Friday 6 December 2019

नवे सरकार अंधारात, शिक्षण विभागावर तावडेंचीच सत्ता


आमदार कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र -

दिनांक : ०६/१२/२०१९

प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

विषय :
१. नव्या सरकारला अंधारात ठेवून शिक्षण विभागाने स्थापन केलेल्या अभ्यासगटांचे  आदेश त्वरीत रद्द करण्याबाबत.
२. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे दि. २८ ऑगस्ट २०१५ (संचमान्यता) आणि दि. १७ मे २०१७ (रात्रशाळा) शासन निर्णय रद्द करण्याबाबत.
३. मागील पाच वर्षातील शैक्षणिक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नवा अभ्यासगट स्थापन करण्याबाबत.

महोदय,
राज्यात आपल्या नेतृत्वाखाली नवे सरकार प्रस्थापित झाले असतानाही शिक्षण विभागावर मात्र माजी शिक्षणमंत्री मा. श्री. विनोद तावडे यांचीच सत्ता अद्यापी कायम असल्यागत अधिकारी आदेश काढत आहेत. मागच्या शिक्षणमंत्र्यांनी घेतले निर्णय नव्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शसास आणून देणे आवश्यक असताना ४ डिसेंबर २०१९ रोजी ३३ अभ्यास गट स्थापन करण्यात आले आहेत. हे अभ्यास गट नसून महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे मोडून काढण्याचे नियोजित षडयंत्र आहे. 
४ डिसेंबरचे हे आदेश पूर्णपणे रद्द केले पाहिजेत. हे आदेश मागे घेऊन महाराष्ट्राचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या माजी शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयांचा अभ्यास करण्यासाठी नवा अभ्यासगट नेमावा, अशी माझी आपणास नम्र विनंती आहे. 

दि. ४ डिसेंबर २०१९ रोजी शिक्षण आयुक्त यांनी शासनाच्या आदेशानुसार नवीन ३३ अभ्यासगट स्थापन केले आहेत. या आदेशातच असे म्हटले आहे की, मंत्री मंडळाच्या बैठकीत देण्यात आलेल्या सुचनेनुसार अभ्यासगट स्थापन करण्यात येत आहेत. 

मी स्वतः मा. शिक्षण आयुक्तांकडे याबाबत चौकशी केली. नवीन मुख्यमंत्र्यांकडे किंवा त्यांच्या मंत्रीमंडळापुढे हा विषय मांडण्यात आला होता का? असे स्पष्ट विचारले. तेव्हा त्यांनी दीड वर्षांपूर्वीचाच हा निर्णय असल्याचे स्पष्ट केले. याचा अर्थ हा निर्णय आणि हा आदेश तत्कालीन शिक्षणमंत्री मा. श्री. विनोद तावडे यांच्या काळातीलच आहे, हे स्पष्ट होते. त्यांच्या नंतर शिक्षणमंत्री झालेले मा. श्री. आशिष शेलार यांनाही दोष देता येणार नाहीत. कारण त्यांच्या काळातील हे निर्णय नाहीत. स्वतः मा. श्री. विनोद तावडे यांनी त्यांच्या काळात जाहीर केलेले हे निर्णय आहेत. आता नवीन सरकार आलं असताना खुद्द नवीन मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून शिक्षण विभागाने हे आदेश काढले आहेत. हे धक्कादायक आहे. नवीन सरकारच्या मंत्रीमंडळाच्या चार बैठका झाल्या. पण कुठेही त्यांच्या निदर्शनास सदर बाब आणण्यात आलेली नाही. 

विविध ३३ अभ्यासगट स्थापन करण्याचे मा. शिक्षण आयुक्तांचे सदर आदेश विनाविलंब मागे घेण्याची आवश्यकता आहे. या अभ्यासगटांना मान्यता देणे म्हणजे महाराष्ट्रातील अनुदानित शिक्षण व्यवस्था संपवून टाकण्याच्या षडयंत्राला मान्यता देण्यासारखे होईल. महाराष्ट्रात अनुदान व्यवस्था संपवून प्रतिविद्यार्थी अनुदान म्हणजे व्हाऊचर सिस्टीम सुरू करण्याचा डाव यामागे आहे. शिक्षकांना वेतन आयोगानुसार पगार देण्याऐवजी जितके विद्यार्थी तितक्या विद्यार्थ्यांच्या फी चे पैसे सरकार देणार. त्यातून पगार भागवायचा. म्हणजे मोठ्या पटसंख्येच्या शाळांचा पगार मोठा राहिल. खेड्यापाड्यातील  छोट्या शाळांचे पगार छोटे होतील. समान कामाला समान वेतन राहणार नाही. वेतन आयोग राहणार नाही. सर्व शिक्षक कंत्राटी मजूर बनतील. 

