Friday 12 June 2020

तूर्त शाळा नको ...


प्रति,
मा. मुख्य सचिव
महाराष्ट्र राज्य

1) शाळा, कॉलेज 15 ऑगस्ट पर्यंत सुरू करू नयेत, असे जाहीर निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री मा. ना. श्री. रमेश पोखरियाल उर्फ निशंक यांनी दिले आहेत.

2) कोरोनाच्या स्थितीत शाळा सुरू करण्याची घाई करू नका. त्याऐवजी शिक्षण सुरू ठेवण्यासाठी इतर सर्व पर्याय शिक्षण विभागाने अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता असल्यास टेलिव्हिजन, प्री लोडेड टॅब, ऑनलाईन किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शिक्षण सुरू ठेवायचा प्रयत्न करावा. त्यासाठी आवश्यक ते ट्रेनिंग शिक्षकांना देण्यात यावं, असे सुस्पष्ट आदेश मा. मुख्यमंत्री यांनी मा. शालेय शिक्षण मंत्र्यांना झूम बैठकीत दिले होते. या बैठकीला मी उपस्थित होतो.

महोदय,
वरील दोन्ही संदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाने काहीही कार्यवाही केलेली नाही. 

15 जून पासून शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण निरीक्षक / शिक्षणाधिकारी यांनी तोंडी व Whatsapp आदेश दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण आहे. 

शिक्षकांना तातडीने शाळेत हजर राहण्याचे आदेश गेलेले आहेत.

15 जून पासून शाळा सुरू करायच्या म्हणजे कसे? असे मुख्याध्यापक आणि शिक्षक विचारत आहेत. 

मुंबईसह राज्यातील बहुतेक शाळा कॉरंटाईन सेंटर झालेल्या आहेत. त्यांच्या निर्जंतुकीकरणाची आवश्यकता आहे. 

लोकल ट्रेन, बस सुरू झालेल्या नाहीत. शिक्षकांनी यायचे कसे? त्यामुळे वर्क फ्रॉम होमबाबत विचार होण्याची गरज आहे.

बाहेरगावी अडलेल्या शिक्षकांना आपापल्या कार्यक्षेत्रात जाण्यासाठी पास उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

70 टक्क्यांहून अधिक शिक्षक हे कोविडच्या विविध ड्युटीवर अद्यापी कार्यरत आहेत. त्यांना परत बोलवण्यात आलेले नाही. 

केंद्र सरकार आणि मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशाची दखल अद्यापी शिक्षण विभागाने घेतलेली नाही. 

शाळा सुरू होऊ शकणार नाहीत ही बाब लक्षात घेऊन शाळाबाह्य (ऑनलाईन, टेलिव्हिजन, वर्कबुक, वर्कशीट इ.) शिक्षण कसे सुरू ठेवावे. याबद्दल कोणतेही प्रशिक्षण शिक्षण विभागाने शिक्षकांना आजतागायत दिलेले नाही. 

संचमान्यतेचे निकष निश्चित करणारा 28 ऑगस्ट 2015 चा अन्यायकारक जीआर, कला - क्रीडा विषयांवर अन्याय करणारा 07 ऑक्टोबर 2015 चा जीआर आणि रात्रशाळा बंद पाडणारा 17 मे 2017 चा जीआर हे अशैक्षणिक शासन निर्णय तातडीने रद्द करण्याबाबत सर्व मान्यवरांनी विनंती करूनही शिक्षण खात्याने त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही. 

शिक्षकांची मोठ्या संख्येने गरज असताना सरप्लस शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेत तातडीने बोलावून घेण्याबाबतही शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. 

शाळा प्रत्यक्ष सुरू होत नाहीत तोवर शाळाबाह्य शिक्षण सुरू ठेवण्याबाबत अडचणी असल्यातरी आणि कामाचा बोजा वाढत असला तरी शिक्षक त्यासाठी तयार आहेत. मात्र ते कधीपासून व कसे सुरू करायचे याबाबत अद्यापही कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. 

शिक्षक हे सर्व काम वर्क फ्रॉम होम करण्यास तयार आहेत. ग्रामीण भागातील शाळांबाबत वेगळा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. 

हे ऑनलाईन / शाळाबाह्य शिक्षण सुरू ठेवले तरी त्यातून मिळणारा परिणाम हा फार असण्याची शक्यता कमी आहे. सबब शाळा फिजिकली दिवाळी नंतरच सुरू कराव्यात किंवा वॅक्सिन आल्यानंतर सुरू कराव्यात आणि दरम्यानच्या काळात झालेले शैक्षणिक नुकसान पुढील वर्षाच्या काळात भरून काढावे. येत्या दोन वर्षात दीर्घ सुट्ट्या कमी करून झालेले नुकसान भरून काढता येईल. त्यासाठी शिक्षण विभागाने आखणी करण्याची आवश्यकता आहे. 

स्थलांतरीत कामगारांची मुले आपापल्या गावी किंवा अन्य राज्यात गेलेली आहेत. त्यांना शोधणे, त्यांचा ट्रॅक ठेवणे व त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी शिक्षकांचे सहकार्य लागणार आहे. याबाबतही शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय मा. मुख्यमंत्री यांनी घेतला असताना. शाळा, कॉलेज सुरू ठेवण्याचा आग्रह ज्या पद्धतीने केला जात आहे. ती चिंता वाटणारी बाब आहे. 

