादी आहेत. म्हणून टिकून आहेत. शरद पवारांनाही छगन भुजबळ, सुनिल तटकरे आणि जितेंद्र आव्हाड म्हणून हवे असतात. मंडल वजा करून देशाच्या कोणत्याच भागात राजकारण होऊ शकत नाही. पण मंडल अहवाल राजकारणातल्या जातीय समीकरणापुरताच मर्यादित आहे काय? मंडल अहवालामध्ये एक सुंदर वाक्य आहे, ‘सत्तेच्या वर्तुळात माझा माणूस.’ याच सूत्रावर पिछडा पाँवे सौ में साठ’, हे लोहियांचं गणित उभं होतं. बी. पी. मंडल हे लोहियांचेच पट्टशिष्य. जादू या सूत्रानेच केली आहे. मंडल आयोगाच्या फक्त दोन शिफारशी सरकारने अमलात आणल्या आहेत. नोकरी आणि शिक्षणातल्या आरक्षणाच्या. या वर्गाच्या मुक्तीचा जो व्यापक जाहीरनामा मंडल आयोगाने मांडला आहे, त्याला अजून स्पर्श झालेला नाही. तो होताही उलथापालथ किती घडली. जाती व्यवस्थेने आणि वर्णाश्रमाने ज्ञान आणि कौशल्य यांची फारकत केली. श्रमाचं नाही श्रमिकांचं विभाजन केलं. प्रतिष्ठेची उतरंड तयार केली. पारंपरिक कौशल्य, कारागिरी, कला, सर्जनशीलता आणि अपार कष्टाची तयारी असलेल्या वर्गाला ज्ञानापासून तोडून टाकलं.

स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांत दोन-चार अपवाद सोडले तर देशात संशोधक निपजले नाहीत. जगातल्या पहिल्या पाचशे विद्यापीठात एकही भारतीय विद्यापीठ नाही. ज्ञान, कौशल्य आणि सर्जनशीलतेचा मिलाप होतो, तेथेच नवनिर्मिती घडते. शोधांचं अवकाश निर्माण होतं. या मिलापाची आणि अवकाशाच्या निर्मितीची सुरूवात आता कुठेशी होते आहे. डॉ. आंबेडकरांच्या संविधानातील तरतुदी आणि मंडल आयोगाच्या शिफारशींमध्येच या अवकाशाची शक्यता दडलेली आहे. संविधानातल्या तरतुदी कायद्यात आणि प्रत्यक्षात उतरत नाहीत, मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी प्रत्यक्षात अमलात येत नाहीत तोवर या शक्यतांना धुमारे फुटणार नाहीत.

-------------------------
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ
अध्यक्ष, लोक भारती 
-------------------------
पूर्व प्रसिद्धी - लोकमुद्रा मासिक - अंक पाचवा, सप्टेंबर २०१५

Wednesday, 2 September 2015

शिक्षणमंत्र्यांना खुले पत्र.
















दिनांक : 02/09/2015 
प्रति,
मा. ना. श्री. विनोद तावडे
शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.

महोदय,
'चुकीची माहिती भरणार्‍या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना जेलमध्ये टाकू', या आपल्या धमकीची शाई वाळत नाही तोच आपण राज्यातल्या तमाम शिक्षकांना 'कामचुकार' ठरवलं आहे.

याबाबत मी आपणास दिनांक 13/08/2015 रोजी पत्र पाठवले होते. हे शब्द मागे घ्यावेत म्हणून विनंती केली होती. मात्र आपले उत्तर अजूनही आलेले नाही. उलट 28 ऑगस्टच्या संध्याकाळी राज्याच्या शिक्षण व्यवस्थेलाच हादरवून टाकणारा नवा जीआर आपण जारी केला.

दोन कोटी वि़द्यार्थ्यांचा शिक्षण हक्क का हिरावून घेता?
एक लाख शिक्षकांना सरप्लस करण्यासाठी दोन कोटी वि़द्यार्थ्यांचा दर्जेदार शिक्षण मिळण्याचा आणि त्यासाठी शिक्षक मिळण्याचा अधिकार आपण हिरावून घेतला आहे. शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) मूळ हेतूलाच हरताळ फासत सुप्रिम कोर्टाच्या निकालाचा सोयीचा हवाला देत आपण हा जीआर जारी केला आहे. वि़द्यार्थी पटसंख्या कितीही असो वर्ग खोली असली तरच शिक्षक, तीन्ही भाषांना एकच शिक्षक, सायन्स आणि गणिताला एकच शिक्षक, कला, क्रीडा शिक्षकांना आणि शिक्षवेत्र्तरांना तर हद्दपारी याचा अर्थ स्पष्ट आहे दोन कोटी वि़द्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क आणि त्यांचं भविष्य उ्‌दध्वस्त करण्याचा आपण पण केला आहे. आपल्याला हा अधिकार कोणी दिला?