छोट्या शाळा बंद करून फक्त १ हजार पटांच्या शाळांना परवागनी देण्याचा निर्णय तत्कालीन शिक्षण सचिव श्री. नंदकुमार यांनी जाहीर केला होता. १३ हजार शाळा त्यांनीच बंद केल्या. राज्यात १ लाख शाळा आहेत. त्यातील फक्त ३० हजार शाळा शिल्लक ठेवून उरलेल्या ७० हजार शाळा बंद करण्याचा तो कार्यक्रम होता. 

अल्पसंख्यांक शाळांचे अधिकार संपवणे, शिक्षण संस्थांची स्वायत्तता संपवणे, सामान्यांचे शिक्षण फक्त कौशल्य आधारीत करणे, वेतन आणि वेतनतर खर्चासाठी सीएसआर फंडावर जबाबदारी टाकणे, शिक्षक संख्या कमी करून त्यांना खिचडी शिजवणे (शालेय पोषण आहार) व इतर सेवा कामे देणे, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणे असे या अभ्यासगटांमागचे उद्देश आहेत. 

शिक्षणासाठी दलित, ओबीसी, आदिवासी, गरीब आणि विशेष गरजा असलेले विद्यार्थी (CWSN - अंध, अपंग, मतीमंद विद्यार्थी) यांना मिळणाऱ्या सवलती संपवून टाकणे असा मुख्य उद्देश तत्कालीन शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी त्यांच्या शैक्षणिक धोरणात जाहीर केला होता. त्यांचे ते धोरण माजी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी Scrap केले होते. नंतरचे शिक्षणमंत्री श्री. आशिष शेलार यांनीही चुकीचे धोरण चालू न ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मागच्या दाराने त्याची अंमलबजावणी सुरू होती. हे या अभ्यासगटांमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आता तर नव्या सरकारला पूर्णपणे अंधारात ठेवून तावडेंचा कार्यक्रम आदेशान्वये जाहीर झाला आहे. तो ताबडतोब रद्द केला पाहिजे. 

गणित, विज्ञान, समाजशास्त्र व कला, क्रीडा शिक्षक कमी करणारी संचमान्यता (२८ ऑगस्ट २०१५), रात्रशाळा संपवण्यासाठी दुबार शिक्षकांना नोकरीवरून काढणे (१७ मे २०१७) यासारखे शासन निर्णय ताबडतोब रद्द केले पाहिजेत. आपण हे करावे आणि मागच्या पाच वर्षात शिक्षण क्षेत्रात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नवीन अभ्यासगट स्थापन करावा, ही विनंती. धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, वि.प.स.
अध्यक्ष, लोक भारती


108 comments:

  1. अगदी बरोबर साहेब..हे निर्णय रद्दच व्हावेत.

    ReplyDelete
    Replies
    1. साहेब हे सगळं एकदाचं संपवलं पाहिजे .ते आपणच करू शकता !!या कार्यासाठी आमच्या खुप खुप शुभेच्छा!!

      Delete
  2. नक्कीच साहेब.....योग्य विचार

    ReplyDelete
  3. Replies
    1. Correct sir,..100% anudan hawe.

      Delete
    2. This G.R.is nothing but the conspiracy to demorolise teachers.

      Delete
    3. Saheb tumachya aashirvadane anek lokancha sansar vachnar ahe

      Delete
  4. Respected sir,
    Thanku very much your work for us and our education system are realy appriciated.

    ReplyDelete
  5. Agadi babobar sir.cansal 33 study group...

    ReplyDelete
  6. our edu system is not appreciated





    ReplyDelete
  7. सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी टी ई टी माफ करणे साठी पण प्रयत्न करा .यातील बहुतेक लोक 20% अनुदानावर 7 वर्षापासून कामे करीत आहेत आणि आता त्यांना सेवेतून टी ई टी पास नसल्यामुळे काढून टाकणे कितपत योग्य आहे याचा आपण विचार करा .