कृपया याबाबत तातडीने कार्यवाही करावी आणि 15 जून पूर्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना अवगत करावे, ही विनंती.
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, विपस

दि. 12 जून 2020

-------------------------

याच संदर्भात यापूर्वी लिहलेले ब्लॉगही जरूर वाचा -

शाळा नाही पण शिक्षण सुरु
Tap to read - https://bit.ly/3gLnPbF

-------------------------

कोरोना काळातलं शिक्षण ...
Tap to read - https://bit.ly/2X2pUI7

16 comments:

  1. अगदी बरोबर साहेब..1जुलै पासुन विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून केवळ 9ते 12 चे वर्ग आॕनलाईन किंवा Tv माध्यमातून शिक्षण सुरू करता येईल..पण प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थी 15 आॕगष्ट नंतर लस उपलब्द झाल्यानंतरच सुरू करावे.ही विनंती शिक्षक भारती नागपूर जिल्हा तर्फे आज वेबीनार मध्ये ठरविण्यात आले.

    ReplyDelete
  2. मा.कपिल पाटिल साहेब, पञात उपस्थित केलेल्या सर्व मुद्य्यांशी आम्हि सहमत आहोत.

    ReplyDelete
    Replies
    1. मा.कपिल पाटील साहेबांच्या मुद्यांशी मी सहमत आहे.

      Delete
  3. सर बरोबर आहे .सरकारी नोकरदार जूनी पेन्शन डाॅकटर शिक्षक पोलिस पेन्शन द्या कम॔चारी जोरात काम करतील

    ReplyDelete
  4. साहेब आपल्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहेत
    शिक्षकभारती

    ReplyDelete
  5. जब तक मुम्बई को ग्रीन जोन घोषित न किया जाए तब तक स्कूल, कालेज और अन्य विकर्षण संस्थाएं बन्दर रखा जाए और आनलाइन शिक्षण एक से नवी कक्षाएं तक नहीं किया जाना चाहिए

    ReplyDelete
  6. सर्व मुद्दे व्यवस्थित, मांडलेले आहेत, लवकर मान्य झाले पाहिजे.ही विनंती.

    ReplyDelete
  7. आ.पाटील सर आपली भुमिका नेहमी शिक्षक व विद्यार्थी केंद्रीत राहीली आहे..शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, एकुण विद्यार्थी संख्या, उपलब्ध डेस्क बेंच..होणारे संक्रमण याची खातरजमा करूनच शाळा सुरू करण्याचा विचार शासनाने करावा...स्व च्या मुलाला सुरक्षित ठेवता मग गरीबांच्या मुलांच्या जीवाला धोक्यात का टाकायचे?शाळा,वरीष्ठ अधिकारी,मंत्री विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे स्विकारतील का?हा महत्त्वाचा प्रश्न आहे...आज जीव वाचवणे महत्त्वाचे आहे...शिक्षण online ,tv,radio,channels द्वारे पण दिल्या जावु शकेल..
    सर आपले आभार...🙏🏻

    ReplyDelete
  8. मान.पाटील साहेबांनी अत्यंत तळमळीने विद्यार्थी हित समोर ठेवून अभ्यासपूर्ण भूमिका मांडलेली आहे.
    सर आपले मनापासून आभार.

    ReplyDelete
  9. धन्यवाद सर
    आपण नेहमीच योग्य पध्दतीने मुद्दे मांडता. परंतू शिक्षण विभागाकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरीत रहातात. व त्यामुळे शिक्षक व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.क्रुपया हा तिढा लवकरात लवकर सुटले याचा प्रयत्न करावा.त्यामुळे पालक व शिक्षक यांच्यातील संभ्रमाचे वातावरण दूर होऊन सर्व सुरळीत होइल. व हे आपल्या प्रयत्नानेच होऊ शकते. धन्यवाद.

    ReplyDelete
  10. सर नमस्कार आपण अतिशय उत्तम पद्धतीने शासनास सांगितले आहे.दत्ताभाऊ तोरसकर माजी अध्यक्ष इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघ जय जगदंब

    ReplyDelete
  11. सर सर्व शिक्षकांच्या वतीने आपले आभार वेळोवेळी आपण विद्यर्थ्यांचे व शिक्षकांचे हित जोपासून आवाज उठवित असतात शाळा सुरु करण्याचा अट्टाहास हा फक्त फीस वसूल करण्यासाठी दिसत आहे अगोदर पावसाळी अधिवेशन तर सुरु करा जनतेचे प्रश्न सोडवा गोरगरीबांच्या मुलांना शाळेत तुम्ही सुविधा पुरवू शकता का? तशा सुविधा ग्रामीण भागात आहेत का? जो पर्येन्त कोरोना वर लस तयार होत नाही तो शाळा सुरु करणे म्हणजे धोक्याचे लक्षण आहे

    ReplyDelete
  12. अगदी बरोबर आहे सर, मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढता येईल पण जिवीतहानी भरून काढता येणार नाही.धन्यवाद सर आम्ही आपले आभारी आहोत. शासन योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा!


    ReplyDelete
  13. Yes patil sir you are right. Until and unless train and buses starts regularly proper functioning of school is next to impossible.

    ReplyDelete
  14. मग सर उद्या शाळेत जाणे गरजेचे आहे का❓उद्या सही नाही केली तर जून चा पगार मिळणार नाही का ❓

    ReplyDelete