मराठीला शिक्षक का नाही?
मराठीला राजभाषेचा दर्जा देणारी कायदेशीर तरतूद आपणच केली आहे. मात्र आता मराठीला शिक्षक द्यायचा नाही याचा अर्थ काय? महाराष्ट्रातल्या मुलांना इंग्रजीचं चांगलं शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र शिक्षकच द्यायचा नाही. मराठी, इंग्रजी, हिंदी/उर्दू/संस्वृत्र्त या सार्‍यांसाठी एकच शिक्षक देणारी पदवी कोणत्या वि़द्यापीठात मिळते?

6 हजार कोटी वाचण्यासाठी हा आटापिटा?
माझा एक लाखाचा आकडा आपल्याला खोडसाळ वाटला. पण 24 हजार कोटी वेतन अनुदानातले 6 हजार कोटी रुपये वाचवणार असल्याची बातमी आपल्याच गोटातून (खात्यामार्पत्र्त) वर्तमानपत्रांना रंगवून पुरवली गेली. हे 6 हजार कोटी वेतन अनुदानाचे आहेत ते वाचणार याचा अर्थ सरप्लस शिक्षकांचा आकडा मोठा असणार आहे. शिक्षकांची बदनामी केली की याला मंजूरी मिळेल असा आपला समज असावा.

शिक्षकांची बदनामी का करता?
आपल्या 31 ऑगस्टच्या प्रसिद्धीपत्रकात अनुदानित शिक्षणातून लुबाडणूक आणि चुकीच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी हा जीआर असल्याचं आपण म्हटलं आहे. आपल्या मूळ बातमीत लूट थांबवणार असल्याचं आपण म्हटल होतं. शिक्षक कामचुकार, त्यांचा पगार म्हणजे लूट, लुबाडणूक आणि चुकीची प्रवृत्ती. शिक्षक, मुख्याध्यापकांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करुन आपण थांबलेले नाही आहात. अपशब्दांचा मारा आपण थांबवत नाही आहात.

कारण काहीही असो, राज्याच्या आजवरच्या कोणत्याही शिक्षणमंत्र्यांनी अशी भाषा वापरली नव्हती. असं काय कारण आहे की शिक्षकांबद्दल इतकी टोकाची भाषा आपण वापरावी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, की एकनाथ खडसे, सुधीर मुनगुंटीवार, गिरीष बापट यांच्यासारखे ज्येष्ठमंत्री असोत विरोधकांच्या टीवेत्र्नंतरही ते अपशब्द वापरत नाहीत. संवेनशीलतेने प्रतिसाद देतात. शिक्षणमंत्र्यांनी अशी संवेनशीलता का दाखवू नये?

सुभद्राचे प्राण कुणी वाचवले?
शिक्षणमंत्री महोदय, डहाणू तालुक्यातल्या वाणगाव जवळच्या आदिवासी पाड्यावरची गोष्ट आहे. सुभद्रा राजाराम बालशी या आदिवासी मुलीला 5 ऑगस्टच्या पहाटे झोपेतच साप चावला. त्या मुलीने घरच्यांना उठवलं. पायाला दोरीने घट्ट बांधलं आणि डॉक्टरकडे न्यायला सांगितलं. मुलीचे प्राण वाचले.

डॉक्टरांनी मुलीच्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं. मुलगी म्हणाली, आमच्या शाळेतल्या बाईंनी आम्हांला हे शिकवलं होतं. प्रतिभा क्षीरसागर-कदम हे त्या शिक्षिवेत्र्चं नाव. बाईंनी शिकवलेला धडा तिने प्रत्यक्षात गिरवला. त्या शिक्षिका जर कामचुकार असत्या तर सुभद्राचे प्राण वाचले असते काय?
  
धमकी कशाला?
शिक्षक मुख्याध्यापकांनी खरी माहिती दिली नाही तर शाळा अन्‌ ज्युनिअर कॉलेजांचे अनुदान बंद करु. शिक्षकांवर फौजदारी करु. मुख्याध्यापकांना जेलमध्ये टाकू, अशी ताकीद आपण खुद्द विधान परिषदेच्या सभागृहात 23 जुलै 2015 रोजी दिली होती. ही धमकी कशासाठी? सॉफ्टवेअर चुकलं हे आपण मान्य करता. पण दुरुस्तीसाठी अटी, शर्ती लादता. जेलची भीती दाखवता. हे कशासाठी? शिक्षक आणि मुख्याध्यापक खोटी माहिती भरतील हा अनाठायी संशय कशासाठी व्यक्त करता? राज्यात दोन चार जणांनी चुका वेत्र्ल्या असतील म्हणून सात लाख शिक्षकांबद्दल तुम्ही संशय कसे काय घेता?