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी योग्य पण जे टी ई टी पास आहेत त्यांचे काय

      Delete
    2. Correct decision aahe aaple sir

      Delete
  8. 100% right sir.विनाअनुदानित क.म.वि.चा प्रश्न महत्त्वाचा आहे

    ReplyDelete
  9. अगदि योग्य साहेब.

    ReplyDelete
  10. आ.कपिल पाटील सर, आपण घेतलेला पुढाकार अतिशय योग्य असून आपण लिहलेल्या पत्राबद्धल आपले मनःपूर्वक अभिनंदन व आपल्या कार्यास शुभेच्छा.....(प्रा.नानासाहेब निवल, अमरावती)

    ReplyDelete
  11. सदैव सजग नेतृत्व

    ReplyDelete
  12. अतिशय महत्वाच क्रिडा शिक्षक प्रत्तेक शाळेत असावा

    ReplyDelete
  13. साहेब ,अगदी योग्य आहे ही आपली भूमिका , या क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी ,आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत .

    ReplyDelete
  14. अतिशय योग्य मागणी आहे.अभ्यासपुर्ण

    ReplyDelete
  15. मा.पाटीलसर अगदी बरोबर
    शासनाने ग्रामीण शिक्षण व्यवस्था उध्वस्त करण्याचा विडाच उचलला आहे अशी शंका येते.६-१४वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची हमी आरटिई कायद्याने दिली असतांनाच वारंवार धोरण बदलले घातक आहे.प्राथमिक शिक्षण १००टक्के शासनाने दिलेच पाहिजे त्यातून पळवाटा शोधून नयेत

    ReplyDelete
    Replies
    1. You are 100%right Sir....Government should not run away from it's basic responsibility to educate the children on nominal fee or free charges..

      Delete
  16. सर अगदी योग्य विचार आहे शिक्षकांचा कैवारी म्हणून लोक आपल्या कडे पाहता
    सर असेच अजुन एक काम करता येईल का ते बघा आम्ही पायाभूत पदावर काम करणारे लोक गेली 10 वर्षापासुन विनावेतन कां करित आहेत त्याविषयी पण असेच लक्ष घाला
    धन्यवाद सर

    ReplyDelete
  17. मा कपिल पाटील सर तावडेंनी फक्त पाच वर्षात नुसते जि आर काढण्यात दांडशाही मग्रुरी याच्यात काढले पहिल्या पासून साहेब तुम्ही आमच्या पाठीशी आहात विधानभवन सुद्धा तुम्ही गाजवले तुमच्यामागे एकही मावळा नव्हता आता सर्व तुमच्या पाठीशी आहोत शुभेच्छा देतो व आभार मानतो

    ReplyDelete
  18. साहेब क्षेत्रिय स्तरावरिल कनिष्ठ महाविद्यालयाचा अनुदानाच प्रशन मार्गी लावा साहेब खुप खुप आभारी राहू साहेब !!!!!

    ReplyDelete
  19. It’s reall true sir and thanks a lot ��������

    ReplyDelete
  20. धन्यवाद सर असेच कार्य करत रहा. सहाव्या वेतनाचे थकबाकी अजून पर्यंत मिळालेली नाही याबद्दल सुद्धा प्रयत्न करावे ही विनंती.

    ReplyDelete
  21. मा कपिल पाटील सर तावडेंनी फक्त पाच वर्षात नुसते जि आर काढण्यात दांडशाही मग्रुरी याच्यात काढले पहिल्या पासून साहेब तुम्ही आमच्या पाठीशी आहात विधानभवन सुद्धा तुम्ही गाजवले तुमच्यामागे एकही मावळा नव्हता आता सर्व तुमच्या पाठीशी आहोत शुभेच्छा देतो व आभार मानतो

    ReplyDelete
  22. असले चुकीचे आदेश रद्दच करायला हवे . आमदारांनी लिहलेले पत्र अतिशय योग्य आहे.-Anil hankare

    ReplyDelete
  23. साहेब आम्ही आपल्यासोबत.

    ReplyDelete
  24. शैक्षणिक धोरण

    ReplyDelete
    Replies
    1. Sir ji PF pension sathi kuchh kijiye aise hi
      Very nice.

      Delete
  25. सरजी, आपल्या जागरूक नेतृत्त्वाला सलाम .

    ReplyDelete
  26. शिक्षण शेत्राला मागे नेणारे व शिक्षकांना त्रासदायक असे शासन निर्णय नव्या सरकारने रद्द करावे.व शिक्षकांना न्याय द्यावा.

    ReplyDelete
  27. पाटील सर आपणाला या चांगल्या कार्याबद्दल खूप खूप अभिनंदन..
    "ज्याला शिक्षणाची आस त्यालाच शिक्षणाचा खरा विचार"
    या विचाराचे आपण आहात....
    आणि विनोद तावडे नी खरोखर शिक्षकाच्या जीवनाचा कहर करून ठेवलंय हे आपण ही जाणता..
    शिक्षक व शिक्षण यातील पहिल्या शि या शब्दाचा विनोद तावडे ला कसलाच अर्थ माहिती नसेल तरीही शिक्षकाच्या जिवनाची व संसाराची त्यांनी राखरांगोळी करण्याचा आटोकाट प्रयत्न करून ठेवलेला आहे हे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू व शिक्षक आमदारांना ही माहिती आहे व याच तमाम गोरगरीब शिक्षकांचा त्यांच्या कुटुंबांचा त्यांच्या मुलाबाळांचा तळतळाट लागून निवांत बसलेला आहे तरीही त्याचे डोके शांत नाही नंतर दुसरी बाजू देवेंद्र फडणीस जो की मी पुन्हा येईन पुन्हा येईन असं म्हणणारा जाता जाता त्याने असा कट करून गेला की मला सत्ता नाही मिळाली तर मी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचा नायनाट करून जाईन असा अभ्यास गट त्याने तयार केलेला आहे यावर आपली प्रतिक्रिया अतिशय योग्य आहे.
    आपण जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे ती अतिशय योग्य आहे व आपण जे आमच्या साठी म्हणजे शिक्षक बंधू साठी जे कार्यकर्ता नेहमीकरता याबद्दल मी शतशः आपला आभारी आहे..

    ReplyDelete
  28. लढेंगे जितेंगे आम्ही कायमचे सोबती

    ReplyDelete
  29. सतीश चौधरी, खिरवड .
    सन्माननीय आमदार साहेब शिक्षणक्षेत्रातील जागरूक नेतृत्त्वाला सलाम .

    ReplyDelete
  30. सतीश चौधरी, खिरवड .
    सन्माननीय आमदार साहेब शिक्षणक्षेत्रातील जागरूक नेतृत्त्वाला सलाम .

    ReplyDelete
  31. साहेब,आपणच हे करु शकता

    ReplyDelete
  32. सरजी, आपल्या जागरूक नेतृत्त्वाला सलाम .

    ReplyDelete
  33. उठसुठ शिक्षणक्षेत्रावर नवीन नवीन कल्पना आणून , विद्यादान च्या कामात अडथळे आणण्याचे सत्र सुरू केले आहे, साहेब आपल्या सारखे जागृत आमदार आहेत म्हणून ठीक नाही तर शिक्षण क्षेत्रावर खूप वाईट दिवस आले असते

    ReplyDelete
    Replies
    1. कपिल पाटिल आत्ताच जागृत झाले..का ?

      Delete
  34. Yogyach ahe sir vinodravanche bhut utarun takayala pahije

    ReplyDelete
  35. सन्माननीय आमदार कपिल पाटील साहेब आपल्या जागरूक आणि सडेतोड नेतृत्वास मनपूर्वक सलाम.

    ReplyDelete
  36. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अश्या प्रकारचे निर्णय राबवणे म्हणजे सर्व सामान्य बहुजन वंचित मागासवर्गाला शिक्षणासारख्या सोयीसुविधांपासून दूर ठेवणे हाच उद्देश् या परिपत्रकामागे दिसतो .हा GR रद्द्च केला पाहिजे .

    ReplyDelete
  37. आपण निदर्शनास आणून दिले त्या मुळे गरीब मुलाचे शिक्षण हक्क कायदा मोडून काढण्यासाठी धनाढ्य लोकांच्या विरुद्ध बंड पुकारला
    अपल्या नेतृत्व सलाम

    ReplyDelete
  38. माननीय आमदार पाटील साहेब आपल्या कार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन 💐💐🙏🙏

    ReplyDelete
  39. माननीय आमदार पाटील साहेब आपल्या कार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन 💐💐🙏🙏

    ReplyDelete
  40. Kapil patil sir is the correct voice of teachers,keep it up sir

    ReplyDelete
  41. Correct sir ,real voice of teacher

    ReplyDelete
  42. मा.पाटील साहेब,
    आपल्या सजगते मुळे नवीन अभ्यासगट नक्की नेमला जाईल अशी पक्की खात्री आहे.धन्यवाद...!