तुमच्या डिग्रीबद्दल मी किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही शिक्षकांनी कधीही आक्षेप घेतला नव्हता. चर्चा केली नव्हती. पण प्रामाणिक शिक्षक आणि मुख्याध्यापकांना थर्ड डिग्री लावण्याची आपण भाषा करता. आपण शिक्षणमंत्री म्हणजे आमचे वुत्र्टुंब प्रमुख आहात. वुत्र्टुंब प्रमुखानं अशी भाषा वापरावी?

विद्वानांचं ई-टेंडर काढणार का?
शिक्षण खात्याचा कारभार रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतून चालतो आणि अभ्यासव्रत्र्माच्या संघीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे, या माझ्या आरोपावरही आपण घाईघाईने प्रसिद्धीपत्रक काढले होते. त्यात शिक्षकांना तुम्ही कामचुकार म्हटले. खूप वेदना झाल्या तुमच्या पत्राने.

''जे कपिल पाटील ई-टेंडरचा आग्रह धरतात तेच कपिल पाटील ऑन लाईन अभ्यास समिती निवडण्याच्या प्रक्रियेला कसा काय विरोध करू शकतात?'' असा आरोप आपण केला आहे.

माझा ई-टेंडरचा आग्रह आपण मनाला फारच लावून घेतलेला दिसतो. वह्या, पुस्तकांसाठी लागणारा कागद आणि छपाई यासाठी ई-टेंडर काढलं पाहिजे. खुद्द माननीय मुख्यमंत्र्यांचा तसा आग्रह आहे. आणि तो योग्यच आहे. पण अभ्यासक, वि्‌दवान आणि तज्ज्ञ यांच्यासाठी ई-टेंडर कसं काय काढणार? डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. मंगला नारळीकर, डॉ. रवी सुब्रह्मण्यम, विवेक माँटेरो, डॉ. सदानंद मोरे, गीता महाशब्दे, किशोर दरक, डॉ. जयसिंग पवार या वि्‌दवानांना आजवर शासनाने आदराने बोलावलं. आता त्यांनी ई-टेंडर भरायचं का? आणि टेंडरमध्ये आपली विंत्र्मत काय लिहायची? यांनी ऑनलाईन अर्ज वेत्र्ले नाहीत, हे कारण सांगून वि्‌दवानांना आणि अभ्यासकांना अभ्यास मंडळातून बाहेर काढण्याचा आपण शोधलेला मार्ग अ्‌दभूत म्हणावा लागेल. या सार्‍यांनी तयार वेत्र्लेली पुस्तकं थांबवण्याचे आदेश आपण का दिले आहेत?

आपल्या दाव्यानुसार, ऑनलाईन पारदर्शक प्रक्रियेतून तज्ज्ञ समिती निवडण्यात आली. 6वी ते 12वी पर्यंतचा अभ्यासव्रत्र्म व पाठ्यव्रत्र्म ठरवण्याच्या दृष्टीने त्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत उ्‌दबोधन कोणी केलं? हे आपण एका पारदर्शकपणे जाहीर करून टाकावं.

कामचुकार कोण?
सरकार आपलं आहे. शिक्षणमंत्री म्हणून आपण निर्णय घेण्यास मुखत्यार आहात. पण याचा अर्थ असा नाही की तमाम शिक्षकांना आपण कामचुकार म्हणायचे. त्यांच्याबद्दल संशय निर्माण करायचा. कामचुकार कोण आहेत? शाळेची घंटा होण्यापूर्वी शाळेत पोहोचणारे शिक्षक की इलेक्ट्रॉनिक मीडियाने झोड उठवल्यावर ऑगस्ट क्रांती मैदानात दुपारनंतर पोहोचणारे शिक्षणमंत्री?

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम म्हणाले होते, Only three people can teach righteousness in the heart. They are Father, Mother & The Teacher.

माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, आपण आवेशात येऊन शिक्षकांबद्दल जे काही बोलत आहात, अपशब्द वापरत आहात, ते त्वरित मागे घ्यावेत. माझं नको पण किमान कलामांचं ऐका. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवा, अनुदान द्या, वि़द्यार्थ्यांना दिलासा द्या, सर्वांसाठी पेन्शन जाहीर करा. दोन कोटी वि़द्यार्थ्यांचं शिक्षण उ्‌दध्वस्त करणारा 28 ऑगस्टचा जीआर आपण त्वरीत मागे घ्या. आपण तसे केले नाही तर येत्या शिक्षकदिनी 5 सप्टेंबर 2015 रोजी मी आत्मक्लेशासाठी एक दिवसाचे उपोषण करण्याचे ठरवले आहे. धन्यवाद!

आपला स्नेहांकित,
आमदार, मुंबई शिक्षक मतदार संघ