    ReplyDelete
  43. मा.पाटील साहेब,
    आपल्या सजगते मुळे नवीन अभ्यासगट नक्की नेमला जाईल अशी पक्की खात्री आहे.धन्यवाद...!

    ReplyDelete
  44. मुख्यमंत्री साहेब,पूर्ण वाट लावली ह्या शिक्षण खात्याची आणि सर्व शिक्षकांची,कृपया आपण बारकाईने लक्ष घालण्याची गरज आहे....please😢😢😢😢

    ReplyDelete
  45. मा.आ.श्री.कपिल पाटील साहेब,आपले खर्रच खूप खूप आभार, करण सत्य परिस्थिती लक्षात आणून दिल्याबद्दल.... धन्यवाद👍

    ReplyDelete
  46. साहेब आपल्या सारख्या सजग शिक्षक आमदारांनी विधानसभेत आज पर्यंत सरकारच्या चुकीच्या निर्णया विरोधात आवाज उठवला आहे म्हणून.आज शिक्षक काम करत आहेत आणि या पुढेही आपण सरकारला घाम फोडाल अशी खात्री आहे.म्हणूच आम्ही नेहमीच आपल्या पाठीशी राहिले आहे आणि यापुढेही राहू "जय हिंद"

    ReplyDelete
  47. मुख्यमंत्री साहेब,पूर्ण वाट लावली ह्या शिक्षण खात्याची आणि सर्व शिक्षकांची,कृपया आपण बारकाईने लक्ष घालण्याची गरज आहे....please😢😢😢😢

    ReplyDelete
  48. साहेब येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न प्रथम प्राधान्य देऊन त्या सोबतच माझी शासकीय शाळा(जि.प.माध्यमिक शाळा)यांचे अनेक वर्षांनी रीक्त असणारे राजपञित मुख्याध्यापक पदे भरणे आणि माध्यमिक स्तर शाळांत मध्ये कमीत कमी पुर्वी प्रमाणे ०५ शिक्षक आणि शा.शि.,कला शिक्षक विशेष शिक्षक दर्जा असणारी मान्य करुन नविन भरती करणे बाबत सुचवावे हि विनंती ...

    ReplyDelete
    Replies
    1. मा. आ. पाटील साहेब आपले खुप खूप आभार.

      Delete
  49. सर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध कधी उठवणार गेले 10/10 वर्षे झाले बिनपगारी काम करीत आहोत

    ReplyDelete
  50. नविन सरकार च्या नावाने निर्णय

    ReplyDelete
  51. कपिलजी आपणच आता शिक्षण मंत्री व्हा आणि शिक्षकांची प्रश्न सोडवावेत...हि विनंती

    ReplyDelete
  52. Absolutely right Sir our state all India 2nd no in education but after 2012 we back 25 years Mr Tawde educations policies

    ReplyDelete
  53. साहेब आपल्या पाठीस सदैव आम्ही खंबीरपणे राहु
    गजानन वाघमारे diet नागपूर

    ReplyDelete
  54. Saheb kahitari Kara shikshanche jiwan Barbad honyapasun vachava. Dargedar shikshanche milave hich Apexa.

    ReplyDelete
  55. साहेब सरकार चे डोळे चांगल्या प्रकारे ऊघडा.
    सरकारी शाळा वाचवा.नाही तर देश समृध्दी कडून अधोगतीला जायला वेळ लागणार नाही.
    गरीबांचे मुलं शिक्षणापासून वंचीत राहतील.

    ReplyDelete
  56. मागील सरकारचे असे सर्व निर्णय हाणून पाडले पाहीजेत तुम्ही होते म्हणून त्यांच्यावर थोडे तरी दडपण होते म्हणून नाही तर व्हॉचर सिस्टम आतापर्यंत सुरू झाली असती साहेब अपेक्षा हीच या शासनाने तरी याकडे गांभीर्याने पाहीले पाहीजे

    ReplyDelete
  57. Teachers remain optimistic because of your efforts to provide them a respectful life. May you be successful. Thank you so much sir foe being our voice.

    ReplyDelete
  58. मा. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी मराठमोळे निर्णय घ्यावे. मराठी शाळा, मराठी माणूस, मराठी अस्मिता टिकवून अस्सल शिवशाही निर्णय घ्यावे.

    ReplyDelete
  59. चुकीचा निर्णय आहे.एकाच बाजूचा निर्णय आहे

    ReplyDelete
  60. Sir aamchya 20%Vinanudanit shikshkansathi kahi kara pliz

    ReplyDelete
  61. चुकीचा निर्णय आहे हा

    ReplyDelete
  62. आमचा तुम्हाला या बाबतीत नेहमी पाठिंबा राहील. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच....

    ReplyDelete
  63. Today I told our15 teachers about this news and tell them that mr.patil sir,will100% help us and guide to govt,sir so we debar them from our state,sir amhala apla Darth abhiman ahe.

    ReplyDelete
  64. Thanks saheb cashless mediclaim final kara sir

    ReplyDelete
  65. आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत.

    ReplyDelete
  66. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे साहेब प्रत्येक विषयाचा पदवीधर विषय शिक्षक स्पेशल रित्या न दिल्याने विद्यार्थ्यांचे
    खूप नूकसान होत आहे.. याकडेही साकल्याने विचार करून
    लक्ष देणे आवश्यक आहे..

    ReplyDelete
  67. It will be Great HONOURS to THE TEACHERS.

    ReplyDelete
  68. We are in your SUPPORT.
    CASHLESS MEDICLAIM FACILITIES SHOULD BE GIVEN TO THE TEACHERS AS EARLIER AS POSSIBLE.
    Most of TEACHERS NOT ABLE TO GET GOOD TREATMENT.
    Definitely it will be helpful for them.

    ReplyDelete
  69. We are with you Mr.Patil sir

    ReplyDelete
  70. अगदी बरोबर साहेब,
    आमच्या सारख्या सर्वसामान्य शिक्षकांचा रोष सुध्दा शासनापर्यंत पोहचायला हवा

    ReplyDelete
  71. मा.कपिल पाटील सर
    आम्ही आपल्या पाठीशी आहोत .पण आपणच सांगत आहात समान काम समान वेतन मग रात्र शाळेच्या शिक्षकांना समान वेतन
    मिळत आहे का ? आपणाकडे खूप अपेक्षा होत्या की रात्र शाळा शिक्षकांना समान वेतन मिळऊन द्याल परंतु 17मे चा जी आर रद्द करण्याची मागणी करून रात्र शाळा शिक्षकांना रस्त्यावर आणण्याचं पाप करू नये
    आपल्याला रात्र शाळा शिक्षकांचे चांगले नसेल तर वाईट इछ्यू नका हीच नम्र विनंती

    ReplyDelete
  72. स्कॉलरशिप /फ्रीशीप ची वेबसाईट पण एक आठवड्या पासून निर्णय घ्यायला कोणी नसल्यामुळे बंद आहे, विध्यार्थ्याना तहसील मधून दाखले मिळायला एक ते दिड महिन्याचा कालावधी लागतो,आपले सरकार ची वेबसाईट तर नुसती टाईमपास आहे,एकदा योग्य रेझोलूशनची डॉक्युमेंट अपलोड केल्यावरही पुन्हा पुन्हा अपलोड करायला सांगून हैराण करतात.विध्याथ्याना डॉक्युमेंटस देण्याची सोपी पद्धत शुरू केली जावू शकणार नाही का ?

    ReplyDelete
  73. अगदी योग्य वेळी योग्य निर्णय.अभिनंदन

    ReplyDelete
  74. Sir, you are right. We support you.

    ReplyDelete
  75. कपिल पाटील साहेब ,सगळे महाराष्ट्राचे शिक्षक आपल्या पाठीशी आहेत शिक्षकांवर अन्याय होत आहे आणि शिक्षणाचे सगळे बाजारीकरण करून टाकले आहे न्याय व्यवस्था कुठे गेली काय कळत नाही सगळी हुकूमशाही चालू आहे तावडे साहेबांचा GR रद्द करा .

    ReplyDelete
  76. Sir surplus teacher ko jis school me bheja gaya wahan se in ko hataya na Jaye kyun k is se teacher ka mind disturb hota h

    ReplyDelete
  77. Sir humari dua hai ki Allah Aap ko kamiyab kare,Aap ko sehat wa tandurust rakh taki Aap isi Tarah teachers aur non teaching staff ke bhalai ke kam karte rahein.Aameen.

    ReplyDelete